Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 17, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » आषाढ » काव्यधारा » कविता » Archive through July 17, 2006 « Previous Next »

Zaad
Friday, July 14, 2006 - 11:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वांनीच जबरदस्त लिहीलंय... आषाढ खर्‍या अर्थाने बरसतोय... :-)


Zaad
Friday, July 14, 2006 - 11:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तूच ठरवलंस सगळं...
माझं
उमलणं
फुलणं
कोमेजणं.
माझं
हात जोडणं
हेही तूच ठरवावंस
?


Pkarandikar50
Friday, July 14, 2006 - 11:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mi_anandyatri

बहोत खूब. मोजकेच लिहावे पण ते मोजले जाईल असे लिहावे, या न्यायाने, लक्षणीय कविता.
-बापू.


Pkarandikar50
Friday, July 14, 2006 - 11:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mrudgandha6

गेल्या दोन-चार दिवसातल्या सगळ्या कविता सुन्दर आहेत. कोणत्या कवितेचा खास उल्लेख करावा ते कळत नाहिये.
-बापू.


Mrudgandha6
Friday, July 14, 2006 - 12:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापू,
धन्यवाद..तुमचा आशिर्वाद असुद्या.

झाड,
अप्रतिम.. थोडक्या शब्दात खोल अर्थ..


Pkarandikar50
Friday, July 14, 2006 - 12:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mrudgandha6

गेल्या दोन-चार दिवसातल्या सगळ्या कविता सुन्दर आहेत. कोणत्या कवितेचा खास उल्लेख करावा ते कळत नाहिये.
-बापू.


Jo_s
Saturday, July 15, 2006 - 12:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mrudgandha
तुझ्या साठि हे परत

मृं नो
तुमच्या या कवितां मुळे मला मझ्या जुन्या चारोळ्या आठवल्या

मना मनातील मिटता अंतर
प्रश्ण कशास देहाचा
तू अन मी हे शब्दही गौणच
खेळ हा सारा अद्वैताचा
---------------
मनं एकदा जुळली की
हे असच घडणार
दुर शरीरं जातात
मनात अंतर कसं पडणार

सुधीर


Mrudgandha6
Saturday, July 15, 2006 - 2:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुधीर,
छान. आणि धन्यवाद माझ्यासाठी पुन्हा कविता टाकण्याचे कष्ट घेतलेस म्हणुन... छान चारोळि आहेत तुझ्या..


Niru_kul
Saturday, July 15, 2006 - 3:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तू विसरु शकशिल का?

ते गोड क्षण,
माझं हळवं मन;
तुझी अखंड बडबड,
आणि माझं नि:शब्द मौन.
तू कसं विसरु शकतेस?

तूझं मुग्धपणे हसणं,
हसताना मोहक दिसणं;
तुला डोळ्यात साठवताना,
माझं भान हरपणं.
तू कसं विसरु शकतेस?

तुझं ते अलगदपणे माझ्या मिठीत शिरणं,
घरची आठवण काढुन उगाच मुसमुसणं;
तुझ्या हळवेपणाला मझ्यात समावुन घेताना,
माझं तुझी समजुत काढणं.
तू कसं विसरु शकतेस?

आपलं ते चांदण्यांखाली जागणं,
तुटलेला तारा पाहुन तुझं देवाकडे काहितरी मागणं;
जन्म-जन्मांच्या साथीची आण घेताना,
तुझा हात माझ्या हातात गुंफणं.
तू कसं विसरु शकतेस?

माझं ते तुझ्यासाठीचं तळमळणं,
तुझ्या स्वप्नांसाठी निद्रेची आराधना करणं;
तरीही नेहमी तुझ्या विचारात गढुन,
माझं रात्र रात्र जागणं.
तू कसं विसरु शकतेस?

तू कसं विसरु शकतेस;
माझं प्रेम,
माझ्या भावना,
माझं मन,
माझ्या वेदना.
सांग, तू विसरु शकशिल का?





Misonal
Saturday, July 15, 2006 - 6:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sandarbh: Bom-blasts in Mumbai 7/11/06
Sahaj mazya ladkya shahracha vichar kartana suchal.

________________________
Dhag

Kale dhag datlele kshitijavar
Jara jastach gadad
jara jastach kale

"ka aaj? sahajach?", mi vicharal tyanna

"Gelya varshi aala hotat asech datun
garjala hotat jorat aani
baraslat dekhil
Itke ki udhvast kelat barach kahi
Ragavala hotat far
Aaj jastach ragavlele dista
aajhi rag okayla aala aahat?"

Dhag jara jastach datun aale.

Datlelya galyanech mhanale,

"Tyanni hi udhvastach kel sagal.
Pan te jast kale hote.
Te garajale nahit, fakt barasle..pani anhi, aag.
to aawaj eikla mi. Mazya garjne peksha bhayankar.
aani kinkalya suddha. Mazya vidhvaunsa peksha jivghenya.

Ya varshicha rang vegla aahe jara
Prayatna kartoy mansanchya manatal kal shoshun ghyaycha
kinva to kala dhur asel kadhachit
ki kalvandlelya chehryanch pratibimb?

Rag okayla nahi aalo
ashru dhlayla aalo aahe
Hatbal aahe mi. kahich thambvu shakat nahi.

Tevahi rag okayla navtoch aalo.
jara jastach dadpan aal hot tumha mansanchya magnyanch.
hatbal hoto tevahi
Thambvu shaklo nahi tevahi...swatahla!!!"

Aani dhag radu lagle.
________________________



Meenu
Saturday, July 15, 2006 - 1:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनल मनापासुन लिहीलं आहेस .. प्रसंगच असा की कवितेलाही छान म्हणवत नाहीये .. फारच दुःखद घटना खरच ... मराठीत टाकते सगळ्यांसाठी

ढग

काळे ढग दाटलेले क्षितिजावर
जरा जास्तच गडद
जरा जास्तच काळे

"का आज? सहजच?", मी विचारलं त्यांना

"गेल्या वर्षी आला होतात असेच दाटुन
गरजला होतात जोरात आणि
बरसलात देखील
ईतके की उध्वस्त केलतं बरचं काही
रागावला होतात फार
आज जास्तच रागावलेले दिसता
आजही राग ओकायला आला आहात?"

ढग जरा जास्तच दाटुन आले.

दाटलेल्या गळ्यानेच म्हणाले,

"त्यांनी ही उध्वस्तच केल सगळं.
पण ते जास्त काळे होते.
ते गरजले नाहीत, फक्त बरसले .. पाणी नाही, आग.
तो आवाज ऐकला मी. माझ्या गर्जनेपेक्षा भयंकर.
आणि किंकाळ्या सुद्धा. माझ्या विध्वंसापेक्षा जिवघेण्या.

या वर्षीचा रंग वेगळा आहे जरा
प्रयत्न करतोय माणसांच्या मनातला काळा शोषुन घ्यायचा
किंवा तो काळा धुर असेल कदाचित
की काळवंडलेल्या चेहर्‍यांचं प्रतीबिंब?

राग ओकायला नाही आलो
अश्रु ढाळायला आलो आहे
हतबल आहे मी. काहीच थांबवु शकत नाही.

तेव्हाही राग ओकायला नव्हतोच आलो.
जरा जास्तच दडपण आलं होतं तुम्हा माणसांच्या मागण्यांचं.
हतबल होतो तेव्हाही
थांबवु शकलो नाही तेव्हाही...स्वतःला!!!"

आणी ढग रडु लागले.


Meenu
Saturday, July 15, 2006 - 1:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुला नाही पटणार ...

खरं सांगायचा यत्न करतेय पण तुला नाही पटणार
पुन्हा पुन्हा नजरेत तुझ्या अविश्वास दाटणार

स्वतःलाच समजुन घ्यायचा यत्न करतेय पण तुला तसं नाही पटणार
तुला मात्र मी मुद्दामच त्रास देतेय असचं वाटणार

ईश्वराची योजना समजुन घेण्याचा यत्न करतेय
पुढे काय घडवायचय त्याला ते जाणुन घेण्याचा यत्न करतेय

माझी ताकद कमी पडतेय पण तुला नाही पटणार
तुला सारं मीच घडवुन आणतेय असचं का वाटणार ..?


Meenu
Saturday, July 15, 2006 - 1:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निर्मीती

तुला तरी खात्री आहे का मी तुझीच निर्मीती आहे अशी ..?
नाही .. , मला तरी कधी कधी शंकाच येते तशी

का मी आहे केवळ व्यावसायीक निर्मीती जिला
विसरुनही गेलास तु किंमत वसुल झाल्यावर ..?

मान्य होतं मला अनेक संकटांचा सामना करणं
सोन्यासारखं आगीतुन तावुन सुलाखुन निघणं

प्रत्येकवेळी अधिकाधिक उजळुन निघताना
मी तुला धन्यवाद देत होते

धगीचा सामना करताना थकले, वाकले पण मोडले नाही कधी
आज मात्र मोडुन पडावसं वाटतय जेव्हा तु मलाच आग बनुन वापरतोस तेव्हा .....

खरच शंका येते मी तुझी लेक आहे का याची ..?


Meenu
Saturday, July 15, 2006 - 2:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकाकी

चांदण्यांची गर्दी नभी दाटलेली
खंत एकाकीपणाची मनी साठलेली

सुर्यकिरणांनी सार्‍या धरेस व्यापलेले
सावलीत फुलं एक किरणास आसावलेले

शब्द जंजाल सर्वत्र हे पसरलेले
मौन संवाद साधण्या तरसलेले

थेंब थेंब धरणीवरी बरसलेले
तरी कुणी जीवना तरसलेले


Athak
Saturday, July 15, 2006 - 3:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ढग अनुवाद :-) एकाकी अन निर्मीतीची निर्मीती छानच मीनु

Meenu
Saturday, July 15, 2006 - 10:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अथक धन्यवाद पण ढग मी नाही लिहीलेली सोनलनी लिहीलीये .. मी फक्त मराठीत टाकलीये वाचायला सोपं जावं म्हणुन

Kandapohe
Sunday, July 16, 2006 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनल खरच मनापासून लिहीले आहेस.

मीनू, देवनागरीकरणाकरता धन्स. कविता! निर्मीती छान!
:-)

Antya
Sunday, July 16, 2006 - 11:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महात्माजी...
होर्डींग्जमधून दिसणारं तुमचं हसू
जखमेवर मीठ चोळतय...
ज्या जख़मा अजुनही ताज्या आहेत...
तुमचं मूठ्भर मीठ
फरचं झोंबतय आम्हाला हल्ली....

मनावरच्या जखमा
आमच्या हातापायांवर उतरताना
मनासारखेच आमचे कानही बधिर झालेत...
भग्न लोकल सारख़े- तडे पडलेत पुन्हा मनामनात

आई
यापुढं पिशवीत ड्ब नको देऊस मोठा...
लोक संशयाने पाहू लागलेत...
सार्‍या पिशव्यांकडं

लोकलच्या आत चिकटवलेल्य नकाशात
भितीचं आणि काळजीचं प्रत्येक स्टेशन
आम्ही पार करतोय...
लोकलसारखंच धकधक असणार्‍या मनानं...
त्यात तुझ्या प्रेमाचं ओझं वाहून कसे नेऊ?

माणसांनो
मदतीच्या तुमच्या फुंकरीनं, बरं वाटेलही कदाचित...
पण क्रुरतेच्या वादळात विझून गेलेले दिवे...
मणुसकीचीच वाट पेटवतील ना?
महात्माजी...
होर्डींग्जमधून दिसणारं तुमचं हसू
जखमेवर मीठ चोळतय...
ज्या जख़मा अजुनही ताज्या आहेत...
तुमचं मूठ्भर मीठ
फरचं झोंबतय आम्हाला हल्ली....

मनावरच्या जखमा
आमच्या हातापायांवर उतरताना
मनासारखेच आमचे कानही बधिर झालेत...
भग्न लोकल सारख़े- तडे पडलेत पुन्हा मनामनात

आई
यापुढं पिशवीत डबा नको देऊस मोठा...
लोक संशयाने पाहू लागलेत...
सार्‍या पिशव्यांकडं

लोकलच्या आत चिकटवलेल्य नकाशात
भितीचं आणि काळजीचं प्रत्येक स्टेशन
आम्ही पार करतोय...
लोकलसारखंच धकधकत असणार्‍या मनानं...
त्यात तुझ्या प्रेमाचं ओझं वाहून कसे नेऊ?

माणसांनो
मदतीच्या तुमच्या फुंकरीनं, बरं वाटेलही कदाचित...
पण क्रुरतेच्या वादळात विझून गेलेले दिवे...
माणुसकीचीच वात पेटवतील ना?


Mrudgandha6
Monday, July 17, 2006 - 9:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुपारची वेळ..
सारं कसं स्तब्ध..
मध्येच येते एखादी वार्‍याची झुळुक अन
सहजतेने गळुन पडते एखाद्या झाडावरचे एखादे पान
अन खिडकी जवळच्या टेबलावरची कागदांची पानेही
भिरभिरतात,विस्कटून जातात
मी ठेवते त्यांना गोळा करुन पुन्हा त्यांच्या जागेवर
आणि ते झाडाचे पानही एखाद्या वहीमध्ये
अन क्षणभरच बघते आजूबाजूच्या उदास शांततेला
मग,मीच भिरभिरत जाते कुठेतरी दूरवर..
..मृद्गंधा


Mrudgandha6
Monday, July 17, 2006 - 9:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु तुझी 'एकाकी' अतिशय सुन्दरतेने मांडलि आहेस.

अनन्तजी आणि सोनल
तुम्हच्या कवितेसाठि काय अभिप्राय देवू फ़क्त डोळ्यात पाणी दटले एव्हढॅ पुरे होइल त्या भावना सांगायला..





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators