Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
...ती तो त्याची कविता आणि तिची खिडकी....

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » आश्विन » कथा कादंबरी » ...ती तो त्याची कविता आणि तिची खिडकी... « Previous Next »

Dhund_ravi
Tuesday, September 26, 2006 - 12:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

...ती तो त्याची कविता आणि तिची खिडकी...

स्वत्:चं अस्तित्व नसल्याची
किंचीतही ख़ंत न मानणारी निराधार दुपार
दिवसानी झिडकारल्यानंतर संध्याकाळची वाट पहात
जेंव्हा क्षणांवर रेंगाळते
तेंव्हा आपल्याही निरुत्साही श्वासात विनाकारण एक उदासपणा भरुन जाते.

आशाच एक अस्पृश्य दुपारी ती एकटीच होती.
ख़र तर दुपरीच काय हल्ली ती सततच एकटी होती.
अगदी तो सोबत असतानाही.

स्वत्:च्या रमणीय भुतकाळाच्या पाचोळ्यात
स्वत्:चं बहरणं शोधताना गुलमोहरालाही होत नसेल
इतका त्रास तिला हल्ली त्याच्यातला तो शोधताना व्हयचा.
... हल्ली किती बदलला होत तो.

दुपारच्या त्या सुतकी हवेत मिसळुन
त्याच्या बेफ़िकीर श्वासातली धुंदी
उन्मादक गंधाचा आवेग
त्याच्या नजरेतली वीज
हसण्यातली विषारी नशा
तिच्या मलुल श्वासात पसरली आणि त्याच्या जिवंतपणाच्या निष्प्राण आठवणींनी स्वत्:ची आवस्था करुण होण्याआअधिच
तिनं कधीच बंद करुन घेतलेल्या
पण थोडिशी झडप उघदीच राहीलेल्या मनाच्या अभेद्य ख़िडक्या
पुर्णच बंद करुन घेतल्या.

ओसाड तर ती आत्ताही होती.
पण आता तिला स्वत्:ची (त्यापेक्षाही त्याची) किंव येत नव्हती.

पर्याय नसल्यासारख़ं संध्याकाळनं दुपारच्या भकास क्षणांना
स्वत्:च्या पदरात अनिच्छेनि घेतलं आणि ती संध्याकाळही रटाळ झाली.
हल्ली तिला ह्याचीही सवय झाली होती.
..............................तसही तिची ख़िडकी बंदच होती.

अशा भेसुर क्षणी
वळीवाच्या मस्तवाल पावसाचा एक अल्लड थेंब
तिच्या भावनाशुन्य ख़िडकीच्या बंद काचांवर
सुख़ाची नाजुक रेशीमरेघ हलकेच ओढुन गेला.
पण तिची अजाण ख़िडकी अजुनही बंदच होती.


मग स्वत्:चं बरसणं जाणवुन देणारा पावसाचा दुसरा एक थेंब त्याच्या ओठतले शब्द आणि श्वासातले सुर घेऊन
तिच्या बेसुर ख़िडकीवर मिलनवेडे नाद छेदुन गेला.
तरीही तिची दुर्दैवी ख़िडकी बंदच होती.

आत तिच्या बंद ख़िडकीबाहेर
त्याच्या आठवणीत भिजणारे काही आगतिक थेंब
तिच्या वियोगात निराश होऊन
तिच्या आंगणातल्या मातीत शिरले आणि तिनी ख़िडकी न उघडताच
त्याच्या रिमझिम स्पर्शाचा बरसत गंध
तरंगत तिच्या श्वासात उतरला.

आत तिला ख़िडकी उघडण्यावाचुन दुसरा पर्यायच उरला नव्हता.

तिनी थोडीशी ख़िडकी उघडली आणि
तिच्यावर बरसायला आधिर असणारी व्याकुळ पावसाची एक उतवीळ सर
एका ओल्या झुळुकेसह तिच्यावर तुटुन पडली.
त्या पावसाच्या गाण्यात आणि झुळुकेच्या पाण्यात
त्याचा गंध इतकच भरुन रहीला होत की
तिनी डोळे मिटुन स्वत्:ला वातवरणाच्या स्वाधिन करणं स्वाभाविकच होतं.

वा-याची ती बेहेश झुळुक तिच्या केसात शिरली
तेंव्हा तोच फ़ुंकर घालुन केसाची बट कपाळावर ओढतोय असं तिला वाटलं.
मग त्यानी तिच्या बांधलेल्या केसात
पर्यायानी आणि अपरीहार्यानं देहात
स्वत्:ला झोकुन दिलं.
तिचे केस मोकळे सोडताना पसरलेल्या रेशीमजाळीत तो जास्तच गुंतत गेला.

मग तिच्या अर्धोंमिलीत पापण्यांवर विसावलेला
एक हळुवार थेंबाचा स्पर्श
तिला त्याच्या ओठंचा वाटला
तेंव्हा त्याच्या मिठीत मनसोक्त रडून घ्यावंस तिला वाटलं.

पापण्यांवरचा तो धगधगता थेंब आपल्या ओठावर ओघळतोय ह्य कल्पनेनं ती नख़शिख़न्त शहारली आणि आवेगानं त्याच्या मिठीत शिरली.

ख़र तर ती ओली चिंब भिजली होती
पण त्याच्या उबदार मिठीच्या सुख़द पाशात ती इतकी बेभान झली होती की
पावसाचा जोर
त्याच्या मिठीइतकच गुदमरुन टाकणार हवा असं तिला वाटायला लागलं.

वा-याच्या निरागस झुळुकेचं आत बेछुट वादळ झालं होतं.
त्याच्या बेफ़म वादळाच्या आवेगात आज ती ख़ुप दिवसांनी भिजली होती.
२६ २६ २६मनसोक्त.
आत तर तिला स्वत्:सोबतही रहाणं अशक्य झालं आणि
दरवाजा उघडुन ती बाहेर आली.

बाहेरचं जग तर सगळं शांतच होतं.
कुणीतरी जवळचं गेल्यासारख़ं निस्तेज त्यापेक्षाही निरस आणि निशब्द.
तिच्या आंगावरुन ओघळणारे ते अमृतथेंब सोडले तर सगळच मृतावह होतं
निर्जीव होतं.

ह्य दोन्ही भिन्न जगातलं ख़रं जग कुठलं आणि भासाचं कुठलं हे तिनी ठरवण्याआधिच
तिला तो दिसला.
चिंब भिजलेला गहिवरलेला.
आज ख़ुप दिवसांनी तो मोकळा दिसत होत.

त्याच्या श्वासात धुंदी होती. गंधात आवेग होत. स्पर्शात बहर होत. त्याच्या हसण्यात नशा होती.
तो पुर्वीइतकच नाही पुर्वीपेक्षा जास्त तिचा वाटत होत.

पण त्यांच्या आंतरतलं जग कितीही जिवंत असलं तरी बाहेरचं जग अजुनही मेलेलंच होतं.
ह्य फ़रकचं कारण शोधण्याइतकी ती भानावर नव्हतीच. आणि आत तर तिला त्याची गरजही उरली नाही.
आसमंतात जीव नसतनाही त्या दोघांच्या आयुष्य भरुन वाहण्याचं कारण
तिनी त्याच्या डोळ्यात वाचलं होतं.
आज खुप दिवसांनी त्यानी कविता लिहीली होती.

ती कविता त्यानी कधीच वाचली नाही. तिनी ती कधीच ऐकली नाही.
पण दोघांनी ती कविता जगली होती.
तिनी खिडकीआत त्यानी खिडकीबाहेर

धुंद रवी


Milya
Tuesday, September 26, 2006 - 4:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा धुंद रवी सहीच... आवडली लिहिण्याची स्टाईल आणि वापरलेला शब्दसंभार ही....

Viveki
Tuesday, September 26, 2006 - 4:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


हे शिर्षक सर्च मध्ये ति २६ तो २६ त्याची कविता २६ आणि तिची ख्डकी असे दिसत आहे.
बाकी कविता चांगली आहे.


Dhund_ravi
Tuesday, September 26, 2006 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks Milya...

लेखातुन २६ आकडा काढला पण शिर्षकातुन कसा काढायचा?
Moderator pl माझ्यासाठी एवढं कराल?

धुंद रवी


Aandee
Tuesday, September 26, 2006 - 6:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रवि,कविता चांगली आहे,भकास उदास,अगतिकता,आवेग,उधळुन जाण छान आहे... पण तिला त्याच्यात स्वतचा शोध लागला का?

Dhund_ravi
Tuesday, September 26, 2006 - 7:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" आज ख़ुप दिवसांनी तो मोकळा दिसत होता.
त्याच्या श्वासात धुंदी होती. गंधात आवेग होत. स्पर्शात बहर होत. त्याच्या हसण्यात नशा होती. "

.... तिच्या शिवाय तो 'असा' असुच शकत नाही. तो असा आहे म्हणजे ती त्याच्यात असलीच पाहिजे!

... तसही एखाद्यात विरघळुन गेल्यानंतर स्वत्:चा शोध कुठे लागतो?

धुंद रवी.


Moodi
Tuesday, September 26, 2006 - 7:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धुंद रवी तुम्ही लिहीता अतीशय सुंदरच. पण ही कविता आहे की कादंबरी? की ललित? कारण जर कविता असेल तर ती कवितेच्या विभागात हवी, ललित असेल तर ललितच्या. कथा तर वाटत नाही. पद्यरुपी गद्य आहे का हे? कारण कथा किंवा कादंबरी म्हणून वाचायला आले की कथा आहे की कविता असा संभ्रम पडतो. प्लीज रागवु नका, पण ही कविता आहे का?

Chinnu
Tuesday, September 26, 2006 - 9:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुंदर!! .... .... ....

Dhund_ravi
Wednesday, September 27, 2006 - 12:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Chinnu, Andee मनापासुन आभार...

वसुमती,

ही कविता असेल तर
तुमच्या ओठावर उतरुन जाईल...
हे ललित असेल तर
तुमच्या जगण्यात तरंगुन जाईल...

असेल कथा तर
भासात मिसळुन जाईल आणि
कादंबरी असेल तर
श्वासात रंगुन जाईल...

आपण फ़क्त लिहु शकतो... कुठं जायचं हे त्यानीच ठरवायच!

धुंद रवी.



Smi_dod
Wednesday, September 27, 2006 - 1:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा धुंद रवी..क्या बात है...मस्त लिहिलय.... लिहिण्याची स्टाईल आवडली...सही!!!

Dineshvs
Wednesday, September 27, 2006 - 12:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान आहे लेखन. आवडलं

Manuswini
Wednesday, September 27, 2006 - 1:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुपच अलंकारीक आहे
डोक्याला जरा ताण येतो एवढी अलंकारीक भाषा वाचताना
.. पण भावना पोहचल्या
प्रेम हे असे बदलत जाते????

सुरेख!!!


Dhund_ravi
Thursday, September 28, 2006 - 12:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयुष्यात कधीकधी असेही क्षण येतात की...

प्रेम तेच असं ग मनुस्विनी
पण ते जगायचा उत्साह बदलतो...
स्वप्न तिच असतात
पण ती पुर्ण करायचा उन्माद बदलतो...
धुंदी तिच असते
पण बेभानपणातला उल्हास बदलतो...

... आणि हीच वेळ असते, आपली बंद खिडकी उघडण्याची

धुंद रवी.





Manuswini
Thursday, September 28, 2006 - 2:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

याचा अर्थ हा नाही ना की प्रेम शेवटी हे बदलते??

माझी उंची एवढी नाही की तुझी अलंकारीक भाषा समजेल.
पण दुख हेच की प्रेम बदलते नी उरतो तो व्यवहार :-( हेच सत्य आहे?

असे कुणा अनुभवीचे बोल एकलेत.
sorry to change your mood


Daad
Thursday, September 28, 2006 - 2:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रवी, सुरेख, खरंच! कविता की गद्य की ललित या वादात पडत नाही. .... पण जे आहे ते भावना सुंदर व्यक्त करतंय. .... अगदी खरं सांगू? तुझ्या नंतरच्या प्रतिक्रिया जास्त भावल्या मला but thats me!

रागाऊ नकोस.... पण हे म्हणजे माझ्या जेवण करण्यासारखं झालंय. मी शक्यतो, काय करायचा घाट घातलाय, ते पूर्ण होईपर्यंत सांगत नाही....
पण वाचून, माझंतरी पोट भरलंय....

लिहिलेलं, वाचणार्‍याच्या मनात..... गुणगुणत राहिलं पाहिजे... तसं हे नक्कीच आहे!


Indradhanushya
Thursday, September 28, 2006 - 8:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनातील प्रत्येक कोपरा शोधण्याचा प्रयत्न दिसतोय... केवळ लाजवाब

Dnyanaba
Thursday, September 28, 2006 - 9:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धुंद रवि माझ्या मते कथा आणि कादंबरी मते एखादा प्लॉट असतो.. प्रसंग असतात.. एक सुरवात असते एक शेवट असतो.. केवळ नायक आणि नायिका आहेत म्हणून ही कथा होत नाही..
तुम्हाला एक सुचवावसं वाटतं..
तुम्ही तरल शब्दात भाव मांडता हे मान्य आहे पण तुमचे विषय आणि संकल्पना साधारणत: त्याच असतात.. त्यामुळे तुमच्या लिखाणात एकसुरीपणा जाणवतो.. बघा तुम्हाला पटत असेल तर


Shirishk
Wednesday, October 04, 2006 - 5:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


सही है!

ंअनुस्विनि, "ह्यच अर्थ प्रेम बदलत असत्- व्यवहरिक ".... बद्दल्:
ह्य कवितेतल प्रेम कुठेच व्यवहारिकते कडे जात नहि!
ह्यात एक वेगळीच तगमग आहे
एक वेगळीच धुन्दी आहे

रवी, 'ही कविता असेल तर' पण सही!!
:-)





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators