Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
शुभेच्छापत्र

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » आश्विन » ललित » शुभेच्छापत्र « Previous Next »

Prasik
Monday, October 02, 2006 - 1:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



शुभेच्छापत्र

प्रथम तुम्हाला दसय्राच्या शुभेच्छा देतो आणि सुरुवात् करतो. दसरा म्हटला की मला आठवते ते म्हणजे आपट्याच्या पांनाचे सोने आणि माझा ज्युनिअर कॉलेजचा मित्र शाम. दसर्याला आम्ही सर्व मित्र एकमेकानां आपट्याची पाने सोने म्हणून द्यायचो. पाने देताना त्यावर् एखादा मेसेज किवॉ कसलेतरी चेहरे काढून द्यायचो. (स्माइलिज सारखे दिसणारे :-) असे)क्लासमधे ह्याचे सोने त्याला आणि त्याचे आणखी कोणाला तरी असे पास करत असायचो. एखाद्या आवडत्या मुलीने दिलेले मात्र खय्रा सोन्यासारखे सांभाळून ठेवायचो. अजून काही मुले तो पालापाचोळा स्वःताच्या पॉकेट्मधे सांभाळतात, आठवण म्हणुन. सोने जसे मित्रांना द्यायचो तसे सर व मॅडमना देखील देण्याचा प्रोग्राम व्हायचा. अर्थात सोने देताना लेक्चरचा पंधरा-वीस मिनीट टाईम मस्त पास होत असे हा त्यामागचा उद्देश असायचाच. शाम मात्र सोने देताना देखील ते खय्रा-खुय्रा सोन्यासारखे रंगवून लाल रंगाच्या काइट-पेपर मधे गुंडाळून देत असे. बस इतके केले की टिचर्स् वर् त्याचे चांगले इम्प्रेशन पडत असे. प्राक्टीकल्स् चे मार्कस् टिचर्सच्या हातात असल्याने हा पठ्ठा इम्प्रेशन पाडायचा एक चान्स् सोडायचा नाही.

बारावीला आल्यावर मी देखील अशीच आयडीया वापरायचे ठरवले. दसर्याच्या आदल्या दिवशी बाजारात सोनेरीरंगाच्या भानडीत न पडता बाजारातून मस्तपेकी सात ग्रिटीग-कार्ड्स खरेदी केले. ( सहा टिचर्स् साठी आणि सातवे शाम साठी.... बिलकूल नाही) दुसर्यादिवशी क्लासमधे ग्रिटीग् देण्याच्या आगोदर् त्यावर टाइप मेसेज सोबतच माझा स्वःताच्या हस्ताक्षरातला मेसेज (कशाला ती मेहनत हा विचार मनात् होताच.) लिहायला एक कार्ड उघडले तर त्यात 'सुवासनी, कुंकूवाचा टिळा' असे बायली शब्द होते.कार्ड घेताना, मी त्यामधील मेसेज न वाचता फक्त वरचे फोटोग्राफ बघून घेतले होते. त्यामुळे हा सगळा घोळ झाला होता आता सरांना काय असे मेसेज देणार म्हणून ग्रिटीग कार्डाचा विचार रद्द् करावा लागला. नंतर् शाम कडचेच सोने घेउन त्यावर् पुन्हा एकदा हसरे चेहरे बनवले आणि दसरा सेलिब्रेट् केला.
:-) :-) :-)





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators