Meggi
| |
| Monday, July 17, 2006 - 8:56 am: |
| 
|
मायबोलिकरांनो..पहिलाच प्रयत्न असल्याने सांभाळुन घ्या... " यात माझा काय दोष? " बेटा, दिवेलागणीची वेळ झालि.. अशी एकटीच काय उभी आहेस अंधारात? आईच्या प्रश्नाने मानसीने फ़क्त मागे वळुन बघितले आणि ती आपल्या खोलीत निघुन गेली. तिचा चेहरा शांत असला तरी तिच्या डबडबलेल्या डोळ्यातली वेदना रत्नाला दुखवून गेली. मानसीने आजवर अनेक टक्के-टोणपे, अपमान झेलले होते.. किंबहुना तिला त्याची सवय होति.. गौरवची प्रतिक्रिया तशी तिला अपेक्षितच होति.. पण वेडं मन मात्र मानायला तयार नव्हतं. गौरव आणि मानसी एकाच colleage मध्ये होते. मानसीचा आकर्षक व्यक्तिमत्व गौरव ला पहिल्या भेटितच भावलं. अभ्यासात सर्व साधारण असली तरी colleage मध्यला स्पर्धा, नाटकं, वाद्-विवाद यात नेहमी पुढे असलेल्या मानसीचं व्यक्तिमत्व पहिल्या भेटितच छाप पाडत असे. अनेक मित्र-मैत्रिणी असुनही ती सर्वांशी थोडा अंतर राखुनच वागायची. तिच्या डोळ्यातल एकाकिपण गौरवला नेहमि जाणवायचं. "उन्मेश" साठी नाटक बसवताना दोघांच्या मैत्रिचं प्रेमात रुपांतर कसं झालं कळलच नाही. सर्वोत्क्रुष्ठ अभिनेत्री म्हणुन निवड झाल्यावर मानसीने ठरल्या प्रमाणे गौरव ला treat द्यायची होती. गौरव पण आज खुशीत होता. आपल्या मनातली गोष्ट तो आज सांगणार होता. Garden Court हे त्याच आवडत ठिकाण. "मानसी, मला तुला काही सांगायचं आहे." "मला कल्पना आहे, गौरव.. तुला काय सांगायचं आहे. मला तुझ्या घरी येऊन तुझ्या आई-वडिलांना भेटायला आवडेल." "मनु, माझे आई वडील खूप प्रेमळ आहेत.. तु काही काळज़ी करु नकोस.." "तरी पण, गौरव... एकदा भेटायचय मला सर्वांना..." "बरं तर मग येत्या रविवारी भेटु.. नक्की.." ती संध्याकाळ खुप सुंदर होती. मानसी आणि गौरव खूप वेळ बोलत बसले होते. ठरल्या प्रमाणे मानसी गौरवच्या घरी गेली. गौरव च्या आई वदिलांनी तिचा मनापासुन स्वागत केलं. बराच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यात. मानसी धीराने म्हनाली..."मला काही महत्वाचं बोलायचं आहे.." "बोल की, अशी लाजतेस काय... आता तुझचं घर होणार आहे हे.. गौरवने सगळं सांगितलय आम्हाला." मानसी बोलु लागली... बघता बघता गौरवचा चेहरा फ़िका पडला... आई-बाबा च्या डोळ्यातली प्रेमाची आणि आपुलकिची भावना तिरस्कारात बदलली... "मानसी, आई वडिलांच्या मना विरुद्ध...." गौरव ला बोलण जड जात होतं. "गौरव.. जाउ दे रे.. या सर्व योगा-योगाच्या गोष्टी आहेत..." गौरवला पुढचं बोलू न देता मानसी घरी परतली... तिच्या मनाला केवळ एकच प्रश्न भेडसावत होता.".... यात माझा काय दोष?" क्रमश:
|
Vadini
| |
| Monday, July 17, 2006 - 4:35 pm: |
| 
|
pahila praytna asun-hi kathe-cha pahila bhag utsukata nirman karnara aahe.pudhil katha lavkar aali tar maja yeil.
|
Yog
| |
| Monday, July 17, 2006 - 4:43 pm: |
| 
|
Meggi, छान सुरुवात आहे... पुढचे येवू देत..
|
Shreeya
| |
| Monday, July 17, 2006 - 9:19 pm: |
| 
|
meggi , कथा छान वाटतेय लवकर पुर्ण कर. पहिला प्रयत्न असुनही पकड घेतली आहेस कथेवर!
|
Manutai
| |
| Tuesday, July 18, 2006 - 3:43 am: |
| 
|
छान लिहीते आहेस. पुढ्ची कथा येऊ देत लवकर.
|
Meggi
| |
| Tuesday, July 18, 2006 - 8:20 am: |
| 
|
आपल्या नशिबाचे भोग आपल्या मुलिला मानसीला भोगायला लागताहेत... हे विचार रत्नाला अस्वस्थ करत होते. तिच्या डोळ्यासमोरुन भुतकाळ झरझर सरकला. रत्ना एका मध्यमवर्गीय कुटुंबात चाळीत वाढलेली. एकुलती एक असल्याने थोडी हट्टी होती. हुशार देखण्या रत्नाला हिर्यासारखा मुलगा मिळावा हे आई-वडिलांचं स्वप्न. बाबा नेहमी म्हणायचे ' मझ्या रत्नाला फ़ुलासारखं जपणारा नवरा मिलेल. ' रत्नाने अज़ुन लग्नाचा विचार पण केला नव्हता. तिचं L.L.B झालं होतं आणि आता ती L.L.M करत होती. चांगलं शिकुन स्वतःच्या पायावर उभं रहायच होता तिला. अभ्यासाप्रमाणेच ती नृत्य, गायन यामध्ये पुढे होती. तिच्या बडबड्या स्वभावामुळे तिला मैत्रिणी ही खूप होत्या. एक दिवस रत्ना आपल्या मारवाडी मैत्रिणीच्या लग्नाला गेली होती. अर्थातच नाचाच्या कार्यक्रमात ती पुढेच होती. नाचत नाचता तिच्या लक्षात आल कि तिच्याकडे कोणितरी बघत आहे.. तिने वळुन बघितलं तर त्याने तिला छान smile दिल. दुरूनच ' खूप छान नाच करतेस ' अस प्रमाणपत्र पण त्याने दिलं. त्याचं उंचपुरं देखणं व्यक्तिमत्व रत्नाला पहिल्या नजरेतच आवडलं. कार्यक्रम संपल्यानंतर रत्नाने त्याला इकडेतिकडे शोधलं पण तो कुठेच दिसला नाही. तिने आपल्या मित्र-मैत्रिणी कडुन पण माहिती काढायचा प्रयत्न केला. पण काही उपयोग झाला नाही. आत्ता पर्यंत केवळ career च विचार करणारी रत्ना आपल्या भावी आयुष्याची स्वप्न रंगवू लागली. ' कोण तो? ज्याचा नाव पण आपल्याला माहित नाहि त्याचं आपण इतका विचार का करतो ' हे रत्नाला ला उप्मगत नव्हते. पण त्याच्या बद्दल विचार करण्यात तासन-तास घालवू शकतो हे तिला कळुन चुकले होते. एक दिवस रत्ना colleage ला जात होती. बस स्टॉप वर उभी असताना तिला कोणितरी येताना दिसल. ' त्याचा ' सारखाच दिसत होता का तो? ' आपल्याला आता सगळीकडे तोच दिसू लागलाय बहुधा ' अस विचार तिच्या मनाला चाटुन गेला. पण नाही आज तो भास नव्हता. तो ' तोच ' होता. " हलो, मि मुकुंद. " त्याच्या स्वतहुन येऊन बोलण्याने रत्ना आनंदीत झाली. " मी रत्ना. " " खुप छान नाचतेस. त्यादिवशी तुला कार्यक्रमा नंतर भेटुन तुझा अभिनंदन करायचि इच्छा होती. पण काही कारणामुळे मला अचानक घरी जावं लागलं. " कार्यक्रमानंतर ती त्याला शोधत होती हे न दाखवता थोडी अजुन माहिती काढण्याच्य उद्देशाने ती बोलली. " तुम्ही कुठे असता? " " मी पाली हिलला रहातो. आणि दुसरं म्हणजे मला ' तु ' म्हंटलेलं आवडेल. " उत्तरादाखल ती नुसतीच हसली. रत्ना आणी मुकुंदच्या भेटी वाढत राहिल्या. मुकुंद मर्चंड नेव्ही मध्ये होता. सहा महीने घरी आणि ६ महीने शीपवर असायचा. शीपवर जायचे दिवस जवळ येउ लागले तसं रत्नाला वाईट वाटू लागलं. मुकुंद परत आल्यावर त्याच्या आई वडिलांशी बोलणार होता. तो पर्यंत तिची परीक्षा पण संपणार होती. ' ६ महिने हा हा म्हणता निघुन जातील ' असं म्हणत मुकुंद ने तिचा निरोप घेतला. रत्नाने या प्रकरणाची कुणकुण कोणाला लागू दिली नाही. ६ महीने झालेत ठरल्या प्रमाणे मुकुंद परत आला. उत्तम गुणानी पास झाल्यामुळे रत्ना आणि आई-बाबा पण आनंदात होते. यावेळि बक्षिस म्हणुन काय मागायचं ते पण रत्नाने ठरवलं होतं. एका संध्याकाळि रत्ना आणि मुकुंद भेटले. मुकुंद थोडा चिंतेत दिसत होता. " रत्ना, मी घरी आपल्या बद्दल सांगितलं. घरच्यांनी ठाम विरोध दर्शवलाय. त्याना घराण्याची पत मुलापेक्षा जास्त महत्वाची वाटतेय. त्याना एखाद्या businessman ची श्रीमंत मुलगी हवी आहे, जी त्यांच्या घरात पैशाचा पाउस पाडेल आणि सोन्याचा उजेड. " " मुकुंद अरे मी स्वतः भेटेन तुझ्या आई-वडिलांना. माझे आई-बाबा पण भेटतिल हवं तर. " " त्याचा काःई उपयोग नाहिये. माझ्या आई बाबांना मध्यम वर्गीय मुलगी चालणार नाही. पण तू काळ्जी करु नकोस. मी स्वतः च्या पायावर उभा आहे. मी तुला पाली हील च्या बंगल्यात नाही ठेउ शकत पण स्वतःचा एक छोटा flat तर नक्कि घेउ शकतो. " " तुझ्या बरोबर मी कुठेही यायला तयार आहे. मला फ़क्त तू हवा आहेस. पण एका आदर्श पत्नी बरोबर एक आदर्श सून व्हायला मला आवडलं असतं. " " आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळतेच असं नाही ना. आपण दोघे सुखाने संसार करु. तुला कशाची कमी पडु देणार नाही. खोटी प्रतिष्ठा आणि पैश्यासाथी मला तुझं प्रेम गमवायचं नाही. मि लवकरच तुझ्या आई बाबाना भेटतो. " मुकुंद चा आपल्या वरील विश्वास आणि प्रेम बघुन रत्नाला भरुन आलं. मुकुंदचे त्याच्या आई वडिलांशि संबन्ध तुटल्यातच जमा होते. तो रत्नाच्या आइ बाबांना भेटला. देखणा, चांगली नोकरी आणी मुख्य म्हनज़े जातिचाही प्रश्न नसल्याने त्यांनी ही या लग्नाला होकार दिला. स्वतः च्या घरची परिस्थीती मुकुंद्ने त्याना सांगितलेलिच होती. ४ महिन्यानी त्यांचा साखरपुडा आणि लगेच आठवडाभरात लग्न मुकुंडच्या आई-वडिलांच्या आशिर्वादाशिवायच पार पडलं. मुकुंद ने पुण्याला flat घेतला. दोघे सुखाने संसार करु लागले. मुकुंद रत्नाला फुलासारखं जपायचा. त्याच्या प्रेमाने रत्ना हरखुन गेली होती. आयुष्याची स्वप्न प्रत्यक्षात उतरत होती. मुकुंदचा शीपवर जायचा दिवस येउन ठेपला. आज तो ६ महिन्या साठी जाणार होता. रत्नाच्या रहाण्याची शीपवर सोय झाली नसल्याने पुढ्च्या वेळि तो तिला नक्कि घेउन जाणार होता. पाणावलेल्या डोळ्यानी तिने मुकुंद्ला निरोप दिला. मुकुंद्ला जाउन २ महीने झाले होते. त्यचि खुशाली अधुन्-मधुन पत्राने कळत होतिच. शिवाय त्याच्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण होताच तिच्या सोबतिला. इतका प्रेमळ आणि समंजस नवरा दिल्याबद्दल तिने देवाचे मनोमन आभार मानले. एकुलत्या-एक मुलीला आनंदात बघुन आई-वडिल पण खुश होते. पण नियतीच्या मनात काही वेगळेचं होतं... क्रमश:
|
Meggi
| |
| Thursday, July 20, 2006 - 2:05 pm: |
| 
|
आज़ संध्याकाळी रत्नाला घ्यायला आई-बाबा दोघेहि येणार होते.. कालच तिचे reports आले होते. आई होण्याची चाहुल लागल्याचे तिने अजुन मुकुंदला सांगितले नव्हते. सकाळी जाग आली तरी ' ही बातमी मुकुंदला बातमी कळल्यावर तो किती आनंदी होइल ' याचा विचार करत बराच वेळ लोळत पडली होती. आज काहिचं करावस वाटत नव्हत. थोड्या वेळाने ती उठली. स्वयंपाकाची तशी काही घाई नव्हतीच. रविवार असल्याने आंघोळही उशिरा झालेली चालणार होती. स्वतःसाठी मस्त एक कप चहा करुन घेतला आणी मुकुंद्ला पत्र लिहायला बसली. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. आत्ता कोण आलं असेल असा विचार करत तिने दार उघडलं. दारात एक बाई उभी होती. चांगल्या घरातली वाटत होती. कडेवर एक मुल आणि दुसर्या हाताच बोट धरुन एक ३ - ४ वर्षाची मुलगी होती. तिच्या चेहर्यावरचे भाव रत्नाला विचित्र वाटले. " कोण हवय आपल्याला? " " मुकुंद इथेच रहतात का? " त्या बाईच्या प्रश्नात जरब होती. " आपण कोण? " " मी कोण?? मी मुकुंदची बायको. आणि हि दोन त्याचीच पोरं....... " त्या बाईचा प्रत्येक शब्द रत्नावर आसुडासारखा बरसत होता. तिची घोर फ़सवणुक झाली होती. विश्वासघाताने तिच मन पेटुन उठलं. ती रागाने थरथर कापत होती. त्या बाई पुढचे शब्द ऐकुन तर रत्ना कोसळुन पडली. " माझ्या पदरात दोन पोरं आहेत. मी माझ्या नवर्याला मुळीच सोडणार नाही. तु हवं तर त्याची ' रखेल ' म्हणुन रहा... " ती बाई निघुन गेली. रत्ना पुर्ण कोलमडली होती.... ती किती वेळ तशीच बसुन होती माहित नाही. तिला शुद्धं आली ती आईच्या हाकेने. आई-बाबा आले होते. रत्नाला अस दारात बघुन हवालदिल झालेत. काहितरी अशुभ घडलय याची कल्पान आली त्यांना. रत्नाला पाणी मारुन आत घेउन गेलेत. आईच्या कुशीत रत्नाने अश्रुंना वाट करुन दिली. आत्तापर्यंत सुंदर वाटणार आयुष्य तिला नरक वाटू लागलं. आपल्या बाबतितच का असं झाला? कुठे चुकलो आपण? का? का? वागला मुकुंद आपल्याशी असं? तिला कुठल्याच प्रश्नांचि उत्तरं मिळत नव्हती. लोकांच्य कुत्सिक नजरा आणि टोमणे तर आता जीवनाचे एक अविभाज्य भाग होते. आपल्या मुलीला कुठल्या नरकात धकलला आपण? माणुस ओळखायला पार चुकलो आपण हे समजुन चुकले होते आई- बाबा. मानसीचं प्राक्तन तिच्या जन्मा आधीच लिहिल्या गेलं होतं. अवहेलना आणि कुत्सिक नजरा याशिवाय तिला काही मिळणार नव्हतं. मुकुंद परत आला होता. सगळ्यात मोठा धक्का रत्नासाठी होत कि त्याने हे सर्व निर्लज्जपणे कबुल केले. " तुला काय कमी आहे. ' सर्वकाही ' मिळतय ना. अजुन काय हवय? मी ६ महिन्यातले काही दिवस तुझ्याकडे येइल. " या शब्दांवर रत्ना हतबुद्ध झाली. तरिही त्याच्यावर भाळलेली रत्ना या गोष्टीसाठी तयार झाली. सर्व गोष्टी स्पष्ट होत्या. घरच्यांच्या नकळत लग्न करायच म्हनुन आई-वडिलांशी संबन्ध तोडल्याचा बहाणा होता तो. ते प्रेम..तो विश्वास..एकत्र जीवन्-मरणाच्य शपथा हे सारं काही खोटं होतं. एकच गोष्ट खरी होती कि ति मुकुंद चि " रखेल " होती. समाप्त. -सत्यघटनेवर आधारित ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ कथा लिहिताना नावे बदलली आहेत. कल्पना विलास केला असेल तरी यातिल पात्रे आणि घटना सत्य आहेत. अश्या अनेक रत्ना आणि मुकुंद आपल्या समाजात आहेत. या कथेचे प्रयोजन कथा लेखन नसुन रत्नाचि फ़सवणुक आणि मानसीची चुक नसताना समाजात तिची होणारी अवहेलना सगळ्यांसमोर आणावी हे आहे. रत्नाबद्दल मी ऐकलं तेव्हा माझ्या मनातले काहि प्रश्न अनुत्तरीत रहिले. कायद्याच शिक्षण घेतलेल्या रत्नाने मुकुंदला कोर्टात का नाहि खेचलं? आयुष्यभर keep म्हनुन रहाण्याचा निर्णय का घेतला? प्रत्यक्षात रत्नाला मानसी नंतर अजुन एक मुल झालं. म्हणजेच रत्नाने मुकुंदला सर्वार्थाने accept केले होते. पण मुलांचं काय? या कथेचे शेवट मला अजिबात आवडला नाहि. पण सत्यकथा असल्याने शेवट माझ्या हातात नव्हता. मी काही लेखिका नाही, शाळेचा निबंध देखिल कधी ताईला विचारल्याशिवाय पूर्ण झाला नाही, त्यामुळे काही त्रुटी असल्यास सांभाळुन घ्यालं. धन्यवाद.
|
कथा आवडली. तुझ्या ह्या प्रश्णाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करते : <>>>रत्नाबद्दल मी ऐकलं तेव्हा माझ्या मनातले काहि प्रश्न अनुत्तरीत रहिले. कायद्याच शिक्षण घेतलेल्या रत्नाने मुकुंदला कोर्टात का नाहि खेचलं? म्हणजे काय झालं असतं ? मुकुन.द ने रत्नाशी संबंधच नाहित, अस सांगितलं असतं तर ? legally एक लग्न झालेलं असताना दुसरं लग्न कायदा ओळखत नाही. तेव्हा कोर्टात जाऊन मुकुंद वर legal हक्कं फ़क्त पहिल्या बायकोचाच राहिला असता. आणि रत्ना ची चार लोकात मान हानी झाली असती ते वगळं <>>>आयुष्यभर keep म्हनुन रहाण्याचा निर्णय का घेतला? कदाचित दुसरा कुठलाच मार्ग नाही म्हणुन. single mom म्हणुन समाजात acceptance तर नाहिच नाही. पण physical महिनतिच्या दृष्टिनी आणि financially सुध्हा ते खुप अवघड आहे. ह्या दोन्ही बाबतित "कोणाची" तरी मदत लागतेच. आणि तसं ही एक मुल असताना रत्ना काय करणार होती ? दुसरं लग्न ? आपल्या बायको ला झालेलं दुसर्याचं मूल आपलं म्हणुन वाढवण्याचा मोठे पणा फ़ार कमी पुरुषांना असतो. <>>>प्रत्यक्षात रत्नाला मानसी नंतर अजुन एक मुल झालं. म्हणजेच रत्नाने मुकुंदला सर्वार्थाने accept केले होते. पण मुलांचं काय? हे मात्र मला माहित नाही. i'd like to believe, that there are people with open minds and big hearts that realize that the kids are really not responsible for their existence . पण प्रत्येक्शात काय घडतं देव जाणे
|
रत्ना ने मुकुन्दाला कोर्टात खेचून रत्ना च्या नशीबी फ़ार काही आले नसते समाजात बदनामीच्या खेरीज शिवाय तिला कदाचित शेवट्पर्यन्त मुलीला एकटीने वाढवावे लागले असते. निदान तिच्या या निर्नयामुले तिच्या मुलीला मुकुन्दाचे नाव मिलाले असेल. कारन दुसर्या बायकोला जरी लीगल स्टेटस मिलाला नाही तरी मुलाना मिलतो. रत्नाला दुसरे मूल का झाले हा मात्र त्यान्चा वय्यक्तीक प्रश्नन आहे... आपन काय बोलनार????
|
Meggi
| |
| Friday, July 21, 2006 - 3:26 am: |
| 
|
PN आणि फुलपाखरु, तुमचे बरेच मुद्दे पटले. रत्नाचा निर्णय तिचा वैयक्तिक प्रश्न आहे हे पण पटलं. पण रत्नाच्या मुलांना समाज जी वागणुक देतो ती बघुन वाईट वाटतं.
|
खरे आहे मेग्गी रत्नाच्या मुलाना त्रास हा झालाच असेल कारन भारतात लोक अजूनही जुन्या विचारान्चेच आहेत तरिही काल बदलतो आहे आज काही लोक असेही आहेत की ज्याना या असल्या गोश्टीनचा फ़रक पडत नाही निदान आपल्या पीढीला तरी पडू नये अशी ईच्छा किन्वा अपेक्शा आपन करूया याचा अर्थ असा नाही की रत्ना ने जे केले ते बरोबर आहे पन जर कोनी केलेच असेल तर त्याची शिक्शा मुलाना दिली जाऊ नये... कारन आपल्याला आवडो वा न आवडो अशा कितीतरी रत्ना आपल्या आसपास असतात. आनी मुलन्चा काहीच दोश नसतो.....
|
Moodi
| |
| Saturday, July 22, 2006 - 3:30 pm: |
| 
|
मेग्गी हेच समाजातले वास्तव आहे, अन दुर्दैवाने निष्पाप मुलांचे आयुष्य यात पणाला लागते.
|
ह्म्म्म मन वाचुन सुन्न झाले विश्व्वास हा प्रकार नसतो का जगात असे प्रश्ण पुन्हा पुन्हा खरोखर पडतात Anyways मला तरी हे प्रश्ण पडले रत्ना ही खरोखरच अशिक्षित स्त्री न्हवती(तीने law केले होते तिचे हे शिक्षण मुकुंदला कोर्टात खेचण्यासाठी नाही तरी स्वःताला उपयोगाचे का नाही ठरले?? २) ती एवढी हुशार असताना(कथेत लिहिल्याप्रमाणे की नाचात, बोलण्यात हुशार) असे hopelessly एका हलकट माणसासा बरोबर आयुष्य का स्विकारले ते ही सत्य समजल्यानंतर? ३) समाज अजुन divorcee किंवा विधवा स्त्रीयांन सुद्धा कितपत Accept करतो? I am not trying to compare here two different status ladies but even though legally happened things, society takes a while to accept in small towns. i have seen that for my friend. just because she was divorcee, she was topic of gossip and her kids were asked intentional questions like where does your father live etc? so children from illegal relationship is far far behind to be accepted by society i think. We (society) are still stuck in old mindset ४) i have no clue why she had another kid? may be that was her personal decision .... ५) what was her parents role here? were they supportive of her later decision? ६) why did she continue her pregnancy even in manasi's case? ७) sad thing kids are payign for no msitakes of thier own
|
मेग्गी कथा एकदम मनाला भिडणारी आहे. परिस्थिति विदारक असली तरी सत्य आहे. कमितकमि आपण स्वत्: तरी या विचारसरणीला झिडकारुण येनार्या पिढीसमोर तेच उदाहरण म्हनुन ठेवु शकतो. कारण असे बदल सहजासहजी होत नसतात. हे आपले माझे मत. अमोल
|
Abcd
| |
| Tuesday, July 25, 2006 - 2:34 pm: |
| 
|
मी मानुस्विनि बरोबर अगदी अग्री करते. स्वाभिमान ही अत्यन्त महत्वाची गोश्ट आहे. आपल्या समाजाची विचार बदलण्याची फ़ार गरज आहे.प्रत्येक बाई नी खम्बीर स्वताहाच्या पायावर उभे राहिले तरच हे शक्य आहे. I think all this samaj related thinking is originated from a woman...men dont think to care (at least portray) about these things happening in a society. Most of the women(not all) in our society have lot of empty time in their hands and only thing they would prefer to do with it is gossip. If they spend there time doing something constructive then life will be much easier for people like Ratna. She needs to know every body makes a mistake but its how you improve a situation after that makes a difference in the quality of life.
|
Arch
| |
| Tuesday, July 25, 2006 - 3:53 pm: |
| 
|
ह्यात बर्याच गोष्टी खटकतात. १. मुलाची माहिती न काढता आईवडिलांनी लग्न कस लावून दिल? २. एवढी शिकलीसवरलेली मुलगी मुलाशी एवढी मैत्री करताना ज्या मैत्रीणीच्या लग्नात तो तिला पहिल्यांदा दिसला तिच्याकडून त्याच्या घरची खरी परिस्थितीपण विचारू नये? ३.पहिली मूल चूक नव्हती अस मानल तरी दुसर मूल होऊ देणं मूर्खपणाच वाटत. एवढ्या शिकल्या सवरलेल्या बाईला self respect असू नये? ४. अस त्या माणसाबरोबर रहाणं हा मुलांवर केलेला मोठ्ठा अन्याय आहेच पण त्याच्या बायका मुलांवरपण अन्याय आहे. तो एक मूर्ख असला तर ही सात मूर्खच म्हणावी लागेल. अशा लोकांबद्दल मला मुळीच कणव नाही.
|
Meggi
| |
| Wednesday, July 26, 2006 - 8:18 am: |
| 
|
कथेले दिलेल्या प्रतिसादां बद्दल मनापासुन धन्यवाद. तुम्हाला सगळ्याना पडलेले प्रश्न मलापण पडलेत जेव्हा मी रत्ना बद्दल ऐकलं तेव्हा. तो मुलग engagement ला एकटा आला होता. आणि लग्नाल पण एकटा येतो म्हंटल्यावर तिच्या वडिलांनी विरोध केला होता. पण तिच्या हट्टापुढे काही चाललं नाहि त्यांचं. त्या मुलाबद्दल काहिही माहिती न काढता तिच्या आई-वडिलांनी लग्न कस काय लावुन दिलं माहित नाही. लग्नात फ़सवणं इतकं सोप असतं का असा प्रश्न पडला मला. तिने जी चुक केली ती तिने भोगली. मुलं पण नसलेली चुक भोगताहेत. जे लोक आपल्या मुलांना legal आणि social status देउ शकत नाही, त्यांनी मुल होऊ देणे मला चुकिचे वाटले.
|
मेग्गी तुला मुलं आहेत का ? माझ्या अंदाजा प्रमाणे बहुतेक नसावीत. कारण इतकं टोकाचं वाक्य इतक्या सहजा सहजी तू लिहीलं नसतस -- जे लोक आपल्या मुलांना legal आणि social status देउ शकत नाही, त्यांनी मुल होऊ देणे मला चुकिचे वाटले -- मूल होऊ देण्या मागे legal आणि social status सोडुनही बरेच विचार आणि emotional गुंता असतो, ह्याचा अंदाज तुला आजून आलेला नसावा.
|
Maudee
| |
| Thursday, July 27, 2006 - 2:38 am: |
| 
|
अनुमोदन आर्च. पण त्या बरोबरच मला असाही प्रश्न पडला की त्या माणसाची जी बायको होती पहिली तिने हे ख़पवून कसं घेतलं की तिच्या नवर्याने तिला अंधारात ठेवून दुसरे लग्न केले. तिला घटस्फ़ोट घ्यायला लागणार नाही किंवा तिच समाजात स्थान बदलणार नाहीये म्हणुन ती ही फ़सवेगिरी सहन कशी काय करु शकली???
|
Maudee
| |
| Thursday, July 27, 2006 - 2:49 am: |
| 
|
अशाच फ़सवेगिरीचं आणख़ी एक उदाहरण. माझी एक दूरची बहीण आहे. तिचे लग्न ठरले तसे फ़ारच झटपट. कदाचित तिचे लग्न बरेच दिवस ठरत नसल्याने जास्त विचारपूस न करता तिच्या आईबाबानी लग्न ठरवले(हातात आलेले स्थळ सोडा कशाला या विचाराने) तर लग्न झाल्यावरती मुलगी जेव्हा सासरी गेली तेव्हा तिच्याशी घरातले कोणीच चांगले वागत नव्हते. तिला कळेना की तिच इतक काय चुकलय की लग्न झाल्या झाल्याच तिला टिकेला तोंड द्याव लागाव. लग्नानंतर ३ महिन्याने असच काहितरी कारण काढून सांगितले की तू तुझ्या माहेरी निघून जा मला तुझ्याबरोबर संसार करायचा नाही. त्यावर बरीच बोलाचाली झाली आणि बर्याच दिवसानी कळल की त्या मुलाचे गावातल्याच एका मुली बरोबर प्रेम जमले होते पण ती मुलगी घटस्फ़ोटीत असल्या कारणाने घरातल्यानी परवानगी दिली नाही. तिच्याशी लग्न करण्यासाठी म्हणुन याने एक लग्न करुन घट्स्फ़ोट घेतला आणि मग त्याच्या त्या प्रेयसीशी लग्न केले. नशिबाने हिला दिवस गेले नव्हते. या सगळ्या गोष्टी legally झाल्यामुळे तसा विशेष problem नाही आला तिला. तिने आता दुसरे लग्न केले आहे.... आणि तिला एक मुलगा पण आहे. पण नाही म्हटल तरी मुलीचे भावविश्व उध्ह्वस्त होतेच ना
|
Meggi
| |
| Thursday, July 27, 2006 - 3:27 am: |
| 
|
मेग्गी तुला मुलं आहेत का ? माझ्या अंदाजा प्रमाणे बहुतेक नसावीत. कारण इतकं टोकाचं वाक्य इतक्या सहजा सहजी तू लिहीलं नसतस >>माझं विधान टोकाचं असु शकतं. पण पुढे मुलांना त्रास होतं ते पण नाहि बघवत ना त्यांना. भावनेला महत्व द्यायचं कि मुलांच्या भविष्याला हा वैयक्तिक निर्णय. अजुन एक, मुलं असणार्या स्त्रियांचं मत असे असलेलं मी बघितलं आहे. मझं मत केवळ रत्नाच्य case साठी होतं. divorcee किंवा विधवांच्या मुलांना social status नसतं, असा अर्थ नव्हता. जर गैरसमज झाला तर please दूर कर.
|
गैरसमज काही नाही ग. आणि मुलं असलेल्या स्त्रीया अस बोलतात म्हणजे कमाल आहे. म्हणजे लग्न न करता मुलं होऊ देणं हे मी बरोबर की चूक ह्यावर वाद घालत नाही आहे, पण काही स्त्रीया हे emotionally का करत असतील एव्हढं नक्की समजू शकते. आणि हे मी तरी मला मुलगी झाल्यावरच समजू शकले, आधी समजले नसते. असो, त्य बापड्या मुलीच्या आयुष्याचं भलं होवो
|
मुले होवु देणे न देणे हा पुर्ण व्ययतिक प्रश्ण असला तरी काही प्रकारात त्या खुद्द व्यक्तिने स्वःता निर्णय घ्यावे कितीहि कठिण असले तरी specially मुलांच्या बाबतीत. मला ह्यातले काहीच कळत नाही पण एका जवळच्या व्याकतिचा हा अनुभव लिहित आहे तीला विचारुन कारण आज तीच अश्या विचांराची आहे की मुलिने भक्कम रहावे. माझ्या एका family friend ची अशीच फसवणुक झाली फरक एतकाच की एथे त्याचे दुसरे लग्न न्हवते झाले पण त्याचे ex-grilfriend बरोबर संबध चालु होते त्या मुलिला हा प्रकार कळल्यानंतर काहीच दिवसाने कळले की दिवस गेले आहेत नशीब म्हणा का काय हा मुलगा red-handed पकडला गेला त्या मुलिबरोबर धक्का हा खुपच गंभीर होता. सर्व प्रकारे समजावुन,प्रयन्त करुन, preganancy ची news देवुन सुद्धा मुलाने निर्लज्पण हेच सांगितले की तुला काही कमि पडु देणार नाही. त्याचे घरचे सुद्धा हेच म्हणाले की मुलिला काय फरक पडतो तिला स्वःताचे घर मिळेल etcetc सर्व मोठ्या माणसांने भेटी घेतल्या तरी उपयोग नाही झाला. तिला खुप आशा होती की नविन मुलाची चाहुल लागुन फरक पडेल. किंवा मनच सांगत होते की बाळ आल्यावर हा परत ठिक होईल. पण तिच्या घरच्यांने एकच सांगितले की हा मुर्खपणा आहे जेव्हा त्याला सर्व प्रकारे समजावुन तो तुझी पर्वा आता करत नाही, होण्यार्या मुलाबद्दल वाटत नाहे मग नंतर काय वाटणार. pregannacy पुढे continue करावी की नाही हा तुझा निर्णय आहे पण तु विचार कर की तुझे आयुष्य गुंतगुंतीचे होईल. शेवट हाच की बरेच दिवस मानसिक झुंज(तिच्या भाषेत) देवुन तिने preganancy terminate केली, divorce घेतला त्या व्याकतीबरोबर. निर्णय कठिण होता. पण ती आज स्वःताच्या निर्णायाबद्दल समाधानी आहे. दुख कोणाला होत नाहे असे ती म्हणते पण आज तिच्या आई वडीलांनी हा suport नसता केला तर तीचे आयुष्य कदाचित वेगळे असते. तिने दुसरे समंजस माणसाशी लग्न केले आणी त्या नराधमाबाबत सांगायचे तर त्याने त्याच्या girlfriend ला पण काही काळानंतर सोडुन दिले आणी तिसर्याच मुलिबरोबर रहात होता.
|