Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 28, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » आश्विन » ललित » असाही एक रमझान-कुवेतचा » Archive through September 28, 2006 « Previous Next »

Jayavi
Tuesday, September 26, 2006 - 5:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आखाती देशात वास्तव्य सुरु झालं तेव्हाच कळलं की रमादान म्हणजे काय ते. मुस्लीम लोकांचा पवित्र महिना रमझान. त्याला इंग्रजीत Ramadan म्हणतात. ह्या पूर्ण महिन्यात हे लोक रोजे पाळतात. आता रोजे म्हणजे काय? तर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काहीही न खाता पिता रहायचं. अगदी पाणी सुद्धा पीत नाहीत हे लोक. सूर्यास्तानंतर मात्र खाणं पिणं सुरू होतं ते अगदी सूर्योदयापर्यंत चालू असतं :-) रोजे म्हणजे उपास. रोजे सोडताना सगळ्यात आधी खजूर खातात. रोजे सोडताना जे खाणं पिणं होतं ना त्याला इफ़्तार म्हणतात. पूर्ण एक महिना रोजे केल्यानंतर मग ईद असते.

आपण जशी दिवाळी साजरी करतो ना......... तशाचप्रकारे हे लोक मनवतात ईद. ह्या दिवसांमधे हे लोक खाण्यापिण्याचं खूप सामान घरी आणून ठेवतात कारण सूर्यास्तानंतर कोणातरी कडे इफ़्तार पार्टी असते. ह्या दिवसात चिकन, मटण सारख्या गोष्टींना फ़ार मागणी असते. ह्या रमादान मधे शाळा, ऑफ़ीस पण कमी वेळ असतात. एक ते दीड तास उशीरा सुरु होतात आणि १ तास लवकर सुटतात. दिवसभर रोजे करुन थकलेले हे लोक रात्री खाणं पिणं करुन ताजी तवानी होतात. दुकानं पण पूर्ण रात्रभर सुरु असतात. रात्रभर मस्तपैकी फिरत फिरत शॉपिंग करत मज्जा करतात.

सौदी अरेबियाला तर खूपच धमाल होती. मार्केटमधे रस्त्यांवर दोन्ही बाजूला खाण्यापिण्याचे मस्त स्टॉल्स असतात. अरबी मिठाया, तर्‍हेतर्‍हेची चॉकलेट्स, व्हिनेगरमधे घातलेल्या बारिक भाज्या, छोले- पण आपल्यासारखे नसतात हं. शिजवलेले चणे, त्यात व्हिनेगरमधे घालून बारीक चिरलेल्या भाज्या घालून देतात. मस्त लागतात अगदी. स्टीम्ड कॉर्न. तिळ, शेंगदाणे ह्याची चिक्की. तळलेले वेगवेगळ्या आकाराचे क्रॅकर्स. नुसती धम्माल. रस्त्यांवर मस्त लाईटींग असतं. मेरी गो राऊंड सारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या राईड्स पण असतात. आम्ही लोक पण संध्याकाळी थोडंसं खाऊन निघायचो आणि रात्रभर खात खात विंडो शॉपिंग करत फ़िरायचो. ईदच्या जवळपास छानपैकी एका आठवड्याची सुट्टी मिळायची. मग काय.......... नुसती मज्जा :-)

कुवेतमधे त्यामानाने जरा शांत असतो सगळा माहोल. पण शाळा, ऑफीस उशीरा असतात ना म्हणून सगळ्यांकडे मस्त पार्ट्या असतात. ईदच्या नंतरच्या सुट्ट्यांमधे पिकनिक्स ना तर अगदी उधाण येतं.

२-३ वर्षांपूर्वीच्या रमादानमधे इथे 'कभी खुशी कभी गम' रिलिज झाला. खरं तर इथल्या थिएटरमधे कधीच फ़ार गर्दी नसते. कधी कधी तर चक्क २-३ लोकांसाठी सुद्धा सिनेमा सुरु असतो. आम्ही सगळ्या मित्रमैत्रिणींनी ठरवलं की आपण सगळे मिळून जाऊया. सकाळी पिकनिक सुद्धा होती. ती आटोपून, घरी येऊन थोडं फ्रेश होऊन आम्ही सगळे मेट्रोला गेलो. तिथला शो हाऊसफ़ुल्ल होता. सगळ्यांचा मूडच गेला. आता काय करायचं........ हा विचार सुरु असतानाच कळलं की फ़िरदौसला पण लागलाय हाच सिनेमा. पण तिथे रात्री अकराचा शो होता. तो क्या हुआ............ आज तो किसी भी हालत मे ये पिक्चर देखनाही था. आमच्या सगळ्या मुलं आणि बायकांच्या आग्रहापुढे नवरे लोकांना हार स्वीकारावीच लागली. मग काय सगळी पलटण फ़िरदौसकडे रवाना झाली. १-२ गाड्या जरा लवकर निघाल्या तिकिटं काढायला. आम्ही लोक थोडे मागे होतो. इतक्यात मोबाईल वाजला.......... अरे टिकीट मिल गये रे..................! येऽऽऽऽऽऽ! सगळे अगदी एका सुरात सारखेच भेसूर ओरडलो :-)

मग काय मज्जाच मज्जा! जवळपास तासभर आधी पोचलो होतो. आता टाईमपास कसा करायचा.......? सगळ्यात सोप्पा उपाय म्हणजे हादडणं. भराभरा खाणं उरकलं आणि हॉलवर आलो. बघतो तर काय प्रचंड गर्दी. जुने, जाणते लोक म्हणाले,'अरे कोई बात नही...... ये तो सब ऐसेही टाईमपास करनेवाले होंगे.' त्यामुळे आम्ही अगदी निवांतपणे गप्पा मारत बसलो. पण ही वादळापूर्वीची शांतता होती हो. दार उघडल्याबरोबर इतका गोंधळ उडाला ना की बस. सगळ्यांची आत जायची एकच घाई. कारण कळेचना. मग त्या धक्काबुक्कीत पुढे जाता जाता कळलं की तिकीटांवर नंबरच नाहीयेत. हे कळल्यावर आम्ही पण अधिक जोमाने मुसंडी मारुन आत शिरायचा प्रयत्न करायला लागलो. कसेबसे आत आलो. बघतो तर काय पुढे अजून एक दार. पुन्:श्च 'हर हर महादेऽऽऽऽव'! सगळ्या अरबी लोकांची धाव सगळ्यात समोरच्या रांगेतल्या सीट पकडण्यासाठी हो अहो हे आम्हाला आधी कळलं असतं तर कशाला येवढ्या धुमश्चक्रीत भाग घेतला असता...... पण असो....कोणी कुठे, कोणी कुठे.......... कसे तरी करुन आत शिरलो. मग आपापल्या नगांची मोजणी झाली. हुश्श:! जरा कुठे खुर्चीत विसावलो (अहो किती दगदग झाली होती....!) तर एकेकाने आपापली गार्‍हाणी सुरु केली. आवेशानी मुसंडी तर मारली होती पण शरीरानं आता कुठे आपली नाराजी व्यक्त करायला सुरवात केली होती. तरी पण चेहेर्‍यावर मात्र जग जिंकल्याचा आनंद! फिर क्या तो......... कुछ पाने के लिये तो कुछ खोनाही पडता है ना! आता त्या 'कुछ' मधे बहोत कुछ आहे हे आम्हाला घरी गेल्यावरच कळलं.

अरे अपुनके अमिताभ और शाहरुख के लिये सबकुछ चलेगा म्हणून सिनेमा सुरु व्हायची वाट बघायला लागलो. आजूबाजूला सगळी अरबी लोकांची गर्दी. आमच्या पेक्षाही त्यांच्या चेहेर्‍यावरची आतुरता अगदी बघण्यासारखी होती. जरा कुठे 'तशरीफ़'खुर्चीवर विसावलं एकदाचं. आपल्या हक्काची दोन्-तीन वीताची जागा पटकावल्यामुळे नाही म्हटलं तरी आनंद झालाच होता. असा आनंद अजून किती लोकांना मिळाला ह्यावर एक नजर टाकली. सगळ्याच चेहेरयांवर अगदी तस्संच विजयी हास्य :-)

थोड्याफ़ार जाहिरातींनंतर सिनेमा सुरु झाला. न राहवून सगळ्यांनी चक्क टाळ्या वाजवल्या. हळुहळु सिनेमा पुढे सरकत होता. अमिताभची एन्ट्री झाली आणि काय............! अरे सगळं थिएटर एका सुरात येऽऽऽऽ म्हणून केकाटलं. काय पण स्वागत.........! तिकडे अमिताभ बच्चन अगदी धन्य धन्य झाला असेल. मग शहारुखची वेळ होती धन्यता मानण्याची. तो जेव्हा हेलिकॉप्टरमधून उतरून धावायला लागतो ना......... त्याच्या त्या धावण्याला सगळ्यांच्या टाळ्यांचं पार्श्वसंगीत. अहाहा.........! क्या नजारा था वो.......! सार्थक झालं रे बाबा करण जोहरा......... सार्थक झालं.

'शावा शावा.......' ह्या गाण्यावर तर चक्क सगळे नाचायला लागले. सरळ्या कुवेती मुली तर वेड्याच झाल्या पुरत्या आणि त्यांच्यासोबत आम्ही पण. होता होता सिनेमा संपला.........! ऊर अगदी भरुन आला......... हृदय अगदी गदगद् झालं. सगळे अगदी विजयोन्मादाने आपापली छाती फुगवूनच बाहेर पडलो. घरी पोचलो तेव्हा घड्याळात वाजले होते चक्क सकाळचे साडे तीन.

तर.......... अश्शी मज्जा असते इथे........! आता उद्या सुरु होणार आहे रमादान. बघूया ह्यावर्षी काय काय होतं. 'लगे रहो मुन्नाभाय.......' अरे थोडा लेट एन्ट्री लेना मंगता था मुन्नाभाय. बोले तो........ तुम्हारे और सर्कीट के साथ मनाते थे ना अपुन इस साल का रमादान!


Ankushsjoshi
Tuesday, September 26, 2006 - 8:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयावि
फार छान लिहिलय.


Chinnu
Tuesday, September 26, 2006 - 9:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जया अगदी भन्नाट ग! :-)

Kiru
Tuesday, September 26, 2006 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Jayavi, मस्तच.. .. ..

Mrinmayee
Tuesday, September 26, 2006 - 11:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयु, लई मस्त! तुमच्याकडे यावसं वाटतय हे एन्जॉय करायला. :-)

Moodi
Tuesday, September 26, 2006 - 12:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जया सगळीकडे मस्तच एंजॉय करतेस हं, मस्त लेख आहे. वाळवंटातही तुम्ही सगळे हिरवळ आणि उत्साहाचे झरे आणता याचेच कौतुक वाटते.

Supermom
Tuesday, September 26, 2006 - 6:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयु,
फ़ारच मस्त वर्णन केलस.
कुवेत बघायची इच्छा होतेय हे वाचून.


Manuswini
Tuesday, September 26, 2006 - 7:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयु,

जाम मजा आली वाचताना.
ते बहोत कुच काय "खो" ले गं?

आम्ही सुद्धा असाच लगे रहो पहिल्या दिवशी पहिला show naaz8 पाहिला १२ ते ३
वाटले कोणीच फिरकणार नाही.
६ जोड्या आणी मी एकटी असे होतो.
पण पोहचल्यावर पाहेले ही गर्दी.
मजा आली. इतके एनाहे जितकी जयवीने लिहिली आहे.




Abhi_
Wednesday, September 27, 2006 - 12:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयावी मस्तच गं... :-)   

Psg
Wednesday, September 27, 2006 - 12:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयवी, मस्त लिहिलं आहेस. पण category चुकली, हे काही विनोदी लेखन नाही :-) ललित मधे टाकायला हवं होतस.. आता या रमदान मधे काय काय केलत त्याबद्दलही लिही

Lopamudraa
Wednesday, September 27, 2006 - 2:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयावी छान ग या वेळी रमदान विषयी लिही.. आम्हालाही कळेल काय असत ते..!!!

Princess
Wednesday, September 27, 2006 - 4:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जया छान लिहिलय. मला काहीच माहिती नव्हते रमदान विषयी. म्हणजे भारतातल्या रमदान विषयीच नव्हते माहित तर आखाती देशाबद्दल कसे असणार ना... खुप माहिती मिळाली. छान लिहिलस.

पण विनोदी लेखनात का टाकलस ग???


Jayavi
Wednesday, September 27, 2006 - 4:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा....... सगळ्यांना आवडलेलं दिसतंय कुवेत :-)

इतक्या छान छान प्रतिक्रियांबद्दल खूप खूप आभार :-)

भाईलोग........ अपुनका गलतीसे मिश्टेक हो गया. बोले तो ललित मे डालने के बजाय विनोदी लेखन मे डाल दिया. Admin अपुनको माफ़ कर दो.

मनुस्विनी, त्या बहोत कुछ मधे कुणाचा हात मुरगळला, कुणाचा शर्ट फाटला, कुणाला खर्चटलं, कुणाचं घड्याळ हरवलं......... बरंच काही गं :-)


Rupali_rahul
Wednesday, September 27, 2006 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयावी, एकदम छान लिहिलय. क्षणभर अस वाटल की मी पण तिथे सिनेमागृहात बसलेय म्हणुन...

Kandapohe
Wednesday, September 27, 2006 - 6:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयावी छानच. विनोदी लेखनाबद्दल सगळ्यांनीच लिहीले असल्याने मी परत लिहीत नाही. :-)

Dineshvs
Wednesday, September 27, 2006 - 12:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयावी छान लिहिलेय. आखातात या दिवसात थिएटर चालु असणे हि हल्लीची सुधारणा. पुर्वी महिनाभर थिएटर्स बंद असत.

Jayavi
Thursday, September 28, 2006 - 1:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपाली, राहुल, कान्दापोहे, दिनेश......... धन्यवाद :-)

दिनेश, अहो महिनाभर बंदच असतात हो पण ही गोष्ट रमझान संपल्या संपल्या लगेच ईद येते ना......त्यावेळची आहे. ह्या संपूर्ण महिन्यात मनोरंजन वर्ज्य असते ना........ मग ते कुठलेही असो.


Mukman2004
Thursday, September 28, 2006 - 3:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जया सुंदरच.. :-)
खरच एकदा तरी तुमच्या Q8 ला यावस वाटत आहे फ़क्त तुमच्या साठी :-)


Milindaa
Thursday, September 28, 2006 - 5:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयावि, तुला जर हा बीबी हलवायचा असेल तर तिकडे feedback बीबी वर तसं सांग मॉड्स ना

चांगलं लिहीते आहेस


Swaatee_ambole
Thursday, September 28, 2006 - 9:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए SSSSS क पूर्ण महिना मनोरंजन बंद असतं??????
तरीच!!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators