Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
पुण्यातले खड्डे ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » श्रावण » विनोदी लेखन » पुण्यातले खड्डे « Previous Next »

Prashantgijare
Friday, August 18, 2006 - 11:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


प्रिय पुणे महानगर पालिका

आजच्या सकाळ मधे या बाबतीत Congress च्या रमेश बागवे यांनी मांडलेले मत मला अजिबात नाही पटले.
(त्यांनी जबाबदारी झटकून घूम्-जाव केले असे जे काही लिहिले आहे त्यात फारसे काही विशेष घडले आहे असे वाटल्यामुळे छापले की काय?) पाउस अणि रस्त्याची दुर्दशा याचा काहीच संबंध नाही असे ते म्हणतात. तब्येत बिघडलेली दिसते. अग, परवाच मला कुणितरी म्हटलं की तुम्ही गेले 9 वर्ष अमेरिकेत रहात आहात. तुमच्याकडे जितका पाउस वर्षभर पडतो तितका पुण्याकडे कधीच पडत नाही (गेल्या २ वर्षातला मान्सून अपवाद). ते थंडी मधला फूट दीड्-फूट भर बर्फ़ विसरले होते. आठवण करून दिली.

तर ते म्हणे की तरीसुद्धा रस्ते त्यामुळे खराब झाल्याची बातमी कधी ऐकलेली नाही किंवा त्यामुळे रस्त्यात खड्डे तयार झाले
असे कधी तुमच्याकडून ऐकले नाही. म्हटलं, अहो इकडच्या लोकाना या बाबतीत जरा कमी अक्कल आहे. काय तर म्हणे, रस्ता बनवतानाच इतका चांगला बनवायला लावतात की त्याकडे वारंवार बघावेच लागत नाही. (मग काय पुण्यात पण रस्ता टिकेल. जंगली महाराज रस्ता नाही का असाच कुणितरी येडपटपणा करून टिकणारा बनवला होता)

म्हटलं, अहो बनवणार्‍या कंत्राटदाराचा, त्याला कंत्राट देणार्‍याच्या कुटुंबाचा काही विचारच येत नाही यांच्या मनात. कसं काय पोट भरतात ते लोक मला तर कळतच नाही. कदाचित तो त्यांचा part-time business असावा आणि इतर वेळी दुसरं काहीतरी करत असतील. आणि खरं सांगायचं तर ना, फार गुळगुळीत रस्त्यामुळे गाडी चालवायला काही मजाच येत नाही. रस्त्यात फारसं इकडे तिकडे बघावं लागत नाही त्यामुळे कधी कधी तर मला गाडी चालवताना झोप येते. त्यापेक्षा तुझी जी पुण्यातल्या रस्त्याची policy आहे ती मस्त आहे. कंत्राटदाराचा चरितार्थ पण चालतो आणि नागरिक कसे एकदम alert राहतात आणि मुख्य म्हणजे त्याना फुकटचा व्यायाम मिळतो ते कुठेच गेलं. का उगाच तुझ्या नावाने खडे फोडतात कुणास ठाउक?

खरं तर फुकटच्या व्यायामाचा tax लावायला पाहिजे per kilometer ते तर कुठेच गेलं, उगाच तुला बिचारीला सारखं नावं ठेवतात. पुण्याच्या लोकाना कुणाला चांगला म्हणवत नाही हे मात्र अगदी पटतं असं बघितलं की. तु उगाच लक्षं देउ नकोस त्याकडे. एखादं किरकिरं पोर कसं दूध पाजलं तरी रडतं, नाही पाजलं तरी रडतं, तस्सं आहे अगदी यांचं. परवाच कुठल्या तरी एका रस्त्यातल्या सुंदर खड्ड्यांचा काय झकास फोटो छापला होता सकाळमधे. पहिलं मला तर वाटलं चंद्रावरचा close up आहे की काय? पण म्हटलं अजून तर आपलं चंद्रयान जायला चिक्कार वेळ आहे. अगं, त्याना आपण सांगूयात की चंद्रावरच्या खड्ड्याची आणि आपल्या "स्व-निर्मित" खड्ड्यांची competition लावायला. मला नक्की खात्री आहे की आपण जिंकणार म्हणून.
अजून त्याना तिकडे जायला २-३ वर्ष आहेत. चल आता लाग कामाला. वाटतं तितकं सोपं नाहिये बरं का. लोक खड्डे बुजवायला टपले आहेत. पण तु काळजी करू नकोस आणि आपलं ध्येय विसरू नकोस. नवीन खड्डे आले कि लगेच कळव हं. फोटो scan करायला विसरू नकोस. मी इकडे त्यांचं प्रदर्शन लावीन म्हणत होतो पण मला लोक वेड्यात काढतील म्हणून मी मूकपणे तुला साथ देईन.

लक्षात ठेव, क्रांतीचा मार्ग नेहमी खड्ड्यानी भरलेला असतो......

सर्वस्वी तुझा "खड्ड्यांकित"


Vinaydesai
Monday, August 21, 2006 - 9:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजून एक खड्डा????

आता गुलमोहरावर आलं की खड्ड्यात पडल्यासारखं वाटतं
:-)

Samrya
Wednesday, August 23, 2006 - 12:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mug saglyat motthya khaddyat ubha raahun sagle khadde mojun sang bara kiti aahet te? :-)

Prashant: chhan .. chalu dya khadda mohim :-)




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators