Maitreyee
| |
| Thursday, August 17, 2006 - 9:48 am: |
| 
|
अरे पण image बनवले तरी उपयोग काय, ओरिजिनल पोस्ट पण इथेच आहे की
|
Milya
| |
| Thursday, August 17, 2006 - 10:04 am: |
| 
|
अरे सागर बिनधास्त पाठव रे ईमेज सर्वांना बर्याच दिवसांनी दिसलास? असतोस कुठे सध्या? MT अगं निदान ज्यांना फ़क्त fwd करायची आहे (श्रेय न लाटता) त्यांचे काम सुकर होईल ना... अगं मूडी का त्या बी ची दिशाभूल करत आहेस. खड्ड्यात नव्हता काही ट्रक आडकला... चुकुन खाड्ड्यांमध्ये थोडासा रस्ता शाबुत होता त्या रस्त्यात अडकला होता ट्रक.. ह्यावर्षी तो पण chance नाही.. फ़ार फ़ार तर रस्त्यात माझ्या मुलाची सायकल अडकु शकेल
|
काय हाॅरिबल लोक आहेत हो या हितगुजवर! तिकडे ते झुम्बरकर आणि उम्बरकर अन इकडे हा मिल्या... मी तर दोनदा हसून हसून मेलो बुवा...
|
सन्मे, good work .. असेच समाजकार्य चालु ठेव
|
Samuvai
| |
| Friday, August 18, 2006 - 12:18 am: |
| 
|
मिल्या, ** बर्याच दिवसांनी दिसलास? असतोस कुठे सध्या? ## खड्ड्यात (आपलं हे ... पुण्यात)
|
Dhumketu
| |
| Friday, August 18, 2006 - 1:02 am: |
| 
|
आले आले.. मिल्याचे विडंबन मला मेल वरुन image म्हणून आले.. त्यात मिल्या म्हणून लिहिले आहे शेवटी.
|
आपल्या सर्वांचे लाडके खासदारसाहेब यांचे चरणी हे विडंबन प्रेमपुर्वक अर्पण.. नको देवरायाच्या चालीवर... नका कल्लुमामा नाट अशी लावु जीव हा खड्यात सांडु पाहे नका कल्लुमामा..... चालता रस्त्यात आढळे आम्हास जागोजागी खड्डा वाढु पाहे नका कल्लुमामा.... मनपाची कृपा झाली की हो त्यात खणती हे रस्ते शोभा न्यारी नका कल्लुमामा... हाडे होती सारी पुरी खिळखिळी शरिराची वाट लागु पाहे नका कल्लुमामा... खड्याचेच रस्ते खड्याचेच राज्य खड्यात जनता गाडुन जाहे नका कल्लुमामा... तरिही म्हणता खड्डे किती कमी जनकल्याणाची चांगली ही हमी नका कल्लुमामा.... मयुरेश
|
तुला सर्व काही देउन माझी ओंजळ भरलेली पाहिल तर तुझी ओंजळ तु माझ्या ओंजळीत धरलेली -चं. गो. तुला सर्व काही देउनही माझा बॅलंस वाढलेला पाहिल तर तुझा चेक मी माझ्या अकाउंटमधे भरलेला रुप... किंवा तुला सर्व काही देउनही माझा बॅलंस उरलेला पाहिल तर माझ्याऐवजी मी तुझ डेबिट कार्ड वापरलेलं रुप... किंवा तुला लाटण मारुनही तुझ टेंगुळ बसलेल पाहिल तर लाटण्याऐवजी मी गोफ़ण फ़ेकेलेली रुप...
|
Himscool
| |
| Friday, August 18, 2006 - 6:23 am: |
| 
|
मयुर, झकास आहे.. मीटर पण एकदम बरोबर..
|
मूळ गाणे.."भय इथले संपत नाही" अंग माझे ठणकत राही अन तुझी आठवण येते मी जातायेता गातो मग रोज तीच रडगीते ते चंद्ररूप रस्त्यांचे चिखलानी भिजली काया खड्ड्यास चुकवितो आम्ही खड्ड्यात पुन्हा अडकाया तो धक्का दोन शब्दांचा मेंदूस तडकूनी गेला खड्ड्यास दरी म्हणूनी राईचा पर्वत केला पुण्यात किरकिरे अवघे गुणगुणती दु:ख कितीते सोसण्याची ऐपत नाही बघणार कसे प्रगतीते -देवदत्त
|
Princess
| |
| Friday, August 18, 2006 - 8:12 am: |
| 
|
too good deva... absolutely perfect...
|
मयूर, 'कल्लुमामा' ! देवा, खड्ड्यास चुकवितो आम्ही खड्ड्यात पुन्हा अडकाया >>>>>>>> छान !
|
Samuvai
| |
| Friday, August 18, 2006 - 8:55 am: |
| 
|
मस्त रे देवा. हा खड्डा अन तो रस्ता अद्वैत होवूनी गेला मग नक्की काय बुजवावे "करीरा" ते उमगत नाही
|
राजा करीर हसतोय कसा >>> यात करिर कोण आहे?ते कळले नाही... plz g.k त भर घाला.
|
Nakul
| |
| Friday, August 18, 2006 - 4:13 pm: |
| 
|
नितीन करीर - पुण्याचे आयुक्त आहेत चु. भू. द्या. घ्या.
|
Moodi
| |
| Friday, August 18, 2006 - 5:05 pm: |
| 
|
चु भु द्या घ्या नाही नकूल तुझे बरोबर आहेच, करीर आयुक्त आहेत. 
|
खड्डे आणि पुणे :D इथली सगळी विडम्बने खरच पेपर मधे दिली गेली पाहिजेत. ह. ह. पु. वा झालि खरच. मिल्या आणि देवा तुम्ही ग्रेट आहात. मिल्या पडत्यात जबरी आहे. सकाळ ला जाउ दे हे सगळ. मागच्या वर्शीच्या पावसाळ्यात मी पुण्याला जाउन रस्ते अनुभवून आले आहे. या वर्शी परिस्थिति आणखी बिघडलेली दिसते आहे
|
देवा,सही रे.. .. ..
|
Kandapohe
| |
| Saturday, August 19, 2006 - 8:36 am: |
| 
|
देवा, मयूर सहीच रे. मयूर कल्लूमामा!! 
|
Sanurita
| |
| Monday, August 21, 2006 - 5:09 am: |
| 
|
देवा खूपच मस्त रे.सर्व पुणेकर दुचकिस्वारान्ची व्यथा मान्डली आहेस.
|