Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 14, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » भाद्रपद » काव्यधारा » झुळूक » Archive through September 14, 2006 « Previous Next »

Shuma
Sunday, September 10, 2006 - 1:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! खूप दिवसांनी झुळूक वाचून कसं ताजं तवानं वाटलं!

धुक्यातील गडदपणा
जेव्हा अचानक विरळ होतो
वास्तवातील रस्ता कसा
तात्पुरता सरळा होतो
रस्त्याला लागताचं वाटतं
धुकंच किती बरं होतं
वास्तवाच्या विदारकतेतील
स्वप्नांहून खरं होतं



Ashwini
Sunday, September 10, 2006 - 2:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग शमा, किती दिवसांनी ग. खूप बरं वाटलं तुला इथे पाहून. आता इतक्या दिवसांच्या साठलेल्या सगळ्या कविता ताबडतोब पोस्ट कर पाहू. :-)

Welcome back!


Paragkan
Monday, September 11, 2006 - 1:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे व्वा ... चक्क Shuma! WC! आता परत गायब होऊ नकोस.

Dhund_ravi
Monday, September 11, 2006 - 8:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती असुसलेली रातराणी
ती चांदण्यांची बेधुंद गाणी
ती अपुर्ण कविता, अधुरी कहाणी
ते काळजाचं पाणी पाणी
..........................................तो तिच्या ओंजळीत गेला टाकुन…

ती थरथरत राहिली त्याच्या वर्षावात
ओंजळीमध्ये चेहरा झाकुन...

धुंद रवी


Sweety85
Monday, September 11, 2006 - 11:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धुंद रवी खुपच छान. असच लिहीत रहा.




Krishnag
Tuesday, September 12, 2006 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती

न बोलता खूप काही बोलून जाते
न रडता डोळे ओलावून जाते
न हंसता मनाला सुखावून जाते
न पहाता काळजाच्या कप्प्यातले निरखून जाते..

ती...

ती आहे एक झुळुक...
मृगाच्या सरी सारखी
नभातल्या परी सारखी
कधी रणीच्या तुतारी सारखी
तर कधी कान्हाच्या मुरली सारखी
कधी कधी श्रावणातल्या तिरिपे सारखी
तर कधी ग्रीष्मातल्या झुळुके सारखी
कधी भादव्यातल्या विजे सारखी
तर कधी कोजागिरीच्या पुनवे सारखी
कधी शिशिरातल्या तिळा सारखी
तर कधी चैत्राच्या पालवी सारखी



Parakhad
Tuesday, September 12, 2006 - 6:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झुळुक तुतारीवनी अस्तीया व्हंय ? आयकावं त्ये नवलच म्या म्हंतू इचार करुन लिव नगंस पन लिवल्यावर तरी इचार कर की रं बाबा

Lopamudraa
Wednesday, September 13, 2006 - 5:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परखडराव.. अवो तुम्ही लयी विनोदी आहात बगा.. काय हे ना.. इथ हौशे नवशे गव्वशे असे आम्ही समदे असतो बगा..त्यामुळ अमाच काही एकदम साहित्यिकासारख नाय.. तरी झुळुक वाहती राहु देवा.. तुम्च्या या परखड बोलन्यान आम्ची मंडळी गेली ना इथुन..
आता झुलुक कोरडि झाली ना एकदम.. अस काय करता राव...
तुम्ही बी लिहा कायी तरी अन आमलाबी वाचु द्या वाइच..!!!


Rupali_rahul
Wednesday, September 13, 2006 - 5:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्रिस मस्तच
धुंद_रवी, शमा छान


Lopamudraa
Thursday, September 14, 2006 - 7:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सकाळी उन्ह दवावर चमकली
आठवन तुझी आज मनावर थबकली.
किती.. लांबणार सावली..
माहित नाही..
कदाचित मावळल्यावरच..
थांबेल ही काहीली..!!!



Lopamudraa
Thursday, September 14, 2006 - 7:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शुभ्र चांदणी..सजली आज
दारात उतावीळ.. हिरवी वाट
वाजलीत तुझीच पावले..
भावमग्न हे स्वप्न मी पाहीले..!!!


Lopamudraa
Thursday, September 14, 2006 - 7:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कळी कळी तुन झरझर
थेंबांच्या सरी..
आतुर मनाच्या
जिद्दी आकांक्षेच्या भरी...
चिंब..सारी..
नदीकिनारी अलवार देही..
अवखळ लहरी..!!!


Lopamudraa
Thursday, September 14, 2006 - 7:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हळुच मरुत छेडे तार
आज उदास वाटे फ़ार..,
येइल का.. आज तरी...
तीन्ही सांजेचे वाट पाहे दार..!!!


Lopamudraa
Thursday, September 14, 2006 - 8:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नुसतेच दिवस मोजणे..
का असे हे जगणे..
जगण्याला अर्थ हवा..
काहीतरी रोज नवा..!!!
उमंग.. उमेद जिद्द हवी..
कष्टाला.. नशीबाची जोड हवी..!!!
जखडुन घ्यावे रंग नवे..
उखडुन टाकावे संदर्भ जुने..
वाहता वाहता जावे..
जगता जगता गावे..
आपणच आपुल्याला..
रोज नव्याने जोखावे..!!!


Lopamudraa
Thursday, September 14, 2006 - 8:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझी चाहुल तुझा स्पर्श देते..
तुझ्या भासाचा पाठलाग करत मी..
किती वर्ष दुरवर जाते..
अस्तित्वाचा अर्थ तुझ्या.....
कोण जाणे कधी कळेल मनास माझ्या..!!!


Lopamudraa
Thursday, September 14, 2006 - 8:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


तु आलास तर रात्रीला..
थोडं थांबवुन घेइन
पाहाटेला लपवुन ठेवेन
माहीत नाही उजाडल्यावर...
आयुष्याच्या दिशा...
कोणत्या दिशेला जातील?


Shyamli
Thursday, September 14, 2006 - 8:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्म्म वैशाली...
छान चाललय चालु दे

जखडुन घ्यावे रंग नवे..
उखडुन टाकावे संदर्भ जुने..
वाहता वाहता जावे..
जगता जगता गावे..
आपणच आपुल्याला..
रोज नव्याने जोखावे..!!! >>>

kyaa baat hai


Lopamudraa
Thursday, September 14, 2006 - 9:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकटाच सुर.
आज दुर दुर..
सुन्न माझ्या मैफ़िलित..
उठवत काहुर..
मनातल्या मनात
अंतराच्या पानात..
त्याचीच कंपने मोजित.
सुन्न बसलेला..गुढ गाभार्‍यत.. हरवुन..
स्वताचाच.. echo ऐकत असलेला..!!!


Shyamli
Thursday, September 14, 2006 - 9:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रत्येक वेळी का असावा
मनाला पार्‍याचा गीलावा
तुझ्याआधीच का कळावा
तुझ्या मनाचा कांगावा?

श्यामली!!!


Lopamudraa
Thursday, September 14, 2006 - 9:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त.. .. ...!!!.. .. .. .. .. ...




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators