|
I always beleave in friends and friendship. नाती आपल्या हातात नसतात. कोणी तरी आपली आई असते, कोणी तरी आपले बाबा असतात, ते देतील ते बहीण भाऊ आपल्याला मिळतात. पण आपण आपले दोस्त नेहमीच निवडू शकतो. आपल्याला आवडले तर आपण त्याच्याशी / तिच्याशी मैत्री करतो नाहीतर १ वा २ भेटीतच सम्बन्ध आवरते घेतो. माझ्या सुदैवाने मला खूप मित्रमैत्रीणी मिळाल्या. त्यान्नी माझे हट्ट पुरवले, मला हसवले तर कधी कधी रडवले देखील. वेळ पडली तेव्हा माझ्या बाजूला; पाठी नव्हे ठाम उभे राहिले; तर जेव्हा मी चुकले तेव्हा माझ्या चुकाहि मला वेळोवेळी दाखवून दिल्या. प्रसन्गी अबोला धरला, वाद घातले, मला दम भरला, तर कधी प्रेमाने समजावले. तेव्हा हे ललीत मझ्यावर प्रेम करणार्या मझ्या सर्व मित्र /मैत्रीणिनसाठी माझी सगळ्यात जवळची आणि आवडती मैत्रीण म्हणजे माझी आई. तिचा धाक ही होता पण कधी काही झाले की कधी एकदा आई ला सान्गते असेही होऊन जायचे. शाळेतून घरी आले की हात पाय धुवून तिला दिवसभराचा सगळा व्रुतान्त दिल्याशिवाय माझी इतर कामान्ना सुरुवात होत नसे. तिला खर तर कन्टाळा येत असेल रोज रोज माझी बडबड ऐकून पण तरीहि ती ऐकत असे. तिच्या सहन शक्तीची दाद द्यायला पाहिजे कारण हल्ली मी तिच्या भूमिकेत शिरलेली आहे आणि माझा मुलगा माझ्या. शाळेत असताना ती माझा अभ्यास घेत असे. कधी तरी उत्तरे आली नाहीत तर धपाटाहि मिळत असे. मग काय रडारड. पण कधी बाबानी अभ्यास घेतो म्हटले तरी आईच हवी असे. आई ने अभ्यास घेतला की आपण नक्की पास होणार अशी खात्री असे??? यालाच वेडा विश्वास म्हणतात का? असा वेडा विश्वास ही असावा कोणावर तरी नाही? मला आठवत तेव्हापासून सरोज माझी मैत्रीण आहे. आजहि आम्ही अगदी सक्ख्या मैत्रीणी आहोत. शाळेत बालवाडीपासून ते दहावी पर्यन्त आम्ही एकत्र होतो. पुढे ती mediicala ला गेली आणि मी engineering ला. ती मुम्बई ल राहिली मी पुण्याला. पण अन्तरे वाढली म्हणून मैत्री कमी थोडिच होते? मी प्रेमात पडले तेव्हा तिला सान्गितल्या खेरीज कोणाला सान्गायचे नाही असे मी थरवले होते आणि जेव्हा तिला सान्गाय्ल गेले तेव्हा आधी तिची प्रेमकहाणी ऐकली नि मग माझी तिला ऐकवली. आता तर ती भारतात आहे आणि मी us ला. आता अन्तरामुळे थोडे बोलणे कमी झाले आहे पण प्रेम कमी झाले नाहि, ते दीवसेन दिवस वाढतेच आहे . आता मला तिला भेटायची ओढ असतेच पण तिच्या तनूला भेटायची ओढ जास्त असते. पुण्याला college ला आल्यानन्तर मला काही जिवाभावाचे मित्र मैत्रीणी भेटल्या. सचीन १, सचीन २, सुशमा आणि प्रदन्या. त्यान्च्या शिवाय मझे college पारच पडले नसते जणू इतकी घट्ट मैत्री तेव्हा झाली, आजही आहे. Submissions, pl मधे रात्र रात्र classroom मधे बसून केलेला अभ्यास, अभ्यास करताना मध्यरात्रि जाउन चहा पिणे, एकामेकान्च्या खोड्या काधने, चेश्टा मसकरी…. ते सोन्पन्खी दिवस होते. पुन्हा तसे दिवस येणे नाही. आज नोकरी धन्द्याच्या निमित्ताने आम्ही दूर दूर आहोत. पण मनाने अजूनहि जवळच आहोत. आजहि कोणी IM वर भेटले कि तेवढाच आनन्द होतो प्रतेयेकाला. वाटते जवळ असतो तर आपली मुलेही एकामेकान्ची best friends झाली असती नाही? पुढे लग्न करून मी US ला आले. मग इथे नवीन मित्र मैत्रीणी शोधल्या. सुरुवातिला मैत्रीणी म्हणजे नवर्याच्या मित्रान्च्या बायका. आधी सगळे मित्रमैत्रीणी मरठीच होत्या. आता कोणि North Indians, कोणि South Indians कोणि गुजराथी. सुरुवातिला वाटले यान्ची आणी आपली भाशा एक नाहि, आपले यान्च्याशि जमेल का? पण जिथे मन जुळतात तिथे भाशा काय चीज? हा प्रत्यय लवकरच आला. त्यन्च्यातही कही जणिन्शी घट्ट मैत्री जमली. इतकी की आपण या देशात एकटे आहोत, घरपासुन लाम्ब ही बोचही हळू हळू कमी झाली. आई, बाबा, इतर नातेवाइकान्ची उणीव त्यान्नी भरून काढली. रात्री २ वाजताहि गरज पडल्यास दार वाजवण्याएवढा हक्क तयार झाला. आता वाटते सुरुवातिला भाशा वेगळी म्हणून हरकत घेणारी मी त्यान्च्या घरातलीच झाले आहे जणू आणी त्या माझ्या घरातल्या. आता Christmas आला की हक्काने मी सिनि कडे cake खायला जाते आणी ती मी दिवाळीत चकल्या कधी बनवते याची वाट पहात असते. मग इथे university त admission घेतली. तिथेही काही नव्या मैत्रीणी मिळाल्या. काहीन्नि स्वार्थापायी मैत्री केली तर काहि आजही माझ्या गोड मैत्रीणी आहेत. आता college सम्पून २ वर्शे होत आली तरी आम्ही अधे मधे भेटत असतो. एक्मेकिन्ची चेश्टा करतू आणी पुन्हा charge up होवून रोजच्या routine ला लागतो. मधून मधून अशा break ची हि गरज असते नाहि? यापुढेही मी अनेक लोकान्ना भेटेन. काहिन्शी माझी wavelength जुळेल काहिन्शी जुळणार नाहि. माझ्या लाडक्या मित्र मैत्रीणीन्च्या यादीत भर पडतच जाईल. एका मेणबत्तीने दुसरी मेणबत्ती पेटवली की जसा प्रकाश वाढतो तसच मनाशी मन जुळल की प्रेमाचा प्रकाश वाढतच जातो. happy friendship day to all my beloved friends मनाली
|
Maudee
| |
| Tuesday, August 08, 2006 - 1:54 am: |
| 
|
ख़ूप छान फ़ुलपाख़रा आणि अगदी मस्त freindship week अम्ध्ये लिहिते आहेस हे ललित. सुरुवातीला थोडसं तुटक वाटल पण नंतर जेव्हा त्याभुमिकेत शिरले तेव्हा ख़रच ख़ूप छान वाटलं माझे पण वेगवेगळ्या टप्प्यावरचे friends आठवले... ख़ूप ख़ूप छान वाटले.... अगदी मनापासून धन्यवाद जुन्या दिवसांतून फ़िरवून आणल्याबद्दल
|
Avikumar
| |
| Tuesday, August 08, 2006 - 12:38 pm: |
| 
|
खुपच छान मनाली! आईबद्दल लिहिलेलं तंतोतंत जुळतंय गं माझ्या आईशी. खुपच छान वाटलं. लिहित रहा असंच.
|
Moodi
| |
| Wednesday, August 09, 2006 - 1:26 pm: |
| 
|
किती छान लिहीलंस. मुठीत धरलेल्या सावरीच्या म्हातारीप्रमाणे बालपण निघुन जात पण मैत्री कायम टिकू शकते. लिहीत रहा गं. 
|
|
|