Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 21, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » आषाढ » काव्यधारा » काहीच्या काही कविता » Archive through July 21, 2006 « Previous Next »

Chinnu
Tuesday, July 18, 2006 - 9:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

..श्रोत्याला विचाराचं, नेत्याला सदाचाराचं ठिगळ देणार
फार छान लिहिलस देवा. फार आवडली.

Gajanan1
Wednesday, July 19, 2006 - 10:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Devdataa, really good poem.

Prasad_shir
Wednesday, July 19, 2006 - 12:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कणा (अतिरेक्याचा)

ओळखलंत का परवेझ मला
पाकिस्तानात आला कोणी
तारवटलेल्या डोळ्यांमध्ये
कणभर नव्हतं पाणी

क्षणभर बसला, भेसूर हसला
बोलला वरती पाहून
मुंबईमधून आत्ताच आलो
आलो बॉम्ब लावून

माज चढल्या सैतानासारखा
लोकल्स मधून नाचलो
साथी सारे पकडले जातील
मीच एकटा वाचलो

वाटलं होतं बॉम्ब लावून
मुंबईची वाट लागली
मुंबईमात्र नेहमी सारखीच
पुन्हा धावायला लागली

खिशाकडे हात जाताच
वर बघून म्हटला
पैसे नकोत सरदार
मनात भकासपणा दाटला

मुंबईकरांचं धैर्य पाहून
मोडलाय माझा कणा
छातीवरती बंदुक ठेवून
फक्त मर म्हणा!

मुंबईकरांच्या अनन्वित धैर्याला सादर समर्पण...

- प्रसाद शिरगांवकर

(आदरणीय कुसुमाग्रज यांच्या 'कणा' या कवितेवर आधारित)


Chinnu
Wednesday, July 19, 2006 - 2:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

nice one prasad ....

Moodi
Wednesday, July 19, 2006 - 4:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद अतिशय उत्कट!! ......

Kedarjoshi
Wednesday, July 19, 2006 - 6:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Good one Prasad. mast ahe.

Kmayuresh2002
Thursday, July 20, 2006 - 12:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद सहीच रे.. पण इथे का रे?ही काहीच्या काहीच नक्की नाही

Meenu
Thursday, July 20, 2006 - 12:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद अतीशय सुंदर .. मयुरला अनुमोदन काहीच्या काही नाहीये रे ही

Dineshvs
Thursday, July 20, 2006 - 11:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद कविता म्हणुन छानच आहे.
पण मुंबईकराला शूर म्हणण्यापेक्षा, अगतिक म्हणणे जास्त योग्य ठरेल.
एक दिवस काम केले नाही तर, जेवायला मिळणार नाही अशी परिस्थिती आहे ईथे अनेकजणांची.
त्यामुळी काहिहि होवो, त्याला कामाची ठिकाणी धाव घ्यावीच लागते.


Bhramar_vihar
Friday, July 21, 2006 - 12:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद छान आणि दिनेशला अनुमोदन!

Prasad_shir
Friday, July 21, 2006 - 3:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी

आपल्या अभिप्रायांबद्दल मनपूर्वक धन्यवाद!

दिनेश, तुम्ही म्हणताय ते कदाचित खरं असावं... मात्र आम्हा 'निवांत' शहरातल्या लोकांना मुंबईकरांचं नेहमीच कौतुक वाटतं!


Sumati_wankhede
Friday, July 21, 2006 - 3:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद,
छानच लिहिली आहेस कविता.


Prasad_shir
Friday, July 21, 2006 - 5:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रेमाचा रिंगटोन!

माझ्या आठवणींनी तुझं हृदय
व्हायब्रेट होत राहू दे
तुझ्या हृदयात माझ्या प्रेमाचा
रिंगटोन वाजत राहू दे!

दूर सखे माझ्यापासून
गेलीस तरी चालेल
बरेच दिवस मला तू
भेटली नाहीस तरी चालेल
पण जाशील तिथे माझ्या आठवणींचं
नेटवर्क कव्हरेज असू दे!
तुझ्या हृदयात माझ्या प्रेमाचा
रिंगटोन वाजत राहू दे!

अन सखे एकटीच तू
निजशीलही कधी कधी
मी नसलेली उजाड स्वप्नं
बघशीलही कधी कधी
पण पापण्या उघडताच तुझ्या डोळ्यांत,
माझाच मिस्ड कॉल दिसू दे!
तुझ्या हृदयात माझ्या प्रेमाचा
रिंगटोन वाजत राहू दे!

दूर दूर राहून असं
थकुन जाशील तू सखे
वणवण सारी सारी करून
विझून जाशील तू सखे
अशावेळी मला भेटून
तुझी बटरी रीचार्ज होऊ दे!
तुझ्या हृदयात माझ्या प्रेमाचा
रिंगटोन वाजत राहू दे!

जमेल तसं प्रेम आपलं
कॉप अप करता यायला हवं
झीरो बलन्स झाला तरी
मोकळं बोलता यायला हवं
मोकळं बोलून, कॉप अप करून
प्रेम 'मोबाईल' राहू दे!
तुझ्या हृदयात माझ्या प्रेमाचा
रिंगटोन वाजत राहू दे!

- प्रसाद शिरगांवकर


(कॉपीपेस्ट व्यावसायिकांना विनंती, ही कविता स्वतच्या कष्टाने इतरांना पाठवण्यास माझी काही हरकत नाही, मात्र असं करताना मूळ कवीचं, म्हणजे माझं नाव कवितेखाली ठेवल्यास मी आपला आजन्म उपकृत राहीन)


Meenu
Friday, July 21, 2006 - 7:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा प्रसाद मस्तच कसं काय रे सुचतं तुला ..

Jyotip
Friday, July 21, 2006 - 7:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद दोन्ही कविता मस्त आहेत

Kandapohe
Friday, July 21, 2006 - 7:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद छानच! कॉल, टॉप असे लिही kOl, TOp :-)

Psg
Friday, July 21, 2006 - 7:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद, एकदम क्यूट कविता आहे! :-)

Vaibhav_joshi
Friday, July 21, 2006 - 8:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही रे प्रसाद ... इथे का पण ह्या दोन्ही ? तिकडे गोंधळ होता म्हणून का ?
:-)
शिफ्ट कर ना ...


Paragkan
Friday, July 21, 2006 - 12:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

jhakaas re prasad!

Chinnu
Friday, July 21, 2006 - 4:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण पापण्या उघडताच तुझ्या डोळ्यांत,
माझाच मिस्ड कॉल दिसू दे!

एकदम भन्नट रे प्रसाद. मज्जा आली! :-)




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators