|
"मी मुंबईकर २६" हा लेख लिहायचे कारण म्हणजे सध्या तिनेक आठवड्यात मुंबईत घडलेल्या ठळक घडामोडी. तस तर प्रत्येकाला आपण रहात असलेल्या जागेचा, राज्याचा, देशाचा अभिमान असतोच. भले त्या वस्तीत, राज्यात, देशात त्यांची कित्तीही गैरसोय होत असेल. मुंबईबद्द्ल बोलायचे तर इथे तुमच्याशी बोलायला कोणालाही वेळ नसतो. लोक अगदी "फ़ास्ट लाईफ़" जगत असतात. ते म्हणतात न "Live Life King Size" ही म्हण पुर्ण करण्यासाठीच त्यांची फ़ार धडपड चाललेली असते. लोकांना आपल्य घरातल्या लोकांशी बोलायची फ़ुरसत नसते मग तिथे समाजातील घडाणार्या घटनांवर काय गप्पा मारणार???? मुंबईच्या बाबतीत एक मात्र अगदी खर म्हंटल आहे "ये बंबई है बंबई, यहा टाईम का मतलब है पैसा." य वाक्याची प्रचिती तर तुम्हाला इथे आल्यावर लगेच येईल. प्रचंड गडबड, वातावरण एकदम चालत बोलतं, प्रत्येकजण आपआपल्या कामात मशगुल. गेला तीन आतअवड्यापुर्वी मुंबईत परत एकदा पावसाने थैमान घातल होतं. तो सतत ५-६ दिवस कोसळत होता. त्यामुळे मुंबई एकदम जलमय झाली होती. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याने मुंबईला परत एकदा गेल्यावर्षीच्या २६ जुलैची आठवण करुन दिली होती. तसाच प्रचंड तुफ़ानी पाउस, विजांचा कडाकडाट, ढगांच गडागडाट वैगरे. त्या दिवशी पुन्ह एकदा मुंबई महानगपालिकेची सगळी आश्वसन फ़ोल ठरविली त्या पावसाने. लाखो मुंबईकरांच्या जीव नुस्त धास्तावला होता त्याने... तो शेवटी पाउस बंद झाल्यावर प्रत्येक मुंबईकराचा जीव भांड्यात पडला. हे असे नेहमीच होत आले आहे. निवडाणुकीच्या वेळी मिळतात फ़क्त भरघोस आश्वासन आणी जेव्हा ती प्रत्यक्षात निभवायची वेळ येते तेव्हा प्रत्येकजण आपआपले हात वर करुन दुसर्याकडे अंगुलीनिर्देष करत असतो. तरीही मुंबईकर याला कधीच डरत नाहि. गेल्यावर्षीच्या आणी यावर्षीच्या पावसात त्यांनी केलेली मदत तर जगजाहिरच आहे. क्रमश:
|
Shivam
| |
| Wednesday, July 26, 2006 - 3:35 am: |
| 
|
रुप, चांगली सुरुवात केली आहेस. लवकर पुर्ण कर. आज '२६ जुलै". आजच हा लेख पुर्ण केला असतास तर बरं झालं असतं.
|
गेल्या वर्षिच्या २६ जुलैने उडविलेल्या हाहकाराची एक झलक या बोलक्या चित्रातुन लगेच कळुन येते. नियटीच्य त्य थैमानाने हजारो लोकांचे बळी घेतले, करोडोंचे नुकसान झाले होते.
त्या मदतीत तर लहान मुलं, या देशाची तरुण पिढि, ज्येष्ठ नागरिक सगळेच सहभागी होते. "लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा" बोलणार्यांनाही आपली या शहरात रहात असतानाची जबाबदारी समजली होती. प्रत्येकजण आपआपलयापरीने मदत करित होते. पावसाचा तडाखा संपतोय न संपतोय तोच नियतीने मुंबईकरांवर दुसरा घाव घातला. ११ जुलै,२००६ ला मुंबईत पुन्हा एकदा अतिरेक्यांनी घातपात घडवुन आणला. त्या दिवशीच बॉम्बस्फ़ोटानेसुद्धा हजारोंचे घर उध्वस्त केले. त्या बॉम्बस्फ़ोटामुळे मुंबईतील जनजीवन पुर्णत: विस्कळित झाले. क्रमश:
|
अचानक झालेल्या बॉंबस्फ़ोटामुळे सगळ्यांचीच वाताहत झाली. मुंबीची "जीवनवाहिनी" समजली जाणारी "रेल्वे लोकल सेवा" खंडीत झाल्यामुळे सगळ्यांचाच आपल्या आप्तेष्ट, मित्रपरिवाराशी, नातलगांशी संपर्क तुटला होता. प्रत्येकजण आपल्य जिवलगांची ख्यालीखुशाली घेत होता.
अतिरेक्यांनी आपल डाव साधला होता. कित्येक लोकांचे तर देहसुद्धा मिळाले नव्हते. त्या ठिकाणची तर दृष्यसुद्धा भयावह होती.
त्या भग्न अवस्थेनंतरही मुंबईकरांनी आपली जगण्याची जिद्द अजिबात सोडली नाही. सगळी संकट, अडीअडचणी, नियतीचे आणि काही दुष्ट लोकांचे डव उधळुन लावत आपली जगण्याची जिद्द आणि प्रतिकुल परिस्थितीवरही मात करण्याची कला पुन्हा एकदा दाखवली होती. जखमींना केलेली मदत, अश्रितांना दिलेला आसरा, लोकांनी उत्स्फ़ुर्तपणे केलेले रक्तदान अगदी प्रशंसनीय आहे. दुसर्या दिवशी पुन्हा एकदा नवी क्षितिजे, नवि आव्हाने आणि नव्या दिशा त्याला खुणावत होत्या. झाले गेले गंगेला मिळाले असा विचार करुन तो "मुंबईकर" पुन्हा एकदा नव्या जोमने, नव्या प्रेरणेने आणि जिद्दिने कामाला लागला. याचे कारण आणि त्याच्या जगण्याचा मुलमंत्रही फ़क्त एकच "The Show Must Go On..." हे सगळ सहन करुनही पुन्हा पुढे मार्गक्रमण करणार्या मुंबईकराला माझे शतश: प्रणाम. मीही आजपासुनच यातुन प्रेरणा घेउन काहीतरी करायचा प्रयत्न करीन. ही मुंबई आहे, जगाला सगळ्याच मौल्यवान गोष्टींच आकर्षण असत. लोक इथे मुंबईवर डोळा थेवुन असणारच. कारण जगातली सर्वात चांगली आणि मौल्यवान गोष्ट कोणला नकोय??? तेव्हा तिचे जतन, रक्षण आणि संवर्धन करणे हेही आपल्याच हातात आहे नाही का???? म्हणुनच मी "एक मुंबईकर" आहे आणि मला त्याचा फ़ार अभिमान आहे... मेघ गर्जु दे, वीज चमकु दे काळोख होवु दे आम्ही ना डरणार कोणाला नाहीच घाबरणार तिच्यासाठीच लढणार रक्षु तिला, जपु तिला तिलाच सजविणार ते आम्हीच "एक मुंबईकर..." रुप...
|
Neelu_n
| |
| Wednesday, July 26, 2006 - 6:15 am: |
| 
|
रुपाली चांगले फोटो टाकलेयस.. लेखही उत्तम.
|
व्वा.. मुंबईकराची छान ओळख 
|
Mrdmahesh
| |
| Wednesday, July 26, 2006 - 7:13 am: |
| 
|
रुपाली, अतिशय छान लिहिले आहेस. विशेषत: समर्पक फोटो टाकले आहेस.. मुंबईकर कुठल्या कुठल्या दिव्यातून गेला ते या लेखावरून कळते.. आणखी काही गोष्टी असतील खासकरून ज्या फारशा कोणाला माहित नाहीत त्यांचा इथे उल्लेख करू शकलीस तर चांगलेच...
|
रुपाली, छान लिहिल हे! पण आजच्या लोकसत्तामधे हार्डकॉपीच्या फ्रण्ट पेजवर गेल्या वर्षीचा पुराचा अन आज रोजीचा ट्रॅफिकचा असे दोन फोटो दाखवुन लोकसत्ताला काय सुचवायच हे?
|
Maudee
| |
| Wednesday, July 26, 2006 - 9:10 am: |
| 
|
छान लिहिला आहेस लेख़ रुप
|
Gurudasb
| |
| Wednesday, July 26, 2006 - 11:01 am: |
| 
|
रुप , ' त्या ' दिवसाची आठवण म्हणजेच खरा ' मुंबईकर ' संकटात कसा धीर गम्भीर असतो , एकजूट कसा दाखवतो , जातीधर्माची बंधने कशी बाजूला ठेवून माणुसकीचे नाते कसे दृढ ठेवतो याचे मुर्तिमंत उदाहरण आहे . तू तुझ्या लेखात प्रसंगचित्रांसहित ते दाखवून दिलेस . छान लिहिलेस . वर्षभराने मुम्बईवर तसाच एक आलेला आपतीक्षण पण मुम्बईकराने त्याच वृत्तीने झेलला . " तेथे कर माझे जुळती "
|
Savani
| |
| Wednesday, July 26, 2006 - 11:26 am: |
| 
|
रुपाली, छान लिहिलं आहेस. आणि फोटो पण समर्पक. salaam Mumbai
|
Chinnu
| |
| Wednesday, July 26, 2006 - 11:48 am: |
| 
|
रुप एकदम झकास! लिहीत रहा..
|
Shreeya
| |
| Wednesday, July 26, 2006 - 10:58 pm: |
| 
|
रुपाली, छानच ग! विशेषत्: फोटोंमुळे लेख खूपच प्रभावशाली झालाय! मुम्बईकरांचे खरेच कौतुक वाटते!
|
शिवम, नीलुताई, योगी, महेश, लिंबुभाउ, माउडी, गुरुकाका, सावनी, चिन्नु, श्रिया तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांबद्द्ल धन्यवाद.. तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनामुळेच मी हे लिहु शकले म्हणुन पुन्हा एकदा धन्यवाद.
|
Dineshvs
| |
| Thursday, July 27, 2006 - 12:16 pm: |
| 
|
मीहि एक पक्का मुंबईकर. मला हे लिखाण आणि सोबतचे फोटो खुप भावले.
|
धनवाद दिनेशजी. पण मला मात्र मुंबईकर खरच एक सामान्य वेषातला असामान्य नागरिक वाटतो... एकदम of them...
|
>>>>> मुंबईकर खरच एक सामान्य वेषातला असामान्य नागरिक वाटतो झकास वाक्य!
|
धन्स लिंबुभाउ... हे अगदी मनापासुन होत.
|
mast g.. rupalii... lihin sodu nako chaan lihites..!!!
|
रुपाली, छान लिहिलय... खरोखर सामान्य मुंबईकरांचे धैर्य आणि माणुसकी असामान्य आहे
|
लोपा धन्यवाद.. प्रयत्न करेन गं... मयुरेश धन्यवाद..
|
|
|