|
Dineshvs
| |
| Friday, August 04, 2006 - 1:42 pm: |
| 
|
रैना, छान लिहिलय. पण तिथल्या तरुणांची अनास्था वाचुन वाईटहि वाटले.
|
मस्त लिहिलय रैना, खरय इथले आजी आजोबा इतके ताठ असतात ना. मला पण ह्यांचा स्वावलंबीपणा खूप आवडतो. डोळ्यांवरून आठवल पुलंच एक वाक्य आहे जसे जसे ही लोक म्हातारी व्ह्यायला लागतात तसे तसे डोळे निळेशार व्हायला लागतात. खरच निट निरखून बघितल तर लहान मुलांचे आणि अगदी म्हातार्या लोकांचे डोळे निळेशारच असतात.
|
Raina
| |
| Monday, August 07, 2006 - 9:48 pm: |
| 
|
मंडळी सर्वांचे आभार KP फुजीवर म्हातारे? Wow ! छ्या! आणि ईथे माझा दर वर्षी फुजीला जायचा निश्चय डळमळतो. चाफा- खरच ग्रेट असेल ती बाई glass of wine? hmmm ;-) रचना- हे पु.लंच वाक्य माहित नव्हते. काय सुरेख आहे. कराडकर- no worries . मला खरंच तुमच्या मैत्रीणीच्या आईचा लेख आवडला. Thanks for the link पराग, चिन्नू, अवी,दिनेश, सायो-धन्यवाद. गजानन, होना! खरच जपानी लोकं दीर्घायू आणि आपल्या फिटनेस बद्दल जागरुक असतात. मला वाटत येवढं जरी एकच जीवनमुल्य आपण अंगी बाणवू शकलो ना तर फार बरं होईल.
|
Bee
| |
| Monday, August 07, 2006 - 10:14 pm: |
| 
|
मला मायबोलिवरच्याच बेटीने एकदा मेल वरुन सांगितले होते की लहान मुलांचे निर्व्याज हास्य शेवटी परत एकदा आपण म्हातारे होतो त्यावेळी आपल्या चेहर्यावर उमटते. अगदी खरे आहे..
|
Lalitas
| |
| Monday, August 14, 2006 - 9:38 am: |
| 
|
रैना, मी आताच वाचला तुझा लेख... नितांत सुंदर आहे.. हे निरिक्षण मी इथे स्वीसमध्येही केलेलं आहे, पण इतकं छान लिहिण्याची शैली माझ्याजवळ नाही. जपान्यांसारखे युरोपातही वृध्द स्वावलंबी असतात. असंच आपणही असायला हवं आहे ही काळाची गरज आहे. वृध्दापकाळी मुलांनी सांभाळावं ही अपेक्षा नाही ठेवली तर मनानेच नाही तर शरीरानेही वृध्द माणसं स्वावलंबी होतात. मी स्वत: यांत लवकरच पदार्पण करणार आहे... साठीच्या जवळ येत आहे... तेव्हा मी ठरवूनच टाकलंय या इकडील आज्यांसारखं नेहमी काहीतरी करत राहायचं. 'जो थांबला तो संपला' हे आयुष्याचं ब्रीदवाक्य ठरवून टाकायचं, सतत पुढे बघायचं... मग दिशा आपोआप सापडेल, मार्ग तयार होईल असा दृढ विश्वास आहे!
|
ललीताताई, खूप छान लिहीलंत वरचं पोस्ट! तुमच्या आयुष्याचं ब्रीदवाक्य मनात कोरून ठेवलंय! माझी आई सत्तरीची झाली. ४२ वर्ष शिक्षिका होती. पण निवृत्त झाल्यापासून ती तिची तब्बेत जपून काय काय करते हे पाहीलं की मला स्वत:ची लाज वाटते. तिच्या शाळेतल्या निवृत्त शिक्षकांचं तिनं एक मंडळ स्थापन केलय. दर महिन्याला त्यांना एकत्र आणून कथाकथन, वक्तृत्व या सारख्या कार्यक्रमांन घेऊन जाणे, अगदी ८० वर्षांच्या शिक्षकांना देखील जमेल तसं घराबाहेर काढून त्यांचा वेळ सत्कारणी लागेल हे पहाणं असही कामं ती करते. दासबोधाच्या परीक्षा देते. गरीब विद्यार्थ्यांना फुकट शिकवते. आपल्याकडे देखील चित्र हळुहळू पालटतय असं नाही का वाटंत?
|
Lalitas
| |
| Monday, August 14, 2006 - 10:14 am: |
| 
|
अगदी मृण्मयी, आपल्याकडेही बदल होत आहेत. तुझ्या आईचं खरंच कौतुक आहे. त्यांच्या सारख्या फार कमी स्त्रिया सापडतील आपल्याकडे, पण चित्र पालटतंय हे नक्कीच! परिस्थिती जशी येईल तसं आपणही बदललो तरच निभाव लागणार आहे.
|
Bee
| |
| Monday, August 14, 2006 - 9:36 pm: |
| 
|
ललिता ताई, तुमचे तर अनुभवाचे बोल दिसत आहेत. वाचून खूप शांत शांत वाटलं मनाला. हे असे लिहिले तर आमच्यावरही एक संस्कार घडतात हे नक्की. तुमच्या पुढील वाटचालीकरीता माझ्या मनपूर्वक शुभेच्छा! रैना, हो ती पहिली कविता आणि ह्या बीबीचे शीर्षक दोन्ही कुसुमाग्रजांच्या कवितेतील ओळी आहेत. तुच लिहिले तेंव्हा तुला नक्कीच माहिती असेल.
|
Raina
| |
| Monday, August 14, 2006 - 9:54 pm: |
| 
|
ललिता ताई- अगदी. तुम्ही म्हणता तसं"जो थांबला तो संपला"! सतत "कार्यरत" असणे हेच औषध असावे- असे ह्या लोकांना पाहून वाटते. एक गंमत सांगू? काही दिवसांपूर्वीची गोष्ट. Art of Living च्या वर्गात त्यांनी सगळ्यांना विचार करुन यायला सांगीतले होते की till when do you plan to be on this planet . ते जोडी-जोडीने discuss करायचे होते. माझी पार्टनर जपानी बाई late 50's मध्ये होती. म्हणाली मी बहूदा शंभरी पार करणार. त्यासाठी तयारी करायला हवी.:-) माझ्या ध्यानी-मनी सुद्धा १०० हा आकडा नव्हता- माझं उत्तर ६५ होतं. हे ऐकून त्या बाईंनी मनातल्या मनात कप्पाळावर मारलेला हात चांगलाच जाणवला. :-) मृणमयी- तुझ्या आईं खरंच great आहेत.
|
|
|