|
माधवा, फ़ार नाही सहा हजार वर्षांपुर्वीची गोष्ट आहे ही..तुझीच..आम्ही ऐकलेली वाचलेली..दोन मित्रांची आणि त्यांच्या प्रेमाची गोष्ट.. सुदामा नावाचा एक गरिब मित्र आणि त्याचा मित्र म्हनजे तुच..कृष्ण नावाचा सार्वभौम राजा यांची गोष्ट. बालपणीचे मित्र तुम्ही..एकत्र गायी रखणारे..एकत्र बसुन काला खाणारे..एकत्र दही चोरणारे..एकत्रच गुरुकुलात शिकलेले..पुन्हा तूमची ताटातूट झाली.. तू राजा झाला आनि सुदाम्याच्या पदरी भिक्षुकी आलि.. एकाच्या पायी सर्व ऐश्वर्ये लोळत होती आणि एक अन्नादशा पहात फ़िरत होता..पण दोघांचेही एकमेकांवर फ़ार फ़ार प्रेम होते. एकदा सुदाम्यालाअ वाटले अप्ल्या बाल्पणीच्या मित्राला भेटून यावे..बघुया मला ओळखतो तरी का??पण एवध्या जिवलग मित्राला भेटायला रिक्त हाती कसे जायचे..? पण सुदाम्याच्या पत्नीने थोडे पोहे शिल्लक होते ते एका कसल्याश्या मळक्या वस्रात बांधून त्याची पुरचुंडी सुदाम्याजवळ दिली.. हा आला मग द्वारकेला..तुझ्या राजमहालापशी..पण त्याला कोण दाद देणार?? फ़ाटक्या वस्त्रातला कुणी एक भिकशुक.. सुदाम्याने भितभितच आपला परिचय दिला त्या राजवाड्याच्या द्वारपालांन.."कृष्णाला सांगा त्याच्या बालपणीचा मित्र "सुदामा" आलाय.. " आधी तर ते द्वारपाल हसलेच पण तरिही त्यांनी तो निरोप महालात जावून दिलाच तू म्हणे त्यावेली तुझ्या राण्यांसोबत गपा मारत बसला होता.."सुदामा" एवधा एकच शब्द तू ऐकला असेल तोवर गहिवरलेला तू असा कही पळत सुटलास..तूला कशाचेही भान रहिले नाही.. अपण कुणी एक राजा अहोत याचे.. आत तू फ़क्त सुदाम्याचा मित्र होतास.. तू जावून सुदाम्याला बिलगलास.. सुदामाही अपल्या मित्राचे पुर्वीचेच सुंदर रुप आणि पुर्वीचाच सुंदर स्वभाव बघून गहिवरला.. नंतर तू त्याची विचारपुस केली, स्वहस्ताने त्याची पुजा करून त्याला सुग्रास भोजन करावयाला अप्ल्या बरोबर बसवले.. सुदाम्याला आपल्या पत्नीचे,मुलांचे भुकेलेले चेहरे आठवले..एकच हुंदका दाटुन आला..पण त्याने स्वतःला अवरले.. तो स्वतचे दुःख तुला धाखवणार नव्हता..त्याचे प्रेमच असे निरपेक्ष होते..त्याला माहित होते "कृष्ण" आपल्याला आपण न मागताही भरपुर देईल पण तेच त्याच्या निरपेक्ष प्रेमाच्या आड आले असते..त्याने जर काही तुला मगितले असते तर..?? छे छे!! तो एव्ह्धा सन्कुचित नव्हता..त्याचे प्रेमच मुळी निस्वार्थ होते.. आनी या सगळ्यांमध्ये त्याने स्वत आणलेले पोहे द्यायचे धाडस तरी त्याच्यात कुठे असायला??? पन्च्पक्वांनाच्या राशीत आपले मुठभर पोहे.. त्याला खुप कमिपणाचे वाटले.. हा सुदामा होता.. निस्वार्थी मित्र पण त्याचा मित्रही तू.. कृष्ण होता..तुला बरोबर कळाले..तू सुदाम्याला म्हणालास "माझ्यासाठी तू काहीच आणले नाहीस??असा कसा मित्र तू? बघू काही दिलय का वहिनीने मला??" असे करत करत तू ती मळकी पुरचुंडी शोधून काधलीइच आणि त्यातले पोहे अधाशासारखे"अहाहा!!"करीत खाल्ली.तुला काय कमी होते का कशाचे..पण नाही तू ते किती प्रेमाने स्विकारले..का??? काय त्या पोह्याची चव वेगळी होती? कसली?उलट किती दिवसांचे शिळे पोहे ते..त्याची चव चान्गलि कुठली?? पण तरीही ती खुप चान्गली होती..कारण त्यात सुदाम्याच्या प्रेमच ओलावा होता.. अतिशय सुंदर चव होती कारण त्यात प्रेमाचा भाव होता..पण एव्हढेच नव्हे तर त्या भावाचा स्वाद ओळखून त्याची किम्मत जाणणारा तू होता.. म्हणुनच ते पोहे खास ठरले.. त्या मळक्या पुरचुंडीतील मुठभर शिळ्या पोह्यांचे मोल त्या सुदाम्याच्या प्रेमाने वाढवले आणि ते जाणाणार्या तू त्याचे मोल अगणित केलेस.. धन्य तो सुदामा पण त्याहीपेक्षा धन्य तो तू "कृष्ण"ज्याला त्या प्रेमाची किम्मत कळली.ज्याला त्या पोह्याची मळकी पुरचुंडी नाही दिसली..त्या पोह्याचा शिळेपणा नाही दिसला..त्या मूठभर पोह्यातला अमुल्या प्रेमभावच फ़क्त दिसला.. पण, हे कृष्णा,आज ६ हजार वर्षानंतर.. आता त्या पोह्यांआ काहीच किम्मत उरली नाही.. आता महत्व आलेय त्या पुर्चुंडीला रन्गीत वेष्टणाला आज किम्मत आहे.. माणसांपेक्षा व्यवहाराला.. नात्यांपेक्षा त्याच्या उपयोगाला.. अर्थांपेक्षा शबदांआ,विचारांपेक्षा ते पोहचवणार्या भाषेला..आणि प्रेमापेक्षा दिखूपणाला किम्मात आलीय.. अज मैत्री म्हणजे फ़क्त friendship day ला band बान्धणे ,प्रेम म्हणजे फ़क्त valentine day ला gift,card देणे,आइ-वडलांचे महत्व फ़क्त parents day ला,आजी आजोबा त्यांचा तर day हि साजरा होत नाही..,पर्यावरण,झाडे वेली,पशु,पक्षी.."काय असते ते??आणि त्याच्याशी आमचे काय घेने देने?".. आजकाल साध्यापेक्षा साधनाला किम्मत आलीयरे.. तू प्रत्येकाला सर्व काही चान्गले दिलेस.. अन्न,पाणि,निवारा देवून एकमेकांवरचे प्रेमासाठी म्हणुन सुंदर नाती निर्माण केलीस.ऽगदी झाडावेलींना पशु पक्षांवरही प्रेम करायला शिकवलेस त्यासाठीइ त्यांचे सण सुधा निर्माण केलेस..आणि मुद्दमच त्यांआ एकमेकांवर निर्भर केलेस..म्हणजे त्यांच्यात दुही माजणार नाही..पण, पण,आता कुणीच कुणाची कदर करत नाहीरे.. आता दिवाळि म्हणजे फ़क्त फ़टाके,आणि छान छान dress घेण्याची पर्वणि, party एव्हधाच त्याचा अर्थ उरलाय..त्या दिवशी तू म्हणे एका अधम नरकासुराला मारुन निष्पाप राजकन्यांना सोडवले होतेस.. आणि दुष्ट प्रवृत्तींचा अन्धकार नाहीसा करुन प्रेमाचा दिवा लवला होतास..आणि असेच सगळ्यांनी प्रेमाचा दिप उजळावा म्हणुन तू ही "दिवाळी " साजरी कारावी असे ठरवले होतेस ना?? अता कुणालाच याचि आठवण नाही..म्हणुनच पुन्हा म्हणतेय साध्यापेक्षा आता सधनांना किम्मत आलीय्रे माधवा.. आता आपल्यावर निरपेक्ष प्रेम करणार्या आई-वडिलांआ आजी आजोबांआ,बहिन भावांआ उपयोग्यतेच्या ताराजुवर तोलले जाते..ज्यांईइ आपल्यासाठी अनंत कष्ट उपसले त्यांची ही दशा केली जाते..आणि वाटेल तेव्हा दुर लोटले जाते..तिथे त्या गरिब मुक्या झादावेली,पशु पक्षांचि काय दशा???त्यानी आपल्यला निरपेक्षपणे सावली दिली,फ़ले दिली,फ़ुले दिली,प्राणवायु दिला,निसर्गाचा समतोल राखला..त्याची कुणाला साधी आठवण देखील नाहिरे.. वट पौर्णिमेचेच बघ ना..त्या दिवशी ते झाद लावावे,पुजावे..पण नाही आता त्याच्या फ़ांद्या ओरबाडल्या जातात,तोडल्या जातात..पुजण्यासाठी???..बास एवधेच त्या झाडाचे महत्व.. तू म्हने आपापल्या राशी-नक्षत्रान्नुसार झाडे दिली होतीस पुजायला..उद्द्येश एव्हधाच प्रत्येकाने झादान्वर प्राण्यांवर प्रेम करावे..पण आम्ही मानासे आहोतरे जिथे जन्मदात्या आई वडिलांआ विचारत नाही तिथे तरुवेलि,पशु-पक्षांची काय घेवून बसलास.. आता चिमण्यांचा किलबिलाट फ़ारसा होत नाही,झाडांच्या सावल्याहीइ खुप कमी झाल्यात,एकमेकांची प्रेमाने विचारपुस करणे अवघड तिथे प्रेम करणे तर दुरच..तेव्हढा वेल कुणाला आहे? जागा नही..आता मोठमोथ्या show pieces मध्ये आम्हाला एक छोट झाड लावणे परवडत नाही.. आम्ही निसर्गप्रेमी आहोतरे..जातो ना अम्बोली,महाबलेश्वर,ई. अनेक ठिकानी.ंइसर्गाचा आनन्द घ्यायला..मस्त माजा येते बघ..तिथले तरुवेली प्राण्यांचे आपापसातले प्रेम,आणि त्यान्ची एकमेकांवरची निर्भयता बघू म्हणतोस पण,आम्हाला त्या धबधब्याच्या पाण्यात नग्न आरडाओरडा करत नग्नतेचा नाच दाखवन्यात आणि दारु पिवुन झिन्गन्यात वेळ कसा मिळेल..तेव्हधे निसर्गप्रेम पुरे नाहई का?? निसर्गात काय दगडाचे सन्गीत असते??आमचे rock,jazz ऐक कधी तरी..त्या पशु पक्षांचे आवाज काय"हिमेश रेश्मिया" पेक्षा गोड आहेत का?? काय म्हणतोस?? घरच्यांशी बोलायला वेळ कुठला?? t.v.,movies,late night parties cricket matches,football यातून वेळ कुठला..आम्ही खुप busy माणसेरे..आणि तो आमचा हक्कच वेळ त्यात काय प्रेमबिम दखवायचे तेही त्या घरच्यांवर.. दिनदुबळे कोन?? आम्हाला कधी दिसत नाहित रे..? आम्च्या A.C गाद्यांच्या goggle glaasses मधुन आम्हाला काहीच दिसत नाहीरे.. म्हणुनच सान्गतो.ऽमच्या लेखी प्रेम म्हनजे सुंदर सुंदर भेट्वस्तू,पैसा,..त्या भेटवस्तून्च्या रन्गीत वेष्टनावरून आम्ही प्रेमाची किम्मत ठरवतो..जितकी जास्त मोठी आणि महाग भेटवस्तू तितकॅ जास्त प्रेम..आणि हेच प्रेम आहे..ते भाव भिव कशाला म्हणतात..त्या भावाना-बिवना काय असतात??आम्ही भावनीक माणसांआ emotinal fool म्हणतो..तूही त्यातलाच एक.. आता आम्हीइ मोठे झालोय.. सुदामा असेलही एखादा आमच्यात..पोहे घेवुन फ़िरणारा..पण आम्च्यातील ते प्रेम जाणुन घेण्याची तुझ्यासारखी सुंदर दृष्टि हरवलीय रे..
|
Jaaaswand
| |
| Thursday, September 14, 2006 - 9:36 am: |
| 
|
नितांत सुंदर आणि स्पर्शून जाणारे ...!!!
|
मित्रमैत्रिणींनो,, काही शब्द neat type झाले नाहित..तेव्हढे समजून घ्या.
|
Mrinmayee
| |
| Thursday, September 14, 2006 - 10:04 am: |
| 
|
मृद्गंधा, फारंच सुंदर लिहिलंय!! डोळ्यात अंजन घालणारं!
|
Lopamudraa
| |
| Thursday, September 14, 2006 - 10:32 am: |
| 
|
अप्रतिम.. म्रुदगंधा..!!!! ... .. .. .. .. ...
|
Prashantnk
| |
| Thursday, September 14, 2006 - 12:56 pm: |
| 
|
मृद्गंधा, आता 'वाचनप्रेम' करायची आमची पाळी! लिहित रहा.मला अभिमान वाटतो तूझा.
|
Fulpakhru
| |
| Thursday, September 14, 2006 - 2:22 pm: |
| 
|
म्रुद्गन्धा फ़ार छान लिहिले आहेस. खरच हल्ली आपण बाह्य रुपालाच फ़ार महत्व देतो...
|
Dineshvs
| |
| Friday, September 15, 2006 - 1:44 am: |
| 
|
मृद्गंधा, छान आहे पण अनेक मुद्द्यांची सरमिसळ झालीय. यासाठी वेगवेगळे लेख लिहिले असते तर चांगले झाले असते.
|
धन्यवाद सगळ्यांना.. दिनेशदादा,बरोबर आहे तुमचे.ऽगदी मालाही नंतर हेच वाटले एकेका मुद्द्यावर एक लेख होवू शकतो.. पण,काय झाले भावनेच्या भरात लिहिले त्यामुळे जरा सरमिसळ झाली.. आणि माझ्या मते तरी निसर्ग आणि माणसे वेगवेगळे नाहितच..त्यामुळे आई-वडिलांवर प्रेम करणे जेव्हढे जरुरी तेव्हढेच निसर्गावर पण.. प्रेम करा हा एकच मुद्दा इथे मन्डायचा होता
|
Soultrip
| |
| Friday, September 15, 2006 - 9:05 am: |
| 
|
आजच्या भाषेत सांगायंचं झालं तर.. product पेक्षा packaging ला, आणि substance पेक्षा style ला जास्त महत्व आलंय!
|
Asmaani
| |
| Friday, September 15, 2006 - 10:56 am: |
| 
|
मृ, काय लिहू? मनापासून आवडलं तुझं लिखाण. कळाकळीनं लिहिलंआहेस. तुझ्या कविता तर छान असतातच. लिहित रहा.
|
मृदगंधा, तुझं हे लिखाणही तुझ्या कवितेसारखच काव्यात्मक आहे keep it up
|
एक मात्र खात्रीपुर्वक की तुम्हा सर्वांकडे कृष्णासारखी दृष्टी आहे..ध्न्यवाद.
|
Maudee
| |
| Tuesday, September 19, 2006 - 6:13 am: |
| 
|
सुरेख लिहिल आहेस मृद्गंधा
|
Kiru
| |
| Thursday, September 21, 2006 - 11:24 am: |
| 
|
मृद्गन्धा.. अगदी मनापासून लिहिलयस... आणि मनातलंसुद्धा.
|
|
|