|
कोलाहलात मी -विरंगुळा एकदा फोनच्या बिलासंबंधी मी टेलिफोन एक्स्चेंजमध्ये गेले होते , तेव्हा पांढराशुभ्र पायजमा आणि तसाच शुभ्र शर्ट घातलेले ६५-७० च्या जवळपासचे आजोबा बिल भरण्याच्या रांगेत अगदी उठून दिसत होते. सहजच त्या एवढ्या गदीर्त शुभ्रपणा लख्खन डोळ्यांसमोर आकर्षक वाटला. दुसऱ्या दिवशी मला पुन्हा तिथे जावं लागलं. पुन्हा मी त्या आजोबांना रांगेत तशाच वेशात पाहिलं. तिसऱ्या दिवशी पुन्हा मला माझंच काम रेंगाळलं म्हणून जावं लागलं पुन्हा आपले ते गृहस्थ तसेच तिथे. मनात आपलं मलाच भास होतोय की काय ? पण तो भास असेल तर याची शहानिशा करायला हवी म्हणून त्यांच्या जवळ गेले आणि विचारलं आजोबा तुम्हाला प्रश्न विचारू ? ( ते नाही म्हणाले असते तरी मी विचारलंच असतं म्हणा , पण ते हो म्हणाले) तुम्हाला मी सलग तीन दिवस इथे पाहत्येय. तुम्ही बिल भरण्याच्या रांगेतच असता , आश्चर्य वाटतं म्हणून विचारते. त्यावर अती मार्दव आवाजात त्यांनी उत्तर दिलं. आधी थोडे मिश्किलपणे हसले आणि म्हणाले , ' अगं निवृत्तीनंतरचे हे उद्योग आहेत. सेवानिवृत्तीनंतर हे कार्य हाती घेतलं , सोसायटीतल्या बऱ्याचशा घरांमध्ये सगळे नोकरी करणारे. इलेक्ट्रिकचं बिल , फोनचं बिल इत्यादी कामांसाठी वेळ कोणाकडे आहे पण न केल्यास पश्चात्ताप करण्याची वेळ येते म्हणून महत्त्वाची कामं , अशी कामं मी करतो. निवृत्तीनंतर पुन्हा सेवेत , पण कशाची अपेक्षा न करता. बरं एकाच दिवशी सगळी बिलं भरली तर माझा वेळ कसा जाणार म्हणून तीन दिवस फोन बिलासाठी काढतो. हे उत्तर देताना ना त्यात अहंभाव होता , ना कटकटीच्या आठ्या कपाळावर होत्या. एक मश्गूल बहाण्याचं चांगलं कारण मिळाल्याचं समाधान ओतप्रोत होतं. झरकन मनात विचार येऊन गेला ही कदाचित आपलीच आयुष्याची उद्याची संध्याकाळ मला भेटली. शरीर साथ देतं , मनाची उमीर् शरीराबरोबरीने कार्य करते तोपर्यंत जगण्याची केवढी निमित्तं आपल्याकडे असतात. पण उद्या कधीना कधी आपल्याला आयुष्यभराच्या कष्टानंतर निवृत्ती घ्यावीच लागते , मग तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा. पण या निवृत्तीनंतर पैशांच्या अपेक्षांशिवाय मनाला विरंगुळा देणारं एखादं काम आपल्यालाही या आजोबांसारखं शोधायला लागेल. पण एवढी सेवाभावी वृत्ती तेव्हा आपल्यात असेल ? आम्ही ' रिटायर्ड ' झालो म्हणजे रिकामटेकडे नाही , वाट्टेल त्याची कामं करायला असं उद्धटपणे म्हणण्याची वृत्तीची मी खूप जणात पाहिलीय. आपण आता रिकामटेकडे ही त्यांची स्वत:चीच भावना , शल्य ते असं बोचक बोलून दाखवतात आणि रिकाम्या क्षणाचं दु:ख आणखी वाढवतात. पूवीर् एका उत्स्फूर्त वक्तृत्व स्पधेर्त मला एक विषय आला होता , तो विषय म्हणजे ' माझा आयुष्यातील एक विरंगुळा! ' या विषयावर अगदी प्रामाणिकपणे बोलले होते की दिवसभर खूप मजा मस्ती आणि छंद जोपासल्यावर मी विरंगुळा म्हणून अभ्यास करते. समोर पालक आणि मुलांमध्ये थोडी कुजबूज झाली पण मी माझ्या मताशी ठाम होते विरंगुळा म्हणजे कामात बदल. काम किंवा काहीतरी कार्य करत राहण्याला पर्याय नाही. पण सततच्या कामात जरा बदल केला की मनाला विरंगुळा मिळतो. माझी आई नेहमी सांगायची गणिताचा थोडा अभ्यास करून कंटाळा आला तर विरंगुळा म्हणून शास्त्राचा अभ्यास सुरू करायचा. अभ्यास करण्याला पर्याय नाही हे एकदा कळल्यावर त्यातच आलटपालट करायची की झाला विरंगुळा आणि विरंगुळा म्हटलं की कंटाळ्याला थाराच नाही. जे करणार ते मनापासून. त्यामुळे दिवसातून थोडा वेळ जरी अभ्यास केला तरी कायमचा लक्षात राहणार. कधीकधी गैरसमज होतो की कष्टाचं काम केलं आता जरा मेंदूला विश्रांती म्हणून विरंगुळ्याची साधनं शोधायची. अहो पण कष्ट करतानाही मेंदू त्याचं काम करतो तसं विरंगुळ्यातही मेंदूचं काम सुरूच असतं की फक्त विषयाचं वेगळेपण असतं. हे आठवण्याचं कारण हे की मला टेलिफोन एक्चेंजमध्ये भेटलेल्या आजोबांच्या कार्यात हीच मेथड दिसली. अभ्यासाला जसा पर्याय नाही तसाच जगण्यालाही पर्याय नाही , जगायचं तर आहे मग कामात थोडा फरक करू या. पूवीर् चरितार्थासाठी , आता दिवसाला अर्थ येण्यासाठी. अशी माणसं नेहमीच निरोगी राहतात कारण ती मनाने फ्रेश असतात. स्वत: आवडीने उचललेली जबाबदारी पार पाडताना त्यांना कृतकृत्य वाटत असतं. आपण कोणाच्या उपयोगी पडतो म्हणजे आपण नगण्य नाही ही भावना त्यांना सुखावते. कार्यमग्नतेत मनाची अस्वस्थता केव्हाच गायब होते. अशी कितीतरी माणसं जगात असतील नाही. कुणी सोसायटीच्या कामांची जबाबदारी घेतं , कोणी रस्त्याच्या साफसफाईची काम आवडीने स्वीकारतात , कुणी राहिलेले छंद जोपासतात , कुणी नातवंडांना घडवण्यात रममाण होतात. मला वाटतं ही माणसं आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहतात. आयुष्याची संध्या- काळ त्यांना प्रफुल्लीत करणारी असते , सूर्य बुडण्याची भीती त्यास नसते. वास्तवता माहीत असते पण बागेची अगदी वेळ संपेपर्यंत , बागेचं फाटक माळी लावून घेईपर्यंत जशी काही मुली सर्व खेळण्यांवर पटापट खेळून घेतात तसं या माणसांचं असतं ना ? मी भाषणात विरंगुळा या विषयाला जशी कलाटणी दिली तसाच हा विरंगुळ्याचा विचार उद्या माझ्या आयुष्याच्या संध्येलासुद्धा कलाटणी देऊ शकेल हे सतत लक्षात ठेवायला हवं. ' मावळत्या दिनकरा , अर्ध्य तुजं जोडूनी दोन्ही करा ' या गाण्याच्या ओळी मला कायमच आवडतात. याचा अर्थ मला ' त्या ' आजोबांमध्ये प्रत्यक्षात दिसला तेव्हा त्या ओळी जास्त भावल्या. ' जो तो वंदन करी उगवत्या , जो तो पाठ फिरवी मावळत्या ' या ओळी आपण स्वत:बद्दलसुद्धा खऱ्या करत असतो. आपण आपल्या उमीर्च्या सळसळत्या दिवसांचं स्वागत करतो पण मग मावळतीच्या क्षणांकडे का पाठ फिरवतो. त्यांनाही ही अर्ध्य देऊन उजळवलं पाहिले ओंजळ असते आपल्याच मनाची. त्याची जाणीव ठेवायला हवी! हो ना ? क्षितिजापर्यंत पसरवू या उल्हास त्याही पलीकडे उरू द्या उल्हास।। दृष्टिपथातल्या एकेक थेंबांचा समुद ओंजळीत घ्या , सुखाची मासोळी गवसते का ? तुमचं तुम्हीच उत्तर द्या।।
|
Maitreyee
| |
| Wednesday, September 27, 2006 - 2:07 pm: |
| 
|
very nice Prachi
|
Arch
| |
| Wednesday, September 27, 2006 - 4:07 pm: |
| 
|
फ़ारच छान प्राची. नावाला साजेशी वाक्य आहेत तुझी. 
|
>>>> बागेची अगदी वेळ संपेपर्यंत , बागेचं फाटक माळी लावून घेईपर्यंत जशी काही मुली सर्व खेळण्यांवर पटापट खेळून घेतात तसं या माणसांचं असतं ना ? प्राची, छान लिहीलंयस. असं जमायला हवं खरंच.
|
Sashal
| |
| Wednesday, September 27, 2006 - 4:22 pm: |
| 
|
छान लिहीलंय ..
|
Moodi
| |
| Wednesday, September 27, 2006 - 5:38 pm: |
| 
|
ए फारच अप्रतीम आणि हवे हवेसे लिहीलस गं. अजून येऊ दे.
|
Ashwini
| |
| Wednesday, September 27, 2006 - 9:09 pm: |
| 
|
खरच छान आहे ग प्राची. अनुकरणीय आहे.
|
Raina
| |
| Wednesday, September 27, 2006 - 9:44 pm: |
| 
|
प्राची- छान लिहीलं आहेस ग आवडलं!
|
Abhi_
| |
| Thursday, September 28, 2006 - 12:54 am: |
| 
|
प्राची, छान लिहिलं आहेस.
|
क्षितिजापर्यंत पसरवू या उल्हास त्याही पलीकडे उरू द्या उल्हास।। छान, अगदी पटल मनाला...
|
Abhishruti
| |
| Thursday, September 28, 2006 - 2:55 am: |
| 
|
Nice Prachi, Very Nice!स्वातीने सांगितलेले वाक्य मलाही खूप भावले आणि एकंदरीत सर्व कल्पनाच खूप आशादायक आहे . Keep writing!
|
Bee
| |
| Thursday, September 28, 2006 - 6:41 am: |
| 
|
प्राची, पहिल्यांदाच भेटलीस आणि मनात घर केलसं.. खूप सुंदर आचारविचार आहेत तुझे.. अजून काही खूप आधी असं लिहिलेल जरी असेल तरी इथे टाक ही विनंती.
|
प्राची, सुंदर. "फाटक बंद होईपर्यंत पटापट खेळून घेतात". अतीसुंदर...
|
Chinnu
| |
| Thursday, September 28, 2006 - 10:14 am: |
| 
|
छान विचार आहेत प्राची.
|
Paragkan
| |
| Thursday, September 28, 2006 - 10:35 am: |
| 
|
wah .. chhaanach !!
|
Asmaani
| |
| Thursday, September 28, 2006 - 5:17 pm: |
| 
|
nice prachee... really very nice. सुंदर विचार आहेत.
|
Bee
| |
| Friday, September 29, 2006 - 12:56 am: |
| 
|
प्राची, मायबोलिचा दिवाळी अंक असतो. १२ तारेखेच्या आत साहित्य द्ययला हवे. तू लवकर विचार कर.. आणि दे पाहू दिवाळी अंकाला साहित्य.
|
Giriraj
| |
| Friday, September 29, 2006 - 3:04 am: |
| 
|
Nice Praachi! .. .. .. 
|
|
|