Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
मनाची आंदोलने ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » आषाढ » ललित » मनाची आंदोलने « Previous Next »

Mrudgandha6
Saturday, July 15, 2006 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनाची आंदोलने..

१.

बरेच दिवस धुळीने माखलेल्या एखाद्या काचेच्या खिडकीला अचानक बरसणार्‍या पावसाने लख्ख धुवून काढवं तसं अगदी तसंच कधीतरी काहीतरी मनाला धुवून काढतं.. अन् मग सगळंच कसं स्वच्छ दिसू लागतं ते दिसणंच शब्दात पकडण्याचा हा इवलासा प्रयत्न..

शांत तळ्याकाठी बसणं मला फ़ार आवडते जिथं इतर कसलाही गोंगाट ऐकू येत नाही.फ़क्त शांततेचा मधुर स्वर मनात आणि मनाबाहेर निनादत असतो.. हो शांततेलाही स्वर असतो..खरं तर सूर असतो.. अशावेळी मी माझं अस्तित्वच विसरुन जाते..कुठेतरी हरवून जाते. पण हे हरवणे खरंच हरवणे असते का

घनश्यामाने त्याच्या बासरीला स्पर्शावं आणि तिनेही स्वत्व विसरुन अन्तरंगात फ़क्त त्यालाच स्थान द्यावे तर कसे मधुर स्वर उमटतात.. किती निस्वार्थ असते ती आणि अहंकारापासून किती अलिप्त.. तिने स्वतचा आत्मा फ़क्त सावळ्यासाठीच समर्पित केलेला असतो.. किती खुल्या हृदयाची असते ती स्वतत सामावणार्‍या प्रत्येक झुळुकेला तेवढ्याच आपुलकीने प्रवेश देते.. ति त्यांचे सूर होवुण बाहेर जाणेही किती निर्मोही पणाने स्विकारते.. हिच तिचि अन त्या सवळ्याची निर्मोही एकरुपता संगित म्हणुन बाहेर पडते..
असचं काहीसं होतं माझ्याहीबरोबर कधी कधी..जिथं माझा 'अहं ' मी विसरून जाते तिथं 'त्याच्या' अस्तित्वाशिवाय काहीच उरत नाही..उरते ते केवळ अप्रतिम शाश्वत सौन्दर्य आणि मधुर संगित..म्हणुनच हे हरवणं 'हरवणं' नसतं

असच हरवून जावं कारण हरवल्याशिवाय स्वतचा शोधच लागत नाही.

..मृद्गंधा



Mrudgandha6
Saturday, July 15, 2006 - 6:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


२.

वयाच्या या टप्प्यावर, कधी विचार येतो एक तपाहून जास्त काळ लोटला अबोध मनाचा काळ उलटून या सरत्या वर्षांत आपण काय केले? स्वत.ःची प्रगती केली का? काही सृजनशील घडवले का? का ती सारी वर्षे निरर्थक गेली?
जगणं म्हणजे कसं निखळ निर्मळ खळाळात्या झर्‍यासारखे असावे..स्वः आनंदी राहून आनंद वाटत फ़िरणारं स्वत.ःचा ऊत्साह भरभरुन वाटत वाहणारं झर्‍यासारखे वाहणे जमणार नसेल तर निदान शांत संयमी तळ्यासारखं तरी असावे..ज्यात असंख्य कमोदिनी रममाण असाव्यात..आणि इतकं स्वच्छ की त्यातुन आरपार दिसावं

मला जमलं का असं झरा होवून वाहणं किंवा त्या शांत तळ्यासारखे तरुवेली फ़ूलवणे.. ?
कधी कधी वाटते मी एक डबकं झालेय वाहणच विसरुन गेलेय. आणि मनात एव्हडे मळभ साचलेत की स्वच्छ आरपार असे कहीच दिसत नाही..काही स्वतचे अवगुण तर काही इतरांनी केलेल्या जखमांनी कसं गढूळ झालेय माझे मन शेवाळलेले झालेय..

आधी असे नव्हते.. पण, कळत नकळत त्यात कचरा साठत गेला.. कधी अहंकाराचे रुप घेवुन कधी क्रोध लोभाचे रुप घेवुन.. आळस तर भरुन उरलेला..
कळायचे आपले काहीतरी चुकतेय पण, म्हणावे तसे वळत मात्र नव्हते..तसंच अलिप्तपणे पडून रहायचे मन दुःख कवटाळत बसायचे..त्यावेळीही वाटायचे की हा कचरा बाजूला सारावा..पण, जमलं नाही नव्हे मी कधी जमवले नाही.

पण एक दिवस
एक दिवस असे काय घडले की वाटले आताच्या अत्त मला स्वच्छ झर्‍यासारखे व्हायचय.. सगळे मळभ दूर सारुन..
एक पवित्रतेचा तेजाचा पुन्जकाच मला स्पर्शून गेला. ' एव्हढं सुंदर ही काही असू शकतं पाहिले तर खरच असं वाटले की 'ते' रुप हृदयात साठवून थेवावे.. पण. पण आड आले ते माझे गढुळ्पण..

त्याची दिव्यता एव्हढी मोठी उदात्त आणि मी शुद्रातीशुद्र.. त्याच्यापुढे मान वर करुन पाहीले तरी नजर त्याच्या नखापर्यन्त्देखील पोहचत नाही.. अशावेळी वाटते की आत आत विरुन जावे.. आणि पुन्हा नव्याने उगवावं त्यावेळी एव्हढं निर्मळ असावं की त्याच्यापुढे नतमस्तक होताना कुठलाही न्युनगंड मनात येवूच नये.. कसलीही लाज वाटु नये उजळ मनाने त्याला सामोरे जावे.
आसे म्हणतात.. पश्चात्तप सारी पापे धुवून काढतो.. खरे असेलही पण. त्याला प्रयत्नान्चीही जोड हवी..

मला एव्हढं शुद्ध व्हायचाय की त्याचे पवित्र प्रतिबिंब माझ्यात लख्ख दिसावं.

असे म्हणतात जिथं जाग तिथं सकाळ..आणि माझी सकाळ आता सुरु झाली आहे..

..मृद्गंधा.


Robeenhood
Sunday, July 16, 2006 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृदगंध, अति सुंदर!!
लगे रहो!!


Chaukatcha_raja
Sunday, July 16, 2006 - 1:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृद्गंधा,

केवळ अप्रतिम !

फारच सुरेख !!


Kmayuresh2002
Sunday, July 16, 2006 - 11:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृदगंधा, सुंदर लिहीलयस.. मस्तच!!!

Dineshvs
Sunday, July 16, 2006 - 11:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान आहे ललित, मृद्गंधा

Bee
Monday, July 17, 2006 - 12:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही भाग.. काही ओळी छान लिहिल्यात. काही काही खूप काल्पनिक पण वाटतात.

Limbutimbu
Monday, July 17, 2006 - 2:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान पण अवघड विषय हे! :-)
मला समजायला कठीण जातय!


Mrudgandha6
Monday, July 17, 2006 - 3:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

३.

बोलाची कढी अणि बोलाचा भात

अरे ! श्रावण अला की..दिवस कसे फ़ूलपाखरासारखे उडून जातात कळत देखील नाही..कधी हातात येतात अणि कधी जातात.आपण आपले नुसते डोळे फ़ाडून दिनदर्शिकेकडे पहात राहतो..कुणीतरी खाडकन जाग केल्यासारखे.आणि या धावपळीत ठरवलेली कामे मात्र अजुन तशीच असतात.कही सुरुही झालेली नसतात आणि काही सुरु होवून अर्धवट

किती ठरवले होते..या पावसाळ्यात इथल्या रस्त्यच्या दुतर्फ़ा झाडं लावायची.कशी छान दिसतील..त्यावेळी बसले होते पावसाची वाट बघत.. आणि आता पाउस सुरु होवून महिना उलटला आणि झाडं रुजली उगवली वाढली पण स्वप्नातच..

हे असच होतं माझं आणि मग होते बोलाची कढी आणि बोलाचा भात
शेखचिल्लीसारखे..

मला घड्याळाला बांधलेलं आवडत नाही पण अगदीच बेशिस्तपणाही नको असतो म्हणुन कितीवेळा नियोजन केलेय पण कसचं काय..२-३ दिवसांत पुन्हा येरे मझ्या मागल्या”

रोज ठरवते उद्यापासुन पहटे रियाज्” आणि ध्यान्” करायचे पण,हा उद्या” अजून यायचा आहे. आजकाल माझी पहाटच काय पन सकाळ ही मऊ रजईतच उगवते.. माझ्याएवजी माझा मेंदूच ध्यानस्थ असतो आणि एकदा उशिर झाला की मग कितीतरी विधायक कामे अस्पर्शच रहातात.

एकदा एक गोष्ट मनात ठान मांडून बसली की मग इतर कामांकडे माझे दुर्लक्ष होते. परवा काढलेलं राधाकृष्णाचे चित्रही असच त्यांच्या मुखावरच थांबलय..

आणि मग मनात द्वंद्व चालु होते.स्वतचा राग येतो. असे झालेकी मग माझे कृष्ण्” माझ्याकडे बघून हसत रहातात. नाही मी कृष्णाला आदरार्थी संबोधलेले नाही.तर त्यान्ची ओळख अशी.. कृष्ण नं १ म्हणजे आपला गोपालकृष्ण, शाम,माधव इ. अनेक नावे असलेला. तसे सगळे निर्गुण निराकार परब्रह्म आणि त्याची सगळी साकार रुप मला तेव्हढीच प्रिय अहेत आणि मी त्यान्च्याशी मोकळेपणाने बोलतेही पण कृष्ण म्हंटले की मी जरा जास्तच खुलते त्याच्यापुढे..लहानपणापासुनच..लहानपणी मुलं गोष्टींची पुस्तके वाचतात मी कृष्णचरित्र वाचायचे..वेड लावले होते मला त्याने.मझ्या room मध्ये तो गायीच्या पुढे उभा राहून बासरी वजवन्यात अगदी डोळे मिटुन तल्लीन झाला अहे. आई म्हणते तो मझ्याबरोबर लग्नानंतर सासरीसुधा जाणार.. अर्थातच!
तर हा कृष्ण नं १ मझा बंधू सखा,मित्र सगळच..
आणि कृष्ण नं २ शी माझे नाते तेच आहे जे मीरेचे तिच्या कृष्णाशी आहे..
या दोन्ही कृष्णांत मला यत्किंचीतही फ़रक वाटत नाही.. त्या गोपाळकृष्णाच्या मुर्तीबरोबरच कृष्ण नं २ चा फ़ोटो आहे.तर हे दोघेही मझा हा अस्त्याव्यस्त करभार बघून मिश्किलपणे हसत रहातात. मी बिचारी त्यान कही उत्तर देवू शकत नाही करण माझी चुक असतेच वर ते दोघेही आदर्शाचे कळस मग काय बोलणार.

आजही दोघेही माझ्याकडे बघून खट्याळपणे हसले आणि मला विचारले ” काय गं आजही बोलाचीच कढी काय ?”
मिही आधी हसेले आणि त्यानंतर पापण्याच्या ओल्या कडा हळूवार पुसतानान.. उगाचच मनात दोन ओळी तरळुन गेल्या..
” एक वो है के जानिब्-ए-मन्झिल पहुन्च गये और एक हम है की बस राह्गुजर देखा किये. ”
मलाही ध्येय गाठायलाच हवे आणि वेळ निसतुन जाण्या आधी पाउल पुढे ताकायलाच हवे.

..मृद्गंधा.





Mrudgandha6
Monday, July 17, 2006 - 4:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुप खुप धन्यवाद robeenhood ,चौकटचा राजा, लिम्बुटिम्बु दिनेश्जि आणि मयुरेश.

bee ,
बरोबर आहे तुझे तुला कही भाग काल्पनिक वाटला असेल.पण हे वाच.
The little space within the heart is as great as the vast universe. The heavens and the earth are there, and the sun and the moon and the stars. Fire and lightening and winds are there, and all that now is and all that is not. --The Upanishads
तुझ्यासठि ही एक कल्पना असेलही पण माझ्यासठि तो एक प्रत्यक्ष अनुभव आहे.कधी कधी सत्य कल्पनेपेक्षही सुन्दर अद्भुत असते फ़क्त ते पहायला तशी नजर ठेवावि लागते.धन्यवाद असाच प्रतिसाद देत रहा


Lopamudraa
Monday, July 17, 2006 - 4:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mast lihilay mrudagandhaa.. .. .. .. .. ..

Iasanil
Monday, July 17, 2006 - 8:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vaa lay bhari lihilay. te aadhiche likhan mal majhech vatle. mhanje ki majhych bhavna tithe vyakt hotanna dislya.
Thanks asa sundar likhan far kami sapdata.......




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators