|
Puru
| |
| Wednesday, September 13, 2006 - 9:22 am: |
| 
|
थाप..कौतुकाची! परमेश्वरानं कष्टून, खपून सृष्टी निर्माण केली, मंजुळ कुजन करणारे पक्षी निर्माण केले, सुक्ष्मापासुन ते महाकाय डायनोसॉर पर्यंत प्राणी निर्माण केले. पण त्याला सारखी हुरहुर राहुन रहिली. काही तरी राहिलंय, काही तरी राहिलंय अशी. अचानक त्याला जाणवलं, एवढा सगळा ब्रह्मांडाचा पसारा उभा केलाय मी एकट्यानं, पण एक कौतुकाचा शब्द कानी पडत नाही! .. आणि विधात्यानं तत्क्षणी माणुस निर्माण केला! आणि का असू नये कौतुकाची अपेक्षा? कलेसाठी कला म्हणुन चित्रकारानं अवर्णनीय चित्रं रेखाटली असतील, पण जेंव्हा ती चित्रे प्रदर्शनात येतात, जाणकार जनत अचंबीत होउन ती चित्रे न्याहाळु लागते, उस्फुर्तपणे दाद बाहे पडते अन मग त्या चित्रकाराला वाटतं ‘ बस्स, यासाठी केला होता अट्टाहास!’. कौतुकाचं tonic घेऊन एक नव्या हुरुपानं त्याचा कुंचला आणखीन एक दिव्य कलाकृती चितारु लागतो! लाख पेक्षकांनी खचा-खच भरलेलं stadium, सचिन, सचिन च्या गगन-भेदी आरोळ्या; का नाही तेंडल्या आणखी एक memorable innings खेळणार? पार्श्वसंगीत, CDs, albums मधुन कोट्यावधी कमवुनही सच्च्या गायकाला मैफिलीत गाणं म्हणजे पर्वणी वाटत असते. कारण तेथे मिळणार असते, जिवंत, रसरशीत, उस्फुर्त दाद! Once more ची लाडकी फर्माईश!! कलावंत, खेळाडू सोडा, पण तुम्हा-आम्हा सामान्यजनांच्या रोजच्या आपल्या सामान्य, सरळ-धोपट जीवनात ही कौतुकाची अपेक्षा असतेच! लहानपणी आजी-आजोबा, आई-बाबांकडुन होणारं सकारण\अकारण कौतुक तर गृहितच धरलेलं असतं! पण नंतरच्या जीवनातही प्रत्येकाला कौतुकाची भूक असतेच. खपुन एखादी पाक-कृती केली आणि नवरोबांनी काहीही न म्हणत ती ‘आत ढकलली’ तर काय प्रसंग गुदरतो, माहित आहे नां? किंवा आजच्या काळातील नवथर पत्नीनं नवा hair-do केला आणि श्रीयुत मात्र काहीही नं बोलता (पक्षी, कौतकाचे चार शब्द न उच्चारता) मुग गिळुन गप्प बसुन राहिले, तर त्या लवंगी मिरचीचा आपटबार फुटणारच सायबर-विश्वातील internet चं मोठ्ठं दालन बर्याच हौशी, नवागत तसेच प्रख्यात कवीना सारखं खुणावत असतं! मग काय, साहित्याचा गुलमोहोर नुसता फुलून येतो, सुंदर कविता झुळूकीसम वाटु लागतात, विडंबनांच्या बुंदी पडतात! मान्य आहे, बर्याच कवितांमधे, लेखांमधे फारसं काही भारी ('जेथ नं जाय रवी, तेथ जाय कवी' वगैरे वाटावं असं इ.) नसेल, काही अगदीच धोबळ चुकाही असतील! पण उगाच त्या चुका परखडपणे ओरडुन सांगुन बिचार्याचा तेजोभंग करण्यापेक्षा भाष्य नं केलेलं बरं, नाही का? आणि हो, सगळेच कांही खांडेकर, माडगुळकर, करंदीकर, शिरवाडकर, महानोर वगैरे नसतात. पण म्हणुन काय बाकीच्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करुच नयेत? मग उद्याचे साहित्यीक कोठून येणार? उलट, कधीही न भेटलेल्या, हजारो मैल दुर राहणार्या अनोळखी रसिकांकडुन जेंव्हा मन:पुर्वक दाद येते, कौतुकाचे चार शब्द येतात, ‘अजुन येऊ दे’ ची आग्रही मागणी येते, आणि मग त्या अनामिक कवि, लेखकाच्या प्रतिभेचा अंकूर आत्मविश्वासानं आकाशाकडं झेपाऊ लाग़तो, गगनास कवेत घेऊ पाहतो अन वेगानं की-बोर्डवर बोटं फिरु लागतात, पांढर्यावर काळे उमटू लागते!! साहित्याचा जन्म-सोहळा सुरु असतो!!!
|
Ldhule
| |
| Wednesday, September 13, 2006 - 9:53 am: |
| 
|
पुरु, gr8... अजुन येऊ दे

|
Fulpakhru
| |
| Wednesday, September 13, 2006 - 1:54 pm: |
| 
|
पुरु अगदी मनातलं लिहिलस. लिहित रहा असच.
|
Puru
| |
| Thursday, September 14, 2006 - 3:36 am: |
| 
|
धन्यवाद लक्ष्मीकांत आणि फुलपाखरु! दुसर्या एकाच्या लेखावरती एक जरा खटकणारं भाष्य होतं, वाटलं समस्त नवोदितांच्यावतीने त्याच्या आणि इतरांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन द्यावं, म्हणुन हा लेख्-प्रपंच केला गेला!
|
Maudee
| |
| Thursday, September 14, 2006 - 3:42 am: |
| 
|
छान लिहिल आहेस पुरु.
|
Sonchafa
| |
| Friday, September 15, 2006 - 3:31 am: |
| 
|
हो अगदी मनातले लिहीलस पुरु..!
|
पुरु.. या भारत भेटित मी माझे आवडते कवी.. श्री. ना.धो.महानोर यांना भेटुन आले.. तेव्हा तीन तास ते बोलत होते आणि मी ऐकत होते, त्यातले पहिलेच वाक्य मला आठवत ते अस.. " एका टिकेच्या वाक्याने माणुस आयुष्यातुन उठु शकतो पण कौतुकाच्या थापेने.. माणसात प्राण येतो.., तेव्हा पोरी तु म्हणाली तरी तुझ्या.. वर मी टिका करणार नाही आपले काय चुकतेय हे स्वताच स्वताच्या कसे लक्षात आणुन द्यायचे.. ते मी तुला सांगतो.. आणि त्यानतरही ते खुप सुंदर बोलत राहिले.. माझ्या अयुष्यातलाखुप.. आंनदाचा जपुन ठेवण्याचा तो क्षण होता त्याचा व्रुतात मला मायबोलिवार लिहायचा होता.. पण माझच शब्द सामर्थ कमी पडेल अस मला वाटल्याने.. मी ते रहित केले.!!! छान लिहिलय...!!!
|
Shyamli
| |
| Friday, September 15, 2006 - 8:20 am: |
| 
|
पुरु एरवीही तुम्ही छानच लिहीता........ आवडत तुमच लीखाण मला आणि हे तर सगळ्यांच्या मनातल....... छानच... 
|
पुरु, शाब्बास!!! थाप बर का..कौतुकाची.. छान लिहलय
|
Puru
| |
| Friday, September 15, 2006 - 8:47 am: |
| 
|
एव्हढ्या थापांची सवय नाही हो! धन्यवाद सर्वांना!!
|
|
|