रचना सगळी चित्रे पाहिलित.. छान आलीत... आणि रुपेश मलाही कर्ण काही केल्या पाठमोरा नाहिये हे समजत नाहिये.. (मला तो पाठमोराच वाटतोय)...
|
रूपेश.. अप्रतिम चित्र आहे.. रंगसंगती उच्च.. रचना सहिच आहे मूरलीधर.. लोपा.. जर कर्ण पाठमोरा आहे असं इमॅजिन केलं तर तो फक्त खाली बघतोय असं वाटतंय.. आणि सामोरा आहे असं पाहिलं तर खिन्न, हताश कर्ण वाटतोय..
|
Moodi
| |
| Thursday, July 13, 2006 - 8:59 am: |
| 
|
रुपेश तुमच्या या अजोड कलाकृतीची नक्की कोणत्या शब्दात तारीफ करावी? मोठा प्रश्नच उभा केलात तुम्ही. रचना जमेल तेव्हा बालकृष्णाच्या तसविरीत रंग भर गं. अतिशय मोहक अन गोड आहे. 
|
rupesh, great.. atishay sundar
|
Himscool
| |
| Thursday, July 13, 2006 - 11:05 am: |
| 
|
रुपेश, एकदम सही.... मृत्यूंजय वाचताना कर्णाबद्दल एक चित्र डोळ्यासमोर उभे राहते.. त्यात हा कर्ण एकदम फिट बसतो आहे... (तू क्लास घेतोस का रे बाबा चित्रकलेचे?)
|
Asami
| |
| Thursday, July 13, 2006 - 11:58 am: |
| 
|
भन्नाट आहे रे कर्ण Just too good
|
Jaaaswand
| |
| Thursday, July 13, 2006 - 12:21 pm: |
| 
|
रूपेश... मानाचा मुजरा रे तुला.. कर्णाच्या जीवनातल्या शेवटचा अध्याय अगदी चपखल रंगसंगतीत बसवलायेस... Absolute fantastic !!! मृत्युंजयची पारायणे झालीयेत रे... तू दिलेले स्पष्टिकरण पण अगदी योग्य आहे.. " हारण्यासाठी " उभा राहिलेला एकच वीर.. तुझे चित्र बघून.. अजून एक कल्पना स्पर्शून गेली.. नाईलाजाने आईला पोरका होणारा " राधेय " शेवटी आपल्या पिताश्रींकडे आश्रय मागतोय.. .. " मला जवळ घ्या " म्हणत चू.भू.दे.घे.
|
Dineshvs
| |
| Thursday, July 13, 2006 - 2:08 pm: |
| 
|
जास्वंद मलाहि तो सुर्याकडेच जातोय असे वाटले. रुपेश फारच छान. महाभारतात तर असे अनेक प्रसंग आहेत, तुला स्फुर्ती देणारे.
|
Paragkan
| |
| Thursday, July 13, 2006 - 2:51 pm: |
| 
|
खल्लास रे ! 'कर्ण' केवळ ...!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
|
रूपेश एक अन एक चीज उतरली आहे चित्रात. रंग, सावल्या आणि पाठमोरे कर्ण. जादू आहे तुझ्या हातात. जास्वंद कल्पना छानच आहे तुझी... त्याला ब्रह्मास्त्रासाठी मंत्र आठवत नाही कारण त्याला तसा एका ऋषींकडून शाप असतो. त्यानी एका ऋषींकडून स्वत: ब्राह्मण आहे असं सांगून विद्या घेतलेली असते. एकदा ते कर्णाच्या मांडीवर डोके ठेऊन झोपले असताना त्याच्या मांडीवर एक मोठा कोळी चढतो आणि त्याची मांडी पोखरत आत जातो. गुरूंची झोपमोड होईल म्हणुन तो दंश सहन करून जरासुधा हालत नाही. जेव्हा त्या ऋषींना जाग येते आणि त्यांना हे कळतं तेव्हा ते म्हणतात की ब्राह्मणाला इतकी सहनशक्ती असूच शकत नाही तू खोटं बोललास. असं म्हणुन ते कर्णाला शाप देतात की तुला अगदी हवा असेल तेव्हा मंत्र आठवणार नाही. त्या ऋषींचं नाव आठवत नाही. चु. भु. द्या. घ्या.
|
Bhaguram
| |
| Friday, July 14, 2006 - 1:13 am: |
| 
|
shekchilly हे चित्र मी फोटोशॉप मध्ये ड्रॉ केले आहे. 
|
चान्गल हे रे भागुराम, ओरिजिनल चित्राचा साईझ काय हे?
|
शेवटच्या क्षणी कर्ण तलवारीने लढला की धणुष्यबाणाने >> हा एका प्रतिभावंत चित्रकाराच्या अस्मितेचा प्रश्न आहे >> बी, त्याने रुपेशच्या अप्रतीम कलाकृतीला काही फरक पडणार नाही असे मला वाटते.
|
केपीला अनुमोदन.. चित्रकार हा इतिहासकार किंवा पौराणिक गोष्टींची बिनचूक माहिती असणारा असावा असे नाही.. btw कर्णाची मांडी भुंग्यानी पोखरली ना
|
Bee
| |
| Friday, July 14, 2006 - 5:13 am: |
| 
|
फ़रक नक्की पडतो कांदेपोहे कारण तुम्ही जी हकीकत आहे तिचे संदर्भ बदलण्याचा प्रयत्न करत अहात. चित्रकार जर काल्पनिक दृष्य नजरेसमोर ठेवून चित्र काढत असेल तर ठीक आहे पण इथे कर्ण ही काल्पनिक बाब नाही.. ती एक हकीकत आहे. त्यामुळे तुमची कलाकृती कितीही मोठी का असेना अशा चुका कलाकाराच्या अस्मितेला नक्कीच घातक ठरतात. आणि ही बाब फ़क्त चित्रांपुरतीच मर्यादीत राहत नाही तर प्रत्येक कलाकृतीची निर्मिती करताना कलाकाराने संदर्भांचा जरूर विचार करावा जर त्यांचा तुमच्या कलाकृतीशी काही संबंध येत असेल तर..
|
Bee
| |
| Friday, July 14, 2006 - 5:20 am: |
| 
|
देवदत्त असे जर असेल तर मागे M.F.Hussain ह्यांच्या चित्रांवर ज्या जहाल प्रतिक्रिया उमटल्या होत्या की त्यांनी हिंदू देवीदेवतांचा अपमान केला तो सर्व वाद मग निरर्थक मानायला पाहिजे. जर तुमच्या कलाकृतीला facts/references चे महत्त्व वाटत नसेल तर खुलेआम हुसेनचे चित्र मग ते शील असो वा नसो निर्विवादपणे त्यांची कलाकृती स्विकारायला पाहिजे.
|
बी.. नीट वाच रे पोस्ट माझं मी बिनचूक माहिती म्हंटलय.. आणि ही वाद घालायची जागा नाही, हा बीबी चित्रकलेचा आस्वाद घेण्यासाठी आहे त्यासाठी आपण त्या बीबीवर जाऊ.. म्हणजे तू जा..
|
Bee
| |
| Friday, July 14, 2006 - 5:32 am: |
| 
|
तुम्हाला अनुमोदन नाही म्हणून मी वाद घालतो असे नाही देवदत्त. ज्या बीबीवर तुम्ही प्रतिक्रिया देता त्याबीबीवरच्या प्रतिक्रियांना तिथल्या तिथे उत्तर देता येते. त्यासाठी अन्य बीबीवर जायायची गरज नाही. एखादा मुर्तिकार गणपतीला सिंहावर आणि सरस्वतीला उंदरावर बसवेल तर नक्कीच त्याच्यावर आक्षेप घेतला जाईल. तेंव्हा तुम्ही असेच म्हणाल का त्या मुर्तीकाराला देवतांच्या वाहनांची बिनचूक माहिती असायची गरज नाही.. जाऊ दे.. अपनी अपनी मर्जी..
|