Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 19, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » आषाढ » काव्यधारा » कविता » Archive through July 19, 2006 « Previous Next »

Devdattag
Wednesday, July 19, 2006 - 12:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मृदगंधा आवडली गं कविता..

हा सागर आहे सभोती
बोल त्यात उतरण्या डरतात
हे पहा उतरले भाव,
शब्द नाव बनवूनी तरतात

हात बोलून जाती शब्द
ते ओठांशी अबोला धरतात
मला अव्हेरून मुक्याने
या वेड्या कविला वरतात

हे शब्द ना एकटे जाती
ते भावही माझे नुरतात
भाव माझे कवितेपायी
परक्याशी सलगी करतात

मग जनही माझ्यासाठी
कोरडे उसासे भरतात
हा कवी की फकीर वेडा
ह्या लावून पैजा हरतात
-देवदत्त


Jyotip
Wednesday, July 19, 2006 - 1:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देव मस्त रे..
निनावी, मृ,मृदुगंधा,मीनु,लोपा,वैभव,सारंग,श्रध्दा..सही


Vaibhav_joshi
Wednesday, July 19, 2006 - 2:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभार दोस्तानो ...

बापू ... अलख निरंजन लिहीली गेली तेव्हा डोक्यावरचं छ्प्पर उडतंय की काय अशी वेळ आली होती ... ही फकिरीची सुरूवात तर नव्हे ना अश्या उद्विग्न मनःस्थितीत उतरली अलख निरंजन ... माझ्यामते त्याच्या फकिरीचा ( may be by birth ) प्लॅट्फॉर्म एस्टॅब्लिश करतं पहिलं कडवं ... पहिलं कडवं नसेल तर तो काय शोधत निघालाय हेच underline नाही होत ...
अर्थात तुमचाही काही विचार असणारच .. मला कृपया ते कडवं पसरट आणि गुळगुळीत च का वाटलं सांगाल का ?


मृद्गंधा ....
काही काही खूप चांगल्या शब्दांचा वापर केला असलास तरी मला काही शंका आहेत ....
म्हणजे माझ्या समजुतीनुसार मीलनाने सुरू झालेली कविता अचानक विरहात कशी काय उतरली हे नाही कळलं .. तसंच मुखचंद्र, चंद्र आणि चांदवा असा तीनवेळा उल्लेख आल्याने गोंधळ वाढलाय ...
म्हणून मग मी हा एक गझल लिहीण्याचा स्तुत्य प्रयत्न आहे असं ग्रुहित धरून बसलोय म्हणजे मग प्रत्येक कडवं ही एक वेगळी कविता समजली जाऊ शकते ... कृपया सांगणार का जरा ? कारण जर गझल असेल तर मला आणखी काही बोलायचय .... चु . भू . दे . घे .

देवा ... छान ...
सरळसरळ split personality वरची कविता वाटली तरी त्यासाठी एक कवी अन एक फकिरच का हे नाही कळले ...
म्हणजे हे एक साध्या माणसाच्या आत दडलेल्या कवीच्या बाबतीत रोजच होतं ना ?


Devdattag
Wednesday, July 19, 2006 - 2:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव.. मला शब्दांच्या दृष्टीने फकीर अभिप्रेत आहे..

Mrudgandha6
Wednesday, July 19, 2006 - 4:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद लोपा,निनावि,देवदत्त,ज्योति..

वैभव..
मी काही तुमच्यासरखी प्रतिभासंपन्न व्यक्ती नाही.. हे मी पुर्वीच कबूल केले आहे..तुम्ही ते वाचले नसणार..
आणि तुम्ही म्हणालात की मी चांगले शब्द वापरले..
मला आधीच हे सांगायला हवे..की
मी शब्द नाही वापरत..मी भावना उतरते ज्या जशा येतिल तश्या..मी भाषान्चे बन्धन मानत नाही... आणि छन्दांचेही..
कारण माझ्यामते भावनांची कुठलिःइ भाषा नसते..त्या स्वत.ःच एक भाषा असतात..

माझ्या कविताना कृपा करुन साहित्याच्या तराजुत तोलु नका..मी व्याकरणातही क्:पदर्थ आहे.. छन्दवृत्तचा मला गमभनही कळत नाही.
आणी माझ्या कवितान्वर गझलेची छाप असनारच मी हिन्दी गझल करते..त्यमूले ही इथली कविता गझल नाही परन्तु गझल मझ्या रक्तातच आहे त्यामुळे ति इथेही थोडि फ़ार उतरली असावी...
मिलन आणि विरह मझ्यासठि प्रेमाची बदलती रुपे आहेत..समुद्रात लाटा याव्यात आणि कधीहि त्यान्ची दिशा बदलावी तश्या माझ्या भावना बदलतात.
ते मिलन हे प्रत्यक्श practcal मिलन असेलच असे नाही..

असे म्हणतात की सीता 'राम राम करत स्वतच राम झाली होति...ते मीही अनुभवले अहे.. मी त्याल कधीही भेटु शकते करण हे द्वैतातले अद्वैत अहे..मी अनुभवले आहे..ते इतरांना कळणार नाही कदचित... अनि कधी कधी पुन्ह लौकिक जगतातला द्वैतभाव जागृत होतो अन विरह उतरतो.. कधी कधी असेही होते की समोर असुनही त्याच्यापसून दूर रहावे लागते.. कधी कधी प्रेमात तृप्त होवुनही अजुन तृष्ना वाढतच रहते... त्यामूळे असे वेगवेगळे भाव ऊतरले असावे..
तुम्हीच मज पामराला क्षमा करावी. मी चुक केली की या विद्वानांच्या सभेत येवून बसले इ थे कृत्रिम गंधची आखिवरेखीव फ़ूलेच जास्त आवडतात ऽस्सल पण गंधहीन रानफ़ूले नाही..
जहाल शब्द वाटले असतील हे..पण
मी स्पष्ट बोलते तुमची शन्का जर निष्पाप असती तर मी तीचे निरसन वेगळ्या भाशेत केले असते.मला तिच्यातून का कुनास ठावूक पण वेगळा गंध अला.

माझ्यावर बरपूर प्रेम करणार्या रसिकांआ मनापासुन धन्यवाद...
आता मला रजा द्यावी.. ही माझी इथिली इतीश्री आहे क्षमस्व!

..मृद्गंधा{सुप्रिया
}






Vaibhav_joshi
Wednesday, July 19, 2006 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओह !!!
सुप्रिया .. तुमचा भलताच गैरसमज झालेला दिसतोय .. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मी खरोखर तुमचं आधीचं लिखाण वाचलेलं नाहिये ... मला ज्या genuine शंका होत्या त्या मी तुम्हांला आणे देवदत्तला पण विचारल्या ... मला तुमच्या ह्या outburst चं कारणंच समजत नाहिये ..
तुम्हाला कल्पना नसेल की आधी इथे कवितांवर चर्चा व्हाय्ला हवी अशी चर्चा झाली होती .. आज वेळ होता ... समोर दोन कविता होत्या ... " लक्ष " देऊन वाचल्या आणि शंका विचारल्या .. ह्यात एवढ झोंबण्यासारखं काय आहे ? आपल्या कविता कुणीतरी वेळ देऊन वाचतंय .. समजून घ्यायचा प्रय्त्न करतंय ह्या सारखं समाधान नाही हो खर्‍या कवीला ..

इथे यायचं की नाही हा तुमचा प्रश्न आहे .. मी काही justification द्याय्ला हे लिहीण्याची तसदी घेत नाहिये .. मला एवढंच कळतं की its high time मायबोलीवर कवितांवर चर्चा व्हाय्ला हवी .. मला जोवर चांगलं म्हणतात तोवर मी आहे .. तू मला छान म्हण मी तुला म्हणेन .. अश्याने काहीच साध्य होणार नाहिये ...

जेव्हा आपण आपली कलाकृती सादर करण्यासाठी public forum निवडतो तेव्हा हे आलंच ना ? आणि प्रश्न विचारले म्हणजे वाईट असं असतं का ? मला गझल्बद्दल इथे बोलायचं होतं .. आताशा सारंग वगैरे पण दिसतात इथे ... चार गोष्टी पदरात पडतात ... काही चूक आहे का ?

छंद वृत्त म्हणजे कृत्रिमता असं सांगून का हसं करून घेताय ? बोरकर .. कुसुमाग्रज कळवळले असतील .. ही हिंदी काव्यातली परिभाषा आहे का ?
तुम्ही कसही लिहा हो .. पण हे का लिहीलं ह्याचं उत्तर प्रत्येक कवीकडे , लेखकाकडे तयार हवं ... कुणी विचारलं की द्यावसं वाटलं तर तेवढं उत्तर द्यावं .. आणि पुढच्या लिखाणाकडे वळावं ... हो ना ?

बघा विचार करून ...

जाता जाता ...

" चांगल्या शब्दांचा वापर केला " ...

हो ... माणूस लिहीताना थबकतोच .. suitable शब्द आहे की नाही ह्याचा विचार करतोच ... आणि त्यात काहीच गैर नाहिये ... कदाचित मी कबूल करत असेन तुम्ही करत नसाल इतकाच फरक पण creative लिखाणात पण हे process background ला घडतच असते ..
आणि बाय द वे त्या त्या वेळी आपलेच शब्द वापरतो ना आपण ?

माझं हे लिखाण्सुध्दा निष्पाप वाटेलच ह्याची खात्री आता उरलेली नाहिये .. कदाचित तुम्ही इथे नसाल्च हे वाचाय्ला .. पण मी हे सगळ्यांसाठीच लिहीलंय ... मी मागे म्हट्ल्याप्रमाणे व्यक्तीसापेक्षता सोडून माझ्या कविता वाट्टेल ते प्रश्न .. आक्षेप ... thought process मधल्या चुका .. अगदी कशावरही चर्चा करण्यांसाठी open आहेत कारण मला ठाम विश्वास आहे की त्यातूनच मला जरा जास्त समजणार आहे .. आणि ह्यापुढे जेव्हा वेळ असेल तेव्हा माझ्याकडूनही असे प्रश्न विचारण्याच पातक पुन्हा पुन्हा घडणार आहे ...



Mruda
Wednesday, July 19, 2006 - 5:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृदगंधा अगं काय झालं तुला? तुझ्या कवितांच केवढ कौतुक आहे गं सगळ्यांना..! आणि हे काय भलतच मनात आलय तुझ्या..? अशी मोकळी चर्चा ही किती सुंदर गोष्ट आहे गं....
अशी रागवु नकोस.... आणि लिहीत रहा इथे.... हाच तुला मैत्रिपूर्ण आग्रह आहे....


Chetan007
Wednesday, July 19, 2006 - 6:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मी चेतन पुण्याहुन...मृदगंधा तुझ्या कविता ख़ुप छान आहेत.

Limbutimbu
Wednesday, July 19, 2006 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> अशी मोकळी चर्चा ही किती सुंदर गोष्ट आहे गं.... :-)
अगदी अगदी!
मला वाटत की तिनी (मृदगन्धाने) अजुन V&C च्या बीबीन्ना भेट दिली नसावी! मग तिला फरक कळेल
DDD

Mrudgandha6
Wednesday, July 19, 2006 - 6:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव,
तुम्ही मझ्या म्हणण्यातील तात्पर्य समजला नाहीत मला healthy समिक्षा नेहमीच आवडते.
कुसुमाग्रज बोरकर कळवळले असतील? शक्यच नाहि.. कारण त्याना मझ्या म्हणन्यातील अर्थ नक्कीच कळला असेल.
छन्द वृत्तन मी कधीच कृत्रिम म्हणाले नाही... मला त्यांचे सौन्दर्य माहीत आहे आणि मला त्या साहित्याबद्दल अतिशय आदरही आहे.
तुमच्या चर्चा करण्याविषयीची चर्चा मी वाचली आहे. मझेही याबद्दल तुमच्यापेक्षा वेगळे विचार नाहीत mind it .

कारन्जे नियमबद्ध असते आणि त्याच्या नियमबद्धेतुनच खुप सौन्दर्य्पुर्न कृति निर्माण होते पण ओबड्धोबड धबधब्याचे सौन्दर्य सौन्दर्य नसते का? बरे हाही माझा प्रश्न नाही. माझा फ़क्त एव्ह्ढाच हेतु आहे की चर्चा ही कुणला कमी दखवण्यासाठि नसवि आज्काल हेच फ़ार होते.
मला छान म्हणा मी तुम्हाला म्हणते यावर मझाही विश्वास नाही. मला स्तुती तिही खोटि अजिबात अवडत नाही त्यामुळे मी असल्या स्तुती साठी इथे आलेली नाही.. मझे अतिशय दिव्य व्यक्तीकडुन आधीच कौतुक झाले आहे मला अता असल्या स्तुतीचि अजिबात गरज नाही.

तुमच्या चर्चा चालतात आनी " गुप्तसत्रही" हे मला माहीत आहे.. त्यात पुढे काय चालते याचा अन्दाजही आहे मला.
माझे म्हणने एव्हढेच आहे की नियम्बद्धेतेचा अट्टहास नको.. आधी भावनेच सौन्दर्य बघ..स्वतच्या निष्पाप healthy शन्का विचारा..सुचनाही द्या.
तुम्ही निरागस शन्का करण्याचे पातक नव्हे तर पुन्य पुन्हा पुन्हा करा पण त्याच्या गोन्डस नावाखाली एखाद्याची खिल्ली ऊडवण्याचे पाप मात्र करु नका.
तुमचा मला शन्का विचारण्यामगचा हेतु खरच निरपेक्श असेल तर मला आवडेलच हो पण मला त्याच्या बुरख्याखाली कुनी माझ्याच नव्हे तर इतर कुनाच्याही भावनाच अपमान केलेला अवडणार नाही..
इथ्हे बर्‍याच जणांआ हे माहीत असेल आणि त्याना कळलेही असेल मला नक्की काय म्हणायचे आहे ते.

इथे येन्Yआ जाण्यचा प्रश्न माझाच आहे.. the decision is mine.nobody has the strength to force someone to do something. and anybody doesnt worth to be the reason behind my action.

i apologize if i have hurt anybody`s feelings.

..मृद्गंधा



Mrudgandha6
Wednesday, July 19, 2006 - 6:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ता.क. माझेही वरील उत्तर हे व्यक्तिसापेक्ष नसुण कृतिंमागच्या काळ्या बाजूबद्दल विचारलेला प्रश्न आहे.कृतींबद्दल नाही.
..मृद्गंधा


Mrudgandha6
Wednesday, July 19, 2006 - 6:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mrudaa ,mokali charachaa sundarach asate. mala charchebaddal kahich mhanayache naahi..pan ti "mokalich asavi" ..hach majhaa muddaa ahe.


Vaibhav_joshi
Wednesday, July 19, 2006 - 7:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते काय " गुप्तसत्र " वगैरे तुमच्याकडूनच ऐकतोय पण असो ...
माझं intention असं असू शकत नाही ... हे सांगायला सुध्दा मला ओळखणार्‍या " मित्रांपैकी " एकही न पुढे यावा ह्यातच अपयश लपलेलं आहे ...

तुमचे सर्व आरोप पूर्ण मान्य सुप्रिया ...

I QUIT


Devdattag
Wednesday, July 19, 2006 - 7:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव.. तुला ओळखत असूनही मी इथे टाईप केलं नाही ह्याबद्दल खरंच क्षमस्व.. तुझं असं इंटेंशन असूच शकत नाही हे अगदी खरं.. पण कदाचित माझं इथे असं बोलणं आपण हमबीबी असल्याने उंदराला मांजर साक्ष असा प्रकारही वाटला असता कोणाला.. आणि मला ही चर्चा न रहाता वाद विवादाकडे झुकेल असे वाटल्याने मी इथे पोस्टलो नाही.. पण सुप्रियाजींना मेल करून तसे निश्चित सांगितले आहे..
परत एकदा क्षमस्व


Vaibhav_joshi
Wednesday, July 19, 2006 - 8:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

i know देवा .. but this is ridiculous एक प्रश्न विचारला आणि वाट्टेल ते ऐकून घेतलं ... म्हणूनच ह्या case मधून मी quit केलंय ...
मला इतकंच वाटून गेलं की हे चर्चा वगैरे ही सुरू करण्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे रे .. का लोकांना ह्याचं महत्त्व लक्षात येत नाही हेच कळत नाही मला ...

काहीतरी वाटतं गुलमोहोरबद्दल म्हणूनच धडपड ना .. दुसरं काय


Meenu
Wednesday, July 19, 2006 - 8:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे सांगायला सुध्दा मला ओळखणार्‍या " मित्रांपैकी " एकही न पुढे यावा ह्यातच अपयश लपलेलं आहे ... >> हा निष्कर्ष योग्य वाटत नाहीये वैभव. मी तरी आत्ताच हे वाचतीये म्हणुन माझं मत देतीये

मृदगंधा वैभवनी दुसर्‍या कुणाला कमीपणा दाखवण्यासाठी प्रश्न विचारल्याचा अनुभव मला तरी ईतक्या दिवसात आला नाही .. शक्य होईल तेव्हा चांगली input देण्याचा तो प्रयत्न करतो. त्यात स्वतःचा शहाणपणा सिद्ध करणे हा हेतु नसुन आपण सर्वांनीच एकमेकांच्या साथीने काही शिकावे ईतकाच हेतु असतो. ईथे सर्वच जण कविता आवडली नाही तर शक्यतो गप्प बसतात. तो तुझ्या कवितेबद्दल बोलला याचा अर्थ त्याला तुझ्या कवितेत चर्चा करण्यालायक काही content दिसला असं मला वाटतं

गुप्तसत्र वगैरे असतं असं मला तरी वाटत नाही. असलं तरी how does that affect you...?


Zaad
Wednesday, July 19, 2006 - 8:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, सारंग,देवदत्ता कविता खूपच सुंदर.
मृद्गंधा, "सुटुन पापण्यांच्या मिठीतून " कल्पना आवडली....

निनावी, हो. तक्रारच आहे. आणि ही तक्रार करणं पण किती फोल आहे! :-)


Nalini
Wednesday, July 19, 2006 - 8:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझं intention असं असू शकत नाही ... हे सांगायला सुध्दा मला ओळखणार्‍या " मित्रांपैकी " एकही न पुढे यावा ह्यातच अपयश लपलेलं आहे ...

तुमचे सर्व आरोप पूर्ण मान्य सुप्रिया ...

I QUIT >>>>


वैभव, हे चर्चासत्र ह्यापुढे सुरुच राहीले पाहिजे... ह्यातुन कवीच्या मनातली कविता आणखी जवळुन अनुभवायला मिळते. कविता जरी एक असेल तरी तिचा प्रत्येक जण आपल्यापरिने अर्थ लावत असतो हे आपले माझे मत.
जसं देवा म्हणतो त्याप्रमाणे चर्चेचे रुपांतर वादात होऊ नये म्हणुन तुमच्या मित्रांपैकी कोणी पुढे आले नसतिल.

म्रुदगंधा, मलाही हेच वाटते की वैभव कधीच कुणाला कमीपणा दाखवण्यासाठी प्रश्न विचारत नाही. आणि तु म्हणतेस तसे गुप्तसत्र वैगेरे काहिच नसत गं, काही नियमित गप्पा मारणार्‍यांना चर्चेसाठी विषय कमी पडले की ते ईतर बीबींवरचे विषय गोळा करुन त्यावर चर्चा करतात एवढेच.

तुझ्या कविता खरोखरीच छान असतात. येऊ देत आणखी..




Vaibhav_joshi
Wednesday, July 19, 2006 - 8:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुगंध ...

फुलांस सांगू नको तुला हा कसा निराळा ऋतू लाभला
उगाच चर्चा तुझी नि माझी, सुगंध कोणी कुणा वाटला

पहाटवेळी कळी तुझी ही जगावेगळ्या दवांत न्हाली
कणाकणाने वयात येता कसा अचानक देह धुंदला

वसंत चुंबावयास येता खुलून आल्या कश्या पाकळ्या
तरंग उठती पुन्हा पुन्हा अन मरंद सारा उतू चालला

फुलून आलीस रोमरोमी ऋतूस ओल्या मिठीत घेऊन
लपावयाला कुठे न जागा बहर शरीरामध्ये जागला

घडायचे ते घडून गेले उपाय नाही अता लाजुनी
कुणी तुझा तो सुगंध लुटला, जगास आता छडा लागला



Lopamudraa
Wednesday, July 19, 2006 - 8:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तरंग उठती पुन्हा पुन्हा अन मरंद सारा उतू चालला >>>>

वैभव नेहमिप्रमानेच छान आणि हे मकरंद असावे का?...

जाउदे मागे एक्दा तो समिक्षक आला होता तेव्हा ही तु असेच मनाला लाउन घेतले होते..
म्रुदगंधा.. गैर्समज झाला तुझा, वैभव ची पावती मिळणे आम्ही नविन लिहिणारे अभिमानाची गोष्ट समजतो..आणि त्याला शंकाही विचारत असतो.. असे प्रश्न विचारण्याचा हक्क आम्हिच दिलाय त्याला.. उगाच केलेली टिका कशी असते ती बघायला photchyaa bb वर जाउन ये.आणि v&c च्या..!!!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators