Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
नळ स्टाॅप

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » श्रावण » विनोदी लेखन » नळ स्टाॅप « Previous Next »

Rahul16
Tuesday, August 22, 2006 - 6:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नळ स्टाॅप च्या मधोमध भर दिवसा पाठीवर पडुन आकशा कडे पाहता येइल असे मध्या ला कधी वाटले नाही. मध्या ची गाडी उजवी कडे मध्या डावीकडे आणी मधे गड्डा.काही क्षणापुर्वीच नळ स्टाॅप च्या चौकातील गड्ड्यामुळे भर दुपारी भर चौकात मध्या आडवा पडला होता. त्याच्या उठन्याची वाट पहात दुचाकी वरचे त्याच्या मागे असणारे पुणेकर त्याला पडल्या पडल्या दिसले. आता मध्या भानावर आला होता. तो उठला कपडे झटकले, आणी गाडी उचलाली, तो पर्यंत त्याच्या मागील पुणेकर पी पी करत त्याच्या बाजुने निघुन गेले. त्यांच्यासाथी हे नेहेमीचेच होते, आज मध्या उद्या सद्या. आत पाॅ पाॅ करत पी एम टी ची बस त्याच्यामागे उभी होती. आता मध्याला लवकर हालचाल करणे भाग होते. पी एम टी च्या ड्रायव्हर कडे धीर कमी असतो असे तो ऐकुन होता. मध्या ने गाडी बाजुला घेतली आनी पी एम टी ची बस मध्या ज्या गड्ड्यामुळे पडला होता त्याच गड्ड्यात हिसका देउन निघुन गेली. मागे बसलेल्या प्रवाश्याचे पाय दिसल्या सारखे मध्याला झाले. बस मधे बसलेला माणुस ईतका उंच उडु शकतो का असा विचार उगाच त्याच्या मनात आला. एव्हाना मध्या पुर्णपणे भानावर आला होता. त्याला पडतांना पाहणारे सगळे लोक सिग्नलहुन निघुन गेले होते. आता सगळे त्याच्याकडे विचित्र नजरेने पहात होते. मध्याचा २ महिन्यापुर्वी लग्नात घेतलेला शर्ट खराब झाला होता. मध्याला या गडबडीत सिग्नल वर थांबलेल्या नविन लाॅट मधली चेहरा झाकलेली गोरी हिरवळ दिसली. कमीत कमी अश्या परिस्थितीत तरि ही हिरवळ आपल्याकडे सहानुभुतीने पाहिल असे त्याला वाटले. त्याने चश्म्याच्या आत डोकवन्याचा प्रयत्न केला, पण 'छि' किंवा असेच काहितरी ते डोळे म्हणत होते असे त्याला वाटले. त्यामुळे लोकांकडे सहनुभुतीच्या अपेक्षेने पाहन्याचा नाद त्याने सोडला. नळ स्टाॅप च्या कोपरयातुन पोस्टर वरचे दाढीवले, सुट बुट वाले आणी साहेब मध्याकडे पाहुन हसत होते.

Daku
Wednesday, August 23, 2006 - 12:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

:-)
very good rahul.....keep it up.....






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators