|
तसं ललित लिहिणं हे माझ्या अंगात नाही.. पण म्हंटलं काय हरकत आहे लिहून पहायला? बघु, जसं उतरेल तसं. जे काही उतरलंय ते तुमच्यासमोर आहे. गाव बरेच दिवस झाले आम्ही घरातले सगळे मिळून असे कुठे गेलो नव्हतो. तसा घरात हा विषय बर्याच्दा समोर येइ, पण त्यातून निष्पत्ति अशी काही होत नव्हती. ह्यावेळेस, त्यामुळे ठरवलंच की ही जी काही दोन दिवसाची सुट्टी मिळाली आहे त्याचा सदुपयोग करायचा आणि कुठेतरी जाऊन यायचं. कुठे जायचं हे विचारताच सगळ्यांच एकमुखाने उत्तर आलं आपल्या गावाला. आमचं गाव, कडूस. खरंतर आमचं गाव म्हणायला त्या गावात आमचं असं काहिच उरलं नव्हतं. आमच्या पिढीने तर कडूस काळं का गोरं हे सुद्धा पाहिलं नव्हतं. पण बाबांच्या आणि काकांच्या आठवणीतून कडूसचं चित्र आमच्या डोळ्यासमोर उभं रहायचं. बाबा तर कडूसचा विषय निघाला तर अजूनही आठवणीत रमून जातात. ते गावातलं आमचं घर, आमच्या बागा, शेतं, नदी, ग्रामदैवत भैरवनाथाच मंदीर, दरवर्षी होणारा पांडूरंगाचा उत्सव एक ना अनेक गोष्टींबद्दल आमच्या बाबांनी आणि काकांनी कुतुहल निर्माण केलं होतं आमच्या मनात. तसं माझ्या आजोबांनी गावं सोडलं साधारण १९३० च्या सुमारास. त्यावेळेसच्या प्रथेप्रमाणे शिक्षण झाल्यावर ते शिक्षक म्हणून मुंबईत नोकरीस लागले. आणि त्याचवेळेस खरंतर आमच्या आणि आमच्या गावात दूरावा निर्माण व्हायला सुरवात झाली. तसे वडिलांच्या लहानपणी दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत आमचे काका, आत्या सगळे कडूसला जायचे. आमच्या शेतांमध्ये यथ्थेच्छ हुंदडायचे, नदीत डुंबायचे, आमराईतल्या झाडांवर चढायचे, कैर्या तोडायचे. क्रमश:
|
देवदत्तजी, छान अगदी जिव्हाळ्याचा विषय निवडलात तुम्ही.आणि जे मनातून उतरत तेच खरे..त्याला आधी कशाला लिहायला हवे.. रविन्द्रनाथानी ६०व्या वर्षी हातात paint brush धरला होता.तुमच्यात तर आधीच एव्हढी प्रतिभा आहे.जेव्हा जसे वाटते तेव्हा तसे करावे.. always listen to ur heart. waiting for next
|
गावाच्य वेशीवरच एक मोठं प्रवेशद्वार आहे. ते प्रवेशद्वार आम्हाला जणू खुणावत होतं, सांगत होतं,” या मुलांनो, या तुमच्या गावात तुमचं स्वागत असो. बरीच वाट पहायला लावलीत रे”. त्या प्रवेशद्वारातून आत शिरताच एक ओळखीचा दरवळ जाणावायला लागला. श्वासात एक प्रकारचा मोकळेपणा वाटायला लागला. गावातला अरूंद रस्ता पाहिल्यावर वाटलं, अरे, आपण याच रस्त्यावर तर चालायला आणि सायकल चालवायला शिकलो. का कुणास ठाउक पण जरा आठवल्यासारखं झालं की हाच रस्ता पुढे भैरवनाथाच्या मंदीराजवळ जातो. मी त्या रस्त्याने पुढे चालू लागलो, बाजूची घरं माझ्याकडे कौतुकाने बघत होती. जसं अखादं मूल त्याच्या दूडक्या चालीने चालतं तेव्हां आजूबाजूचे लोक त्याच्याकडे बघतात ना, अगदी तस्सं. चालता चालता मी देवळाच्या जवळ येउन उभा राहिलो. या भैरवनाथाच्या मंदीराच्या बाजूनेच नदी वहाते. नदीचं ते संथ पण नागमोडी वळण अगदी मन मोहवून टाकणारं होतं. मी जरा वेळ त्या नदीत पाय ताकून बसलो तेंव्हा असं वाटलं की मी दिवाळीत अभ्यंगस्नानासाठी बसलोय आणि आई माझ्या पावलांना उटणे आणि सुगंधीत तेल लावून आंघोळ घालतेय. मंदीरात प्रवेश करण्याआधी ह्यापेक्षा शुद्धोदक स्नान ते कुठलं असणार, नाही का? आत मंदिरात गेल्यावर मात्र मला देवाच्या गाभार्यात जाण्याचा धीर झाला नाही. कदाचित मनात एक बोचणी होती की इतकी वर्षं सरली पण आपल्याला आपल्या गावात येता आलं नाही. शिवाय भैरवनाथाच्या गाभार्यात महिलांना प्रवेश नाही त्यामुळे जिथे माझी आई आणि बहिण जाऊ शकत नाहित तिथे मी कसा जाऊ असंही वाटलं असेल कदाचित. मी बाहेरूनच भैरवनाथाला नमस्कार करून परत फिरलो. क्रमश:
|
Meenu
| |
| Tuesday, July 18, 2006 - 2:05 am: |
| 
|
शिवाय भैरवनाथाच्या गाभार्यात महिलांना प्रवेश नाही त्यामुळे जिथे माझी आई आणि बहिण जाऊ शकत नाहित तिथे मी कसा जाऊ असंही वाटलं असेल कदाचित. हे आवडलं आपल्याला .. देवा छान लिहीतोस .. मी पण imagine करतीये की कसं वाटेल आपल्याला असं आपल्या गावी जाताना
|
|
|