इथे कोणीतरी एखाद चित्र टाका रे.. मग मागुन कविता आपसुक येइलच फार सुन सुन वाटतय इथे
|
Zaad
| |
| Wednesday, October 04, 2006 - 8:35 am: |
| 
|

|
Bee
| |
| Thursday, October 05, 2006 - 3:15 am: |
| 
|
झाड बिचारे एकटेच उभे तलम धुक्याची शाल ओढून, हाक मारायला शब्दच फ़ुटेना अवघा परिसर गेला गोठून! ऐरवी निरव असताना पाचोळा वाहे कुजबुजणारा, शीळ घालणारा वारा बिलगे हिरव्या पानांना! काळोखाच्या श्यामल पदरावर सायीसारखी दाटते शांतता, मांजरीसारखे डोळे होतात अंधार पिऊन गुपचुप मिटतात!
|
Meenu
| |
| Thursday, October 05, 2006 - 4:09 am: |
| 
|
भान बहर सरला अन विखुरले सारे सखे नी सोबती ... कळले मला माझे नव्हे ते सुखाचे सोबती ... उमगले मजलाच माझे स्थान या शिशीरातुनी क्षणभरी गेल्या सार्याच जाणीवा ही गोठुनी उमगले ........ उमगले अंती परी, शिशीर घेऊनी आज आला जाणीव ही नवखी जरी खरा वसंत बहरला आताच मम अंतरी
|
तिचा काजळी पदर त्याला अंधाराची कडा तिच्या अंगणी काळोख ........ काळ्या मोग-याचा सडा काळ्या नागिणीच्या दंशातली नशा सुद्धा काळी काळ्या पाशात राणीच्या काळ्या रेशामाची जाळी तिच्या बनात फ़ुलला काळ्या गंधाचा केवडा तिच्या अंगणी काळोख ........ काळ्या मोग-याचा सडा काळ्या पौर्णिमेत सजली ति तारकंची राणी काळ्या मेघात गुंफ़ली तिनी चांदण्यांची गाणी तिच्या काळ्या चांदण्याला काळ्या मेघाचाच ओढा तिच्या अंगणी काळोख ........ काळ्या मोग-याचा सडा त्या गर्द क्षितिजावरती काळी निशाराणी आली रंग मिसळुन श्वासात काळ्या पावसात न्हाली ओल्या श्वासात राणीच्या काळा पाऊस कोरडा तिच्या अंगणी काळोख ........ काळ्या मोग-याचा सडा धुंद रवी
|
Shyamli
| |
| Wednesday, October 11, 2006 - 8:28 am: |
| 
|
शब्दरचना छान आहे पण काय म्हणायचय ते नाही कळलं रवी खुलासा करणार का जरा
|
Kedarjoshi
| |
| Wednesday, October 11, 2006 - 11:13 am: |
| 
|
मला ही पहीले श्यामली सारखेच वाटले पण मग मी बिबीचे नाव चित्र कविता असे पाहीले व त्या चित्राला लक्षात ठेवुन कविता वाचली. धुंद रवी मान गये. तुम्ही ते चित्र सुर्योदया पुर्वीचे आहे असे ही मांडु शकला असता.
|
Ekata
| |
| Sunday, October 22, 2006 - 7:31 am: |
| 
|

|