Prasik
| |
| Tuesday, September 19, 2006 - 3:10 pm: |
| 
|
बदला गेल्या दोन दिवसात मी आणि माझा भाऊ खुप हासतो आहोत. आमचा अनुभव तुमच्याशी सुध्धा शेअर करावा म्हणुन हे लिहतो आहे. काही दिवसापुर्वीच आम्ही मुम्बई ला शिफ़्ट झालो. ईथे आल्या नन्तर जॉब सर्च करण्यासाठी म्हणून ईन्टरनेट घेतले. फ़्रिडम एट नाईट चा प्लान असल्या मुळे रात्री नेट युज करण्याला काहीच लिमीट नव्हते. पण सर्व वेळ काय जॉबच सर्च करणार, म्हणुन याहू मेसेन्जेर वर चाटिन्ग करण्याचा आमचा उद्योग चालु झाला. पाच वर्षानन्तर प्रथमच मी रेग्युलर चाट करत होतो. माझ्या फ़्रेन्ड्स्-लिस्ट मधील सर्व आय्-डी खुपच जुने असल्याने त्याच्याशी सम्भाषन होणे कठीनच होते, तरीपण दोन-तीन फ़्रेन्ड्स मिळालेच. त्यान्च्याशी जुन्या आठवणीन्ची उजळणी झाली. पण हे पुरेसे नव्हते म्हणून चाट रूम मधे जाउन आणखी फ़्रेन्ड्स शोधायला लागलो. पण काल बदला होता त्य प्रमाणेच याहू चाट देखिल बदलली होती. पुर्वी सारखे फ़्रेन्ड्स काही मिळत नव्हते. पाच वर्षापुर्वी चाट पर्स्नल माहिती, फोटो, ईमेल-आय डी शेअर करून ह्वायची. आगदीच पुढे जाउन फ़ोन नम्बर देखील कधी कधी शेअर व्हायचा. किवॉ कोणितरी डेटीन्ग ला देखील जाउन आल्याचे कानावर यायचे. पण आता चाट म्हणजे निव्वळ टायीमपास झाला होता. शेवटी आमची फ़्रेन्ड्स ची सर्च मराठी:१ या रूम मधे पोचली. सुरवातीचा वेळ एकमेकान्ची खेचण्यात आणि एन्फ़ोर्मेशन शेअर करन्यात गेला. खरे नाव वापरण्यापेक्शा आम्ही निक नेम वापरूनच चाट करत होतो. आमच्या चाट करण्याच्या स्टाईलने काही अवधी नन्तरच आम्हाला फ़्रेन्ड्स देखील मिळायला लागले चाट चालू आसतानाच रूम मधे ईतर काही युसर वर सन्गीताची मैफ़ील जमवायचे. त्यान्च्यामधील एक युजर सिधन्त्_चोउधरि ईतके छान गाणे म्हनयचा की बस एकुनच कान धन्य ह्वायचे. त्याचा आवाजच ईतका जबर्दस्त होता की मि त्याला चाट आयडोल ची पदवी देवुन टाकली होती. त्याच्या सोबत राधा_गोद्बोले, शुक्रतर_मन्द्_वर, आणि ईतर काही जण सन्गतीला आसायचे. कधी मराठी, कधी हिन्दी गाणी चालू आसायची. गाणे निट वाटले तर दाद द्यायचो आणि नाही आवडले तर बदलायला सन्गायचो. अर्थातच आमच्या मागणीकडे त्यान्चे काहीच लक्ष नसायचे. पण एखाद्या पोरीने माग़णी केली तर मात्र............ ह्यान्चा आपला स्व:ताचा ग्रूप आसताना दुसर्याना गाणी बोलायला देखील बिलकूल सन्धी मिळत नसे. नन्तर चाट रूम मधे चाट करया एवजी मी आणि माझा एक मित्र रूम मधे गाणे ंP३ वर लावून एकवायला लागलो. पण हे आगोदरच चाट रूम मधील सो कॉल्ड सिनीअर युजर्स्ना मान्य नव्हते. काही वेळानन्तर माझ्या मित्राने माझ्याकडे कम्प्लेट केली की त्याला कोणीतरी याहू मेसेन्जर वरून बूट मारतोय. बूट म्हणजे चप्पल-बूट नव्हे तर याहू-बूटर नावाचे सॉफ़्टवेअर वापरून जो युजर आपल्याला नकोसा झाला असेल तर त्याचा रिमोटली रिस्टार्ट करून त्याला चाट बाहेरचा रस्ता दाखवणे. अर्थातच मला हा प्रकार माहीत नव्हता. आम्ही विचार केला की हा उगाचच पकवत असेल. वरती तो मिहिर्स्म्_८७ ह्या युजर वर सन्शय घेत होता. आता मिहिर हा तर आगदी 'सान्स्-बहू' सिरीयल मधल्या मिहिर प्रमाणेच फ़ेमस आय डी होता त्यामुळे मला ह्याच्यावर बिलकूल विश्वास बसत नव्हता. त्यानन्तर माझा हा ईन्टर्नेट फ़्रेन्ड कधीच ऑनलाईन आला नाही. कदाचीत दुसरे प्रोफ़ाईल आय्-डी वापरून चाट करत असेल. त्यानन्तर व्हिक्टीम बनायची माझी पाळी होती. प्रथम माझ्यावर ं बूस्टर युज करन्यात आला. Pं बूस्टर मुळे मला आचानकच ६० ते ७० ं आचानक आले. माझी मॉनिटर विन्डो ं नी भरून गेली. त्यामुळे मला नाईलाजाने नेट डिसकनेक्ट करायला लागले. याहू एडमीन कडे तक्रार केली पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. असेच आणखी दोन्-तीन हल्ले झाले. त्यानन्तर माझ्या विरुध्ध याहू बूटर वापरले गेले. माझा माझ्या मनाविरूध्ध रिस्टार्ट होत होता. अशावेळेस चाटीग सोडन्याचा सुध्धा विचार मनात येवुन गेला. पण त्याच वेळेस कोण्याच्यातरी विरुध्ध आपण कमी पडत असल्याची जाणिव सारखी होत होती. यावर उपाय शोधण्यासाठी वेगवेगळ्या फ़ोरम वर जाउन बघीतले. ह्या सर्व गडबडीत एक मात्र लक्षात आले की हे सर्व करणारा मिहिर्स्म्_८७ च होता. चाटीग रूम मधील त्याच्या मेसेजेस वरून ते स्पष्ट होत होते. हे सर्व तो त्याच्या वर गाणी बोलणाय्रा मित्रासाठी करत होता. जर एखादा युजर त्याच्या ग्रुप मधील नसेल आणि वर चाट करण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याचा अडसर हा दुर करत असे. दुसर्यान्च्या ची काय वाट लागेल ह्याची त्याला काहीच काळजी नव्हती. अशातच आम्हाला देखील काही बूटर आणि काही एन्टी-बूटर सापडले. एन्टी-बूटर वापरताना रिस्टार्ट होत नव्हता पण आम्ही याहू मेसेन्जर वरून जरूर किक-आऊट होत होतो. अजुन प्रोब्लेम पुर्णपणे सॉल्व झाला नव्हता. याहू बूटर युज करताना आमचा प्रोसेसर्-पन्खा अगदी विमानाच्या पन्ख्यासारखा जोरजोरात आवाज करत फ़िरत होता. त्यामूळे ते वापरण्याचा विचार सोडून द्यावा लागला. पण बदला तर घ्यायचा होताच. म्हणुन एक चान्गला मास्टर प्लान बनवला आगोदर ह्या सर्व आय-डी च्या सिमीलर असे आय्-डी बनवले. सिमीलर आय्-डी म्हणजे सिधन्त्_चोउधरि साठी सिधन्त्_चोउधरी जस्ट लाईक द्याट. नन्तर त्या प्रोफ़ाईल्स ना एक एक निक-नेम दिले. असे निक-नेम ज्यावर कोणाचेच लक्ष जाणार नाही. नन्तर काही साउन्ड फ़ाईल्स तयार केल्या. असे साउन्ड ज्याने कानाला त्रास होईल. ( साउन्ड फ़ाईल्स कोणत्या होत्या हे मी सान्गू शकत नाही. ऊगाचच ई ई असे आवाज निघतील आणि सेन्सर आडवा येयील.) युध्धाची सर्व तयारी झाल्यानन्तर आम्ही युध्धभूमित (म्हणजे चाटीग रूम मधे) प्रवेश केला. आगोदर टेहळणी करून बघीतली कि कोण्-कोण शत्रू आले आहेत. आमच्या निक्-नेम मुळे आमच्यावर कोणालाही सशय येणे कठीणच होते. आता वेळ होती गनिमी काव्याने हल्ला करण्याची. सर्वात आगोदर आमचा फ़ेवरेट दुश्मन मिहीर निवडला. त्याचा सिमीलर आय्-डी घेऊन विचीत्र असे आवाज सम्पुर्ण चाट्-रूम ला एकवला. आचानकच असा विचीत्र आवाज एकून सर्वजणच मिहीर वर हसायला लागले. त्याच्या नावाने रूम मधे लाफ़िग स्मायलीज आणि अजब्-गजब मेसेज येऊ लागले. ह्या विचीत्र हल्ल्याने मिहीर खडबडून जागा झाल्यासारखा ओरडला (म्हणजे त्याने टाईप केले ) हा आय-डी माझा नाही. पण वेळ निघून गेली होती. आमचा आय-डी त्याचा डुप्लिकेट असल्याने सगळेजण त्याच्यावरच कमेन्ट्स करत होते. त्याचा आय्-डी म्हणजे चाट रूम मधे जोकचा विषय झाला होता. ईतर युसर्स जरी ह्याची मजा घेत असले तरी त्याचे प्रस्थापीत मित्र मात्र खुश दिसत नव्हते. आमचा खरा आय-डी निक्-नेम च्या बुरख्याखाली आसल्याने त्याना खरा हल्ले करणारा शोधण्यास त्रास होत होता. त्याना सापडलाच तर तो आय्-डी पुन्हा बूटीग सॉफ़्टवेअर मधे टाईप करायला त्रास होत होता. एका नन्तर एक असे सर्वच वरचे सन्गितकार आमच्या हल्ल्याचे शिकार बनत होते. हे सर्व करताना मधेच आम्ही दूसर्या आय्-डी नी चाट रूम मधे येऊन ह्यान्ची हालत बघायला मजा येत होती. ईतर युजर्स चे रिल्पेज तर वाचण्यासारखे आसायचे. एकाने लिहले होते 'सिध्धान्त विमानात बसला आहेस काय.' आरतीला विचारत होते 'काय आरती पाऊस पडतोय का?' आणि ती मात्र सर्वाना मेसेज पाठवून म्हणत होती की हे मी नाही केले. आमचे हासुन हसुन पोट दुखत होते. एक रिप्ले वर आला होता. कोणीतरी पन्जाबी युसर चा होता- आरे आजकल चाटीग के लिये कैसे कैसे लोग आते है. एक किसी ने दूसरोके आय-डी लिये और उसके बाद क्या हुआ मै बता नही सकता. सर्व दुश्मनान्च्या ईमेजचा आम्ही फ़ालूदा केला होता. ज्या युजर्सना ते आवाज एकू नाही वाटले त्यानी सर्व सन्गितकारान्चे युजर्-आय-डी ईग्नोअर लिस्ट मधे टाकले होते. आशाप्रकारे ईन्टरनेट च्या या व्हर्चुअल वॉर मधे आम्ही विजय मिळवण्यात यशस्वी झालो. लेटेस्ट न्युज आमच्या काही दुश्मनानी स्व:ताचे प्रोफ़ाईल आय्-डी चेन्ज केले आहे व काही जण अजून बकरा बनायची वाट बघतायेत. ---------------------------------प्रसिक
|