Smi_dod
| |
| Tuesday, August 15, 2006 - 12:01 am: |
| 
|
आज जन्माष्टमी... आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कृष्णाची अनेकविध रूपे नजरे समोर फ़ेर धरतात.त्याच्या बालपणा पासुनची...सखा,प्रियकर,पाठिराखा,योगेश्वर... अनंत रूपे.स्रियांना त्याचे बालरूप सादवुन जाते.त्यांच्यातील मातृत्व जागवते... राधाकृष्णाचे रूप आगळे अगदी मंदिरे बांधुन पूजा करण्याईतके.या नात्याला पवित्रता मिळवुन दिली ती कृष्णाने. नाहीतर राधे सारख्या वयाने मोठ्या,विवाहित स्री बरोबरचे प्रेम म्हणजे आजच्या आधुनिक युगातपण संशयाने बघण्याचे नाते पण या नात्याला पवित्रता मिळवुन दिली ती कृष्णाने...... सखा..... जो सख्य जाणतो,मनातले ज्याच्या पाशी बोलता येते,अडचणीत जो न सांगता धावतो तो....ते मैत्रीचे नाते त्याने निभावले ते द्रौपदीशी....मला कृष्णाचे सगळ्यात अधिक भावलेले हे रूप.कृष्णसखा........ राधेचा,मिरेचा,द्रौपदीचा...पैकी द्रौपदीला कृष्णा म्हणुन ही संबोधतात...त्या कृष्णेचा हा कृष्णसखा... हे सख्याचे,मैत्रीचे नाते त्याने निभावले...पाच पराक्रमी पती असुनही जिला मदतीची हाक माराविशी वाटली तिच्या या सख्याला.... त्या कृष्णसख्याला माझे अभिवादन
|