Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 10, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » भाद्रपद » काव्यधारा » झुळूक » Archive through September 10, 2006 « Previous Next »

Dhund_ravi
Wednesday, September 06, 2006 - 2:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या बोलण्याला
बडबडण्याची धार आहे..
पण तु ऐकुन घेतेस
हेच माझ्याकरता फ़ार आहे..

मी नुसताच बडबडत बसतो
पण तु करुनही जातेस..
न बोलताच सगळ जिंकुन
माझ्याकरता हरुनही जातेस...

धुंद रवी



Bhramar_vihar
Wednesday, September 06, 2006 - 11:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान! येल्ट्या, लेका छानच हे की!

R_joshi
Friday, September 08, 2006 - 5:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धुंद रवि तुम्ही फारच छान लिहिता.

तुझ्यासाठी जगताना
मी स्वत:साठी जगत असते
तुझ्या बडबडण्यात
मी माझ्या भावना व्यक्त करते

प्रिति :-)


R_joshi
Friday, September 08, 2006 - 5:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्रुंचा अर्थ दु:ख
सुखाचा अर्थ हसु
मग सुखात अश्रु
पापण्या का ओलवतात?
अश्रु आणि हसु एक असताना
दोघे एवढे भिन्न का वाटतात


R_joshi
Friday, September 08, 2006 - 5:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला गृहित धरण
हे नेहमीचच असत
बहुतेक माझे-तुझे विचार
एकच असण्याचे हे लक्षण असत

प्रिति :-)


Rupali_rahul
Friday, September 08, 2006 - 6:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धुंद_रवी,स्मि, श्यामली उच्च
प्रिति सुरेख



Rupali_rahul
Friday, September 08, 2006 - 6:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुखाचे अश्रु आणि दु:खाचे अश्रु
ह्यात फ़क्त एकच फ़रक
एका वेळी मन आनंदी आणि
दुसर्‍यावेळी बसत कुढत

रुप...


Rupali_rahul
Friday, September 08, 2006 - 6:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्या बडबडीला ऐकण्यातही
माझाच फ़ायदा फ़ार आहे
त्य निरर्थक बडबडीला
माझ्यालेखी अर्थ फ़ार आहे

रुप...


Rupali_rahul
Friday, September 08, 2006 - 6:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुर्वी एकदा पोस्ट केलेली...
तुझ्या गालावरच्या ख़ळ्यांच्या
प्रेमात मी पडलोयं
पण तुला कस सांगावं
याच्या विचारात मी गढलोय

रुप...


Shyamli
Friday, September 08, 2006 - 7:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रूप.....

चालु दे,.. .. ..


Suruchisuruchi
Friday, September 08, 2006 - 9:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गालावरच्या खळीवरचं प्रेम
असं बोलून का सांगायच?
अधरांमागे दडली ख़ळी
की नकळतच ते उमगायचं


Smi_dod
Friday, September 08, 2006 - 11:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रूप...


शब्द तुझे झेलताना
स्पर्श तुझा पेलताना
वसंत फ़ुलतो
रोमा रोमात दरवळतो
श्वास तुझा,
ह्रुदयात दरवळतो
हुन्कार तुझा
त्या श्वासांचि,हुन्काराचि
आस लागलिये मला
हळुवार स्पर्श तुझा
कळ्या फ़ुलवतो
उमललेली फ़ुले
बेभान करतात
कुशीत तुझ्या
भान हरवतात

स्मि


Smi_dod
Friday, September 08, 2006 - 11:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हात तुझा हाती
युगान युगे असावा
क्षण ते सारे.....
कोसळत्या धारेचे
रखरखीत वाळवंटाचे
तृप्त हिरवळीचे
फ़ुललेल्या कळ्यांचे
ओंजळीत दोघांच्या असावे

स्मि


Dhund_ravi
Saturday, September 09, 2006 - 12:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लाजली कळी कळी
ख़ळी गालावर उमलली
उमलत्या खळीत जळून
पाकळी बहरली
बहरत्या फ़ुलात मिटुन मज पाखरु बनायचे
उधळु नको मोहरंग, मज अजुनही जगायचे

मन सैरभैर पाखरु
श्वासवरी तरंगले
पेटले श्वासात गंध
गंधात भास रंगले
रंगात अंग भिजवुनी मज तरंगात गायचे
उधळु नको मोहरंग, मज अजुनही जगायचे

उन्मत्त रात्र रेशमी
विखरुन पाश न्हायली
पाशात दंश लपवुनी
दरवळली सायली
मोहात मात असुनही मज पराभुत व्हायचे
उधळु नको मोहरंग, मज अजुनही जगायचे

धुंद रवी


Smi_dod
Saturday, September 09, 2006 - 12:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा धुंद रवी.... छान!!!

Shyamli
Sunday, September 10, 2006 - 8:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या नाही..
माझ्या जिवलग सखीच्या चारोळ्या पोस्ट करतीये


धुक्यात फिरुन यावे सगळीकडे
जग कांही दिसत नाही
वास्तवाचे चटके लागेपर्यंत
धुके कांही जात नाही

नीलीमा


Shyamli
Sunday, September 10, 2006 - 8:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नियतीने ठोकरले म्हणून
तिच्याशी भांडायच नसतं
जळजळीत जहाल विष
हसत हसत पचवायच असतं

नीलीमा


Shyamli
Sunday, September 10, 2006 - 8:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तू माझा की मी तुझी
हा वाद फक्त तुझा आहे
एकत्वाच्या खात्रीपोटीच
मी याला अपवाद आहे

नीलीमा


Shyamli
Sunday, September 10, 2006 - 8:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उभयान्वयी अव्ययाचं असच असतं
दोघांना जोडता जोडता
बिचार्‍याला
दोघांपासून तुटाव लागतं

नीलीमा


Shyamli
Sunday, September 10, 2006 - 8:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फॅशनच्या हट्टास्तव घरामधे
रोपट्याचा बोन्साय होतो
घराबाहेरील रोपटे मात्र
फोफावणारा वृक्ष होतो

नीलीमा





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators