Aavli
| |
| Saturday, August 26, 2006 - 12:26 am: |
| 
|
आज मैत्री दिन...... सर्व मायबोलीकर मित्राना..... हार्दिक शूभेच्छा.......
|
आज खरंच मैत्रीदिन आहे का? तो तर होउन गेला ना मला नाही माहीत असो जर आज मैत्रीदिन असेल तर मझ्याही सगळ्या मायबोलीकरांना मनापासुन शुभेच्छा!
|
R_joshi
| |
| Saturday, August 26, 2006 - 6:48 am: |
| 
|
आवलि, मनिषा मैत्रिला कोणत्याहि दिवसाचे बंधन नसते. सर्व दिवस मैत्रि दिवस.
|
R_joshi
| |
| Saturday, August 26, 2006 - 6:52 am: |
| 
|
न मागता मी सर्व काही मज दिलेस मैत्रिचे हात तु जेव्हा स्व:तहुन पुढे केलेस प्रिति
|
स्पर्शांमध्ये राहून गेले दोन चार रेंगाळलेले स्पर्श तुझ्या माझ्या भेटीचा बस ! हा इतकाच निष्कर्ष
|
पाऊस अंगणात दिसला म्हटलं जाऊ दे, आडोश्याला लपत असेल उरलासुरला पाऊस कुणासाठीतरी जपत असेल
|
आता निघालीच आहेस तर.......... तुझ्याबरोबर जगलेले क्षण ठेवून जा त्या क्षणांतच सामावेल माझं जीवन जगण्याला जगण्याचं कारण देऊन जा
|
सोसून वार सारे वादळ घरात येते ही शांतता कधीची? छत बावरून जाते
|
" गेले जळून कागद " अफवा खरीच होती शाईत आसवांची गर्दी बरीच होती
|
Paragkan
| |
| Saturday, August 26, 2006 - 3:53 pm: |
| 
|
wah .. .. .. !!
|
Swara
| |
| Saturday, August 26, 2006 - 4:09 pm: |
| 
|
मस्त प्रीती. सही वैभव. अश्रूस आज माझ्या उरला न अर्थ काही रक्तातुनी उतरली ह्रुदयातली व्यथा ही
|
Swara
| |
| Saturday, August 26, 2006 - 4:15 pm: |
| 
|
ते हसले मला,जेव्हा मी तुझा ध्यास घेतला आणि पहात राहिले जेव्हा संन्यास घेतला
|
Swara
| |
| Saturday, August 26, 2006 - 4:20 pm: |
| 
|
मोहाचा क्षण नादावलेली रात्र स्वप्नांचा व्रण मंदावलेली गात्र
|
सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!!! झेलताना ऊन-वादळे तनू तुझी जराही थकेना अन मला मात्र दवाचाही भार सोसवेना
|
Giriraj
| |
| Sunday, August 27, 2006 - 12:12 pm: |
| 
|
वैभवा,क्या बात है! .. .. ..
|
Asmaani
| |
| Sunday, August 27, 2006 - 7:04 pm: |
| 
|
"शाईत आसवांची गर्दी बरीच होती". वैभव just amazing !!!!!!!!!!!
|
Smi_dod
| |
| Monday, August 28, 2006 - 12:46 am: |
| 
|
ओढ माझ्या वेदना विसरवणारे ते तुझे दिलखुलास हसणे ती ओढाळ नजर माझ्यात गुंतलेली माझ्या डोळ्यातुन ह्रदयात आरपार डोकावणारी उत्कट स्पर्श,आवेगी मिठी अजून ओढ निर्माण करतेय तुझ्यामधे सामावण्याची तुझ्यात विरून जाण्याची स्मि
|
Sanyojak
| |
| Monday, August 28, 2006 - 1:59 am: |
| 
|
`अहो संयोजक, कुठे चालला एवढ्या घाइत? झाली का तयारी गणेशोत्सवाची? काय स्पर्धा आहेत हो?` घाई घाइत चाललेल्या संयोजकाला बघताच एक मायबोलीकराने त्याला हटकलेच. संयोजक (मनातल्या मानात) `वैताग, या आयडीने अगदी उच्छाद मांडला आहे. एक संधी सोडत नाही टोचून बोलायची` (प्रत्यक्षात) `काय सांगू तुम्हाला. मंडपाची व्यवस्था, सजावट, स्पर्धा ही सगळीच कामे आहेत. ऐनवेळी कलाकार तर सोडच बाकीचे संयोजक पण सापडत नाहीत हो. ` उच्छाद देणारा आयडी : `पण स्पर्धा काय आहेत? त्या कुठे आहेत? मला फार उत्सुकता आहे.` तावडीत सापडलेला संयोजक : `ते जावूदे हो. हा नं. १ संयोजक कुठे गेला काय माहीत` उ. दे. आ. : `अरे वा! नंबरी संयोजक आहेत तर.` ता. सा. सं. : `काय चेष्टा करता राव. ते सुद्धा खर्या आयडीने. पण तुम्हाला म्हणून सांगतो. या बारीला फार काही वेगळे नाहीये. स्पर्धा जर वेगळ्या आहेत एवढेच.` उ. दे. आ. : `म्हणजे नक्की काय आहे.` ता. सा. सं. : `मला कळले ना की मी नक्की कळविन तुम्हाला. तुम्ही आहात ना इथेच?` उ. दे. आ. : `स्पर्धेचे जावुदे यावेळी काही नाविन्य आहे की नाही?` ता. सा. सं. : `हो आहे ना. या वर्षी मंडपासाठी खड्डे खणायचे पैसे वाचल्याने आम्ही त्या पैशात `रस्ता दाखवा, ईनाम मिळवा` अशी अभिनव स्पर्धा घेत आहोत. उ. दे. आ. : `हो का अरे वा वा.` (मनात) खड्ड्यात जाणार बहूतेक मंडळ. ता.सा. सं : (मोबाईलवर) `काय सांगतेस? स्पर्धांची घोषणा झाली सुद्धा?` (मनात)इथे आम्हाला त्याचा पत्ता सुद्धा नाही.` उ.दे.आ. कडे वळून. `अहो शुक शुक. झाल्या स्पर्धा चालू. इकडे जा म्हणजे तुम्हालाही भाग घेता येईल. गणेशोत्सव स्पर्धा कुणी विचारले मी कुठे आहे तर काही बोलू नका हं.`
|
सर्वांना एकच सांगायचे आहे.. क्या बात है!!!
|
R_joshi
| |
| Monday, August 28, 2006 - 2:24 am: |
| 
|
स्वरा,वैभव फारच छान तुझा स्पर्श होता झुळुकेचा गारवा आणि आता एकटाच गात आहे पारवा प्रिति
|