Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 14, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » आषाढ » काव्यधारा » कविता » Archive through July 14, 2006 « Previous Next »

Mi_anandyatri
Thursday, July 13, 2006 - 6:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्रूंचे गाणे मजला आता हवेसे वाटते
झाकोळणे चांदणीचे आता हवेसे वाटते १
रंगला भोवताली माणसांचा रम्य सोहळा
गर्दीचे एकटेपण आता हवेसे वाटते २
सप्तसुरांशी जोडले मी मनाचे खोल नाते
सूर आठवे शांततेचे आता हवेसे वाटते ३
माथ्यावरली ही निळाई धुंद झाली मध्य-रंगी
दुरंगी चित्र अवघे आता हवेसे वाटते ४
दरवळे आसमंत जागणार्‍या या फुलांनी
फूल शुष्क तगराचे आता हवेसे वाटते ५
शब्द ना जुळले तरी कुंभ झाला भावनांचा
प्रतिबिंब माझ्या सांत्वनाचे तेथे हवेसे वाटते ६


Devdattag
Thursday, July 13, 2006 - 6:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>शब्द ना जुळले तरी कुंभ झाला भावनांचा
प्रतिबिंब माझ्या सांत्वनाचे तेथे हवेसे वाटते ६
अप्रतिम.. सुंदर

Princess
Thursday, July 13, 2006 - 7:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृदगन्धा तु म्हणजे अगदी वादळ आहेस.... पाउस आहे.... काय भन्नाट लिहितेस तु. व्वा!!!

Mrudgandha6
Thursday, July 13, 2006 - 8:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks friends. thanks princess..i got overwhelmed for a while after reading ur comments.
anandyatri...apratim!!

Himscool
Thursday, July 13, 2006 - 8:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांच्या कविता अप्रतिम आहेत...

Devdattag
Thursday, July 13, 2006 - 8:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृदगंधा कविता सुंदर आहेत तुझ्या..
मीनु.. वाडा मस्त बांधला आहेस
मृदा.. छान आहे गं


Zaad
Thursday, July 13, 2006 - 8:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नचिकेत, भन्नाट आहे गज़ल. फक्त एक सुचवतो, शेवटच्या शेर मधे
"प्रतिबिंब माझ्या सांत्वनाचे आता हवेसे वाटते"
असं केलं तर ते मीटर मधे बसेल.


Mi_anandyatri
Thursday, July 13, 2006 - 9:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे मित्रा, ती गज़ल नाहीये... म्हणजे गज़लेसारखी वटते आहे, पण, गज़ल नाही...

Mrudgandha6
Thursday, July 13, 2006 - 11:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रमैत्रिणींनो,
इथं येवून मला फ़ार तर चार दिवस झाले पण या दिवसांत मल इथं जे अपार प्रेम मिळाले आहे त्याने अगदी मन भरुन आलेय माझे.त्यामुळे मला इथ काही बोलावेसे वाटतेय..
माझ्या काव्यलेखणाला इतका छान प्रतिसाद दिला तुम्ही माझ्या बोबड्या बोलांना आपले मानलेत या बद्दल तुमची मनापासून आभारी आहे."माझ्या कवितांना न व्याकरणाचा गंध ना छंदवृत्तांशी तिचा काहि संबंध.." पण मला वाटते कि भावना महत्वाच्या.. शब्द कुठलेही वापरा त्यांच्यातून संवाद साधने महत्वाचे.. ओबडधोबड पन अतिशय मनस्वीपणाने वाहणार्‍या झर्‍यासारख रहाणे मला आवडते.खरं तर मला भ्रमरवृत्तीने.. सगळ्याच फ़ूलांचा मधुकर चाखायला आवडते..त्यामुळे मी मनात येइल तसे वाहते.. कधी मराठीत तर कधी हिंदी-ऊर्दू इंग्रजी असा कुठेही माझा प्रवास सुरु असतो..मी आजकाल मराठीपेक्षा हिंदीत जास्त लिहीते..पण आपल्या मायबोलीचे प्रेम ते मायेचे प्रेम.. आणि मला ते मिळाले याबद्दल मी भाग्यवान समजते स्वतला..धन्यवाद. असेच उत्तरोत्तर तुमचे प्रेम मझ्यावर बरसत रहवो हीच प्रार्थना..मृद्गंधा


Mruda
Friday, July 14, 2006 - 12:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


पूर्णं उमललीच नाहीत
ती फ़ुलं..
तशीच राहिली अर्धबोल
काळ थांबल्यासारखी..

त्यांच्या उमलण्याची
वाट पहात..
मी मात्र थांबलेली
आयुष्य थांबल्यासारखी..

मृ



Bee
Friday, July 14, 2006 - 1:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mruda, nice poem. Keep it up.

Mruda
Friday, July 14, 2006 - 1:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



काही क्षणांना
होऊन तू पुरुष
मला सुंदर स्त्रीत्व द्यावं..
उरलेल्या बाकी
क्षणांना मात्र
तुझ्या स्पर्शानं वात्सल्य व्हाव..१.

व्यक्त होणार्‍या
शब्द-स्पर्शांच
शरीर फ़क्त माध्यम असावं..
पण त्याही अनुभूतित
खोल दडलेल
अशारिर प्रेमच असावं..२.

कधी तू रुसावं
कधी मी हसावं
गोड जिव्हाळ्यानं नातं जपावं..
बघण्या-बोलण्यात
हसण्या-रागवण्यातही
प्रेम, प्रेम आणि प्रेमच असावं..३.

असा तू, तशी मी
तसा तू, अशी मी
वगळेपण जपत एकरुप व्हावं..
साथीनं अशी
वाट चालतांना
आयुष्य लख्खं उजळून जावं..४.

मृ



Antya
Friday, July 14, 2006 - 2:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पावसात न्हाली
माझी मायबोली
शब्दांना ओलावा सोसवेना

घरात ऊमटली
ओली पाऊले
निथळते आभाळ झाकोळले!

माजघरात झाले
भावनांचे तळे
झरोक्याचे गाणे कोंडलेले!

समईची वात
माझी मायबोली
देव्हार्‍याची खोली मोजवेना


Mrudgandha6
Friday, July 14, 2006 - 2:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ,
अतिशय अप्रतिम आणि खरच सुन्दर
अशारिर प्रेम तेच तर उदात्त आणि अभंग असते.. छान अगदी माझ्यासरख्याच कल्पना आहेत तुझ्या..द्वैत जपतानाही अद्वैत अनुभवने.. हेच तर प्रेमाचे वरदान आहे.तिच तर प्रेमाची गंमत आहे

अनन्तजी,
अतिशय सुन्दर



Me_anand
Friday, July 14, 2006 - 5:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वप्नात आलीस तू

स्रुष्टीस न्हाऊ घाली
ती धार चान्दण्याची
त्या शुभ्र चान्दण्यात
न्हाऊन आलीस तू

शुभ्र नक्शत्रमोती
आज तेजाळलेले
हार त्या मोतियान्चा
लेऊन आलीस तू

त्या गूढ शान्ततेने
रात्रीस वेढलेले
त्या मूक सन्गिताची
पैन्जणे ल्यालीस तू

बागेत बान्धला मी
रातराणीचा झुला
मदमस्त एक झोका
घेवून आलीस् तू

कोणास ना कळाले
गूज माझ्या मनीचे
ती तार छेडावया
धावून आलीस तू


Jo_s
Friday, July 14, 2006 - 5:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे दोन मृं ची टफ फाईट चालल्ये.

वा दोघींच्याही कविता मस्त. अगदी भिडणार्‍या

Mruda
Friday, July 14, 2006 - 6:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

jo_s फ़ाईट कसली.... एकमेकांच्या आनंदात सहभागी होणं आहे हे....

मृद आज वेळ कढुन backlog भरुन कढला... खरंच सुंदर लिहीतेस तू.... एकेका कवितेवर बोलायला आवडेल मला पण बघु कस जमतय ते...

देवा... खुप छान गुरुपुजा केली आहेस...

मीनु तुझी "अतृप्त" आवडली...

लोपा.. सगळच फ़ार छन...

निनावी.... तुझ्या भिजणार्‍या उशीने मनही भिजवलं....


Jo_s
Friday, July 14, 2006 - 6:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृं नो
तुमच्या या कवितां मुळे मला मझ्या जुन्या चारोळ्या आठवल्या

मना मना तील मिटता अंतर
प्रश्ण कशास देहाचा
तू अन मी हे शब्दही गौणच
खेळ हा सारा अद्वैताचा
---------------
मनं एकदा जुळली की
हे असच घडणार
दुर शरीरं जातात
मनात अंतर कसं पडणार

सुधीर


Mrudgandha6
Friday, July 14, 2006 - 8:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

jo_s अरे कृपा करुन इथेच type करत जारे मला फ़क्त चौकोन दिसतात नाहीतर..मग मला आस्वाद कसा घेता येनार तुमच्या कवितांचा?
so plz be kind





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators