Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 06, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » भाद्रपद » काव्यधारा » झुळूक » Archive through September 06, 2006 « Previous Next »

Dhund_ravi
Saturday, September 02, 2006 - 4:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणीतरी बिलगले अलगद रिमझिम
अन पाऊस कुशीतला ओला झाला...
प्राजक्त मनाचा कुणीतरी हलवला
सडा चिमुकला गोळा झाला...

धुंद रवी


Smi_dod
Saturday, September 02, 2006 - 4:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहि सगळ्यांच्या झुळ्य्का
धुंद रवि....मस्त...क्या बात है... छान..!!!


Rupali_rahul
Saturday, September 02, 2006 - 5:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा!!! धुंद_रवी क्या बात है!!!

R_joshi
Saturday, September 02, 2006 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मन हे फुलपाखरु झाले
अन सप्तरंगात ते सजले
जुन्या सोबतीच्या सख्याना
ते नव्याने आज भेटले

प्रिति :-)


R_joshi
Saturday, September 02, 2006 - 5:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धुंद रवि, धुंद निशा
धुंदित प्रेम हि असत
या प्रेमाच्या धुंदित
तुझ माझ अस काहि नसत

प्रिति :-)


R_joshi
Saturday, September 02, 2006 - 5:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रेमाचि परीभाषा कोणी सांगावी
ती तर प्रेमातुर सरीता
सागराच्या ओढिने जगणारी
प्रेमाचीच एक सुंदर कविता

प्रिति :-)


Suruchisuruchi
Saturday, September 02, 2006 - 8:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पिरेम म्हन्जी काय?
आसं शोधून गावनार नाय
एकवार डोळ्या भिडवून डोळा
दिलामंदी माह्या उतरून पाह्य


Shyamli
Sunday, September 03, 2006 - 6:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय मंडळि... छान चालय

पुन्हा तुझं ते परत येणं
पुन्हा माझं ते मोहरून जाणं

ऋतूंप्रमाणे येतोस जातोस

माहीत असतं मलाही
तूही तसाच बदलणार आहेस

माहीतीये,
हे ही तोडण्यासाठीच असणारे

तुटक तुटकच............

तरीही,
परत परत जोडणं

श्यामली!!!



Dhund_ravi
Monday, September 04, 2006 - 1:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तु माझ्या सुख़ासाठी
तुझं घरटं सोडलं नाहीस
पण मग तुझ्या सुख़ासाठी माझं घरटं का मोडलंस

तु माझ्या सुख़ासाठी
तुला माझ्याशी जोडलं नाहीस
पण मग तुझ्या सुख़ासाठी मला तुझ्यात का ओढलंस

घरटं माझं मोडायचंच होतं तर तुझ्या घरट्यात राहु द्यायचंस...
मला तुझ्यात ओढायचंच होतं तर डोळे भरुन पाहू द्यायचंस...

येताना तु एकटी आलीस
पण जाताना सगळं घेऊन गेलीस...
सगळ तरी नेलंस कुठे
तुझ्या आठवणी ठेऊन गेलीस...

घरटं माझं जोडायला
फ़क्त एकदा येऊन जा.....
घरटं जोडता नाही आलं
निदान आठवणी तरी घेऊन जा.....!

धुंद रवी


Lopamudraa
Monday, September 04, 2006 - 1:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली... अगदी.. अगदी सुंदर.. काय छान लिहायला लागलीस ग..!!!..
मस्त.... धुन्द रवी.. मस्तय..!!!


Smi_dod
Tuesday, September 05, 2006 - 11:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वर्तुळ

काल सहज जाता जाता
आजुबाजुला बघितले तर
प्रत्येकाभोवती ज्याची त्याची दर्तुळे
लहान वर्तुळे,मोठी वर्तुळे
अर्ध वर्तुळे, पुर्ण वर्तुळे
हसरी वर्तुळे,रडणारी वर्तुळे
मग मी माझ्या भोवती बघितले
वर्तुळच नव्हते
वर्तुळाच्या बंधनांना
मी कधी मानलेच नव्हते
अशी वर्तुळ मुक्त मी
चालता चालता
एका वर्तुळात गेले
वर्तुळ हलले,रागाने फ़ुत्कारले
सॉरी म्हणाले झटकन बाहेर पडले
डबडबलेल्या डोळ्यांनी बघितले
तर आता माझ्याभोवती पण वर्तुळ होते
तुडुंब पाण्याचे वर्तुळ.......


स्मि


Smi_dod
Tuesday, September 05, 2006 - 11:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुखवटा


जगण्याशी आता मी कॉम्प्रमाईज केलय
रडायच नाही ठरवलय
जिव्हारी लागलेले घाव
झालेल्या जखमा
मागे टाकत
हसत रहायचे
एक छानसा मुखवटा चढवायचा
जन्मभर ज्या मुखवट्या पासुन
दूर राहिले.....
आता तोच चढवायचा
लपवतो मग तो आपल्याला
सगळ्यांपासुन,आपल्यापासुन
मग त्या मुखवट्याआड
हवे ते करता येते
वेदनेने कळवळता येते
घावांनी टाहो फ़ोडता येतो
तरी वरचा मुखवटा मात्र
हसत असतो.....

स्मि


Shyamli
Tuesday, September 05, 2006 - 11:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आहा ग स्मि.....

मिळतो का ग असा मुखवटा?

थॅन्क्स वैशाली


Devdattag
Tuesday, September 05, 2006 - 11:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे मस्त चालु आहे अगदी..:-)

Smi_dod
Tuesday, September 05, 2006 - 11:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


ठिकरी

ठिकरी पाणी खेळता खेळता
मी ठिकरी झाले
या घरातुन त्या घरात
कधी मागे तर कधी पुढे
न कुरकुरता.......
पण तु मात्र दमलास
या घरातुन त्या घरात जायला
नकार द्यायला लागलास
ठिकरीचे प्राक्तन असलेली मी तरी हसत होते...
आणि ठिकरी उडवायचे बळ असलेला तु
कंटाळुन परत निघाला होता

स्मि


Shyamli
Tuesday, September 05, 2006 - 11:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह.. .. .. ..

Smi_dod
Wednesday, September 06, 2006 - 12:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली...तुझ्या प्रश्नाचे उत्तर बघ"असे मुखवटे मिळत नाही.... असे मुखवटे कमवावे लागतात.... मनाच्या जखमा लपवायला... "


Dhund_ravi
Wednesday, September 06, 2006 - 1:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लाजली कळी कळी
ख़ळी गालावर उमलली
उमलत्या खळीत जळून
पाकळी बहरली
बहरत्या फ़ुलात मिटुन मज पाखरु बनायचे
उधळु नको मोहरंग, मज अजुनही जगायचे

धुंद रवी


Shyamli
Wednesday, September 06, 2006 - 1:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ग स्मि,
छानच लिहीलयस अगदी


Limbutimbu
Wednesday, September 06, 2006 - 1:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> असे मुखवटे कमवावे लागतात....
अगदी परफेक्ट! :-)

पण मनाच्या जखमा तरी
का लागतात लपवायला
जखमीच असले पाहीजे का
मुखवट्यामागे दडायला

फुग्याप्रमाणे फोडु पहातो
माझे आखलेले वर्तुळ कोणी
अधिकच आक्रसतो वर्तुळ माझे
जेव्हा बोचर्‍या शब्दान्ची टोचणी

कधी मग कन्टाळून
चढवतो असा एक मुखवटा
ज्याचे वर्तुळ खुपच मोठ्ठे
घेई कवेत सार्‍या टोचण्या

(ही उगाचच, शब्दाला शब्द जोडत जुगवलेली कविता हे! सबब नीट उतरली नाही)






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators