पहिलाच प्रयत्न आहे सांभाळून घ्या बालगीत आज आमच्या बसमध्ये आला एक ससा जागा नाही म्हंटले तुम्ही मांडीवर बसा मऊ मऊ केस त्याचे पांढरा होता रंग हजार गाजरं खाण्याचा बांधला होता चंग मान थोडी ताठ करून आणि पिरगाळून मिशा रुबाबात विचारलं त्याने मी दिसतो सांगा कसा? नंतर म्हणाला आता आईस्क्रिम पाहिजे मला आंबा किंवा गाजराचं फ़्लेवर चालेल मला समजवण्यासाठी त्याला मग पुढे आला किशा बोलला खाऊन आईस्क्रीम तुझा दुखेल ना घसा बघ बाबा औषध तुला घ्यावे लागेल कडू इंजेक्क्षन बघुन मग तुला अजून येइल रडू डॉक्टराचं नाव ऐकून मग तो घाबरला असा टुणकन उडी मारुन बघा कसा पळाला ससा
|
Psg
| |
| Tuesday, June 27, 2006 - 2:46 am: |
| 
|
गोड आहे कविता! मुलाला शिकवते आता. कॉपीराईट आहे का रे?
|
mast aahe baal git.. devaa.. .. .. .. .
|
Mruda
| |
| Tuesday, June 27, 2006 - 3:27 am: |
| 
|
देवा.... गोऽड लिहीलं आहेस....
|
धन्यवाद लोकहो.. मीनुलाही याचे श्रेय आहे.. तिने सांगितलेल्या बदलांमूळेच ही कविता चांगली झाली आहे
|
Jayavi
| |
| Tuesday, June 27, 2006 - 5:57 am: |
| 
|
देवा, मस्तच रे, एकदम गोड !
|
Jo_s
| |
| Tuesday, June 27, 2006 - 6:20 am: |
| 
|
देवा तुझा ससा छान जमलाय असा की नेउन मुलांना दाखवावा जसा
|
Swara
| |
| Tuesday, June 27, 2006 - 2:44 pm: |
| 
|
मस्त आहे ही बालकविता.
|
Chinnu
| |
| Tuesday, June 27, 2006 - 4:19 pm: |
| 
|
देवा मस्तच आहे रे!
|
देवा, खरच छान! बालमासिकात दे ना रे.
|
Ninavi
| |
| Wednesday, June 28, 2006 - 12:43 am: |
| 
|
देवा, मस्त जमलंय बडबडगीत.
|
Jyotip
| |
| Wednesday, June 28, 2006 - 12:53 am: |
| 
|
देवा छान लिहिल आहेस... good job
|
Milya
| |
| Wednesday, June 28, 2006 - 1:20 am: |
| 
|
देवा एकदम गोड आहे रे बडबडगीत.... छान!!
|
Sarang23
| |
| Wednesday, June 28, 2006 - 3:54 am: |
| 
|
हे हे हे, सही आहे देवा
|
Gajanan1
| |
| Sunday, July 02, 2006 - 11:09 am: |
| 
|
देवा तुझी कविता वाचून मला मात्र वाईट वाटल मी डॉक्टर असल्याने एवढा सुन्दर ससा माझ्याजवळ येणार नाही का रे?
|
Zee
| |
| Sunday, July 02, 2006 - 2:56 pm: |
| 
|
देवा, छान कविता लिहीली आहेस... फ़ारच छान!
|
देवा, मस्तच कल्पना आणी कविताही.
|
Dineshvs
| |
| Wednesday, July 05, 2006 - 1:01 pm: |
| 
|
सुंदर कविता. अगदी सहज जुळुन आलेले शब्द.
|
धन्यवाद मंडळी.. ठिगळं देणे आहेत.. ठिगळं पाहिजेत का ठिगळं?? सगळ्या प्रकारची ठिगळं देणार ज्याला जसं पाहिजे तसं देणार ज्याला माहित आहे त्याला देणार ज्याला माहित नाही त्याला सांगणार ह्या ठिगळाची महती काय? हे ठिगळ लावल्याने माणसाला जे लपवायचं आहे ते लपणार जसं दिसायचं आहे तसं दिसणार आंधळ्याला डोळसपणाचं ठिगळ देणार बहिर्याला ऐकू येण्याचे ठिगळ देणार विद्यार्थ्याला गुणाचं ठिगळ देणार डॉक्टरला हातगुणाचं ठिगळ देणार प्रेमिकेला सज्जेचं ठिगळ देणार मल्लिकाला लज्जेचं ठिगळ देणार श्रोत्याला विचाराचं, नेत्याला सदाचाराचं ठिगळ देणार सरकारी नोकराला कामाचं, गरिबाला दामाचं ठिगळ देणार अनाथाला आपुलकीचं ठिगळ देणार माणसाला माणूसकीचं ठिगळ देणार ठिगळ पाहिजे का ठिगळ?? -देवदत्त
|
Meenu
| |
| Tuesday, July 18, 2006 - 1:58 am: |
| 
|
देवा हे जरा अवघडच दिसतय बुवा
|