|
Bee
| |
| Monday, September 04, 2006 - 7:25 am: |
| 
|
रविवारचा दिवस असूनही आज अगदी रोजच्या पेक्षा लवकर जाग आली. संधीचा फ़ायदा म्हणून सुर्योदय बघायला तिने सायकल बाहेर काढली. चपलेला चिकटलेले पिवळे post-it भिन्तीवर चिकटेल त्या ठिकाणी थाप मारून लावून दिले आणि ती घराबाहेर पडली. रोज गळ्यापर्यंत येणारे काम आणि पुरे करता करता निघून जाणारे दिवस कळू नये इतकी ती वरच्या पदावर जाऊन पोचली होती. भर पहाटेही तिच्या डोक्यात कामाची यादी तयार सुरू झाली आणि सायकलीचे पायडल जोमाने फ़िरायला लागले. मग स्वतःलाच आठवण करुन द्यावी लागली अनुबाय आज रविवार आहे जरा सावकाश. अशी श्रान्त्-शीतल पहाट लाभली की तिला आपल्या बालपणी पौष महिण्यात रामप्रहरी उठून घराच्या चन्द्रशाळेत अभ्यासाला बसण्याचे दिवस आठवायचे. तिथून जरा मान उन्च केली की समोरच्या मोनाचे शेत दिसायचे. सकाळच्या कोवळ्या उन्हात सोनसळलेले ते शेत बघायला मिळणे म्हणजे तिच्या मांजरीसारख्या डोळ्यांना एक मेजवानी असायची. ती घाईघाईत खाली जायची आणि आपल्या बहिणीच्या अंगावरची चादर भरकन काढून तिला उठवायची. 'रेणू अग उठ जरा.. बाहेर किती प्रसन्न शान्त वाटत. चल आपण दोघी मोनाच्या शेतात जाऊया.' पण साखरझोपेतून उठून अनुबरोबर जायची चुक कोण करणार! सकाळच्या कुडकुडणार्या थंडीत अनुला एक चिमटा काढून चादर डोक्याखाली दुमडून आणि पाय पोटाशी धरून रेणु तिला आतूनच म्हणायची- 'अने येताना वेणीसाठी कुन्दाची नाहीतर शेवंतीची फ़ुले आणायला विसरू नकोस'. शेतावर ती पोचली की दुरुनच शेत राखण करणारी झेलम नावाची कुत्री तिच्या वासानेच धुर्यावर येऊन ठेपायची. मग रात्रीचे उरलेले अन्न तिला भरवताना, तिचे पंजे हातावर घेताना, शेतात आखलेल्या वाफ़्यांवरुन हरिणीसारख्या उंच उंच उड्या घेताना आणि फ़ुललेल्या शेवंतीचे पिवळे, जांभळे, गुलाबी, कथिया.. वेगवेगळ्या आभा असलेले लोभसवाणे रुपडे बघून ती हर्षाने मनातल्या मनात म्हणायची पुढल्या जन्मी आपण मोनाच्या शेतात शेवंतीचा जन्म घेऊनच येऊ म्हणजे आपण देखील ह्या फ़ुलांप्रमाणे सुंदर दिसू आणि मोनाही आपल्या अगदी जवळ. फ़ुलांनाही लाजवेन इतका मोहक चेहरा घेऊन आलेल्या अनुला मात्र आपण किती सुन्दर आहोत, अगदी मनाने आणि रुपानेदेखील, कधीच जाणवले नाही. फ़ुलांशी गप्पा मारून झाल्यावर मोना तिला गवती चहाचे निमंत्रन द्यायला दुरुनच हातवारे करायची कारण तिला जन्मापासून वाचा नव्हती. तरीही मोनाचे सगळे बोल अनुला समजायला कधीच वेळ लागत नसे. एकदा शेकोटीत हुळहुळले हात शेकताना तिचा हात चांगला पोळला आणि मोनाचे हृदय क्षणात द्रवले तो प्रसन्ग तिला न राहून आठवला तसे डोळ्यावाटून ओघळणार्या आसवांचे टिपूस तिच्या हातावर सांडले. भानावर येऊन तिने सायकलीची घंटी दाबली. तिचे हात हुळहुळले तिला वाटत होते, पण तो भास होता कारण इथे पौष नव्हता. रस्त्यावर आडवी आलेली कुत्री तिची झेलम नव्हती आणि मोना कुठल्या जगात वावरत असेल ह्याचा तिला थांगपत्ता काहीच माहिती नव्हते. आकाशातून वर येणारा सुर्योदयही तिच्या निरागस चेहर्यावरचे दुःख मावळू शकला नाही. ती घरी परतली तेंव्हा टपालात काही रंगीबेरंगी पत्रं येऊन पडली होती. खूप वर्षांपासून out of print झालेलं आपल्या आवडत्या लेखकाच पुस्तकही तिला आलेलं होतं. मोबाईमध्ये १०-१२ SMS आलेले होते. ते तसे मध्यरात्रीच केंव्हातरी येऊन गेले होते. मुगाची डाळ मोड येऊन टरटरली होती. खिडकीसमोरच्या हिरव्याचाफ़्याचा गंध घरात मावता मावत नव्हता. आज अनुच्या घरी म्हणजे आनंदी आनंदच होता. भिंतीवर आदळणार्या झुळकांमुळे टांगलेले कालनिर्णय खाली पडले आणि ४ सप्टेंबर म्हणजे आज आपला वाढदिवस तर म्हणून तिला माहिती पडले. तिने भरभर सर्व SMS उकलले. प्रियजनांकडून आलेल्या प्रत्येकात वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा, प्रेम ओसंडत होतं, हरेक पत्र तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांच होतं. माझी प्रिय अने, अर्धशतकाच्या शतशः सहस्त्रशः शुभेच्छा अशी एक ओळ वाचतावाचताच तिने पालखट मांडली आणि पत्रासोबत आलेले मजकूर वाचण्यात गर्क झाली. क्षणात तिच्या चेहर्यावरचे मलूल झालेले भाव पुन्हा एकदा शेवंतीच्या फ़ुलासारखे उमलून आले तेंव्हा उन्हाचे सौम्य कवडसे तिच्या अंगणात नुकतेच उतरले होते.
|
Bee
| |
| Monday, September 04, 2006 - 7:30 am: |
| 
|
क्रमशः आणि काल्पनिक.. शोनूचे वाक्य उधार घेतो आहे :-)
|
एखाद्या english पुस्तकाचे भाषांतर वाचतोय असे वाटते.. छान लिहिलय.. पाल्खट म्हणजे काय?
|
Mrinmayee
| |
| Tuesday, September 05, 2006 - 5:01 pm: |
| 
|
बी, चांगलं लिहितो आहेस. पुढचं कधी लिहीणार? by the way मुगाच्या 'डाळीला' पण मोड येतात? कुठली special डाळ ही?
|
बी छान लिहितोयस....लवकर पूर्ण कर
|
Fulpakhru
| |
| Tuesday, September 12, 2006 - 2:00 am: |
| 
|
बी लवकर टाक ना पुढचा भाग छान लिहित आहेस
|
Parakhad
| |
| Tuesday, September 12, 2006 - 3:22 am: |
| 
|
मुगाची डाळ मोड येऊन टरटरली होती ? काय बी लिवलंय ह्यापरीस चपलीला चिकटल्यालं पिवळं पोश्ट इट ब्येस व्हतं पन मंडळी तुमी टाळ्या पिटा त्याबिगर फुडचं ( महा ) भाग कसं येत्याल
|
मोड येणारी मुगाची डाळ?? कादंबरीच एखाद पान वाचल्यासारख वाटल पुढच लिहाताय केव्हा?
|
Soultrip
| |
| Tuesday, September 12, 2006 - 9:00 am: |
| 
|
बी, छान लिहिलंस. मंडळी, मुगाची डाळ,मोड वगैरे समजुन घ्यायचं. That's ok. परखड- अहो समीक्षक-बुवा, पांढर्यावर काळे करा आधी आणि मग तुमची 'परखड' मते नोंदवा! ज्याला साहित्य-निर्मिती जमत नाही, तो स्वयंघोषीत समीक्षक बनतो, असं मज पामराचं येकमेव परखड मत आहे!
|
Parakhad
| |
| Tuesday, September 12, 2006 - 9:10 am: |
| 
|
का वं आत्माराम ? खरं बोललं की झोंबतंया व्हंय ? मुगाची डाळ समजून घ्याचं ? मंग काहीच लिवू नका , लिवलंय असं समजतुय की आमी . तुमची साहित्य की काय ती निर्मिती म्हंजी त्या झुळ्का व्हंय ? बगितलं बगितलं म्या आत्ताच . तुमी बी स्वयंघोषीत साहित्यकार जनू
|
Soultrip
| |
| Tuesday, September 12, 2006 - 9:44 am: |
| 
|
वो पावणं! झुळ्काच्या चार चुळा तरी भरा आधी अन मग बोला! आरं, मुगाच्या डाळीचं काय घेऊन्शान बसलास एरंडाच्या गुर्हाळागत! त्याच्या लेखाचा विस्तार बघ्; चांगलं काय ते बघावं. छिद्रान्वेशी का काय म्हणत्यात नव्हं, तसं बनु नकोस रं माज्या राजा! आनखी येक सांगतो शेवटचं, बघ पटतय का... प्रौढ्-शिक्शान वर्ग हितं भरत नसतात सोन्या!
|
Asmaani
| |
| Tuesday, September 12, 2006 - 2:25 pm: |
| 
|
मंडळी, looking for receipies मधला बी आपल्या ओळखीचा आहे ना? मुगाच्या डाळीचे मोड एवढे कुठे मनावर घेता? बी सही लिहितोयस रे. लवकर येऊदे पुढचं! उत्सुकता वाढली आहे.
|
बी, पुढच कधी लिहिणार? वाट बघतायत सगळे.
|
Bee
| |
| Thursday, September 14, 2006 - 3:38 am: |
| 
|
सर्वांचा आभारी आहे! लवकरच पुढला भाग मी लिहिणार आहे. थोडा वेळ द्या फ़क्त..
|
बी, पुढच्या भागाची वाट बघतेय...
|
बी सुंदर लिहीतो आहेस.
|
Jadhavad
| |
| Monday, September 18, 2006 - 1:14 am: |
| 
|
मस्त, चालु द्या पुढे.
|
Bee
| |
| Friday, September 22, 2006 - 6:13 am: |
| 
|
भ्रांत हरवलेली अनु साकळलेल्या पायात शिरलेल्या मुंग्यांना दूर करत भिंतिच्या आधाराने उठली आणि तलतच्या सुरेल आवाजाच्या दिशेने वळली. तिला वाटलं ती गझल अशीच ऐकत रहावी. तिने चटकन फ़ोन उचलला. "बये किती हा वेळ! हे बघ आजचा आमचा इथे शेवटचा शनिवार. इथली २० वर्ष, मग ह्या ना त्या कारणाने जमलेली मित्र मंडळी म्हणून एक छोटासा कार्यक्रम ठेवला आहे घरी. भिशीच्या सगळ्या बायका, 'मंथन' मधील महिला मंडळ, ह्यांचे मित्र असे सर्व जण भेटणार आहोत. तुही येच. मग लंडनला गेल्यानंतर परत कधी भेट होणार की नाही सांगता येणार नाही. आणि सांगते खरचं काळजी घे गं.." गहीवरून आलेली मीरा पुढे अजून काही बोलणार इतक्यात अनु म्हणाली, "शनवारच आहे ना आज मिरे, मग उद्याला तुच का नाही येत जेवायला घरी. छान सांग्रसंगीत जेवण आणि मग मनमोकळ्या गप्पा पण होतील. आज जर घरी आले तर तू फ़क्त येरझारा घालताना दिसशील आणि पाहूण्यांसमोर मिरवणारा तुझा तो लांबलचक पदर, शबाना आझमीसारखा.." मुसमुसतच मीरा हसली आणि म्हणाली "बर ठीक, तुझी स्थिती तुम इतना जो मुस्करा रही हो सारखी होईल तेंव्हा मला यायलाच हव तुझ्याकडे." टेबलाच्या खणात रेणूचे अजून एक पत्र तिने आत नीट घडी करुन ठेवले. वाटले २०-२५ वर्षांपुर्वीचे ते जुने आठदहा पानांचे तिचे सर्व पत्र परत एकदा ओच्यात घेउन भुतकाळाची पाने उलटून बघावी. 'जिजाऊ' मध्ये राहत असताना रेणूचे पत्र आले की मैत्रीणींचा घोळका नुसतं तुटून पडायचा पत्र वाचायला. सगळी कमाल असायची तिच्या हस्ताक्षरांची आणि बोलक्या वाक्यांची. एकदा तर रेणू वसतीगृहात भेट द्यायला आली आणि एक दिवस राहते म्हणून चांगली आठ दिवस मुलींनी तिला जाऊच दिले नाही. तिथेच नाक्यावरचा मसाला चहा पिताना तिची आणि राजीवची पहिली भेट झाली आणि म्हणता म्हणता त्यांच्या चांगल्या चार मुलाबाळांची मी मावशीही झाले आहे. हे प्रेम काय असते कधीच उमजले नाही की मला गावलेही नाही. आता विचार करायची गरजच उरली नाही तरीही पाठिवर बिर्हाड केलेल्या विंचवाची नांगी आशानिराशेच्या संपूर्ण कण्यालाच दंश करते.
|
Bee
| |
| Friday, September 22, 2006 - 6:24 am: |
| 
|
लोपमुद्रा, पालखट घालणे म्हणजे मांडी घालून बसणे. जेंव्हा ध्यानीमनी नसताना आपण एकाच जागेवर चार पाच तास बसतो तेंव्हाच्या स्थितीला हा चपखल शब्द आहे.
|
|
|