Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
सईद

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » आषाढ » ललित » सईद « Previous Next »

Yog
Thursday, July 13, 2006 - 6:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सईद

सय्यद x x x इतके मोठे नाव असल्यावर अमेरिकेत त्याचे सईद होणे अगदी सहाजिक होते. युनिवर्सिटीत सईदचे अन आमचे दोघान्चे एकच ऑफ़िस. सईद माझ्या एक सेमिस्टर आधि आलेला. एकाच department एकाच program अन दहा बाय दहा च्या एकाच स्टुडन्ट ऑफ़ीस मधे असूनही अगदी सुरुवातीलाच आमच्यात एक स्पष्ट भौगोलिक दरी होती. सईद पाकिस्तान्चा अन मि हिन्दुस्तानचा. घरापासून दूरदेशी आल की देशाभिमान अधिकच जागृत होतो बहुदा त्यामूळेच असेल, सईदशी कामाव्यतिरीक्त कधी बोलणे होत नसे. एखादी assistantship उपलब्ध असेल तर ती पहिले भारतीय विद्यार्थ्याला मिळावी अशी आमची मनोमन इच्छा, किम्बहुना पाकड्याना मिळू नये म्हणून प्रयत्नही. स्वताबरोबरच इतरान्च्या अडी अडचणी बद्दल जागरूक असताना सईदच्याही अडचणीन्बद्दल कधी मनात चिन्ता निर्माण झाली नाही याच कारण वर्षानुवर्षीच्या भारत पाकीस्तान विद्वेशात दडले आहे असे वाटते. कट्टरतावाद किव्वा अतीरेकीपणा एकदा अन्गात भिनला की माणुसकीचे सन्दर्भ बदलतात बहुदा. अर्थात त्या वयात अन त्या काळी इतका सन्तुलित विचार तर सोडाच पण परदेशीय अन परकीयाकडे फ़क्त एक मनुष्य म्हणून बघायची वृत्ती अन्गी असण हे abnormal असल्याच लक्षण असे. कदाचित सईद हा पाकिस्तानी सैन्यातील अधिकारी अन त्यान्च्या शिष्यवृत्तीवर इथे सहकुटुम्ब येवून रहात होता शिकत होता त्याविरुध्ध आम्ही बरेच जण एकेक पैसा जोडण्याची धडपड करत होतो बहुदा कुठेतरी याचाही द्वेश किवा राग या सर्वाच्या मूळाशी असावा.
सईदशी पहिला मनमोकळा संवाद घडला त्याचा thesis defense होता तेव्हा. एक अडलेली शन्का त्याने मला विचारली अन दिवस रात्र एक करून त्याचे ते थेसिस लिहीणे पाहून मिही मदत केली. तेव्हापासून सईदशी अधिक परिचय झाला, त्याची ओळख झाली.
सईद म्हटल तर पाकिस्तानचा म्हटल तर नाही. पेशावर च्या जवळ NW frontier च्या आसपास, अफ़गाणीस्तान ला लागून एका छोट्या गावातील तो पठाण. "लाले की जान" म्हणत आमच्यातील चर्चेच्या प्रत्त्येक वाक्याची सुरुवात तो करत असे. एक टिपिकल पठाणी ऍक्सेन्ट, मजबूत शरीरयष्टी, लाल गोरा, मध्यम वयाचा सईद पाकिसतानी सैन्यात मोठा अधिकारी होता. तसे तेथिल बरेच अधिकारी सैनिकी शिष्यवृत्ती घेवून पुढील शिक्षणास अमेरीकेत येतात अन बरेच जण इथेच कायम रहातात. पाकिस्तानात मुशर्रफ़ ने लष्करी कारवायी घडवली तो दिवस माझ्यासाठी वेगळ्या अर्थाने लक्षात आहे. त्या दिवशी प्रथमच त्या पठाणाला मी त्याच्या इथल्या घरी अन पाकिस्तानला दिवसभर frantic calls करताना पाहिले. नवाज शरिफ़ान्चा सईद हा साडू. मुशर्रफ़ ने नवाज शरीफ़च्या जवळ जवळ सर्व सैनिकी अधिकार्‍याना, नातेवाईकाना देखिल तुरुन्गात कोम्बले होते त्यात सईदचे अनेक मित्र अन सगे सोयरे होते. रातोरात त्याचे जग बदलले होते. सैन्यातील त्याची शिष्यवृत्ती त्या दिवशी सम्पली अन पाकिस्तानात परत जायचे रस्ते ही. "ना घर का ना घाट का" अवस्थेत सापडलेला सईद अन त्याचे कुटुम्ब, त्याची पत्नी अन तीन सुन्दर गोजीर्‍या मुली. त्याच दरम्यान मुम्बईतील दन्गली वगैरेचा अनुभव असल्याने सईद कुठल्या परिस्थीतीतून जात होता याची कल्पना होती.
"उस्ताद (सईद चे हे मी पाडलेल नाव अजूनही त्याच्या मागे कायम चिकटून आहे) कुछ भी मदद चाहीये तो बेहिचक बोल दो..." मि म्हटले.
" Thanks गुरू (हे बदल्यात सईद ने मला दिलेल नाव), बहोत बहोत शुक्रीया", म्हणून भरल्या डोळ्यानी त्यानी माझे आभार मानले होते.
खर तर त्या दिवसापासून सईद अन माझ्यात माणुसकीच नात जोडल गेल ते आजतागायत. अनेक प्रकारे आम्ही एकमेकाना मदत केली, करतो. रमझान च्या दिवसात न चुकता उपवासाचे सर्व कडक नियम पाळणार्‍या सईदची आम्ही मित्र मस्करी करत असू, "क्यू उस्ताद आपके लिये कुछ ठन्डा गरम लाऊ?, मै canteen मे जा रहा हू", असे मुद्दामून विचारत असू. तोही तितक्याच खेळकरपणे, गुरू तुम बहोत बदमाश हो म्हणत दुर्लक्ष करे.
कारगिलाच्या युध्धाच्या वेळी पुन्हा एकदा दोघान्च्यात तणाव निर्माण होईल असे वाटत असतानाच एका विचीत्र विरोधाभासाने दोघेही घट्ट बान्धले गेलो होतो - "क्या करे गुरू तुम्हारे भी मर रहे है और हमारे भी. दो मुलको के झगडे मे लोग मर रहे है.." यावर आमच एकमत होत. लढाई कुणि कधी का सुरू केली हा वादाचा मुद्दा असला तरी घडतय ते चूक आहे यावर तरी दूमत नव्हतं. आमच्या नकळत आमच्यावर लादले गेलेले असे अनेक चढ उतार एकत्र पचवून आम्ही आमची मैत्री कायम टिकवली.
सईदचे कुटुम्ब तसे पुढारलेले म्हणता येईल. खर तर इथे आलेले बरेच पाकिस्तानी तसे असतीलही. ज्या इस्लाम मधे गाणे बजावणे निषिध्ध(?) मानले जाते तेथे उस्ताद च्या कुटुम्बात भारतीय चित्रपट, शाहरुख खान वगैरे सर्व प्रीय आहेत, आवर्जून पाहिले जातात. आपल्या कडच्या बर्‍याच रेसिपीज बेगम ला येतात अन आवडतातही. एक मात्र खरे आहे पठाण दिसतो तितका भोळा नसतो. मुशर्रफ़ ची सर्व अन्डी पिल्ली सईद ला ठावुक आहेत. सप्टेम्बर अकरा नन्तर आजपर्यन्त अफ़गाणीस्तान, इराक मधे घडणारे सर्व तमाशे पाहताना सईद म्हणतो, "हे जगाला उल्लू बनवण्याचे धन्दे आहेत, अन्दरकी बात कुछ और है". ओ.बी.ला. अन कम्पू कुठे आहे (पाकिस्तानात) हे तो नेमके सान्गू शकेल अन आय एस आय मधे कोण काय उचापात्या करते हेही त्याला ठावूक आहे, असते. सप्टेम्बर अकरा नन्तर विमान प्रवास करायचा तर फ़ार झन्झट आहे एव्हडीच त्याची तक्रार असते, आज त्याचे सय्यद हे नाव सर्व विमानतळावर अधिक सुरक्षा चाचणीत त्याला अडकवण्यास, प्रसन्गी नागवे करण्यास पुरेसे आहे. तरिही सईद अमेरिकेतच आपल्या सर्व मुला बाळाना वाढवणार व इथेच कायमचा राहणार यातच "सर्व काही" आले. त्यामागची जी काही कारणे अन हतबलता आहे ती भारत किव्वा इतर बरेच देश सोडून अमेरिकेत वास्तव्य करणार्‍या लोकान्साठी थोड्याफ़ार फ़रकाने प्रातिनिधिक आहेत असे वाटते.
सईद चे शिक्षण सम्पले तो मोठ्या नामान्कित कम्पनीत कामावर लागला. मागाहून माझेही शिक्षण सम्पले अन कामाच्या शोधात असताना सईदने पुन्हा एकदा मदतीचा हात दिला. "गुरू मैने अपने बॉस से बात की है तुम बस आ जाओ और इन्टरव्यू देदो. तुम तो अपने फ़िल्ड के गुरू हो, जॉब तो मिलेगा ही".
खर सान्गायच तर त्यावेळी सईदचे ते शब्द अन परदेशात येताना, "मुला सुखरूप रहा आमचे आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहेत", असे घरच्यान्चे शब्द यात काही फ़ार फ़रक वाटला नाही, माझ्या सारख्या इथे शिक्षण घेवून, धडपड करून काम मिळवलेल्या अनेक जणाना त्या भावना निश्चीत समजतील. मग पुन्हा एकदा दैवयोगाने मि अन सईद सहा वर्ष एकाच कम्पनीत कामाला होतो. कारगिल युध्ध, भारत पाकिस्तान मधे सतत चालणारे वाद या सर्वाच्या पार्श्वभूमीवर कम्पनीत अन ऑफ़िसमधे माझी अन सईदची दोस्ती हाही गोर्‍यान्च्या कुतुहलाचा विषय. आम्हीही दोघे एकमेकान्ची यथेच्च मस्करी करू. काश्मिर विषय दोघान्च्याही जिव्हाळ्याचा अन दोघानी आपापली आग्रही मते मान्डल्यावर शेवटी, मधल्या मधे लोकान्चे हाल होत आहेत या एका निष्कर्शावर तो वाद सम्पत असे. मला वाटत कुठेतरी दोघान्च्यातील शिल्लक माणुसकी अन दुसर्‍याच्या वेदनेची बोच, या भावना अशा वादातून मार्ग दाखवत असतात.
"गुरू घर मे सब ठीक है ना..?" परवा मुम्बईत बॉम्बस्फ़ोट झाल्यावर सईद ने आवर्जून फोन केला होता, अगदी तसाच जसा मुम्बईत गेल्या वर्षी विक्रमी पावूस होवून वाताहत झाली तेव्हा केला तसाच. पाकिस्तानात अचाट भूकम्प झाला त्याचे केन्द्र NW Frontier जवळच होते हे ऐकले तेव्हाही मि असाच घाबरून जावून पहिले सईदला फोन केला होता.

नुकतीच मी कम्पनी बदलली तरी दोघेही एकमेकासाठी कुठल्याही वेळी मदत करायला तयार आहोत हे दोघानाही ठावुक आहे. सईदबद्दल आदर आहे प्रेमही आहे अन कधी अशा विघातक घटना घडतात तेव्हा सईदची "वेगळ्या अर्थाने" आठवण होते. यात त्याचा काही दोष नाही हे माहित असल तरी सर्वच मुसलमान बान्धव सईद सारखे का नाहीत ही खन्त आहे. सईदचे कौतुकही वाटते. कामावर दोन्ही वेळा न चूकता आसन घालून नमाज पढणे, दर शुक्रवारी मशिदीत जाणे, रमजान च्या दिवसात कडक उपवासाचे पथ्थ्य पाळणे, आपल्या मुलाना उर्दू चि शिकवण लावणे, त्याना कुराण शिकवणे, दुसर्‍या मुसलमानाचा आदर करणे, कुणीही पाकिस्तानबद्दल विचारले तरी न लाजता न घाबरता मुशर्रफ़च्या दडपशाहीविरुध्ध नाराजी व्यक्त करणे, अन इतर बरेच काही. सईदच्या या अशा so called कट्टर विश्वास अन मुल्यान्पूढे कधी कधी स्वताची लाज वाटते. तेहेतीस कोटी देव असून दोन वेळा आम्ही धड देवाची पूजा आरती करत नाही, गरज पडेल तरच देवीची ओटी भर नाहितर सिध्धिविनायक वा ज्योतिबाला साकडे घाल, सलग तेरा दिवस उपास काय, वर्षातून एखाद दुसरा एकादशीचा उपवास तोही घरच्यानी केला तर (थोडक्यात उपवासाचे खाणे बनवले असेल तर), आपल्या मुलाना मराठीवेजी इन्ग्रजी शिकवणे (ती बावळट होवू नयेत म्हणून?), पोथ्या पुराणे, वेद मन्त्रे यान्चि शिकवण सोडाच उलट त्यावर टिका करणे, आणि भारताबद्दल कुणी विचारलेच तर मोठ्या मनाने देशातील भ्रष्टाचार, आर्थिक विषमता याबद्दल खन्त व्यक्त न करता उगाच IT चे पोकळ ढोल बडवणे अन एव्हडे करून सहिष्णू म्हणून आम्ही मारले जातो अन कट्टर म्हणून ते आक्रमण करतात असे स्वतालच समजावणे. सईद पासून खर तर बरेच काही चान्गले शिकण्यासारखे आहे पण जसा त्याला इस्लाम चा अभिमान आहे, पठाण संस्कृतीवर प्रेम आहे, आदर आहे, तसा आम्हाला हिन्दू धर्माचा अन संस्कृतीचा अभिमान अन आदर आहे का हे ज्याचे त्याला तपासून पहावे लागेल.

end of the day सामान्य मनुष्याला हवे असते दोन वेळची रोजी रोटी, कुटुम्बाबरोबरचे गोड क्षण, मानसिक समाधान, शान्ती, अन मित्र बान्धवान्चे प्रेम अन दिलासा. हे सर्व जिथे मिळेल तो देश, अन जमिन, भले मायभूमी नसली, तरी प्यारी वाटते. कदाचित हेच कारण आहे की बर्‍याच वर्षाने नवस करून इथे पुत्रप्राप्ती झाल्यावर अन त्या चार वर्षाच्या मुलाची Dance and Drums ची आगळी वेगळी आवड अन हट्ट पुरवता येण्याची मुभा देणारा अमेरिका सईदला आपला देश वाटतो. हा केवळ त्याचा सन्धीसाधूपणा आहे असे म्हणता येत नाही कारण दैनन्दीन संसार अन आयुष्य चालवायला इथेही वारेमाप कष्ट अन सन्कटाना इतरान्सारखेच त्यालाही तोन्ड द्यावे लागते.
पुढे मागे दुर्दैवाने कधी भारत पाकिस्तान युध्धप्रसन्ग उभा राहिला तरिही सईद्शी जुळलेले भावबन्ध तुटणार नाहीत. सईद इथे रहातोय अन कायमचा राहिल ही जशी परिस्थितीने त्याच्यावर लादलेली त्याच्या अस्तित्वाची लढाई आहे तशीच ती भारतावर लादलेली अस्तित्वाची लढाई असेल, अन मला खात्री आहे सईद ती समजून घेईल. एका अर्थाने सईदसारखे पाकिस्तानी ज्याना स्वदेशी जाता येत नाही अन माझ्यासारखे हिन्दूस्तानी ज्याना स्वताच्या देशाच्या चिन्धड्या उडालेल्या बघवत नाहीत, त्या दोघान्चे "नशीब" बहुदा सारखेच आहे अन एका वेगळ्याच अर्थाने दोघान्ची हतबलताही सारखीच आहे.

खरे आहे, शत्रूला जात, धर्म, देश, नसतो तसेच मित्रालाही नसतो. मला फ़क्त एकच प्रश्ण पडतो, स्वताच्या सुख सुविधान्पुरता मर्यादीत विचार अन अपेक्षा करणारे सईद अन तुम्ही आम्ही हे, मुशर्रफ़ सारखे हुकुमशहा किव्वा भारतातील भ्रष्ट नेते यान्च्या उदयास नकळत तरी जबाबदार आहोत का..?

ता.क. :
http://ia.rediff.com/news/2006/jul/13mumblast5.htm?q=np
काश्मिर मधे अल कायदाच्या कुण्या अन्सारी ने मुम्बईतील बॉम्बस्फ़ोटान्बद्दल आनन्द वगैरे व्यक्त केला आहे वगैरे वगैरे....
"बा अन्सारी, तू अन तुझ्या सारखे इतरत्र मोकाट सुटलेले भुसारी यान्च्यात अन आमच्या मुम्बईतील, दिवसभर उकीरडे फ़ुन्कणार्‍या पिसाळलेल्या कुत्र्यान्मधे काहीही फ़रक नाहीये. दोघेही, निरपराध अन बेसावध व्यक्तीला चावा घेता. पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणेच तुमचा अन्तही गोळ्या घालूनच केला जाईल, तूर्तास प्रश्ण इतकाच आहे की तुम्हाला गोळ्या घालण्या आधी तुम्हाला पोसणारा भ्रष्ट अधिकारी काय घेईल, (तुमचीच) "सुपारी" की (आमची)"गोळी"? .

Chinnu
Thursday, July 13, 2006 - 6:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग, तुझे लिखाण बर्‍याच आठवणी जागविते.
.....शत्रूला जात, धर्म, देश, नसतो तसेच मित्रालाही नसतो. हे अगदी खरयं.
ता. क. मधला प्रश्न बिनतोड आहे. दुर्दैव एवढेच की त्याचे उत्तर समोर असुनही काही लोकांना तसे वागवेसे वाटते..


Kandapohe
Thursday, July 13, 2006 - 11:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कट्टर विश्वास अन मुल्यान्पूढे कधी कधी स्वताची लाज वाटते>>

योग, छान लिहीले आहेस रे. माझा पुण्यातील अन्वर नावाचा एक मित्र आहे. हिंदू ब्राह्मण मुलीशी लग्न केले व नंतर तिला त्यांच्या धर्मा प्रमाणे सर्व सोपस्कार करावे लागले. दर चतुर्थीला उपास करणारा व पहाटे उठून मोरगावच्या गणपतीचे दर्शन झाल्याशिवाय पाणी सुद्धा न पिणारा अन्वर!! मला तो कधीच परका वाटला नाही.

Dhumketu
Friday, July 14, 2006 - 1:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

end of the day सामान्य मनुष्याला हवे असते दोन वेळची रोजी रोटी, कुटुम्बाबरोबरचे गोड क्षण, मानसिक समाधान, शान्ती, अन मित्र बान्धवान्चे प्रेम अन दिलासा. हे सर्व जिथे मिळेल तो देश, अन जमिन, भले मायभूमी नसली, तरी प्यारी वाटते.

एकदम बरोबर!!


Psg
Friday, July 14, 2006 - 1:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा योग, छान लिहिलं आहेस!

Manuswini
Friday, July 14, 2006 - 1:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग,
छान वाटले.....
जाती धर्म सुरवातीला आड येतात. विषेश करुन त्यात पाकिस्तन Vs भारत.
पण एकदा मैत्री झाली की ह्याचे बंधन रहत नाही.
यावरुन मला आठवले
मी एकदम सुरवातीला florida ला असताना florida तील हा भाग एथे फारसे indian न्हवते
आई पप्पा nj ला मला सुरवातीला खुप कंटाळा यायचा एकदा अशीच ओळख झाली सलमाशी
पंजाबी लाहोरी मुस्लिम, उंच गोरी गुलाबी दोन लहान तिचे मुलगे बरोबर होते आणी complex च्या पार्क मधे खेळवत होती.
सहज hi म्हटले. ती उत्साहाने बोलायला लागली पाकेस्तान म्हटल्यावर मी थांम्बलेच तिथे आणी जरासे बोलणे टाळलेच नंतर सुद्धा बर्याच सुरवातीच्या भेटीत...
२००१ ला एक वर्षे सुद्धा न्हवते झाले. त्यांनतर का कुणास ठावुक ओळख अशीच वाढ्त गेली. बहुतेक माझा एकटेपणा आणी तिची दोन लहान मुले ही timepass होता. सुरवातीला तिचे घरचे आग्रहाचे चहाचे invitation मी नाकरले होते कारण ती पाकिस्तानी होती ना काय करेल कोणास ठावुक हा संशय

anyways आज आम्ही छान मैत्रिनी आहोत.
काश्मिर म्हटले की मी लाल होते पण ती मग गप्प बसते.. सुरवातीला तीचा राग की काशमिर वर हक्क मुस्लिमाचा कारण मुस्लिम dominated पण anyways मैत्रीत काही फरक पडला नाही अजुन.


Limbutimbu
Friday, July 14, 2006 - 1:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>>> पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणेच तुमचा अन्तही गोळ्या घालूनच केला जाईल, तूर्तास प्रश्ण इतकाच आहे
तुर्तास प्रश्ण इतकाच हे की देशात भुतदयावादी लोक कुत्र्यालाही गोळी घालु देत नाहीत ते अतिरेक्यान्ना काय घालू देणार? आणि घातली तर मिडिया वाले "एनकाऊन्टर एनकाऊन्टर" म्हणुन बोम्बलणार! एनिवे,
योग छान नेमक मुद्देसुद आणि प्रभावी लिहिल हेस! सहमत!


Dineshvs
Friday, July 14, 2006 - 2:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग छान लिहिले आहेस. माझ्याहि मित्रांचा धर्म मला कधी जाचला नाही.
म्हणुन मला वाटते अतिरेकी वा दशहतवादी या शब्दांमागे कुठल्याहि धर्माचे विशेषण लावणे तसे निरर्थक आहे. त्याना कसला आलाय धर्म ?


Maudee
Friday, July 14, 2006 - 2:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग छान लिहिले आहेस.

ख़रय मैत्रीत जात धर्म काहीच नसतो.

पण ख़र सांगू...... want to confess

मलापुर्वी कुठल्याही जातीचा माणूस समोर आला तरी काहीही फ़रक पडायचा नाही. सगळ्याच बाबतीत माझे freinds मला स्थितप्रज्ञ आहेस असं म्हणायचे.
पुर्वीची मी भांडायचे की नाही माणस कधीच वाईट किंवा चांगली नसतात. they are always gray shedded. and this is true for every community शिवाय एक माणूस वाईट असला तर त्याचा भाऊ तसाच असेल असं काही नाही. कोणीतरी म्हटलय people shud never judged by their relatives but freinds
पण जेव्हापासून गोध्रा झालय मी बदलले आहे. मी आता तेवढी सरळ साधा विचार नाही करत. माझा एक मुस्लीम मित्र आहे त्यच्याकडे बघण्याची दृष्टी बदलली आहे माझी.

हे योग्य आहे का.....

बरे वाटत आहे बोलल्यावर:-)



Sampada_oke
Friday, July 14, 2006 - 3:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग, लिखाण नेहमीप्रमाणेच आवडलं.:-)
माऊडी, मला असं वाटतं,( चूक सुद्धा असू शकेल) की एखाद्या भारतीयाची भारतात राहून मुसलमानाशी असलेली मैत्री आणि भारताबाहेर राहून झालेली मैत्री यात फ़रक आहे. मला वाटते, योगला सुद्धा तसंच काहीसं सांगायचं आहे. कारण त्याची सईदशी मैत्री ही गरज असताना केलेल्या मदतीतून झाली, जेव्हा सईदला त्याच्या इतर कोणत्या पाकिस्तानी मित्राकडून मदतीची आशा नव्हती. मला वाटते, मदत घेताना/ करताना भारत पाकिस्तान हा मुद्दा आला नसावा. तसं भारतात होत नाही. सहसा आपल्याच 'धर्माच्या' लोकांकडे आपण सर्वप्रथम धावतो. म्हणून तुझे वागणे मला नैसर्गिक वाटते.
( मी सहज मांडलेला विचार आहे, कृपया याचे
generalisationकरू नये.यापेक्षा वेगळी परिस्थिती, मनःस्थिति असू शकते, हे मान्य.:-))


Moodi
Friday, July 14, 2006 - 4:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग सुरेख लिहीलस. आपल्या देशातील अनुभवापेक्षा बाहेर देशात ज्यांना आपण शत्रु म्हणूनच संबोधतो, त्यांच्याशी मैत्रीचे भावबंध निर्माण होणे खरच वेगळे असते. मनात त्यावेळी मैत्रीशिवाय दुसरी कुठलीच भावना नसते.

Badbadi
Friday, July 14, 2006 - 8:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग, सुंदर लिहिलं आहेस.. काहि गोष्टींमुळे किती mental blocks असतात आपले...

Ruthi
Friday, July 14, 2006 - 9:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maudee,
mi sampadachya vicharashi sahamat ahe.
pan mala he hi barobar watat, ki mauude, tuza wagana pan naisargik ahe.tyamula tyacha etaka vichar karu nakos.
pan tyach barobar tyachyakade thodya veglya drushtine baghaycha pan prayatna karu sakates.mala mahit nahi, he kiti barobar ahe, pan mazya manat asa apla ek vichar ala, etakach..

Ninavi
Friday, July 14, 2006 - 12:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुंदर लिहीलंयस रे योग.

Storvi
Friday, July 14, 2006 - 5:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग मस्तच रे..
>>म्हणुन मला वाटते अतिरेकी वा दशहतवादी या शब्दांमागे कुठल्याहि धर्माचे विशेषण लावणे तसे निरर्थक आहे. त्याना कसला आलाय धर्म ?
खरंय दिनेश

Kmayuresh2002
Friday, July 14, 2006 - 11:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग, अतिशय प्रभावी आणि प्रामाणिकपणे लिहिलं आहेस

Abhi_
Friday, July 14, 2006 - 11:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग नेहमीप्रमाणेच सुंदर!! :-)        

Jo_s
Saturday, July 15, 2006 - 2:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग तुझ लिखाण भावनांना स्पर्श करतं. त्यामुळे ते मनात खोलवर उतरतं. हेही असच छान आहे.

तुझं तबला शिक्षणावरील लिखाण ही मी जपून ठेवलय.

Ankushsjoshi
Saturday, July 15, 2006 - 9:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मान गये गुरु मस्तच

Athak
Saturday, July 15, 2006 - 10:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग , छान लिहीलेस
आमच्या सोबत आपले हे शेजारी खुप आहेत , बरेचसे colleagues चांगले आहेत पण कधीकधी आपले रंग उघड करतात . नवाब शरीफ अन त्याच्या नातेवाईकांवर आलेले प्रसंग परिस्थिती यामुळे सईद जवळ येण्यास मदत झाली असावी . individual case म्हणुन खुप बरे वाटले पण in general and majority धर्मवेडे आहेत हे मात्र खरं , 9-11 मुंबई ब्लास्ट kidnapping केसेसला आनंद व्यक्त करणारे महाभग बघितले की चिड येते


Lokhitwadi
Saturday, July 15, 2006 - 10:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उत्तम लेख. पण एकच गोष्ट खटकली. मला असे वटते की आपल्या धार्मिक रितीरिवाजान्चे सामुहीक प्रदर्शन आणि तेही परदेशात, अयोग्य आहे. आमच्याहीकडे असेच एक विद्वान बेसिनमध्ये पाय धुवुन cube मध्ये नमाज पढायचे. इतकेच नव्हे तर स्त्रियान्शी हस्तान्दोलन करण्यास नकार द्यायचे कारण त्या धर्माप्रमाने ते अयोग्य. अहो जर का अमेरिकेत रहायचे ठरवलेच आहे तर आपली islamic आणि अमेरिकन culture शी conflicting प्रथा का लादायच्या

Meggi
Sunday, July 16, 2006 - 7:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग, सहिच. तु तर एकावर एक sixer मारतोयस...
नेहमि प्रमाणे हा पण लेख प्रचंड आवडला..


Deepanjali
Sunday, July 16, 2006 - 1:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सईदचे कुटुम्ब तसे पुढारलेले म्हणता येईल. खर तर इथे आलेले बरेच पाकिस्तानी तसे असतीलही. ज्या इस्लाम मधे गाणे बजावणे निषिध्ध(?) मानले जाते तेथे उस्ताद च्या कुटुम्बात भारतीय चित्रपट, शाहरुख खान वगैरे सर्व प्रीय आहेत, आवर्जून पाहिले जातात
आपल्या कडच्या बर्‍याच रेसिपीज बेगम ला येतात अन आवडतातही
<<<मला इथे भेटलेले सगळेच पाकिस्तानी फ़क्त Indian movies च पहातात . त्यांची स्वत : ची film indusrty, music या बद्दल कोणाला काहीही updates सुध्दा नसतात , पाहिले तर तिथले paki dramas पहातात पण बहुसंख्य लोकांना फ़क्त भारतीय movies च आवडतात .
हृतिक , शाह रुख सगळ्यांचे आवडते तर सनी बर्‍याच लोकांचा नवडता नसतो , का ते सांगायची गरज नाही:-)
आणि त्यांचे cooking आपल्या पेक्षा फ़ार वगळे नसतेच , पंजाबी food, hyderabadi food, dahi wadas cooked with moong daal, kashmiri style gosht cooked in green veggies असेच असते !
फ़क्त beef जास्त वापरतात ही गोष्ट वेगळी .
खुदा हाफ़िज ऐवजी बरेच लोक ' अल्ला हाफ़िज ' म्हणताना दिसतात .
त्यांच्याकडे जेवायला गेलो तर आधी veggie options काय आहेत ते सांगतात :-)
chicken खाताना दिसले तर ' ब्राम्हण होके non veg खाती ' हो अशी हमखास reaction मिळते !
पण काहीही असो , भरतीय लोकां सारखेच दिसत असले तरी गर्दीतून पाकि कुठले ते बरोबर ओळखता येतं .
वागण्यात कुठे तरी पाकि पणा दाखवतातच !
:-)

Chingutai
Monday, July 17, 2006 - 1:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग, सुंदर व्यक्तिरेखा!
माझा अनुभवही अथक आणि डिजे सारखाच आहे.
अतिशय गपिश्ठ, खूप फ़्रेंडली..........पण भारत पाक मॅच असेल किंवा काही राजकीय घटना, लगेच यांचे सारे संधर्भ बदलतात. हे लोक गुड माॅर्निंग च्या ऐवजी खास सलाम वालेकुम म्हणतात.
मुंबई मधील घटनेवर शेहनाज़ नावाच्या विदुषीच मत अस - 'ये सब वो बाल ठाकरे कराता है!!'
व्हेजिटेरियन ब्राह्मण आणि त्यात काही उपवास करणारी असं काही या लोकांच्या पचनी पडत नाही. उपवास म्हणजे केवळ रमदानच! धर्म बदलण्याच्या ओपन ओफ़र्स ही मिळतात अस मी ऐकुन आहे.
घरी कधी केली नसेल इतकी भक्ती इकडे उफाळून येते...दिवसातून ५ वेळा नमाज! मग ओफ़िस मधे त्यातिल प्रत्येकवेळी छान सतरंजी टाकुन २०-२५ मिनीटांची गच्छंती!
बाकी या लोकांच उर्दु मला खासच आवडतं :-)

-चिन्गी





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators