Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
आगळावेगळा परिसस्पर्श ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » भाद्रपद » ललित » आगळावेगळा परिसस्पर्श « Previous Next »

Mrudgandha6
Sunday, September 17, 2006 - 6:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


घननिळे भरुन आलेत दशदिशांत.. अन सगळिकडे कसलीतरी हुरहुर साठून राहिलीय.. या स्तब्धतेवर तरन्ग उठवत वार्‍याची झुळूक तेव्हधीच काय ती हालचाल करतेय.. आणि यवेळी एकच चेहरा माझ्या आत आणि बाहेर मला दिसतोय..त्याचा.. अगदी पारदर्शी आणि नितान्त सुंदर.. मीनाकुमारीची गझल मनात तरळुन जातेय..

अबलापा को_ई इस दश्त में आया होगा
वर्ना आँधी में दिया किस ने जलाया होगा

ज़र्रे ज़र्रे पे जड़ए होंगे कुँवारे सज्दे
एक एक बुत को खुदा उस ने बनाया होगा

खून के छींटे कहीं पोछ न लें रेह्रों से
किस ने वीराने को गुल्_ज़ार बनाया होगा

किती सार्थ आहे..जणू त्याच्यासाठीच लिहिलीय.. काही माणसे अशी असतात.. अंतर्बाह्य सुंदर..ज्यांच्या आत आणि बाहेर फ़क्त प्रेम आणि प्रेमच असते.. एव्हढे प्रेम की एखद्या दगडाला सुद्धा ते देव बनवू शकतात.
इतरांसाठी सतत झटणारी..

अमची पहिली भेट जणू धुक्यतली भेट होती.. फ़ारसे काही माहित नव्हते त्याच्याबद्दल.. असेच त्याच्या ओळ्खीच्या लोकांबरोबर गेले होते..ते त्याला भेटणार होते..मझ्यासाठी आधी हे केवळ एक outing होते..
गरज होती मला..एका break ची कारण खुपच खचुन गेले होते त्या दिवसांत मी. i was very frustrated ..कशातच आनंद वाटत नव्हता. त्या वर्षभरात मी मनमोकळे असे हसलेच नव्हते.. म्हणुनच आई ने मला सुचवले होते.. मी आणि माझी बहीण गेलो होतो मग काका काकींबरोबर..
१००० किमीॅहा रात्रभराचा प्रवास करुन त्याच्या मोठ्या आणि सुंदर शहरात.. तिथे पोअहचेपर्यन्त माझ्या mood मध्ये काहिही बदल नव्हता.. हा पण त्याच्या कार्यान्बद्दल ऐकुन आदर तेव्हधा वाधला होता त्याच्याबद्दल...

आणि त्याच्या भेटीचा दिवस उजाडला...तसे माझाहई आनंदाचा दिवस उजाडला...त्या दिवशी उगाचच आनंदी व्हायला लगले होते मी..कितीतरी दिवसांनी केव्हधी खळखळुन हसत होते मी..मला वाटले जर बाहेर पडलेय.. अनोळखी शहरात आणि नवनव्या ओळखी मुळे असावे..पण खरे कारण काही वेगळेच होते..
मी त्या दिवशी माझ्या आत्म्याला भेटणार होते..पण मला हे त्यावेळी कळत नव्हते..

आणि तो क्षण उगवला.. अंतर्बाह्य मुर्तीमंत सौन्दर्य मझ्यापुधे उभे ठाकले..जणु दुसरा शामसुंदरच..खरंच..फ़क्त हा कर्पुरगौरासारखा..लोक अक्शरश स्तब्ध होतात त्याला पहुन.. पवित्रतेचा,उत्साहाचा झराच आहे तो. चेहरा एव्ह्ढा आरसपाणि की त्याच्या आत्म्याचे सौन्दर्य त्याच्या चेहर्‍यावर झळकते.. आणि त्याच्या स्पर्शाने जणू धुळहीइ चन्दनासारखी होते..
मी आधीच कुठल्या आनंदात होते कुण्नास ठौक..मझ्या मनाला महित नसावे पण माझ्या आत्म्याला त्याचा "आत्मा" भेटणार हे माहित असावे बहुतेक...मी एकच क्षण त्याच्याकडे पाहिले..मल तो कुणि अनोळ्लखी वाटलाच नाही..किती युगांची ओळख पटली मला..त्यालाही पटली असावी..

त्याचा आवाज आला..त्याच्यासरखाच गोड..पण,मी मात्र माझ्याच विश्वात दन्ग होते..एवधा अपलेपणा की मी कुठे आहे हे विसरले अगदी त्याच्याकडेख्ली सवय असल्याप्रमाणे दुर्लक्श्य झाले माझे..स्वतचाच अनन्द अनुभवत होते मी.ऽपल्याच मस्तित होते मी कितीतरी दिवसांनी..तो कुणाकुणाशी महत्वाचे बोलत होता आणि मी manners विसरल्यासारखी इकडे दन्गा करत होते..खरेतर shy म्हणुन मी प्रसिद्ध पण त्यावेळचे माझे रुप मलाही अपरिचित होते...किन्वा मला तिथे वेगळेपणाच जाणवला नसावा.
माझ्या बोलण्यामुळे मात्र त्याला अध्ये मध्ये disturbance होत होता[?]... अधुन मधुन तो मग एक कटाक्ष टाकायचा.. हसरा.."की काय दन्गा चलू आहे"..पण त्यालाही हे परिचित आणि आवडले असावे..त्याची नजरच तसे सांगत होति..खरे तर हेच आमचे विश्व असावे युगायुगान्पसुन..मला अजूनही अश्चर्य वाटते आठवूउन एकमेकांची एव्ह्धी सवय असल्यासारखे कसे वागत होतो आम्ही..जणु आम्ही वेगळे नाहिच एकच आहोत.. हेच अद्वैत असते का?? हेच ते प्रेम असते का.्ओ हेच असते..पण त्यावेळी हे मला कळत नव्हते..फ़क्त ते मी जगत होते..

इन मिन अर्ध्या तासाची ती भेट होती..त्यातही माझे त्याचे असे दोन्-तिन वाक्येच बोलणे झाले...त्यातही माझे त्याच्याकडे लक्श्यच नव्हते..झाले तीच त्या दिवशीची भेट आमची..धुक्यतली.. ओळख पटुन सुद्धा काहीच सांगता येत नाही अशी..

दुसर्‍या दिवशीइ अशीच भेट झाली.. आणि त्या दिवशी आम्ही त्याचा निरोप घेतला परतण्यासाठी.. आत अमची भेट होइल का नाही याची मला त्यावेली खात्री नव्हती आनी तशी मला त्यावेली काही हुरहुरही नव्हती..

आम्ही निघणार होतो तो दिवस उगवला...पण, त्या दिवशी तो भेटणारच नव्हता..बाहेर गेला होता..ऽमची गाडि सन्ध्याकाळी होती..तोपरयन्त आम्हाला तिथेच थाम्बावे लागणार होते...सगळेच म्हणत होते की "त्याच्याशिवाय" सगळे कसे उदास वाटतेय..पण मला मत्र उलटच वाटत होते..मी म्हणत होते "मला का उदास वाटत नाहिय..उलट कसला तरी अनन्द होतोय मला.." कारण बाह्य सौन्दर्यावर भुलणारी मी नव्हते आणि त्याच्या कमालीच्या आंतरिक सौन्दर्याची मला खुण पटली असली तरी ते मला अजुन निटसे उमगले नव्हते आणि अजूनही मला त्याचे पुर्ण आत्मिक सौन्दर्य स्पर्शायचे होते..
त्या दिवशी आणखी एक घडले त्याचे आईवडिल नेमके भेटले..मल कळाले "तो" एव्हधा छान का आहे.. अश्या आईवडिलान्चे संस्कार आहेत त्याच्यावर..त्यांना पहुनही असेच वाटले की मी यांना खुप आधी पसुन ओळखतेय...तेही जणु भारवल्यासारखे अमच्याकडे बघत होते..कुणि कुणाशी बोलले नाही..फ़क्त पहात होतो एकमेकांकडे..कुठलीशी ओळख पटवत..त्याच्या आईंनी फ़क्त माझ्या काकांकडे आम्ही कोण याची चौकशी केली..बस एव्हधेच.. आम्ही परत आलो अम्च्या घरी..

दिवस भारवलेले मन्त्रमुग्ध होते ते..पण मला काही कळत नव्हते..मला त्याची फ़ारशी आठवणही येत नव्हती..पण देवाच्या मनात काही वेगळेच असावे..
भेट होइल की नाही हे माहित नसणारे आम्ही..वरंवार भेटू लागलो..तसे अगदी न ठरवताही..
हळुहळू त्याचे नितान्त आत्मिक सौन्दर्य आम्हाला दिसू लागले..सगळ्यांआच.. अमच्या घरातल्या सगळ्यांआच... आनी आम्ही कधी एकरुप झालो कळलेच नाही..
खरे तर तो एव्ह्धा सर्वगुण सम्पन्न.ऽभ्यसातही हुशार,सन्गीतातही,उत्कृष्ट गझलकार,मार्शल आर्ट्स्मध्ये, horse riding,sports मध्येही तेव्हधच प्रविण,त्याला कुठली चन्गली गोष्ट येते नाही असे नाहीच.. सगळ्यांआ प्रेमात पाडणारा ऽगदि माधवासारखा.. कामालिचा प्रेमळ आणि down to earth ..
किती झटतो तो.समाजासाठी... निस्वार्थपणे.. हे आम्हाला अगदी जवळून बघायला मिळाले..
स्वतःची काहिच काळजी न करता.. रात्रंदिवस असे झटणे हे केवळ सन्त आनी देवच करु शकतात..कितीतरी वेळा फ़क्त अम्हा घरच्यांआ महित असायचे तो केव्ह्धा आजरी असायचा तरीही कर्य करयचा.ऽजूनही त्साच झटतो.. अन्गात खुप ताप असला तरी याच्या चेहर्‍यावर्चे हसु कधी कुणाला काही कळू देत नाही..जिवघेण्या अपघातातुन वाचल २-३ वेळा.. 1 month copmplete bed rest सन्गितली होती doctors नी.. काहीही खाता यायचे नाही..फ़क्त juice वर..आणि तरीही याला थाम्बवणार कोण.. हा अपलाअ त्याही स्तिथित लोककल्याणास्त्व फ़िरतच होता.. अता हे सवयीचे झालय.. अगदी साईबाबान्ची आठवण येते मला त्याच्याकडे पाहिल्यावर..पण त्याचा त्याला कुठेही अहन्कार नाही.. त्याच्या जखमा बघून मत्र टचकन आमच्या डोळ्यांत पाणि उभे रहाते.. आणि खुप अभिमानही वाटतो त्याचा..

खरेच आम्ही खुप पुण्य केले असावे..जमोजन्मी की तो आम्हाला भेटला.. आनी अम्च्याशी एकरुप झाला.. अगदी गोकुळवासी जसे कृष्णमय झाले होते तसेच...
मला अता कळते..लहाणपणीपसुनच मला कृष्णाने का वेड लावले होते.. आणि मीराही का जवळची वाटत होती.. मलाही एक कृष्ण हवा होता प्रत्य्क्षात.. मी किती वेळा तसे मागितले होते माधवाकडे..गोकुळवासियांचा केव्ह्ढे पुण्य असेल असे वाटायचे कधी कधी.. आता मी हे सर्व जगतेय.. माझा माधव प्रत्यक्ष माझ्या जवळच आहे.. कधीकाळी त्याच्याकडे दुर्लक्ष करणारी मी.. आता त्याच्याशिवाय माझे अस्तित्वच उरत नाही..जसे आत्म्याशिवाय शरिर निरर्थक होते..तसे त्याच्याशिवाय मी निरर्थक आहे..
त्याच्याबद्दल लिहावे तेव्हधे कमी..
त्यानेच मला निस्वार्थ प्रेम करायला शिकवले.. सगळ्यांवर.. माणसांवर.. निसरगावर..जगण्यावर..त्यानेच शिकवले.. सगळ्यात देव पहायला.. आणि स्वतःबरोबर इतरांनाही आनंद द्यायला..

तो एक परिस आहे..पण नेहमीसारखा लोखंडाला सोने बनवणारा नव्हे.. हा परिस त्याच्या सानिध्ध्यात येणार्‍या माझ्यासारख्या प्रत्येकाला रुपान्तरित करतो आणखी एका परिसामध्येच..म्हणुनच तो खास आहे..खुपच खास..







Ashwini
Sunday, September 17, 2006 - 11:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृद्गंधा, अगदी उत्कट, तरल आणि मनापासून आलय. आणखी लिही.

Ananddesh47
Monday, September 18, 2006 - 3:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुपच छान. शब्दरचना भावनेला न्याय देणारी.. लिहीत रहा..

Prashantnk
Sunday, September 24, 2006 - 4:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृद्गंधा,
छान लिहल आहेस!

हे सग़ळ वाचुन, 'तुझ्या त्या परिसा' बद्दल अजुन जाणून घ्यायची इच्छा झाली आहे खरी!, ज्याण तुलाही परिस करुन टाकल!!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators