|
Fulpakhru
| |
| Wednesday, July 26, 2006 - 6:42 pm: |
| 
|
मायबोलीकर्स पहिलाच प्रयत्न आहे साम्भाळून घ्या कुठून सुरुवात करू तेच समजत नाही आज मम्माची जितकी आठवण येते आहे तितकीच स्वताची लाज वाटते आहे आणि २० वर्शान्चा काळ डोळ्यान्पुढून झरझर सरकत आहे मला आठवते तेव्हापासून म्हणजे मी ५ ६ वर्शान्ची होते आणि जीवन २ वर्शान्चा होता मी मम्मा आणि जीवन आम्ही तिघेच घरात रहात होतो मम्मा ला कधी विचारले की पप्पा कुठे आहेत, कधी येणार तेव्हा ती उत्तर न देता उलट मलाच प्रश्ण विचारत असे का ग मनू तुला मम्मा आवडत नाही का सारखे पप्पा पप्पा का करते आहेस? आणि पप्पा आले की माझ्या आधी तुलाच कळेल. असे म्हणून गोड हसून १ पापा देत असे की मी तो विशय तिथेच सोडून देत असे. पण मी जशी मोठी होउ लागले तसे मला वास्तव कळू लागले; की आपले पप्पा कधी परत न येण्यासाथी गेले आहेत. मम्मा वर आपली आणि जीवन ची जबाबदारी टाकून. की त्याना जीवन ची जबाबदारी टालायची होती म्हणून? ही कथा आहे माझ्या मम्माची आनि जीवनची जीवन माझा लहान भाउ... metally challenged kid मम्माचा दिवसाचा बराचसा वेळ जीवनच्या मागे जात असे मम्मा ने आणि पप्पान्नि किती कौतूकाने त्याचे नाव जीवन ठेवले पण तो कधीहि सर्व सामान्य जीवन जगू शकणार नवता. पण मम्माचा त्याच्यावरही तेवढाच जीव. त्याला कळो न कळो ती त्याच्यासाठी ती प्रत्येक गोश्ट करत असे जी माझ्यासाठी केली गेली होती. नोकरी, मी आणि जीवन मम्मा सगळे कसे साम्भाळत असेल कोण जाणे तिला mentally आणि physically किती त्रास होत असेल... पण तिने कधी तो आमच्या पर्यन्त पोचू दिला नाही ज़ीवन म्हणजे एक डोके दुखीच होती सगळ्यान्साठी पण मम्मा ने कधी कोणती तक्रार केल्याचे आठवत नाही तो असेल mentally challenged पण होता फ़ार प्रेमळ त्याला मम्माचा स्पर्श सारे काही सान्गून जात असे तसाहि तो सगळ्यान्च्या चेश्टेचा विशय होता पोरे त्याला मुद्दाम त्रास देत असत, खोड्या काढत असत खोड्या तरी किती... कधी त्याच्या पयाला १ डबा बान्धत. तो चालू लागला की डब्याचा खड खड आवाज येई...तो बिचारा भेदरून जाई आणि ही मुले हसत हसत त्याच्या मागे लागत, अपूर्ण
|
Meggi
| |
| Thursday, July 27, 2006 - 3:04 pm: |
| 
|
मनाली, चांगलं लिहित आहेस. लवकर पूर्ण कर. कथा लिहितांना नविन paragraph करायचा असेल तरच enter press कर. नाहितर नविन ओळ add होते.
|
कधी त्याच्या खान्द्यावर १ पिशवी लावत आणि त्यात दगड भरत. तो बिचारा ते ओझे घेऊन सगळीकडे फ़िरे, कधी त्याच्या अन्गावर लपून पाणी ओतत १ ना २. मग तो रडत रडत माझ्याकडे येई. आणि मी जर त्याची बाजू घेतली नाही तर मम्मा येईपर्यन्त तो रडत बसे. मम्मा आली कि तिला बिलगत असे. मम्माला काही न सान्गता सगळे कळे पण ती मला कधीही ओरडली नाही. आधी ती जीवन ला शान्त करत असे, त्याचे डोळे पुसत असे, त्याला जेऊ घालून झोपवत असे आणि मग मला विचारत असे मनु का ग त्या मुलान्ना ओरडली नाहीस? ज़ीवन ला त्रास झाला की तुलाही आनन्द होतो का ग? हे बोलताना तिचे डोळे भरून येत. आणि मम्माला रडताना पाहून मीही तिच्या कुशीत शिरून रडु लागे. आणि मी ठरवत असे की पुन्हा कधी जीवन ची कोणी खोडी काढली की मी त्याच्याशी भान्डेन, जीवन ची बाजू घेईन्… मझा हा निर्धार थोडे दिवस टिकत असे, आणि पुन्हा कधी तरी मला जीवन चा राग राग येऊ लागे.... वाटे याच्या मुळे मला मम्मा कमी मिळते, त्याला १ गोश्ट १० वेळा सान्गूनही कळत नाही म्हणून ती सारखी त्याच्याच मागे असते, त्याने न सान्डता पाणी प्यायले तर त्याचे कोण कोउतूक, त्याच्या मुळे मला कोणी खेळायला घेत नाही, त्याल साम्भालायला म्हणून मला घरात बसावे लागते… पण आज मी मम्माची ओढाताण समजू शकते. जीवन सारखी मुले वाढवणे म्हणजे काय आहे हे आज मी समजू शकते अशा रितीने दिवस जात होते. तो अजाणतेपणी कधी कधी माझे फ़ार नुकसान करत असे. माझ्या अभ्यासाच्या वह्या पुस्तकानवर रेघोट्या मारी, पाने फ़ाडी. कधी तरी काही वस्तू इकडे तिकडे फ़ेकुन देई. मग मी त्याचा राग राग करत असे. पण मम्मा मलाच जवळ घेऊन सान्गे की तू तुझ्या वस्तू त्याच्या हाताला लागतील अशा का ठेवतेस? त्याला काहि कळत नाही पण तुला तर कळत ना? हळू हळू मी आणि जीवन मोठे होत होतो. जीवन ला आम्ही आमच्या दोघीनच्या आयुश्यात सामावून घेतले होते. आणि मग मी college साठी पुण्याला hostel ला रहायला गेले. आज पर्यन्त माझ्या आयुश्यात मम्मा आणि जीवन खेरीज कोणीच नवते पण hostel ला गेले आणि माझे जगच बदलले. मला नवीन मित्र मैत्रीणी मिळाल्या. सुरूवातील मी बुजून गेले कारण जीवन मुळे आमचे जग फ़ार मर्यादित झाले होते. मी hostel ला आले आणि प्रथमच लक्शात आले की जीवन मुळे मी किती तरी गोश्टीना मुकले होते. त्याला एकट्याला घरात ठेऊ शकत नाही म्हणून मीही फ़रशी कुठे जाऊ शकत नसे. कारण मम्मा ला नोकरी करणे भाग होते. आणि मम्मा आणि माझ्याइतके प्रेमाने त्याचे कोणी केले असते? आत हळू हळू मला जीवन चा राग येऊ लागला. त्याच्यामुळे मी का सुफ़्फ़ेर होऊ अशी स्वार्थी व्रुत्ति माझ्यात निर्माण होऊ लागली मम्माच्या जेव्हा ही गोश्ट लक्शात आली तेव्हा तिला खूप वाइट वाटले. तिने मला खूप समजावले पण मी तिच्याजवळ हट्ट धरला की आपण जीवन ला एखाद्या सन्स्थेत पाठवून देऊया. आता तो मोठा झाला आहे. आपण त्याला किती दिवस घरात साम्भाळणार आहोत? या एका गोश्टीवरून माझ्यात आणि मम्मात खूप खतके उडू लागले. वास्तवीक जीवन पूर्णतहा परावलम्बी नवता त्याला आपल्या हाताने जेवता येत असे, आपली आन्घोल करता येत असे. आणि मुख्य म्हणजे त्याचे माझ्यावर आणि मम्मा वर फ़ार फ़ार प्रेम होते. आम्ही काही कारणाने चिडलो किवा रडू लागलो तर तो कावरा बावरा होत असे. आमच्या जवळ येऊन गप्प बसून रहात असे. आम्ही कधी आजारी पदलो तरी तेच. म्ह्न्णूनच मम्मा त्याला कुठे ठेवायला तयार नवती. तिचे म्हणणे असे की त्याला थोड्या प्रेमाची गरज आहे बस आणि ते आपणच देउ शकतो ना? पण मी माझा हेका सोडायला तयार नवते मम्मा खूप दुक्खी झाली तिची ही व्यथा जीवन ला समजली की देवाला कोण जाणे पण एका साध्याशा तापाचे निमित्त होऊन जीवन एक दिवस हे जग सोडून निघून गेला. तो गेला तेव्हा मी त्याच्या जवळ नवते. होती फ़क्त मम्मा जिने खरच त्याच्यावर निस्सिम प्रेम केले. माझ्याही प्रेमात काही तरी कमी होतीच पप्पा तर केव्हाच सोडून गेले होते आम्हाला तिघाना. ज़ीवनच्या म्रुत्यूने मम्मा आणखीनच खचली गेली कितेय्क वर्शे म्हणजे मी college साठी घर सोडले तेव्हापासून जीवन हेच तिचे आयुश्य होते... आणि अखेर एक दिवस मम्मा हि हे जग सोडून निघून गेली यथावकाश माझे लग्न झाले. आणि मी आई झाले. पण मला आई झालेली पहायला माझी मम्मा या जगात नाही. माझे बाळ हळु हळु मोठे होते आहे. त्याच्या लीला पाहतान मला का कोणास ठाऊक पण जीवन डोल्यासमोर येतो आहे. ज़ीवनच्या खोड्याना वैतागणारी मी पिल्लूच्या खोड्यान्चे कोउतूक करते आहे. का तर ९ महिने मी त्याला माझ्या रक्तावर पोसले, त्याच्या जन्मासाठी जीवघेण्या कळा सोसल्या तो माझ्या काळजाचाच एक तुकडा आहे म्हणून? जसा जीवन माझ्या मम्माच्या काळजाचा तुकडा होता.. आज मी मम्माची व्यथा समजू शकते किती सहजपणे पप्पा आम्हल सोडून गेले, मी मम्मा ला म्हटले की त्याला मी नाही साम्भाळणार तुझ्या ननतर्……… माझी मम्मा, तिने हे सगळे आघात कसे सहन केले असतील? त्या पोराचा खरच तिच्यावर फ़ार जीव म्हणून त्यानेच तिचा प्रश्ण सोडवला का? मम्मा मला माफ़ कर please मम्मा मला माफ़ करशील ना? समाप्त
|
Moodi
| |
| Thursday, July 27, 2006 - 5:03 pm: |
| 
|
मनाली खूपच हेलावून टाकणारी कथा आहे ही. डोळे कधी पाणावले तेच कळले नाही.
|
Princess
| |
| Friday, July 28, 2006 - 1:10 am: |
| 
|
मनाली.... खुप रडवलस तू. इतके हृदयस्पर्शी लेखन पहिल्याच प्रयत्नात. छान लिहिलस..
|
सुंदर.. फ़ार छान लिहिलेय...!!! अगदी. हृदयातुन आलेला..पश्चाताप आहे.., तशा मुलांच्या सन्स्थेत काम करुन.. ती उणीव भरुन निघेल, दुसरे म्हणजे.. मला आवडलेली गोष्ट mentally challenged.. म्हणणे... हा शब्द मी आत्ता आत्ता ऐकला..!!! एकुण.. अतीशय भावस्पर्शी..
|
मनाली, अगदी काळजाला हात घातलास तु. एक्-एक शब्द .... अमोल
|
खुपच छान, अगदी मनाला भिडलं....
|
Manutai
| |
| Friday, July 28, 2006 - 7:52 am: |
| 
|
फुलपाखरू, खरच जावे त्याच्या वन्शा तेव्हा कळे. तुझ्या आईचे दु:ख तुला बाळ झाल्यावर कळ्ले.
|
Bgovekar
| |
| Friday, July 28, 2006 - 8:44 am: |
| 
|
फुलपाखरु, मन हेलावुन गेल गं या तुझ्या स्व - जिवनातील घडुन गेलेल्या प्रसंगाने.. पण खर सांगु का आईला होणारं दुख खुप वेळाने जाणुन घेतलसं. अश्रुंची दाटी झाली गं वाचताना डोळ्यात.
|
Savani
| |
| Friday, July 28, 2006 - 9:04 am: |
| 
|
मनाली, हृदयस्पर्शी लिहिलं आहेस.साध्याच शब्दात लिहिलं आहेस पण थेट काळजाला भिडणारं आणि नकळत डोळे ओले करणारं. आई झाल्यानंतरच कळतात आईच्या वेदना आणि आईचं मन.
|
Chinnu
| |
| Friday, July 28, 2006 - 9:50 am: |
| 
|
फ़ुलपाखरु, मन हेलावुन गेलय..
|
Dineshvs
| |
| Friday, July 28, 2006 - 12:17 pm: |
| 
|
फुलपाखरु, पुर्वी अंजली नावाचा एक सिनेमा आला होता. त्यातहि थोरली भावंडे आपल्या अश्याच लहान बहिणीचा तिरस्कार करतात. त्यावेळी त्यांचे बाबा त्याना सांगतात. देवाला अंजलीची खुप काळजी वाटत होती, म्हणुन त्याने तिला आपल्या घरात पाठवले, कारण तिची योग्य ती काळजी याच घरात घेतली जाईल, हे त्याला माहित होते.
|
अक्षशरशा रडायला आले आपण कळत नकळत अश्या चुका करतो आणी त्या पुर्ण जाणेपर्यन्त वेळ गेली असते
|
Mita
| |
| Friday, July 28, 2006 - 2:35 pm: |
| 
|
मनाली तू एवढ्या सहज आपल्या चुकांची कबुली दिलीस, खुप धाडस लागतं त्याला. लोपा म्हणते तसं mentally challenged मुलांसाठि काम कर. तुला बरं वाटेल.
|
Arch
| |
| Monday, July 31, 2006 - 1:33 pm: |
| 
|
मनाली, छान लिहिल आहेस. लहानपणी एवढी समज नसते त्यामुळे अस वागल जात. आता दुसर्या कोणात जीवन शोधून त्यला प्रेम देणं तुझ्या हातात आहे.
|
गेले ३ दिवस पिल्लू आजारी असल्यामुळे मी तुमच्या सगळ्यान्च्या प्रतिक्रिया आजच वाचल्या. तुमच्या सगळ्यान्च्या प्रतिक्र्यीयानबद्दल धन्यवाद ही कथा सत्य कथा आहे पण यातील मनू मी नाही ही कथा माझ्या घरातच घडली आहे पण सोना माझी चुलत बहीण... आम्ही कधी तिला खेळयला घ्यायला तयार नसू... तिचा राग राग करीत असू फ़ार वाईट वाटत आठवल की पन लोपा ने सुचवल्या प्रमाणे मी अशा मुलानच्या सन्स्थेत काम करण्याचा जरूर प्रयत्न करेन... मला आवडेल जीवन सरख्या मुलानबरोबर काम करायला... त्याना त्यान्च्या पायावर उभे रहायला मदत करायला... दिनेशदा अन्जली मी लहानपनी पाहिला आहे. घरातल्यान्नी दाखवला होता पण आता आठवत नाही फ़ारसा मनाली
|
|
|