Anilbhai
| |
| Friday, August 18, 2006 - 7:38 am: |
| 
|
इथे चित्रावरुन कविता करायची आहे
|
Anandg
| |
| Saturday, August 19, 2006 - 9:17 am: |
| 
|
कुणी चित्र ठेवेल तर कविता जरूर होईल. श्रावणही कोरडाच जाणार का?
|
Kiru
| |
| Saturday, August 19, 2006 - 9:50 am: |
| 
|
श्रावण.. आणि कोरडा!! असं कसं होईल?? हे घ्या..
|
Anandg
| |
| Monday, August 21, 2006 - 3:15 pm: |
| 
|
कोरडा श्रावण इथे डोंगरात भासे ओला-कोरडा श्रावण नदीबाईच्या पाण्याला खाली आलं रे ऊधाण इथे डोंगरमाथ्याला दिसे हिरवगारं रान तिथे पायथ्याला कसे महापुराचे थैमान वाट चुकुनिया आलं इथे कोवळसं ऊन वाट पाहुनिया तिथे- नाही पहाट किरण इथे दिसतो पिसारा अवचित झाडातून घन निळा बरसतो रेशमाच्या धारातून तिथे पुराचा पसारा टाके गावं झोडपून एक आक्रोश उठतो- "हवा कोरडा श्रावण..." "हवा कोरडा श्रावण.."
|
ही वाट दुर जाते जिथे माझिया प्रियेचे घरटे त्या वळणावर, त्या रस्त्यावर मन अजुनही एकाकी फ़िरते तिच्या आठवणींची संगत अजुनही आहे मनात ना वैराग्य कधी आले त्या दु:खी मनाला मन सतत फ़ुंकर घाले हळुवार त्या भावनांना जगी श्रावणमास तरी मन अनंत उदास वैशाखाचा वणव्याचा असतो सदा निवास रुप...
|
Swara
| |
| Wednesday, August 23, 2006 - 10:11 pm: |
| 
|
हिरवळिचा गालिचा त्याला पायवाटेची किनार हिरव्या गर्द झाडांवर कोवळ्या पालवीचा भार नाजुक दोन पावलांचे त्या वाटेवरती ठसे हिरव्यागार सावलीत कुणी वाट पहात बसे हिरवा वास श्वासात त्याची मनामध्ये साठवण असो तुमचा नीळा कान्हा माझा मात्र हिरवा श्रावण.. माझा मात्र हिरवा श्रावण....
|
R_joshi
| |
| Thursday, August 24, 2006 - 6:00 am: |
| 
|
स्वरा चित्रकविता अगदि शब्दात उतरवलिस
|
R_joshi
| |
| Thursday, August 24, 2006 - 6:14 am: |
| 
|
दाटलेल्या हिरवळीतुन पायवाट एकटीच कुठेही चालली सोबतीच्या स्वप्नांसाठी कुणामागे ही धावली श्रावणाचा होता शिडकाव हिरवळ ही पालावली ओल्या मातिच्या सुगंधाने पायवाट ही सुखावली सोबतीच्या स्वप्नांसाठी कुणामागे ही धावली एकांताच्या मोहक क्षणी सोबत श्रावणाचि मिळाली तेव्हा ती तिची न राहिली तिला हि तिच्या स्वप्नांची सोबत मिळालि तिला हि तिच्या स्वप्नांची सोबत मिळालि प्रिति
|
अशी कशी हि एकटीच चालली कुणाच्या ओढीनं ओढावून ओली कच्च हिरवाळलेली मिलनाच्या ओढीनं गाभुळलेली जंगलाचा मंद सुगंध श्वासात भिनवत आंदोळत बहरत वळणावर बहकत हिरव्या श्रावणात हरवून गेली
|