Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
"सर्व्हर डाऊन" ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » श्रावण » विनोदी लेखन » "सर्व्हर डाऊन" « Previous Next »

Himscool
Friday, August 25, 2006 - 1:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो पहिलाच प्रयत्न आहे सांभाळून घ्याल अशी आशा आहे...

आज सकाळपासुन सगळ्यांच्या तोंडी एकच ऐकू येत होते..
सर्व्हर डाऊन झाला आहे
हे खरे बघायला गेले तर रोजच ऐकु येते पण आज काही वेगळाच रंग होता... जो तो हातात मिळेल ती वस्तु घेऊन सर्व्हर तोडायला निघाला होता.
नेहमीप्रमाणे लेट झालेला होता म्हणुन त्यांच्याकडे लक्ष न देता थेट जागेवर पोचलो आणि विचार करायला लागलो...

हा सर्व्हर मोडायला नक्की काय लागेल... तो कुठे आहे... त्याच्या पर्यंत पोचता कसे येईल... वाटेत जे आडवे येतील त्यांचे काय करावे लागेल...

आणि हा विचार करता करता सर्व्हर कुठे आहे त्याचा पत्ता सापडला... तो शोधायला सुरुवात तर केली पण लक्षात आले की आपल्याकडे कोणतेच वाहन नाही आहे.

अचानक हत्ती आठवला... मीनुला विचारले तुझा हत्ती देतेस का जरा? तर ती म्हणाली सध्या त्याची अवस्था वाईट आहे पुण्यातल्या खड्ड्यांमुळे त्याला इस्पितळात पाठवले आहे...

तेवढ्यात समोर विसोबा खेचर दिसले पण त्यांची भिंत नव्हती बरोबर... तरी धाडस केलेच.. त्यांना विचारले खेचर तात्या तुमची भिंत देता का जरा लांबच्या प्रवासाला जायचे आहे... तर म्हणतात कसे... बाळ ती भिंत सध्या ज्ञानबाकडे आहे आणि तो कुठल्याश्या जंगलात फिरतो आहे मुक्ताईला शोधत...

घ्या म्हणजे भिंत पण नाही सर्व्हर पर्यन्त पोचायला. पुढे जात होतो तिथे एक निळ्या रंगाची बस (बस पांढरीच होती फक्त वरची अक्षरे निळी होती) दिसली. बहुतेक व. वि. ची होती ती बस. तिथे राहुलफटक व. वि. संयोजकांबरोबर "डायवर कोन हाय?" असे कोणाला तरी विचारत होते...

मेलो म्हणजे नुसतीच बस आहे की बिना ड्रायव्हरची.. आली का परत पंचाईत

सर्व्हर पर्यंत पोचणे अवघड आहे हे लक्षात आल्यावर त्याच्यावर आहे इथुनच हला करता येइल का ह्याचा विचार डोक्यात चमकला...
(येस्स, आता बघतो तुझाकडे)
पण तसा सर्व्हर फार लांब असल्याने कोणते अस्त्र वापरायचे तेच कळत नव्हते. आजुबाजुल नजर टकली तर एकदम काहीतरी चमकले जरा पुढे गेलो तर रामभाऊ उभे होते.. त्यांना बघून हायसे वाटले.. चला निदान धनुष्य बाण तर नक्की मिळेल... तर ते म्हणाले "मी आताशा धनुष्यबाण वापरत नाही. फक्त काड्याच वापरतो.. पण त्याचा तुला काहीच उपयोग नाही पावसामुळे फार सर्द झाल्यात काड्या!"
(उसने आणलेले अवसान पण गळून पडले त्यांचे हे भाष्य ऐकून..)

तेवढ्यात समोर रॉबिनहूड आणि लिम्बूटिम्बू येताना दिसले.. त्यांना मदत मागितली तर म्हणाले ह्या असल्या कामासाठी आमच्याकडे वेळ नाही, आम्ही चाललो तिकडे चर्चा करायला... मी रॉबिनला समजवायचा खुप प्रयत्न केला पण व्यर्थ कारण तेवढ्यात लुडबुड तिथे आला होता आणि फारच लुडबुड करत होता...

अचानक समोरून बर्‍याच महिला येताना दिसल्या. त्या सगळ्या नुकत्याच GTG करुन परत चालल्या होत्या त्यांना विनंती करावी म्हणुन पुढे गेलो तर त्या त्यांच्याच नादात निघुन गेल्या

एकदम समोर एक राष्ट्रध्वज फडकताना दिसला आणि त्याबरोबर एका भारी माणसाची आठवण झाली.. आपल्या देशाचे पहिले नागरीक... (बास आता काम नक्कि होणार)
लगेच त्यांच्याशी थेट संपर्क साधला. त्यांच्या बरोबर झालेले संभाषण.

मी: नमस्कार,
ते: नमस्कारम्, कांय हंवे आंहे आंपल्याला?
मी: एक हल्ला करायचा आहे त्यासाठी क्षेपणास्त्र हवी आहेत.
ते: अंहो अंशी कोणालाही क्षेपणास्त्र देत नाही आम्ही
मी: पण ती देश रक्षणासाठीच आहेत ना?
ते: हो तें बरोंबर आहे... पण सध्या टेस्टींग सांठी अमेरीकेकडे दिली आंहेत
मी: अहो पण त्यांनी ती परस्पर पाकिस्तानला दिली तर..
ते: तंसे करणे त्यांना शक्य नांही त्यांचा मुख्य सर्व्हर तुअम्मच्याच कंपनीत ठेवला आहे. त्यामुळे काही चिंता नाही.
मी: अहो पण ह्यामुळे तुम्ही आमचा सर्व्हर बंद केला आहे त्याचे काय?
ते: कंशाला पांहिजे हो तुम्हाला सर्व्हर चालू.. कांम न करता बसता येत नाही का? बघावे तेव्हा आपले सर्व्हर सर्व्हर करुन ओरडत असता ते... गप बसा आणि झोप काढा..
पलिकडून फोन आपटल्याचा आवाज आला

आणि इकडे कोणीतरी खुर्ची गदागदा हलवत होते.

तळटीप: वरील लेखात काही आयडींचे उल्लेख आलेले आहेत त्यांनी बरोबर दिवे घेऊन हा लेख वाचावा.



Limbutimbu
Friday, August 25, 2006 - 1:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकाऽऽस रे हिम्स! :-) पहिलाच प्रयत्न चान्गलाच वठला हे! :-)

Ludabuda
Friday, August 25, 2006 - 3:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयला लिंब्या तुज्या बरोबरीन माजा पन नाव घेतकान की र या पुन्याच्या पठ्यान लय भारी लेका हिम्या. चालु ते रं फुड.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators