|
Prajaktad
| |
| Wednesday, October 18, 2006 - 5:55 am: |
| 
|
मायबोलीकर चित्रकारांपैकी कोणी 'वसुबारसाचे '(गाय वासरु)चित्र काढुन पोस्ट करु शकेल का?आजच्या पुजेला हवे होते. आधिच कुठे असेल तर लिंक द्या.
|
अर्र, मी जन्ग जन्ग शोधल कॉन्ग्रेसच्या साईटवर की कुठे बैलजोडि, गायवासरु वगैरे त्यान्ची जुनी सिम्बॉल्स मिळतात का, पण मिळाली नाहीत, ट्राय करतो! तुम्ही पण करा
|
मी काय चित्रकार बित्रकार नाही हे पर, हे घे पाच मिन्टातल कामचलावु चित्र! हे असच असत ना चित्र? की वेगळ काही? गोड मानुन घ्या छान पुजा करा!

|
Prajaktad
| |
| Wednesday, October 18, 2006 - 10:37 am: |
| 
|
लिंबु तुमचे खुप खुप आभार!छान आलय चित्र. अगदी perfect !लगेच printout काढते
|
दिनेशभाव, तुम्ही बोल्ला होता तर पहिल्यान्दाच पेन्शिलिन चित्तर काढल हे बघा! पर लई अवघड जातया! जमल हळु हळु! मला एक समजत नाही, कागदावर हलक्या हातान काढलेल्या पेन्शिलीच्या रेषा खोडायच्या कशा? कधि? आधिच खोडल्या तर चित्र कशावरुन काढु? नाही खोडल्या तर फ़ायनल चित्रातुन त्या वजा कशा करायच्या? पेण्ट ब्रश मधे हा प्रॉब्लेम नवता! जे काय काढायच ते फायनलच, अन खोडल तर कॉम्प्युटरचा कागुद बी खराब व्हायचा नाही! कोन पेन्सिलिन कस चित्र काढायच याच मार्गदर्शन करेल का?
|
Anilbhai
| |
| Thursday, October 19, 2006 - 8:49 am: |
| 
|
लिंबु, मेल चेक कर.
|
Maudee
| |
| Thursday, October 19, 2006 - 8:54 am: |
| 
|
सर्वांचीच चित्रे ख़ूप उच्च. लिंबू ती मुलगी ख़ूप सुरेख़ काढलीय हं
|
Maudee
| |
| Thursday, October 19, 2006 - 8:55 am: |
| 
|
लिंबू delete का केलत तुम्ही ते चित्र?
|
अनिलभाई, मला अजुन मेल मिळाली नाही हे! माऊडी, मी नाही डिलित केल! उडवल गेल! इट्स ओके!
|
Anilbhai
| |
| Thursday, October 19, 2006 - 9:46 am: |
| 
|
लिंबु, हितगुज वरुन पाठवली आहे रे. मिळाली कि इथे सांग. चित्राबद्दल होत.
|
Apurv
| |
| Thursday, October 19, 2006 - 9:48 am: |
| 
|
लिंबु, फारच छान काढले आहे, स्वतःच्या कल्पनाशक्ति ने की कुठे पाहून? वासराचे मागचे पाय जसे वाकले आहेत, गाईच्या चेहर्यावरील भाव, फारच छान!
|
अपुर्व, कधितरी पाहिलेल दृष्य स्मरणात रहात, आठवल तस काढल, अन पुर्वी गायवासरु ही कॉन्ग्रेसची निशाणी होती, त्यामुळ नजरेत ठसलेल! तरीही इमॅजिनेशन करावच लागत, इतक काही फोटोफ्रेम सारख लक्षात रहात नाही! तुला थॅन्क्यू! अनिलभाई, मझी आयडी Indiatimes ची हे! किती वेळ लावेल ते सान्गता येत नाही, इथेच का सान्गुन टाकत नाही? 
|
Chandya
| |
| Thursday, October 19, 2006 - 11:11 am: |
| 
|
LT गाय वासराचे चित्र मस्तच. विशेषत: गाईचे. अगदी जिवंत वाटतेय
|
अनिलभाई, मेल मिळाली, मजकुर समजला, सुधारणा होइल, धन्यवाद! मेलच्या उत्तरात मी एक दुसरा प्रश्ण विचारला हे, मेल मधे जमल्यास उत्तर द्याल का? कारण मी सन्दर्भाविना कोणतीच गोष्ट धडपणे करु शकत नाही, माझ्या प्रत्येक चित्राला कशाचा तरी सन्दर्भ असतो, पुनर्भुतीचा मला झालेला आनन्द त्यात असतो, बर्याचदा खवचटपणा पण असतो! चन्द्या, तुला थॅन्क्यू! मी हळु हळु शिकतो हे! अर्थात ही अशी चित्रे याच आकारात बघायला बरी वाटतात, मोठी केली की सुक्ष्मपणे बिघडलेल प्रपोर्शन ठळकपणे दिसुन येते, त्यामुळे अशा चित्रान्ची एक मर्यादा हे! आज वाईट पद्धतीने भलत्याच कामात अडकलो हे! मला ४२ jpg फाइल्सची मिळुन एक pdf २.६ mb मधे करता येत नाही हे! अन कोणत्याही परिस्थितीत ती उद्या दुपारपर्यन्त तयार होण आवश्यक हे अन माह्याकड कसलच पॅकेज नाही! पेजमेकर नाही की अजुन कसल नाही! एक pdfmaker हे पण तो साडेचार एमबी पेक्षा जास्त आकाराची फाईल बनवतो हे! एनिवे, या बीबीचा विषय नाही, सहज सान्गितल, कारण आजुबाजुला कोणच नाही, अन हे ऐकुन घेण्यासाठीही प्रत्यक्षात कुणाला इन्टरेस्ट नाही, जोतो एण्ड रिझल्टच विचारणार, झाल की नाही, अजुन कस झाल नाही, करता काय इतका वेळ मग!.... समद्यान्ना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
|
Adtvtk
| |
| Thursday, October 19, 2006 - 11:44 am: |
| 
|
इकडे post झालेली चित्रे फ़ारच छान असतात. ही काही माझी चित्रकला नव्हे पण मला ही चित्रे फ़ार आवडली. कुठे link टाकावी ते समजले नाही म्हणुन इथे टाकत आहे. www.rbpatil.com आज धनत्रयोदशीला धान्याने डवरणारि (शब्द बरोबर आहे का हो?)शेतं बघुन फ़ार छान वाटले (एरवी देखिल वाटते). दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा!!
|
Chinnu
| |
| Thursday, October 19, 2006 - 12:18 pm: |
| 
|
LT सुरेख चित्र हो! धन्यवाद!!
|
Dineshvs
| |
| Thursday, October 19, 2006 - 12:32 pm: |
| 
|
लिंबु गाईचे भाव खुपच सुरेख टिपलेस. जर आऊटलाईन काढत असशील तर अगदीच पुसट काढायची आणि मग शेवटच्या चित्रात ती सामाऊन घ्यायची. पेन्सिलीच्या मागे रबर लावलेली जी पेन्सिल असते ती या कामात उपयोगी ठरते. वसु बारस म्हणजे सोलापुरातल्या बार्शी गावच्या भगवंत मंदीराच्या भगवंताची तिथी. पंढरपुरच्या एकादशीचे पारणे ईथे येऊन फ़ेडायचे. यादिवशी गायीच्या पायावर पाणी सोडताना क्षीरोदार्णव संभूते सुरासुर नमस्कृते सर्व देव मये मातर् गृहाण अर्ध्य नमोऽस्तुते असे म्हणावे आणि नंतर सर्व देव मये देवि सर्व देवैर अलंकृते मातर् मम अभिलषितं सफलं कुरु नंदिनी अशी प्रार्थना करायची.
|
Mavla
| |
| Friday, October 20, 2006 - 12:20 am: |
| 
|
शुभेछा देन्या साठी अजुनही खुप जन पत्रच वापरतात, त्यातलाच ह एक प्रकार, पोस्ट कार्ड वर चित्र काढुन पाठ्वने
|
Mavla
| |
| Friday, October 20, 2006 - 12:29 am: |
| 
|
पोस्ट कार्ड वर चित्र काढुन पाठ्वने

|
Mavla
| |
| Friday, October 20, 2006 - 4:47 am: |
| 
|


मायबोलीकराना शुभ दीपावली २००६ मावळा.
|
दिनेशभाव, छान माहिती सान्गितलित! पेन्सिलिच चित्र आता पुन्हा टाकतो हे! होप, आता उडायची गरज पडणार नाही, दुरुस्ती केली हे! चिन्नु, Adtvtk , धन्यवाद! तर हे ते उशिर झाल्याने दिवाळि अन्कात समाविष्ट न करता आलेले चित्र! ग्वाड मानुन घ्या! पहिलाच प्रयत्न हे

|
Dineshvs
| |
| Friday, October 20, 2006 - 11:33 pm: |
| 
|
लिंबु चित्र छान आहे. सगळ्यान नवल म्हणजे तु काढलेल्या मुलीचा चेहरा, एका मायबोलिकरणीच्या चेहर्याशी हुबेहुब जुळतोय.
|
>>>> तु काढलेल्या मुलीचा चेहरा, एका मायबोलिकरणीच्या चेहर्याशी हुबेहुब जुळतोय कोण? कोण हे ती मायबोलीकरीण, इकडे कानात सान्गा पाहू!
|
|
|