|
Giriraj
| |
| Wednesday, July 19, 2006 - 11:30 am: |
| 
|
मॉड्स,हे सगळ्म लिखाण विनोदाच्या BB वर हलवा पाहू... <मला ओळखणार्या " मित्रांपैकी " एकही न पुढे यावा ह्यातच अपयश लपलेलं आहे .>>>> काय रे बाबा वैभवा,तू असे म्हणायच्या आधीच माझे फोन बंद का नाही पडले.. माझे net connection down कसे नाही झाले?
मृदगंधा,माफ़ी वगैरेची गरज नाही.. .. आपण सगळेच इथे समान आहोत... त्यामुळे मला 'मैने प्यार किया' चित्रपटातिल एक जगप्रसिद्ध वाक्य उद्धृत करावेसे वाटतेय " मायबोली पे नो सॉरी नो थँक्यू " जय हिन्द!
|
Meenu
| |
| Wednesday, July 19, 2006 - 11:48 am: |
| 
|
मॉड्स,हे सगळ्म लिखाण विनोदाच्या BB वर हलवा पाहू... >> हो माझ्या कवितेवर चर्चा करा म्हणलं म्हणुन कारे गीरी ..? कळतात हो असली बोलणी ... वैभव तु ते काय गझल का काय लिहीलस ते बरय ...
|
Chinnu
| |
| Wednesday, July 19, 2006 - 11:56 am: |
| 
|
मीनु, लोपा, निनावी ही घ्या माझी archive मध्ये गेलेली बिचारी कविता. करा बरं जिवंत असलेल्यान्नी चर्चा सुरु! म्हणजे मलापण थोडफार कळेल. . लोकहो, माझ्या कवितेत एक शब्द कपाटी असा आहे, तो देव्हारी म्हणुन वाचावा. मी ते कपारी लिहितांना केलेली चुक आहे. आता बदल करता येत नाहिये. तेव्हा गोड मानुन घ्या! /hitguj/messages/75/112184.html?1152162895
|
Chinnu
| |
| Wednesday, July 19, 2006 - 11:58 am: |
| 
|
>>मायबोली पे नो सॉरी नो थँक्यू " गिरीभाउ, त्या अंताक्षरीवर पोस्टुन पोस्टुन असं झालं वाटते तुझं. पुरे आता फिल्मी दुनियेतुन बाहेर येवुन एक छानपैकी कविता पोस्टा बरं इथे.
|
Divya
| |
| Wednesday, July 19, 2006 - 12:32 pm: |
| 
|
इथे मृदगंधा आणि वैभवचे लिखाण वाचले. मृदगंधा तुला तुझी चुक समजुन आली हे चांगले झाले पण तरी प्रश्न पडला एखाद्या कलेची निर्मीती मग ती कविता असु देत किंवा चित्र असु देत किंवा गाण, त्याच्या वाह वाह करण्यात किंवा त्यावर दुनियेच्या प्रतिक्रीया काय आहेत यावरच कलाकाराचा आनंद अवलंबुन आहे का? त्याच्या निर्मीतीतला आनंद जो तुमच्या मनाला जाउन भिडतो तो जास्त महत्वाचा. मला वैभवच्या कविता मनापासुन आवडतात त्यात शब्द सुद्धा एखादी गाण्याची मैफ़ल असल्यासारखे असतात, गुणगुणायला लावणारे असतात. शेवटी कलाकारान हळव असु नये संवेदनाक्षम जरुर असाव. वैभवच्या कवितांमधे ती संवेदनाक्षमता नक्किच जाणवते, त्यात त्या समीक्षक आयडीला उद्देशुन केलेली कविता आठवते. हळव असण सुद्धा दोष नाही पण भावनेच्या आहारी जाणे, सारासार विचार न करता एकदम कुठल्याही निर्णयावर येणे कितपत योग्य आहे अशा गोष्टीत नंतर sorry म्हणण्याला पण फ़ारसा अर्थ उरत नाही कारण चुक लक्षात आल्यावर त्याचाही स्वतालाच जास्त त्रास होण्याची शक्यता असते. इथे मला सगळ्यांच्याच कविता आवडतात पण तुझ्या पोस्ट वाचुन हे लिहावस वाटल
|
Ninavi
| |
| Wednesday, July 19, 2006 - 12:40 pm: |
| 
|
कविता बीबी वर एवढ्या गद्य पोस्ट्स? शोनाहो!! हां चिन्नू, ही घे वायद्यानुसार तुझ्या कवितेची चिरफाड चर्चा : >>> भरुन आले नभ विचारांची दाटी झाली >>> आठवांचे शब्द लेवुन भरजरी मनाच्या कपाटी अवतरली आठवांचे शब्द? आठवांचे ( भरजरी) शब्द लेवून विचारांची दाटी अवतरली? आठवणीतले शब्द म्हटल तर जास्त अर्थपूर्ण वाटेल अस मला वाटतं. आणि कपाटी शब्द रसभंग करतो असं मला वाटतं. >>> तु दिलेल्या खुणा पैंजण सावरीत होते >>> गुणगुणले मीही जराशी हातात तुझे गीत होते! पैंजणांना कसल्या खुणा देणार आणि कश्या? का पैंजण याच खुणा? मग तू दिलेले पैंजण असं का म्हटलं नाही? हातात गीत कुठून आलं? मनाच्या कपाटातून का? अंधारुन आलेही मग नर्तनात रत पाऊस होता छत्रीखालच्या ओंजळीत चिमुकला थेंब स्तब्ध निजला होता! हा बहुधा अश्रूचा थेंब असावा. पण तो निजलेला होता म्हणजे काय? ती वेडी धडधड हृदयाची अन स्पर्श तुझा ओला थेंबाथेंबात ओवुन घेत माझा पाऊस श्रीमंत झाला!! ही कल्पना चांगली आहे. एकूण सुरुवातीला आलेली कपाटाची प्रतिमा पुढे मधेच हरवली. तशीच पैंजण आणि नर्तनाची पण. अश्याने रसभंग होतो आणि काय म्हणायचंय ते नीट कळत नाही असं मला वाटतं. चिन्नू, हे विनोदाने लिहीलेलं नाही, आणि केवळ चुका काढायला वा दुखवायला तर नाहीच नाही. मला खरंच हे लिहिण्यामागची विचारप्रक्रिया समजावून घ्यायला आवडेल. माझा एकेक आक्षेप घेऊन खोडून काढलंस तर मला आवडेलच ते. मीनू, तुझी कुठली घ्यायची बोल. 
|
Chinnu
| |
| Wednesday, July 19, 2006 - 12:47 pm: |
| 
|
निनावी, चिरफाडीबद्दल अनेक धन्यवाद. तु मेसेज नीट वाचला नाहीस. मी ते कपाट नसुन देव्हारी हा शब्द योजला ग. पण आता मुळ पोस्टमध्ये बदल करता येत नाहिये. तुझ्या विषयीचे विचार आठव(आठवणी) घेवुन आलेत आणि त्या आठवणीच शब्दांचे रुप लेवुन मनाच्या देव्हारी अवतरली. हुश्श.. अस म्हणायचे होते मला तुझ्या शंका वाजवी आहेत. आणि त्या दुरुस्त करायला मला खात्रीने आवडेल(इतक्यात संपले नाही. आलेच!)
|
Chinnu
| |
| Wednesday, July 19, 2006 - 1:21 pm: |
| 
|
तु दिलेल्या खुणा.. इथे खरतर जखमा लिहीले होतं आधी, पण जखम आपण सकारात्मक घेत नाही म्हणुन खुणा असं म्हटले मी. असो. तर तु दिलेल्या हव्याहव्याश्या जखमा अगर खुणा अजुन पैंजण सावरत होते. या ओळीच्या अर्थासाठी नाचुन दमलेल्या नर्तकीचे पैंजण अथवा चाळ आवरणे किंवा सावरणे डोळ्यासमोर आणायला हवे आहे. एकुण उद्देश्य असा की तु दिलेल्या त्या हव्याहव्याश्या खुणा(त्यांची मैफील संपली असतांना देखील) अजुनही ताज्या आहेत!
|
Chinnu
| |
| Wednesday, July 19, 2006 - 2:02 pm: |
| 
|
अंधारुन आलेही मग नर्तनात रत पाऊस होता छत्रीखालच्या ओंजळीत चिमुकला थेंब स्तब्ध निजला होता! पहिल्या ओळीचा अर्थ सांगणे नलगे. जो आहे तोच अभिप्रेत आहे. छ्त्रीखालच्या खालच्या ओंजळीत.. पाउस पडतांना तुझी आठवण काढत काढत सहज हात पुढे केला. ओंजळीत आलेल्या त्या चिमुकल्या थेंबाला छत्रीखाली घेतले, न जाणो ओघळुन गेला तर! पण त्या थेंबाकडे पाहिले तर तो स्तब्ध निजला होता माझ्या ओंजळीत! तर असा हा थेंब अश्रुचा नसुन पावसाकडुनच चोरला आहे! त्या चिमुकल्या थेंबाला जसे मी सांभाळले ओंजळीत, तशाच तुझे माझे गुपीतही माझ्या मनाच्या ओंजळीत सुरक्षित आहे. (शांतपणे निजले आहे.)
|
Chinnu
| |
| Wednesday, July 19, 2006 - 2:07 pm: |
| 
|
>>> गुणगुणले मीही जराशी हातात तुझे गीत होते! हातातले गीत.. चा अर्थ मला काही ठरावीक असा अभिप्रेत नव्हता. It can be anything. कवितेची वही, त्यातील पान, एखादी खुण किंवा त्याच्याशी related कुठलीही मधुर प्रिय गोष्ट जिला त्याचे गीत म्हणता येईल.
|
Chinnu
| |
| Wednesday, July 19, 2006 - 2:13 pm: |
| 
|
>>एकूण सुरुवातीला आलेली कपाटाची प्रतिमा पुढे मधेच हरवली. या कवितेची मुळ सुरुवात आणि शेवट त्या सुंदर आठवणींमधेच गुंफ़ला आहे. मनाच्या दारी, देव्हारी अथवा कपारी, कपाटी ज्या आठवणी शब्दरुप लेवुन आल्या, त्या आठवणीच थेंबात ओवुन घेत माझा पाउस श्रीमंत झाला. ती वेडी धडधड हृदयाची अन स्पर्श तुझा ओला थेंबाथेंबात ओवुन घेत माझा पाऊस श्रीमंत झाला!! एकुण तुझ्या ह्या हव्याश्या खुणा, जखमा, आठवणींमुळेच मी आणि माझ्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट rich झाली आहे, श्रीमंत झाली आहे. (पाउस इथे just symbolic आहे)
|
Chinnu
| |
| Wednesday, July 19, 2006 - 2:20 pm: |
| 
|
>>चिन्नू, हे विनोदाने लिहीलेलं नाही, आणि केवळ चुका काढायला वा दुखवायला तर नाहीच नाही. मला खरंच हे लिहिण्यामागची विचारप्रक्रिया समजावून घ्यायला आवडेल. माझा एकेक आक्षेप घेऊन खोडून काढलंस तर मला आवडेलच ते. निनावी, मी जेव्हा वैभवला उद्देशुन पोस्टले, तेव्हा मला फ़क्त वातावरण हलके करावयाचे होते. तु खरोखरच माझी साधीसुधी कविता अशी उचलुन धरशील असे मला अजिबात वाटले नव्हते. वैभव आणि तु, इथे कवितेवर ज्या सकारात्मक चर्चेविषयी बोलत होतात, त्या चर्चेचा बहुमान माझ्याही कवितेला लाभला, हे तर सोन्याहुन पिवळे झाले म्हणायचे! अजुन काही शंका असतील तर नक्किच सांग. एका गोष्टीचा खेद वाटला कि हा जो अर्थ मी सांगितला त्याशिवाय अजुन वेगळे मत ऐकायला मिळाले असते तर छान झाले असते!
|
Ninavi
| |
| Wednesday, July 19, 2006 - 2:44 pm: |
| 
|
चिन्नू, कवितेचा तुला अभिप्रेत असलेला अर्थ ( न रागावता) समजावून सांगितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि साधीसुधी वगैरे काय? लिहीत रहा गं. शुभेच्छा. 
|
Chinnu
| |
| Wednesday, July 19, 2006 - 3:04 pm: |
| 
|
निनावी, त्यात रागाविण्यासारखं काय ग? उलट अशा चर्चा इथे नित्य घडायला हव्यात. शुभेच्छांबद्दल धन्यवाद.
|
Meenu
| |
| Thursday, July 20, 2006 - 12:33 am: |
| 
|
मीनू, तुझी कुठली घ्यायची बोल. >> घे गं कुठलीही तुला चिरफाड करायला बरी वाटेल अशी
|
ओ कविजन, आम्ही रसिक ईथे येतो ते तुमच्या कवितांचा आस्वाद घ्यायला. तुम्हच्या चर्चेसाठी वेगळ bb उघडा की!
|
Lampan
| |
| Thursday, July 20, 2006 - 1:14 am: |
| 
|
नाहीतर काय ! हां ह्या चर्चासुद्ध तुम्ही त्या ' सवाल जवाब ' type मध्ये करा मग चालेल
|
सलामी लाटांस पेटवुनी बसलेत पीर, स्वामी धर्मांध सागरातुन आली पुन्हा त्सुनामी सेनापती लपूनी रणशिंग फुंकणारे येती रणांगणी पण निष्पाप जीव कामी बोला तुम्ही बसूनी आता निवांत लेको सार्या तहांप्रमाणे ही बोलणी निकामी स्वातंत्र्य येऊनीही जगणे परावलंबी आम्हांस योग्य होती ती कालची गुलामी भगवा तसाच हिरवा, दोन्हींविणा न शोभा झेंड्यास सोडुनी मग रंगांस का सलामी ?
|
Giriraj
| |
| Thursday, July 20, 2006 - 2:40 am: |
| 
|
आहा वैभव!शेवटचा शेर खूपच आवडेश!
|
Aaftaab
| |
| Thursday, July 20, 2006 - 3:34 am: |
| 
|
ultimate, vaibhavaaa ... ...
|
|
|