|
Yog
| |
| Friday, July 21, 2006 - 4:57 pm: |
| 
|
मुक्ती "दोन घडीचा डाव याला जीवन ऐसे नाव!" एका थोर कवियत्रीचे हे शब्द अनेक प्रकारे मागे पुढे करून लिहीले वाचले तरी त्यातल तथ्य काही बदलत नाही. खर तर एका मिलिक्षणात जिथे जागतिक विक्रम घडतात मोडतात तर त्याच वेळी त्याच मिलिसेकन्दाला एखादा जीव जन्म घेतो अन दुसरा काळाआड निघून जातो या आपल्या रोजच्या चक्रात "दोन घडी" देखिल जास्ती वाटतात. तरिही सुखेनैव संसार करायची सामान्य माणसाची इच्छा सदैव त्याला वेगवेगळ्या सुख दुख्खाच्या फ़ेर्यात गोल गोल नाचवत असते. मला सान्गा मग मुक्ती, आत्मशुध्धी, मोक्ष, निर्वाण वगैरेची प्राप्ती सोडाच पण चर्चा करायला तरी वेळ आहे का? सकाळची सात तीस ची कर्जत फ़ास्ट किव्वा मुम्बई फ़ास्ट पकडायची अन त्यातून उतरलो कि "सुटलो" या अर्थाचीच मुक्ती कित्त्येक वर्षे आपल्यातील कित्येकाना ठावुक आहे. मुक्तीचा मार्ग सोपा नाही ती एक अविरत साधना वगैरे आहे असे काही सन्तजन सान्गून गेले तिथे "थाम्बला तो सम्पला" म्हणजे सुटला, मुक्त झाला अशी मुम्बईकराची तरी उलटीच व्याख्या आहे. अन या धावत्या जगात अचानक असा मुक्तीचा अनुभव आला की आपण दचकून जागे होतो अन इतके दिवस वाळीत घातलेल्या संवेदना पुन्हा शहार्याच्या रुपाने थोड्या ओल्या होतात, जिवन्त होतात. मुक्तीचा असा वेगळ्या अर्थाने हा याचीदेही याची डोळा अनुभव. "दादा" हे असेच एक वेगळे व्यक्तीमत्व. आमच्याकडे त्यान्ची येजा ही आमच्या लहान्पणापासूनच. त्यान्चे रहाणीमान,खाणे पिणे, विचारसारणी, एकन्दरीत परिवार, संस्कार हे सर्व इतक लोभस होत की दादा ब्राह्मण नाहीत हे तर्कबुध्धीला न पटणारं, अर्थात हे त्या काळातील. आजकाल तसही कुणाची कुठली जात पात असते, असावी याला कसलाच तर्क नसतो अन नसावाही. बालमनावर घडलेले अन रुजवले गेलेले ब्राह्मणी संस्कार अन त्या अनुशन्गाने अपोआप स्विकारल्या गेलेल्या तत्वाना दादान्च्या माध्यमातून डोळसपणे बघायची सन्धी लाभली किव्वा तशी सुरुवात त्यान्च्या भेटीनन्तर झाली असे म्हटले तरी वावगे ठरू नये. तस तर दादान्ची बेताचीच नोकरी पण मोठा संसार. कधिही कुणाचा एक पैसाही चुकूनही न घेणारे दादा अन त्याच संस्कारात वाढलेल त्यान्च कुटुम्ब यान्च्यावर मग या पैशापासरी जगात अनेक प्रकारची सन्कटे अडी अडचणी नाहि आल्या तरच नवल. पण त्याही सर्वातून त्यान्नी स्वताची अस्मिता कधी सोडली नाही. बहुदा हेच कारण असाव की "त्या एका जागेवर तू आपल्या गुरुन्च मन्दीर बान्ध" अशी आशिर्वादवजा सूचना त्यान्ना त्यान्च्या गुरूपरम्परेतील सद्य आचार्यान्कडून प्राप्त झाली. अन दादा कामाला लागले सुध्धा. स्वताचे सहा जणान्चे कुटुम्ब छोट्याश्या दोन खोल्यात रहात असताना, पावसाळ्यात पत्र्याच्या भगदाडातून घरात पाणि गळत असताना, तर उन्हाळ्यात त्याच पत्र्यातून आगीचे डोम्ब उसळत असताना, कधी रात्रपाळी, कधी पहाटपाळी अशी शिफ़्ट चि नोकरी करताना, अन आलेल्या पाहुण्याला आगत्य, सत्कार, अन्नदान याने तृप्त करताना हमखास कुटुम्बाच्या पोटाला चिमटा बसताना, हे असे मन्दिर बान्धायचे काम एखादा वेडापीर च करू शकेल. जिथे बॅन्केत फ़िक्स डिपॉझीट करायचे तर सहा सहा महिने बचत करावी लागत होती तिथे असे पन्नास लाखाचे मन्दीर बान्धणे हे कुणी स्वप्नातही पाहिले नसते. पण गुरूची आज्ञा शिरसावज्ञ मानून दादानी काम सुरू केले. मन्दीराची जमिन हि पूर्वीच्या स्मशानभूमीचा भाग आहे एव्हडेच काय ते त्याना खटकत होते. "मन्दीर बान्ध", असे सान्गणार्या आपल्या आचार्याना त्यानी आपली तगमग बोलून दाखवली, त्यावर आचार्य फ़क्त स्मित हास्य करून म्हणले, "ती जागा तर मूळची मन्दीराचीच आहे, तेव्हा निश्चिन्त हो अन कामाला लाग.." दादान्साठी तेव्हडे शब्द पुरेसे होते तरिही लौकिक अर्थाने एक भक्कम पुरावा हाती सापडला तेव्हा अख्खा गाव गारद झाला. मन्दीराचे खोदकाम करताना जवळ जवळ तीस फ़ूट जमिनीखाली एक अत्त्यन्त पुरातन अशी गरूडस्वार भगवान विष्णून्ची मूर्ती सापडली अन त्या मूर्तीच्या सापड्ण्याच्या आनन्दापेक्षा आपल्या गुरूच्या शब्दावर आपण नकळत शन्का घेतली (कारण अलिकडे जमिन स्मशानभूमिची होती) या भावनावेगाने त्यान्च्या डोळ्यात पाणी आले. पुरातत्व खात्यातील अधिकार्याकडून मूर्तीची माहिती, खातरजमा करून घेताना फ़ार पूर्वी म्हणजे कदाचित अनेक शतके अगोदर तिथे एखादे भगवान विष्णूचे मन्दीर असावे या निश्चीत विश्वासाने भारावून गेलेल्या सर्वानी मग वाजतगाजत मूर्तीची पूजा केली तेव्हाच मन्दीराच्या पायाभरणीचा नारळही फ़ुटला. काम जोरात सुरू झाले, अन दादान्चे अख्खे कुटुम्ब त्यात जुम्पले होते. एका मुलाने सर्व हिशेबाचे काम बघितले, दुसरा चोवीस तास बान्धकामाच्या देखरेखीवर, मुलगी काय कमी जास्त होतय याकडे लक्ष ठेवून,हे सर्व पुन्हा मुले शाळा अभ्यास सम्भाळून करत होती, त्यान्ची पत्नी येणार्या जाणार्या प्रत्त्येकाचे आदरातिथ्य, काय लागते नाही, कुठे काय कमी पडले ते बघण्यत गुन्ग अन स्वतः दादा, दगड माती, चिखल पासून ते मार्बल च्या कटीन्ग पर्यन्त सर्व कामात जातीने लक्ष घालत होते. घरातील सोन, नाण, दागिने सर्व वेळेप्रसन्गी मोडीत काढल, मित्र, आप्त, हितचिन्तक, गुरूबन्धू यान्च्याकडून कधी कर्ज तर कधी मदत घेत घेत काम सुरू राहिल. दाद म्हणत, "अवो सर्व "त्यान्चच" हाय, मग मि कशाला चिन्ता करू, तेच काम करवून घेतील.." उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कशा कशाने ते थाम्बले नाहीत. इतक करूनही कधी कसलिही चिडचीड नाही की वैफ़ल्य नाही. पुन्हा हे सर्व करताना दोन वेळची ठरलेली प्रार्थना, नियम, ध्यानधारणा कधी सुटले नाही. आमची आई म्हणत असे, वाल्याचा वाल्मिकी झालेला आपण ऐकतो पण इथे साक्षात एका कम्पनीत सुपरवायसर म्हणून काम करणार्या सामान्य माणसाचा एक असामान्य सन्त होताना पहायला मिळाले हेच आमचे भाग्य. दादान्चा अन आमच्या कुटुम्बाचा फ़ार जिव्हाळा. मन्दीराच बान्धकाम चालू असताना दर वेळी आठवणीने मला कळवायचे. "बाबा तू सिव्हिल एन्जीनियर आहेस बघ काही चुकत तर नाहिये ना प्लॅन मधे वगैरे.." इतक्या लाम्ब परदेशात बसून सुध्धा दादान्च्या त्या मन्दिराच्या बान्धकामात आपली नकळत मदत होत आहे याचा आनन्द होता तर त्याचवेळी प्रत्त्यक्षात तिथे जावून मदत करु शकत नाही याच दुख्ख! प्रत्त्येक भेटीत दादा हात धरून सर्व काम दाखवत असत. कौतूकाने कुठे काय कस बान्धल, बनवल ते सान्गत काही प्रश्ण विचारत अन त्यान्च्या बरोबरचा तो सहवास अनुभवताना "भरून पावलो" असे एक अन्तरीक समाधान मिळायचे. मन्दीराच बान्धकाम चालू असताना रोज समोरची एक म्हातारी आजी येवून दहा मिनीटे सर्व बघत बसायची अन मग आपल्या मार्गी निघून जायची. कोण होती ही आजी? तर मन्दीराच्या जवळ लागून असलेल्या जमिनीवर एका फ़ुटकळ झोपडीत राहणारी भिकारीण. दिवसभर गावभर अन्न मागत फ़िरायची, कधी कचरा उचल कधी पिशव्या गोळा कर, उकीरडा साफ़ कर, करत करत आयुष्य ढकलत होती. जवळ जवळ सत्तर ऐशी वर्शाची जक्खड म्हातारी असेल पण सगळीकडे वणवण भटकायची, अन्गावर तेच ते जुने मळके फ़ाटके कपडे, शरीराच्या काड्या झालेल्या, डोळे खोबणीत गेलेले, दोन वेळचे जेवण काय सकाळच्या चहाची वानवा..तरिही जगत होती. खर तर म्हातारी जगते कशी याच दादाना अन अख्ख्या गावाला कुतुहल. मन्दीराच बान्धकाम चालू झाल अन म्हातारी रोज येवून उभी रहू लागली. मग दादानी तीला सकाळचा चहा, कधी दोन वेळच जेवण देण सुरू केल त्या बदल्यात कधी ती झाडू मारून जायची तर कधी नुसतीच एकटिशी बडबडत बसायची. "म्हातारे तू कशाला इतकी हिन्डती, गप रहा पडून झोपडीत, मी देतोय ना खायला प्यायला", दादा तिला समजवायचे. त्यावर, "तो येत नाही न्ह्यायला तोवर चालत रहाते बाबा" म्हणत निघून जायची. "तो" म्हणजे म्रुत्त्यू. रोग व्याधीनी ग्रस्त, नावाला हाडामासाची उरलेली म्हातारी अन तीचे हाल दादाना काय कुणालाच बघवत नव्हते. आताशा अशी वेळ येवून ठेपली होती की म्हातारी मेली तर सुटेल असे दादा म्हणत असत.. मन्दीराच बान्धकाम सुरू होत, दुसर्या मजल्याचा स्लॅब पडायच बाकी होत अन दादान्कडील रसद सम्पली. इतके दिवस सर्वान्कडून छोटी मोठी मदत घेता घेता पुन्हा त्या लोकाना पैशासाठी त्रास द्यायचा हे काही दादाना पटेना. घरातील सर्व होत ते विकून देखील पुरे पडणार नव्हत. मटेरियल चा ट्रक दारात उभा होता पण मजुरी द्यायला अन पुढील कामासाठी हातात एकही पैसा शिल्लक नाही अशा हताश अवस्थेत दादा एकटेच त्या मन्दीराच्या समोर खुर्चीवर विचारमग्न बसले होते. तितक्यात नेहेमीप्रमाणे म्हातारी आली. "काय बाबा असा का बसलायस...?" त्या क्षणी कुणाशी तरी मन हलक कराव इतकीच दादान्ची इच्छा होती. म्हातारी काय मदत करणार होती? तरी पण न राहून दादा बोलले, "म्हातारे, काम अडून राहिलय, पैसे सम्पले, अन गुरूच मन्दिर पुर होईल का न्हाई म्हणून मन बेचैन हाये बघ...." दादान्च्या डोळ्यातून ओसन्डणारी ती चिन्ता अन तगमग बघून म्हातारी एकदम चटकन उठली म्हणली, "थाम्ब जरा येते मि." थोड्या वेळाने म्हातारी परत आली, बुगडीला खोचलेला रुमाल उघडला अन तो दादान्पुढे पसरत म्हणली, "हे दिवसभर भिक मागून पैसे जमा केलेत ते तू घेवून टाक बाबा मला त्याचा काय बी उपयोग नाही..." ती चिल्लर तीने दादान्च्या हातावर ठेवली अन भावनावेगाने त्यानी चक्क तीचे पाय धरले. म्हणले, "म्हातारे तुझे हक्काचे पैसे कसे घेवू? तुला दोन वेळच मिळत नाही, मला पाप लागेल..." त्यावर म्हातारी डोळे पुसत म्हणली, "बाबा आज पहिल्यान्दा अस दान करायची सन्धी मिळाली आहे नाही म्हणू नको... तुझ्या मन्दीराला येव्हडाच माझा खारीचा वाटा बघ" म्हणून म्हातारी निघून सुध्धा गेली. दादा कितीतरी वेळ तिच्या पाठमोर्या आकृतीकडे फ़क्त बघत बसले. त्या तिच्या धैर्याने अन कृतीने त्याना काय बळ आल कुणास ठावुक, ताडकन उठले अन कामाला लागले. त्या तेव्हड्याश्या चिल्लर ने त्याना एखादा महाकाय पर्वत हलवायच बळ दिल जणू. पुन्हा एकदा रसद जमली, यन्त्रे सुरू झाली, बघता बघता मन्दीराच काम धडाक्यात सुरू झाल. शेवटची स्लॅब पडली अन दादान्च्या पोराने निरोप आणला, "दादा, म्हातारी गेली !" बेवारस भिकार्याच आयुष्य जगलेल्या म्हातारीच्या अन्त्यक्रीयेला गाव जमला, अन कुणी कुतुहलाने तर कुणी आश्चर्याने, तर कुणी हळहळत म्हातारीला निरोप दिला. हा सर्व प्रसन्ग मला सान्गताना दादान्चे डोळे भरून वाहू लागले, म्हणले, "तुला सान्गतो बघ, मृत्त्यू येत नाही म्हणून कीळस येणार आयुष्य पण ढकलणारी म्हातारी मन्दीराला दान दीलं अन सुटली, नव्हे मुक्त झाली. आपल्या गुरून्चीच इच्छा बघ, तिला या संसारचक्रातून सोडवली, पण म्हातारी जाता जाता परमार्थ शिकवून गेली." मि काय बोलणार होतो? माझ्या डोळ्यासमोर प्रत्त्यक्ष उभे होते, सर्व सत्ता, सम्पत्ती, लालसा, मोह माया, या सर्वातून मुक्त झालेले, मन्दीरासाठी अन इतर लोकान्साठी झटणारे जिवन्त दादा अन जाता जाता त्यानाही मुक्तीचा मार्ग शिकवणारी पन्चतत्वात विलीन झालेली म्हातारी. - योग (गत गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अशा अनेकान्च्या गुरुश्रध्धेला प्रणाम!)
|
Abhi_
| |
| Saturday, July 22, 2006 - 12:19 am: |
| 
|
योग, नेहमीप्रमाणेच सुंदर लिखाण.
|
Deemdu
| |
| Saturday, July 22, 2006 - 4:07 am: |
| 
|
.. .. .. ..
|
Dineshvs
| |
| Saturday, July 22, 2006 - 1:13 pm: |
| 
|
असा मोह त्यागणे खरोखरीच कठीण असते. ते जमले कि मग येणे, जाणे कसले ?
|
Moodi
| |
| Saturday, July 22, 2006 - 3:24 pm: |
| 
|
जाताना त्या आजीबाई डोळ्यात त्यागाचे काजळ घालुन गेल्या. मुक्ती नव्हे तर परमेश्वराच्या अन अनेकांच्या मनात कायमचे स्थान मिळवून गेल्या त्या.
|
योग, नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर लेख.
|
Gr8 उत्कृष्ट शब्दचित्र! उत्क्रुष्ट आशय! 
|
ग्रेट. म्हातारी खुप शिकवुन जाते.
|
Abcd
| |
| Tuesday, July 25, 2006 - 2:40 pm: |
| 
|
Yog, Well written!!! The only thing comes to my mind is how I can help more to people like "mhatari" "dada" sitting miles away ..... Its like we chasing after BMW Merc and some people looking fwd to just having a good meal....
|
Ninavi
| |
| Tuesday, July 25, 2006 - 2:43 pm: |
| 
|
सुंदर लिहीलंयस रे योग.
|
Chinnu
| |
| Tuesday, July 25, 2006 - 6:02 pm: |
| 
|
योग, खुप छान वाटलं वाचुन. फार सुंदर लिहिलस.
|
|
|