|
Meenu
| |
| Wednesday, July 12, 2006 - 9:59 am: |
| 
|
वा मृ दोघीही छान लिहीतय मृदगंधा jpge टाकतेस तर तुझं नाव पण घालत जा त्यात ..
|
thanks meenu... suchanaa lakshat theven thanks
|
mrudagandhaa sundar lihites g... ajun yeu de...!!
|
Meenu
| |
| Wednesday, July 12, 2006 - 11:35 am: |
| 
|
आलाच आहेस तर ... आलाच आहेस तर थांब थोडा .. नजरेतला माझ्या जा बघुन श्रावणसडा आलाच आहेस तर थांब थोडा .. ऐकुन जा मारतोय हाक तारेवरला राघु वेडा आलाच आहेस तर थांब थोडा .. उठु दे माझ्या भोवतालचा तुझ्या आठवांचा वेढा आलाच आहेस तर थांब थोडा .. सुटल्यावरती जा तुझ्यामाझ्यातला अजब तिढा आलाच आहेस तर थांब थोडा ..
|
Meenu
| |
| Wednesday, July 12, 2006 - 12:00 pm: |
| 
|
मला निसटुन जायचय बेधुंद सोसाट्याचा, वारा मला व्हायचय गळुन पडलेल्या पानांना, दूर फिरायला न्यायचय झुळझुळणारा आनंदी, झरा मला व्हायचय कडीकपारीच्या रानफुला, पाणी नेऊन द्यायचय लुकलुकणारा आकाशीचा, तारा मला व्हायचय रात्रीच्या अंधाराला, इवला प्रकाश देऊन जायचय चमकता शुभ्रसा, पारा मला व्हायचय येण्याआधी कुणाहाती मला निसटुन जायचय
|
Meenu
| |
| Wednesday, July 12, 2006 - 12:11 pm: |
| 
|
वाडा माझ्या आठवणीत आहे एक वाडा संकल्पनेलाच ज्याच्या आज गेलाय तडा जीथे दारं सारी सदा सताड उघडी होती भिंतीना मायेची अजब उब होती अंगणात रंगायचा रोज नवीन डाव कधी सहभोजनावर तीथेच मारला होता ताव होती भांडणं अन रुसवे फुगवे परी नाही अनुभवले मत्सर अन हेवेदावे सार्या रहीवाश्यांच होतं कुटुंब एकदील privacy चं नव्हतं अवडंबर फाजील flat मधे ही आज तसं काही कमी नाही पण यात वाड्याची ती मजा नाही
|
Mruda
| |
| Wednesday, July 12, 2006 - 1:05 pm: |
| 
|
जयावी, मीनु Thanks मीनु आलाच आहेस तर... फ़ारच छन.... मृदगन्धा... आपण दोघीही मृ आहोत... तुझं लिखाण वाचायचय गं पण जमलं नही.../
|
Ninavi
| |
| Wednesday, July 12, 2006 - 4:12 pm: |
| 
|
धन्यवाद, दोस्त्स. मीनू, हुंदका आणि ' आलाच आहेस तर' आवडल्या. मृदा, संपलं म्हणून रुसण्यापेक्षा घडलं म्हणून हसायचा समजूतदारपणा आवडला. लोपा, निराळा विषय घेतलास. छान. 
|
Malavika
| |
| Wednesday, July 12, 2006 - 10:50 pm: |
| 
|
मृद्गन्धा, लोपा, मीनु, नेत्रसखी, मृद सगळेच छान लिहीतत. वैभव अलिकडे नसतो का इकडे? मी बरेच दिवसांनी आले.
|
Kandapohe
| |
| Wednesday, July 12, 2006 - 10:54 pm: |
| 
|
मीनू, सध्या परत बहर आलाय की. आलाच आहेस तर छानच आहे पण वाडा पण आवडला. मोजक्या शब्दात मंडले आहेस. लोपा खळाळती नदी मस्तच. पण कडव्यात कधी ४ तर कधी ५ ओळी का आहेत. काही नविन प्रकार आहे का? मला कळत नाही म्हणून विचारत आहे. मृदा, तू पण? छानच लिहीतेस की. 
|
मीनू, अतिशय सुंदर! ''आलाच आहेस तर ''छान आणि ''मला निसटून जायचय ''मधील प्रत्येक कडवं अतिशय सुंदर कल्पनाच छान आहेत. ''वाड्याने'' खरच आठवणी जाग्या केल्या.तुझी सूचना मी अंमलात आणली आणि jpg. ऐवजी direct post केल्या कविता.धन्यवाद. जयावी,मालविका, धन्यवाद दिलेल्या छान अभिप्रायाबद्दल.. मृदा, खरच आपण दोघीही मृ पण आधी तू नंतर मी.. आधी माती मग तिचा सुवास नाही का?माझं लिखाण वेळ मिळेल तेव्हा वाच.. सूचना दे. मी मात्र तुझ्या कविता वाचल्या खुप आवडल्या. लोपा तुझ्या प्रतिभेच्या चांदण्याची वाट पहातेय..
|
Meenu
| |
| Thursday, July 13, 2006 - 3:18 am: |
| 
|
तुझी सूचना मी अंमलात आणली आणि jpg. ऐवजी direct post केल्या कविता.धन्यवाद. >> नाही ग मी म्हणत होते की jpge च post कर फक्त तुझं नाव पण त्यातच add कर म्हणजे कोणी copy paste forward केलं तर नावासहीत जाईल इतकच .. धन्यवाद सर्वांनाच वैभव असतो ईकडे सध्या नाही आहे काही दिवसांसाठी .. येईल लवकरच
|
असेल तुझे घरटे ज्यावर ते झाड फ़क्त होवूदे मला >>>> मृदगंधा, सुंदरच. 
|
मीनु, अगं माझ्या लक्षात आलेले तुला काय म्हणायचे होते ते.. . thanks for so sweet concern कान्दापोहे, धन्यवाद पण ते चौकोन नाही कळाले..
|
मृदगंधा, सुंदर कविता आहेत तुझ्या.. एकदम उत्कट तुला पाहूनी माझे असे गंधाळत जाणे जणू उमललेल्या कळीचे बेधुंद बहरत जाणे ........ सहीच..
|
R_joshi
| |
| Thursday, July 13, 2006 - 4:39 am: |
| 
|
मृदुगंधा तुझ्या प्रतिभेला तोड नाही. शब्दांमध्ये जादू आहे. अप्रतिम लिखाण.
|
खुप खुप धन्यवाद मयुरेश आणि रुपल..
|
|
|