Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
AayuShya

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » भाद्रपद » ललित » AayuShya « Previous Next »

Rupali_county
Wednesday, September 06, 2006 - 10:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयुष्य

आपण जगतो ते आयुष्य, आपण स्मरतो ते आयुष्यच ना? देवाने जगण्या साठी जन्म दिला मग का जगू नये हे आयुष्य. तुम्हाला मला हा नेहमिच विचार येत असेल कि का अस घडत आपल्या सोबत? आयुष्य जगताना अनेक चान्ग्ल्या नि वाईट प्रसन्गाना आपण समोर जातो, पण हे सगळ कशा साठी? अनूभव मिळवन्या साठी, अनूभवातुन माणुस मोठा होतो म्हनतात, पण मग ह्या अनुभवा चा उपयोग स्वतहा साठी च का करायचा?

आज इथे राहूनही मला एकच प्रश्न सतत बोचत आहे, का कश्या करिता जगतेय मी? पैसा कमवून आमची स्वप्न पूर्ण करण्या साठी? की सूखी जीवन जगन्या साठी? स्वतहा च घर, स्वतहा ची गाडी, सगळच स्वतहा च! कशाला हव हे सगळ? जे दिवस तूमच्या नशिबी आहेत ते जगाना, कशाला उगाचच स्वतहा च बनवन्या साठी स्वतहा चि च धडपड!

ह्या 'स्व' चा अर्थ आपण कधी शोधला आहे का? मि गेल्या ११ वर्षा पासून ह्य 'स्व' च अर्थ शोधत आहे, अजून हि शोधत च आहे. कधी कधी वाटत सापडल उत्तर पण ते उत्तर सुद्धा स्वतहा कडून च आलेल असत.. पण तरिहि एक प्रयत्न " स्व म्हणजे माणसाला मिळालेली एक शक्ति, जि सदैव त्याच्या सोबत राहणारी, त्याला जागरूकता मिळवून देणारी, स्व म्हणजे अहमकार"

पण मला नको आहे हे असले अहमकारि जिवन.
हे आयुष्य स्वतहा साठी न जगता कोणसाठी तरि जगाव.
मि जगतेय ना हे आयुष्य माझ्या बाळासाठी, माझ्या पतिदेवा साठी, अगदि स्वतहा चा विचार न करता... अगदि शेवटच्या श्वासा पर्यन्त मी हे आयुष्य जगणार आहे. अहमकाराचा विचार न करता इतराना मदत करणार आहे, तुम्ही हि असाच विचार करता का? पण एक गोष्ट लक्षात ठेवा सारखा विचार करणे हे आयुष्याला घातक आहे.

मग.. तूम्ही सुद्धा जगताय का हे असल आयुष्य?

माझ्या ह्या "स्व" कडून तुम्हाला अनेक शुभेच्छा हे असल आयुष्य जगन्या साठी!!

रुपाली


Mrudgandha6
Tuesday, September 12, 2006 - 10:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी छाअन आणि योग्यच आहे तुझे आयुष्या.. तुलाहीइ शुभेच्छा.मी ही असले सुंदर आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतेय.."स्व"चा शोध घेत.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators