Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Amar aalingana...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » भाद्रपद » ललित » Amar aalingana... « Previous Next »

Niru_kul
Saturday, September 09, 2006 - 7:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमर आलिंगन...

रविवार सकाळची वेळ होती,
मी हॉलमध्ये पेपर वाचत बसलो होतो;
ती नुकतीच सुस्नात होउन बाहेर आली,
"चहा घेणार का तुम्ही? " असं मला म्हणाली;
मी तिच्याकडे न बघताच "हो" म्हणालो,
आणि पुन्हा पेपर वाचण्यात गढून गेलो;
माझ्या जवळून जाताना तिने केसांना नाजुक झटका दिला,
त्यातून उडालेल्या तुषारांनी पेपर मात्र ओला झाला;
मी उगाच खट्याळ नजरेने तिच्याकडे पाहिले,
तिनंही मग खोट्या रागाने तोंड आपले फिरवले;
मी हळूच उठलो खुर्चीवरुन आणि स्वयंपाकघरात आलो,
तिनं माझ्याकडे बघावं म्हणून फ्रिजवर तबला वाजवू लागलो;
तिनं मात्र मागे न बघताच चहाचं आधण ठेवलं,
आणि मग मला चिडवण्यासाठी आपलं नाक उडवलं;
तिच्या पाठमोर्‍या रुपाकडे बघत मी क्षणभर तसाच थांबलो,
उगाच तिला दुखावले म्हणुन स्वतःच्याच मनाशी भांडलो;
हळुच मग मागुन जाऊन मग मी तिच्या कमरेला विळखा घातला,
पण गडबडीत चहाच्या भांड्याला लागुन हात माझा भाजला;
मी कळवळून हात झटकताना ती मात्र मनसोक्त हसली,
चावटपणाची वेडी लहर माझ्या मनात मग उठली;
मी जखडले तिला मिठीत, ती म्हणाली "जाऊ द्या ना!"
मी म्हणालो तिला "तुला माझ्यात सामवू दे ना!"
ती लाजुन म्हणाली "अहो असं काय करता? चहा उकळतोय!"
मी म्हणालो "उकळू दे! इथं माझा जीव जळतोय!"
"अहो असं काय करता? दूध उतू जाईल ना!"
"कशाला काळजी करतेस मी परत आणुन देईन ना!"
ती उगाच कारणं देत होती, मी प्रत्येक कारण उडवत होतो,
तिला अजुनच जवळ घेत, माझ्या मनासारखं घडवत होतो;
शेवटी तिनं कारण दिलं "अहो सिलेंडरचा बहुतेक वास येतोय"
मी म्हणालो "हो का! मला वाटले की माझा चावटपणा अती होतोय"
तेवढ्यात दाराची कडी वाजली,
मी मनातल्या मनात बाहेरच्याला इरसाल शिवी घातली;
तिनं झटकन स्वतःला माझ्या तावडीतुन सोडवून घेतलं,
आणि हळूच मला धक्का मारुन, स्वयंपाकघराबाहेर लोटलं;
मी वैतागानं दार उघडलं समोर कचरावाला दिसला,
माझा खांद्याशी ओला झालेला शर्ट पाहुन तो पण गालात हसला;
मी कचरा देऊन झटकन दार लावून घेतलं,
पण मागेवळताक्षणी काहितरी विचित्र घडणार आहे, असं मला वाटलं;
पहिले मला स्वयंपाकघरातुन, दूध जळण्याचा वास आला,
नंतर कान दणाणुन सोडणारा, सिलेंडरचा स्फोट झाला;
मी धावत आत गेलो, माझं ह्रदय धडधडत होतं,
माझ्या डोळ्यांदेखत तिचं पातळ आगीवर फडफडत होतं;
मी तिला उचलून घेतलं, डोळे माझे झरत होते,
तिच्या करपलेल्या कायेवरून हात माझे फिरत होते;
मोठ्या कष्टानं तिने डोळे उघडले,
मला पाहुन तिच्या ओठांवर, हास्य मग विलसले;
ती म्हणाली मला "एकदा मला तुमच्या मिठीत घ्या ना!"
"मरण्यापुर्वी मला, तुमच्यामध्ये सामावू द्या ना!"
मी कवटाळले तिला उराशी, अन देवाचे स्मरण करु लागलो,
ती वाचावी म्हणुन त्याची करुणा भाकू लागलो;
पण दूध उतू गेलं होतं, ओटा मात्र फेसाळला होता,
आम्हा दोघांचं अमर आलिंगन पाहुन, तिचा मृत्युही क्षणभर रेंगाळला होता....



Ldhule
Wednesday, September 13, 2006 - 2:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय प्रतिक्रीया द्यावी काही कळेना.

Kedarjoshi
Wednesday, September 13, 2006 - 3:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निरज जबरी. खुप मस्त लिहीलेस.

Kmayuresh2002
Wednesday, September 13, 2006 - 11:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निरज,खरच काय प्रतिक्रिया द्यावी.. एकदम निःशब्द केलस

Smi_dod
Wednesday, September 13, 2006 - 11:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निरज.... ... ... काय बोलावे? सुचेना काही.....

Proffspider
Thursday, September 14, 2006 - 2:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीरज, खरोखर शब्द नाहीत प्रतिक्रिया द्ययाला...... :-) अगदी मोजक्या शब्दात अप्रतिम लिहिला आहे !!!

Shyamli
Thursday, September 14, 2006 - 2:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई ग...
काय रे नीरज.....

कीती सुरेख लीहीलयस रे हे सगळं


Deepanjali
Thursday, September 14, 2006 - 2:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उच्च !! !! !! !!

Rupali_rahul
Thursday, September 14, 2006 - 2:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.. .. .. ..

Bee
Thursday, September 14, 2006 - 4:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेरे... हे खरचं घडल असेल का? .. नीरज तुच सांग..

खूप सुंदर लिहिलं आहेस...


Psg
Thursday, September 14, 2006 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई शप्पत!!!
..
..
..


Niru_kul
Thursday, September 14, 2006 - 8:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रियांसाठी धन्यवाद.......

हा प्रसंग माझ्या कल्पनेतून साकार झालेला आहे.....


Fulpakhru
Thursday, September 14, 2006 - 2:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

niraj very touching ...

Kandapohe
Friday, September 15, 2006 - 1:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निरज, छानच लिहीले आहेस. मस्तच!!




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators