|
Dnyanu
| |
| Friday, August 04, 2006 - 6:11 am: |
| 
|
छान लिहिलं आहेस.. कथा खूप आवडली..
|
श्र, सगळेच छान छान म्हणत आहेत म्हणून मी जरा बिचकत होतो अभिप्राय लिहायला. पण नंतर विचार केला आपल्याला काय वाटते ते लिहायला काय हरकत आहे. तुला सुद्धा असा प्रंजळ अभिप्राय वाचायला आवडेल. असो. तर अनेक लोकांना याचा ऑब्व्हीयस शेवट कळायला लागला होता. तसा तो झाला असता तर अगदीच पठडीतील कथा झाली असती म्हणून शेवत वेगळाच हवा होता. पण तो असा अपूर्ण नको होता असे वाटले. प्रत्येक गोष्टीला ठाम सोल्युशन नसतेच पण लेखिकेला त्यात काय सुचवायचे आहे हे कळत नाहीये. तुला फक्त रीलेशन्स वर लिहायचे असेल तर गोष्ट वेगळी. असो. हा माझा कथेकडे बघायचा दृष्टीकोन झाला. यावर V&C होणार नाही अशी आशा करतो. 
|
Raina
| |
| Monday, August 07, 2006 - 10:09 pm: |
| 
|
श्रद्धा- KP चं म्हणणं १००% पटलं. मलाही ह्या कथेचा शेवट जरा ओढून ताणुन वाटला होता- पण तसं लिहायची हिम्मत झाली नाही. सुरवात ईतकी natural आणि ओघवती होती की खूप अपेक्षा होत्या कथेकडून. Sorry हं कदाचीत आम्ही एकाच अक्षांश- रेखांशावर रहात असल्यामूळे- सुदूर पुर्वेतून ह्या प्रतिक्रिया आल्या असण्याचीही शक्यता आहे. 
|
Maudee
| |
| Tuesday, August 08, 2006 - 12:38 am: |
| 
|
अनुमोदन KP आणि रैना. काहीतरी राहिलय कथेत असं वाटलं.
|
Jayavi
| |
| Tuesday, August 08, 2006 - 1:06 am: |
| 
|
श्रद्धा, कथा तुझ्या नेहेमीच्या ओघवत्या शैलीत लिहिली आहेस. मित्रमैत्रीणींचा संवाद तर खूप छान. शेवट मला मनापासून आवडला. कधी कधी शेवट नसला तरी सुद्धा कथा मनावर ठसा उमटवते. इथेसुद्धा नायिकेला पुढे काय होणार ह्याचा विचार करायची गरज वाटत नाही. कदाचित तो तिच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेचा पराभव असेल. आजकालची पिढी फ़क्त वर्तमानातच जगते तिला भविष्याची चिंता करायची नसते........कदाचित ही विचारसरणी श्रद्धाला सांगायची असेल. माझं पूर्ण अनुमोदन आहे कथेला. Well Done श्रद्धा
|
Meenu
| |
| Tuesday, August 08, 2006 - 5:05 am: |
| 
|
हो मलाही असच वाटतं ठोस असा शेवट असलाच पाहीजे असं काही नाही. एक विचारसरणी व्यक्त झाली ईतकच. मला तर छान वाटली कथा आहे तशीच.
|
|
|