Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 20, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » आषाढ » काव्यधारा » कविता » Archive through July 20, 2006 « Previous Next »

Meenu
Thursday, July 20, 2006 - 3:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भगवा तसाच हिरवा, दोन्हींविणा न शोभा
झेंड्यास सोडुनी मग रंगांस का सलामी ?
वाह क्या बात है ..
वा वैभव सलामी मस्तच ...


Lampan
Thursday, July 20, 2006 - 4:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बोहोत अच्छे !! मजा आ गया ..

Meenu
Thursday, July 20, 2006 - 4:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माळ

हर एक नवा श्वास हा सवाल टाकतो
खर्चलेल्या श्वासाचा हिसाब मागतो
गेला पळ नफ्याचा की तोट्याचा ..?
विचारात मी रात्र रात्र जागतो
आयुष्याची माळ पुढे पुढेच चालली
सरली कीती ..? कधी ..? पळे न मी मोजली
ठरवतो पुनपुन्हा हाच एक खरा तो पळ
नको गेलेल्या क्षणांचा कुरवाळणे वळ
तुटणारच ही जपमाळ कधीतरी
विखुरलेले दिसु देत मोतीच परी


Devdattag
Thursday, July 20, 2006 - 5:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, मीनु उत्तम
हतबल
पुसले वाळूवरचे पाय
हरवली मंगल नक्षी
उडतांना साथ नभाची
देण्यास थांबला पक्षी

विझणार केशरी बिंब
जळणार रात्र जराशी
शर्यत लावून चांदवा
मग हरणार तारकांशी

ती कल्पवृक्षाची फांदी
गळून का पडणार आता
अन घेउन रित्या ओंजळी
घरोघरी फिरणार दाता
-देवदत्त


Sarang23
Thursday, July 20, 2006 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवा! लई खास रे!!!
देवा
short but sweet!

Vaibhav_joshi
Thursday, July 20, 2006 - 8:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद ...

मीनू ... जपमाळ सही ....
देवा .... प्रत्येक कडव्याचा शेवट सुंदर . मस्त !!!


Ninavi
Thursday, July 20, 2006 - 9:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू, जपमाळ खूप आवडली.
वैभव, चांगली आहे गज़ल.

देवा, मला कळली नाही रे. कोण दाता?


Vaibhav_joshi
Thursday, July 20, 2006 - 9:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ल गा गा गा ... ल गा गा गा ...
अश्या मीटरमधली एक गझल टाकतोय .. कानाला अतिशय गोड लागणार्‍या ह्या मीटर मध्ये मी जास्त लिहीत नाही अशी बर्‍याच जणांची तक्रार होती ... अर्थात तसं सुचायलाही " पोषक " वातावरण हवं म्हणा ... नुसतं मीटर हातात घेऊन बसण्याने काय होणार ... थोडक्यात सांगायला ह्याच वृत्तातल्या गीताच्या दोन ओळी पुरेशा आहेत

कळा ज्या लागल्या जीवा कुणाला काय हो त्याचे
कुणाला काय सांगावे , कळा ज्या लागल्या जीवा


निष्कर्ष ............



तुझ्यालेखी जरी होते , उगाचच भेटणे घडले
पुसावे त्यास तू ज्याला , जिण्याचे अर्थ सापडले

तुझे आरोप ते सारे म्हणे की ठाम होते, ना ?
खर्‍या मौनापुढेसुध्दा कशाला प्रश्न गडबडले ?

वसंताला मुभा कोठे, अवेळी यायला वेडे
कशाला दोष द्या त्याला ! तुझे फुलणे तुला नडले

कसे आकाश हे विरळे सदा कोजागिरी येथे
कुण्याकाळी इथे होते तुझे का चांदणे पडले ?

कितीदा पाहणे झाले मुखवटे निरखुनी सारे
मला कळलेच नाही की जगाला काय आवडले

मनाच्या वागण्याचा मी कसा निष्कर्ष काढावा
कधी हसल्याविना हसले, कधी रडल्याविना रडले

तुझ्या कुठल्याच लाटांनी कधीही स्पर्श ना केला
असे जगणे किनार्‍याचे मला नाहीच परवडले

पुन्हा गल्लीत आला पण पुन्हा गेला निघुन मृत्यू
पुन्हा चुकलाच ना पत्ता ! पुन्हा काळीज चरफडले


Chinnu
Thursday, July 20, 2006 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>पुन्हा गल्लीत आला पण पुन्हा गेला निघुन मृत्यू
पुन्हा चुकलाच ना पत्ता ! पुन्हा काळीज चरफडले

Excellent! जियो वैभवा जियो!


>>विझणार केशरी बिंब
जळणार रात्र जराशी
शर्यत लावून चांदवा
मग हरणार तारकांशी

क्या बात है देवा, मस्त! पण मला शेवट नाही रे कळाला. रित्या ओंजळी?

>>नको गेलेल्या क्षणांचा कुरवाळणे वळ

मीनु, तुझ्या कवितेतील काही काही ओळी खुपच खास असतात! छान कविता.

Ninavi
Thursday, July 20, 2006 - 9:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अप्रतीम, वैभव!!
सगळेच शेर. पुन्हा पुन्हा वाचत्ये.


अगदीच रहावत नाही म्हणून एक आगाऊपणा करू का?
त्या गाण्याचे बोल
कळा ज्या लागल्या जीवा.. मला की ईश्वरा ठाव्या
कुणाला काय हो त्यांचे.. कुणाला काय सांगाव्या..
असे आहेत.


Sarang23
Thursday, July 20, 2006 - 9:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, मीटर perfect आहे. मात्रा वृत्तातली गझल छान आहे!

Vaibhav_joshi
Thursday, July 20, 2006 - 10:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा हा हा ... असं झालं का ? पण हे बोल पण बरे आहेत नाही ? लिहून टाकावे एक अशी
:-)


Pkarandikar50
Thursday, July 20, 2006 - 11:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Deva, Vaibhav,
मस्त!
-बापू



Pkarandikar50
Thursday, July 20, 2006 - 12:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी, दोन-चार दिवसात इथे यायला जमले नव्हते, आता कळले की केव्हढे रामायाण घडून गेले. त्यात भर घालण्याची माझी अजिबात इत्छा नहीये. फक्त एकच इत्छा.. नेहमीप्रमाणे सुप्रियाच्या छान-छान कविता इथे वाचायला मिळाव्यात...
Vaibhava,
तुझ्या अल्ल्ख निरंजनच्या पहिल्या कडव्याबद्दल.. माझं मत मी नोन्दवलं पण स्पष्ट केलं नाही. अरे, वात्सल्याची शीतल छाया, ह्रुदयांच्या गावोगावी मृगजळ शोधणे, ओंजळभर अश्रू पिणे हे थोडसं direct and obvious वाटलं मला, एव्हढंच. बाकी सगळी कविता इतकी अर्थगर्भ असताना आणि इतक्या सुन्दर, सूचक प्रतिमा त्यात उतरल्या असताना, फक्त पहिल्याच कडव्यात जरा गुळगुळीत प्रतिमा आल्या, असं मला वाटून गेलं. असो.
-बापू.




Lopamudraa
Thursday, July 20, 2006 - 12:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु.. माळ अप्रतिम......... खुप आवडली..
देवाची हतबल पण सुरेख आहे..
वैभव as usual .. सुंदर!!!


Meenu
Thursday, July 20, 2006 - 1:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद वैभव, निनावी, देवा, चिनु,लोपा

काही माझ्या मावशीच्या कवीता post करणार आहे अधुन मधुन ही पहीली

काही जरी म्हणाले मी तु रोष का धरावा ..?
शब्दास अर्थ नसतो हा शोध तु करावा
पाण्यास रंग नसतो आभाळही भास नुसता
का भान तव सुटावे जाता उडुन कागा
होकार वा नकार होतात अर्थहीन
समजुन घ्यायचे रे सोडुन सर्व क्षीण
नव्हता नकार माझा भवताल तु स्मरावा
शब्दास अर्थ नसतो हा शोध तु करावा

- मेधा पाठक
कवियत्रीची थोडक्यात background
जी तरुणपणीच heart च्या त्रासानी देवाघरी गेली, graduation चा result हाती येण्याआधी. आणि जिला हे माहीत होतं की ती फार दिवसांची सोबती नाहीये. मी शाळेत असताना माझी ही मावशी गेली मला वाटतं 70s मधे कधीतरी. तर त्या वेळचा काळही लक्षात घ्यावा लागेल.



Chinnu
Thursday, July 20, 2006 - 1:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>पाण्यास रंग नसतो आभाळही भास नुसता
का भान तव सुटावे जाता उडुन कागा
होकार वा नकार होतात अर्थहीन
समजुन घ्यायचे रे सोडुन सर्व क्षीण

खुपच छान आहेत या ओळी, मीनु. धन्यवाद!

Ameyadeshpande
Thursday, July 20, 2006 - 1:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव आठवड्याभरानी परत आल्यावर अगदी बहरून राहिल्या आहेत कविता...सलामी, निष्कर्ष... खरच परत परत वाचत बसतो ऑफ़िसमधे.

देवदत्त आणि सारंग, तुमच्या कविताही नेहमीच्या अंदाजाला शोभणार्‍या...
मीनू माळेचे मणी मस्त आहेत आणि तुझ्या मावशीची कविता ही आवडली.

चिन्नूची (चिरफ़ाडलेली) कविता ही वेगळी आहे :-)
मृद्गंधा, पुढच्या कवितेची वाट पाहतो आहे.


Vaibhav_joshi
Thursday, July 20, 2006 - 2:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापू
perfect observation
हो त्या नेहेमीच्याच प्रतिमा आहेत. मला आत्ता कळलं तुम्हाला काय म्हणायचं होतं ते ... असंच लक्ष राहू द्या

धन्यवाद दोस्तांनो


Chinnu
Thursday, July 20, 2006 - 4:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय तुला तुझ्या ' वेगळ्या ' प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! :-)




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators