|
Friendship Day कॉलेजात Friendship Day म्हंटलं की कॉलेजात सेलेब्रेट केलेले फ़्रेंडशिप डे आठवतात. मुलमुलींचा तो उत्साह, प्रचंड धमाल, कार्ड क्वीनसाठी लागलेल्या चढाओढी, आपल्याला आवडलेल्या मुला / मुलीलींशी फ़्रेंडशिप करायची एक "सुवर्णसंधी..." म्हंटल तर सगळ सोप्प आणि म्हंटल तर सगळ कठीण. ती / तो ते कार्ड घेईल की नाही हे कोडे, आपल्याशी मैत्री करेल की नाही याची चिंता, नाही घेतले तर केलेली मस्केबाजी किंवा मित्रमैत्रिणिचा वशील लावण्याच केलेला प्रयत्न एक ना अनेक प्रसंग आज उभे रहातात डोळ्यासमोर. जर फ़्रेंडशिप झाली तर ठीक नाहीतर,"काय भावखाउ आहे रे... किंवा काय चिकट आहे रे???" असे म्हणुन मोर्चा दुसरिकडे वळवायचा. ते म्हणतात ना; "तु नही कोई और सही, कोई और नही कोई और सही...". पण यावर आई, पप्पांचे म्हणणे असायचे,"काय ही आजकालची मुल??? नसते एक एक फ़ॅड असते; काय तर आज म्हणे फ़्रेंडशिप डे उद्या काय तर म्हणे रोज डे??? अशी ठरवुन का कधी कोणत्या दिवसाला मैत्री करतात??? मैत्री करायच कोणात दिवस नसतो, ती तर आपोआपच होत असते." तेव्हा आईचे बोलणे अगदी पुराणातली वांगी पुराणातच असे वाटायचे. काही केले तरिही ती तिच्या मतांवर ठाम आणि मी माझ्या. त्यामुळे मी घरी आल्यावर तिचे ते त्रासिक मुद्रेने बघणे मला सरावाचे झाले होते. मी सोयिस्करपणे तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असे. जास्त काही झाले तर मझा डायलॉग ठरलेला असे;" अग हे पाच वर्षच तर मी सेलिब्रेट करणार ना? नंतर माझ्याकडे वेळ किंवा हे सगळे तरी असतिल का हे सगळ करायला???". त्यावर काहिस विचार करीत ती शांत होत असे पण ते तेवढ्यापुरतेच. दुसर्यावर्षी पुन्हा "ये रे माझ्या मागल्या". पण खरचं कित्ति "सोनेरी दिवस" होते ते. स्वच्छंदपणे जगण्याचे, मस्तीचे. ना कसले बंधन ना कसले टेन्शन. आला दिवस कसा जायच तेसुद्धा कळायचे नाही. क्रमश:
|
कॉलेजच्या शेवटच्या वर्षी मात्र आम्ही खुप धमाल केली खुप जणांशी मैत्री केली पण एक किस्सा असा घडला की तो आठवल तरी अजुनही हसायला येते. आम्ही कॉलेजच्या आवारातुन घरी जायला म्हणुन बाहेर पडत होतो. तेवढ्यात एक मुलाने एकदम धडकती एन्ट्री घेतलि त्याने प्रथम सगळ्यांन फ़्रेंडशिप डेच्या शुभेच्छा देउन सगळ्यांन फ़्रेंडशिप डे बॅन्डस बांधल्या आणि विचारल," From Which class u r??" त्यावर आम्ही सगळ्यांनी उत्तर दिल, " T.Y. bcom." ते ऐकुन जस काय त्याच्यावर आभाळच कोसळल. एकदम घाबरुन आणि गडबडुन जाउन त्याने पळपुटी माघार घेतली. अचानक मागे वळुन तो झपझप चालुन निघुन गेला. त्याला तसे जाताना बघुन आम्हा सर्व मुलींना एकदम जोरात हसुच फ़ुटले. अजुनही कधी फ़्रेंडशिप डे असला की त्य प्रसंगाची हमखास आठवण येते. पण या एका प्रसंगाने मला एक वेगळाच विचार करायला भाग पाडले. की मैत्री फ़क्त आपल्य बरोबरच्या किंवा आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या लोकांबरोबरच करायची का??? मैत्री, मैत्री म्हणजे नक्की काय??? त्याची ठाम अशी व्याख्या कोणालाच करत येणार नाही. कारण प्रत्येक माणसागणिक, परिस्थितीनुसार, लोकांच्या स्वभावांनुसार ती बदल असते. काहीसाठी मैत्री फ़क्त एक वेळ घालवायचे साधन असते, काही ती अगदी काटेकोरपणे पाळतात. जस काय मैत्री ही एक फ़ॉर्मालिटी आहे. तर काही एकदम जिवाभावाचे सख्य असणारे असतात. कधीकधी तर कोणा तिर्हाईताला शंका यावी की हे मित्र आहेत की भाउ एवढी जवळिक त्यांच्यामधे असु शकते. थोडक्यात काय तर ती त्य दोन माणसांमधील सामंजस्य, प्रेम ह्यावर अवलंबुन असते. क्रमश:
|
मैत्री ही फ़क्त दोन समवयस्क माणसांमधेच असु शकते अस नाही. कारण माझे स्वतचे असे कित्तितरी मित्र, मैत्रिणी आहेत जे माझ्यपेक्षा वयाने खुप मोठे किंवा खुप लहान आहेत. सगळ्यात लहान मैत्रिणिचे उदाहरण म्हाणजे माझी भाची "सिद्धि". तिच्याशी बोलताना, तिच्याबरोबर ख़ेळताना, तिला शिकवताना कधी कधी नकळ्त तिच मला खुप काही शिकवुन जाते. पावणेतीण वर्षाची असुनसुद्धा तिला असलेली समज, तिचे बोलणे मला अनेक वेळा आश्चर्यचकित करुन जाते. तिला बोललेले प्रत्येक वाक्यावरच तिच रीऍक्ट होण हे मला बघायच असत. मी ऑफ़िसमधुन घरी आली आणि ती जर घरी आली असेल तर जोरात मासी म्हाणुन येउन बिलगणे, मी बॅग, शुज काढल्यावर मोठ्या माणसांसारखी जाउन पाणी आणुन देणे. मी रागवल्यावर किंवा तिला ओरडल्यावर मासी बोलुन खोट खोट हसुन एक पा देउन माझा राग शांत करण्याचा केलेला प्रयत्न मल नेहमी आईच्या एका बोलण्याची आठवण करुन देतो," एक रागावला तर दुसर्याने शांत राहुन त्याच्याशी प्रेमाने बोलाव". खरच तिच्या त्या वागण्यामुळे आलेला राग पटकन हवेतच विरुन जातो. दुसर एक उदाहरण म्हणजे आमच्या बिल्डींगमधे एक काका होते( त्यांनी आत्ता घर शिफ़्ट केले). ते सगळ्यांशी इतके समरसुन वागायचे की विचारु नये. त्यांन तीन मुली आहेत, सगळ्यात मोट्ठी जेमतेम आमच्यपेक्षा २ वर्षांनी लहान. पण ते बिल्डिंगमधे खुप फ़ेमस होते ते त्यांच्या मैत्रीपुर्ण बोलणे,विनोदबुद्धिमुळे. त्यांच्याशी बोलताना प्रत्येक शब्द जपुन वापरावा लागे. त्यांनी आम्हा सगळ्यांन प्रेरणा देउन बिल्डिंगमधे पार्टी वैगरे आयोजित करायचे काम दिले होते. कॉलेजात असताना,"काय मग आज तर फ़्रेंडशिप डे, मग बरीच मैत्री झाली असेल नाहि, रुपाली???" असे म्हणत नेहमी मस्ती करत रहायचे आणि स्वतादेखील आम्हाला "फ़्रेंडशिप डे"च्या शुभेच्छा द्यायचे. कुठेही दिसले तरी मधेच हटकुन विचारणार,"काय रुपाली, कस चाललय? घरातले सगळे कसे आहेत?? वैगरे". मोबाईल घेतल्यावर त्यांनी सगळ्यांन आवर्जुन नंबर दिला. अजुनही मधुन मधुन त्यांचे फोन येत असतात. त्यांची ती विनोदबुद्धी आणि मस्करी करायची सवय अजुनही तशीच आहे. त्यानंतरची माझी एक खास मैत्रीण म्हणजे माझी "आई". प्रत्येक वेळेला माझ बोलण शांतपणे ऐकुन घेणारी, माझी वायफ़ळ बडबडसुद्धा समरसुन ऐकणारी, चुक झाल्यावर माझी कान उघाडणी करणारी, माझ्या यशात माझे कौतुक करणारी, माझे सगळे हट्ट पुरवणारी, माझ्या प्रत्येक निर्णयात मला साथ देणारी अशी फ़क्त एकच मैत्रीण आहे "ती", तिच्या साथीने मी कहीही करु शकते. तिला असणार दु:ख कधी बोलुन दाखवणार नाही पण मला काय होतय किंवा माझ्या मनात काय चाललय हे मी न बोलता देखील समजणारी अशी ती एकच आहे. असे तर आत्तापर्यंत माझे इतके मित्र मैत्रिणि अहेत की आईच बोलते," तुला कित्ती लोक ओळखतात? इतक्या लोकांची ओळख, नाव, गाव, कित्ति मित्र मैत्रिणि तुझे???". त्यात नवीन अजुन मायबोलीवरील सगळ्यांची ओळख त्यांची नावे आत्त घरीही माहीत झाले आहेत. त्यामुळे तिल खुप प्रश्न पडतात की मी नक्की कोणाबद्दल बोलत आहे.
|
क्रमशः लिहायच विसरलीस की ग! चान्गल लिहिल हेस! अजुन येवुदे
|
पण जेव्हापासुन मायबोलीवर आलीय. मी इथलीच एक बनुन राहिलीय. आत्त हळुहळु का होईना आईचे म्हणणे पटायला लागलय. मी ओळख न पाळख तुमच्याशी बोलायला लागले. हळु हळु सगळ्यांशी ओळखी झाल्या. आपल्या सगळ्या भावना शेअर करु लागले. काही खुप जवळच्या मैत्रिणि झाल्या. एकमेकांना न बघता, न ओळखता खुप काही बोललो, चिडवल, टोमणे मारले. काही वाईट तर खुप चांगले अनुभवही आले. एकत्र मिळुन सगळ्यांनी जीटीजी केले सगळ्यांना भेटले. सगळ्या आयडींना खरखुर बघितल्यावर मनात विचार आला,"आपण ह्य माणसाला कित्ती काय काय बोललो आहोत पण प्रत्यक्षात भेटल्यावर मात्र काहीच बोलायला होत नाहि". एखाद्या अनोळखी व्यक्तीबरोबर आपले इतके चांगले बोलु असे कधीच वाटले नव्हते. आत्त इथे दिवसातुन एकदातरी आल्याशिवाय चैनच पडत नाही. नाहि आले तर एकदम चुकल्या चुकल्या सारखे वाटत रहाते. रविवारी एक दिवस सगळ्यांशी बोलले नाही तर कसतरीच वाटत. मैत्री खरच अशी कधीही, कुठेहि, केव्हाही करता येते, यावर आत्ताशा विश्वास बसायला लागला आहे. पण खरच अस प्रत्येक माणसाजवळ कुणीतरी असाव ज्याच्याबरोबर आपल्याला वेळ काळाच बंधन नसल्यप्रमाणे तासनतास त्याच्याशी गप्पा माराव्यात, आपली सगळि सुख दु:ख त्याच्यासमोर सांगावीत, आपल्या सगळ्या भावना त्याच्यासमोर व्यक्त करता याव्यात. जो आपले सगळे म्हणने शांतपणे ऐकुन घेईल, आपले काही चुकले असेल तर योग्य वेळि ओरडुन, कान पकडुन आपल्याला समजावुन सांगेल. आपल यश सेलिब्रेट करेल तसच अपयशातही साथ देईल. आपल सहाय्यक, सल्लागार, हितचिंतक, निस्वार्थी मित्र / मैत्रीण असेल. असाव ना आपल पण कुणीतरी अस, तुम्हाला काय वाटत??? जो कधीतरी आपल्यासाठीहि गाईल I'll be there for you...." रुप...
|
धन्स लिंबुभाव, तुम्ही वाचलत का?
|
अर्थात! मोठ मोठ्या पोस्ट लिहिण्याबरोबरच मी वाचुही शकतो म्हटल!
|
तस नाही हो लिंबुभाउ.
|
Shivam
| |
| Saturday, August 12, 2006 - 10:28 am: |
| 
|
रुप, खुप चांगलं जमतंय तुला लिहायला. छान वाटलं वाचुन. Keep it up!! 
|
Raina
| |
| Sunday, August 13, 2006 - 11:34 pm: |
| 
|
रुपाली, छान लिहीलं आहेस!
|
रुप्स, चांगलं लिहिलंस... मित्र-मैत्रिणी करायला दिवस लागत नाही हेच खरं...
|
शिवम, रैना, महेश मन:पुर्वक धन्यवाद!!!
|
|
|