|
Soultrip
| |
| Friday, July 28, 2006 - 9:43 am: |
| 
|
आटपाट नगरात, sorry, पुण्यनगरात फेर-फ़टका मारायचा म्हणतोस, तर चल मग! अरे, थोडी उसंत घे आणि मग चालु कर तुझे प्रश्न! ... पुण्यनगरात चौका-चौकात सरदार अजितचंद्रांचे गोंडस छबी असलेले posters, फोटो का लावलेले आहेत, असं विचारतोयस? कधी सिंहासनारुढ, कधी दोन बोटे गालावर ठेऊन विचारमग्न, तर कधी पुणेरी पगडी घालुन लोभस हासणारे सरदार अजितचंद्र, आपले पालक्-मंत्री चौका-चौकात आपल्या प्रजेकडे प्रेम्-कटाक्ष टाकत कसे प्रसन्न हसतायत ते बघ आधी! (नाही रे बाबा, खड्डा चुकवण्याच्या तुझ्या निष्फळ प्रयत्नांना ते हसत नाहीत बरे!) अरे मुढा, कारण काय म्हणतोयस? सरदारांचा वाढदिवस नाही का साजरा झाला मागील सप्ताहात? त्यांच्या बाजुला कोण असं काय विचारतोस वेंधळ्यासारखे? ते पाषाणचे राजे विनायकचन्द्र-पुत्र सनी नाही का? आता फोटो का लावलाय म्हणजे? .. ते चाललेत अमेरिकेला शिकायला म्हणुन तो मोट्ठा फोटो! हो, सोमेश्वर मंदिरात महाराज समस्त जनतेस जातीनं साखर वाटणार आहेत. (हत्तीवरुन वाटणार असं विचारतोयस का?) मागच्या वर्षी कोथरुडचे राजे शशिकांतांचे पुत्र नाही का England ला गेले होते बालिष्टर व्हायला? पण पाषाणच्या राजपुत्राने कोथरुडच्या राजपुत्राला केंव्हाच मागे टाकलय बघ फोटोमधे! तिकडे पिंपरी- चिंचवड नां? तिकडे आहेत ना मनसबदार लांडे, मारणे, मगर अशी खाशी पंचहजारी, दसहजारी मंडळी! काय, बारामतीचे महाराज शरद्चंद्र नं? त्यांचे तर केवढे फोटो आणि cutouts लावले होते म्हणुन सांगु? .. हो, अजुनही आहेत नां बर्याच ठिकाणी!सरसेनापती नां? आताशा वार्धक्यामुळे (धक्क्यामुळे नाही रे बाबा)जास्त बोलत नाहीत ते. हो, पण तिकडे बघ, युवराज राज आणि उद्धव यांचे cutouts . अरे, एकत्र कसे असतील? नव्-निर्माण्-नगराची गादी वेगळी नाही का झाली? त्या पुढच्या चौकात नां? हो, कलाम्-सम्राटांना posters ची एवढी हौस नाहीये. पण त्यांच्या आगमनाप्रित्यर्थ गणेश्-खिन्ड पथ कसा चकाचक केला होता, आठवतं का तुला? आणि रातोरात काम करुन! काय, आता का नाही करत ते रातोरात काम flyover चे? वेडा की खुळा रे तु? आपण प्रजेनं बारमाही कर दिला की झालं! असे उलट प्रश्न विचारु नये रे बाबा आपण छोट्या माणसांनी! खड्ड्यातुन चालायला नको म्हणतोस, अरे ते राज्याच्या सुरक्षेसाठीचे खंदक आहेत बाबा! आणि थोडा धीर तो धरावा माणसानं! कलाम्-सम्राटांच्या पुढच्या भेटीच्या वेळीस ते काम पुर्ण करतीलच नां! मागल्या वर्षी साम्राज्ञी सोनियामाता आल्या होत्या नां पुण्यनगरीत, तेंव्हा तर कशी पुण्यनगरी सजवली होती नववधु-प्रमाणे! राज्या-राज्यातील सरदार मंडळी जातीनं हजर होते पायधुळ घेण्यासाठी! आता खाशांच्या रथामुळे प्रजेचे सामान्य पथ फक्त आठ-दहा घटका अडवुन ठेवले, तर ते प्रजेचे पुण्यच नाही का? राजमातेचं दर्शन नको का घ्यायला? प्रजेला त्यांना राजमाता असं संबोधायलाच आवडतं आजकाल. का, काय विचारतोयस? समस्त मराठा सरदारांना युवराज राहुल आणि युवराज्ञी प्रियांका केवढे आवडतात म्हणुन सांगु तुला? हो, हो, जनतेलाही ते आवडता बरे का! केवढे भव्य ते cutouts केवढी मोठ्-मोठी banners , अन ती राजस, गौर छबी! गांजलेल्या जनतेला बरे नाही का वाटणार अशी छान छबी बघुन? हो, तहान्-भुक विसरुन जाते बघ वैदर्भीय कृषीजनांची! देवाचा फोटो कसा लोभसवाणा असतो नां अगदी तस्सा! आणि तस्साच महिमा आहे हं या या सोनियादेविचा! लढाईत पराभुत होऊनही केवळ देवी-भक्तीमुळे लातुर राज्याच्या शिवराजांना पुन्हा सरदारकी प्राप्त झाली, माहीत आहे का तुज? काय म्हणतोस दिल्ली-तख्तावर राज्य करावं नेहरु-गांधी-कुलोत्पन्न राजबिंड्यांनी आणि महाराष्ट्रावर सरदार शरदचंद्र, विलासचंद्र, अजितसुर्य, विजयसुर्य, धाकले आबासाहेब यानीच? हेच खरं रे बाबा! आपण चाकरमान्यांनी बारमाही कर देऊन त्यांच्या गादीपुढे आणि गाडीपुढे आदरांने कर जुळवायचे म्हणजे झालं बघ! अरे, दमलास की काय एवढ्यातच cutouts आणि posters बघुन? कारभारी करीरांना देणार नां दुवा या सगळ्याबद्दल?
|
.. done.. ..
|
झकास लिवलस रे भो! 
|
Soultrip
| |
| Monday, July 31, 2006 - 7:10 am: |
| 
|
धन्यवाद LT!! (मी खरंच जरा काळजीत होतो )
|
Gondhali
| |
| Wednesday, August 02, 2006 - 4:31 pm: |
| 
|
soultrip , सही रे सही मस्त आहे.. सकाळ मध्ये प्रसिद्ध कर
|
Soultrip
| |
| Thursday, August 03, 2006 - 4:59 am: |
| 
|
Thanks गोंधळी! पवारांचा सकाळ ते प्रसिद्ध करेल असं वाटत नाही; पण try करेन.
|
Moodi
| |
| Thursday, August 03, 2006 - 5:40 am: |
| 
|
छानच लिहीलयस सोल. खरय सकाळचे पवार मंडळी हे लाईटली घेण्याची शक्यता कमीच. 
|
Smitu
| |
| Friday, August 18, 2006 - 4:29 am: |
| 
|
mastach jamale aahe pan bhasha jara nataki vate.
|
Soultrip
| |
| Monday, August 21, 2006 - 4:54 am: |
| 
|
bhasha jara nataki vatate.>>>> दिवाकरांच्या नाट्य-छटेसारखी भाषा लिहिण्याचा प्रयत्न केला आहे पामराने
|
|
|