पुण्यात वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र होत चालला आहे ! ज़ीवाच पाणी करुन जरि समाजप्रबोधन केल तरीही आजही, हो हो ह्या आजच्या युगात, आजच्या दिवशीही मोजकेच का होइना पण काही लोक सिग्नल पाळत आहेत ! इतकेच नव्हे तर उजव्या साईडनेच ओव्हरटेक करत आहेत, जपून वाहने चालवत आहेत, नेमून दिलेल्या जागेतच पार्कींग करत आहेत.. सर्वात दुर्दैवी म्हणजे हॉर्नचा वापर कमीत कमी करत आहेत ! ही परिस्थिती देशाला कुठे घेऊन जाईल ह्याचा विचार मनात आला तरी मेंदूत वाहतूक मुरंबा होतो ! 'हे कधी बदलणार ? ' हा प्रश्न आपल्यालाही छळत असेलच. हे सगळे थांबवणे अर्थातच आपल्याच हातात आहे.. पण मुळातच हे लोक 'रस्त्यावर' यावेत का हा प्रश्न आहे ! वाहतूक खात्याने ह्यावर ततडिने उपाययोजन करायचे ठरवले आहे. पुणे वाहतूक शाखेने नवीन परवाना 'काढायला' येणार्यासाठी खास प्रश्नावली बनविली आहे. आता आठचा आकडा काढून परवाना घ्यायची पद्धत जाउन ह्या सर्व कठीण प्रश्नांची योग्य पर्याय निवडून अचूक उत्तरे देण्यार्यासच ह्यापुढे परवाना मिळु शकेल प्रश्नावली: प्रश्न १. पुण्यात वाहतूक सौजन्य दिन साजरा करण्याचे ठरत आहे. तो कुठला असावा ? * दर महिन्याच्या बत्तीस तारखेला * दर वर्षी फ़ेब्रुवारीच्या तीस तारखेला * श्रावणात नरकचतुर्दशी येइल ते पूर्ण वर्षभर * कर्फ्यू लागेल त्या दिवशी उस्फुर्तपणे. प्रश्न २. चालकासाठी खर्या रस्त्यावर परीक्षा देण्यास सर्वात योग्य दिवस : * गटारी अमावास्येला रात्री * एक जानेवारीला सकाळी ६ वाजता * 'पालखी'च्या दिवशी * सर्व धरणांचे सर्व दरवाजे उघडतील त्या दिवशी प्रश्न ३.'१०० मीटर पर्यंत वाहने उभी करु नये' हा बोर्ड पाहून तुम्ही काय करणे अपेक्षीत आहे ? * घरुन हाताची एक 'वीत' म्हणजे किती सेन्टिमिटर ते मोजुन निघावे आणि बोर्डपासून १०० मिटर होइपर्यन्त सर्व दिशाना विता मोजत बसावे * घरुन टेप घेउन निघावे व ९८ मिटरवर गाडी लावावी * बोर्डवर सोसायटीच्या गणेशोत्सवातल्या स्पर्धांचे राहिलेले पोस्टर लावावे * बोर्ड उखडून आडवा ठेवावा प्रश्न ४.तुम्ही अलिशान चार चाकी चालवताना सिग्नल तोडलात आणि पकडले गेलात. वाहतूक पोलिसाने हसुन गाडिकडे पहात हात खाजवत 'काय करता साहेब' अशी सुरुवात केल्यास.. * गाडीचा ड्रायवर असल्याची बतावणी करुन खिशात दिड रुपया आहे असे सांगावे * आंधळे असल्याची बतावणी करावी व क्रॉस करण्यास मदत मागावी * पोलीसाशी हस्तांदोलन करावे आणि 'आज इकडे कसे काय. ऑफ ड्ट्युटी आहात का' विचारावे ! * चालू फॅशनच्या पक्षाचा झेंडा कायम गाडीत ठेवावा व अशा वेळी झटकन लावावा प्रश्न ५.लाल सिग्नल असल्यास... * सिग्नललाच ठोकावे म्हणजे पुढच्या वेळि लाल दिव्याचा त्रास होणार नाही * हिरवा सिग्नल मिळालेल्या काटकोनात असलेल्या गाड्यात गाडी घुसवून वर आपणच खांदे उडवत रहावेत. * करकचून ब्रेक दाबावा व थांबावे पण त्याआधी गाडी चौकात मधोमध आहे न ह्याची खात्री करावी प्रश्न ६.हिरवा सिग्नल असल्यास.. * गाडी कासवाच्या वेगाने चालवून आयत्या वेळी आपण सटकावे आणि बरोब्बर मागच्या गाडीला लाल सिग्नलला अडकवून असूरी आनंद घ्यावा. * उजवीकडे डिव्हाईडर असूनही उजवा इन्डिकेटर देउन मागच्यास गोंधळात टाकावे * गाडी रस्त्याच्या मधोमध थांबवून पत्ता विचारावा प्रश्न ७.सिग्नल तोडताना पोलीसाने शिट्टी मारल्यास.. * आपणही दुप्पट जोरात शिट्टी मारावी * पोलिसाला घरी आया बहिणी नाहीत का विचारावे * बाजुच्या स्कुटरवाल्याच्या हेल्मेटची काच वर करुन 'ते तुम्हाला बोलवताहेत' असे सांगावे * दोन शिट्ट्यांच्या मधे 'जागते रहो' असे ओरडावे प्रश्न ८.लाल सिग्नलला आपल्या पुढचा थांबल्यास.. * वाईटातली वाईट शिवी द्यावी * त्याच्या गाडीवर ब्लेडने 'वाटेल तिथे थांबू नये' असे कोरावे * 'चल ना.. सिग्नल दिसत नाही का' असे म्हणून त्याला कन्फ्युज करावे प्रश्न ९.'एकदिशा मार्ग' असा बोर्ड पाहिल्यास.. * आपल्याला हव्या त्या एकाच कुठल्यातरी दिशेने जावे. * बाजुने जाताना बोर्डवरच्या बाणाचे तोंड आकाशाकडे वळवावे (मागचा ट्राफिक एकदम कमी होइल) * बरोबर विरुद्ध दिशेने जाउन एकेरी वाहतुक करणारे 'एकेरी'वर येतील असे बघावे प्रश्न १०.उजवीकडे वळायचे असल्यास काय कराल ? * चारचाकीत असाल तर पार्किन्ग लाईट लावावेत * दुचाकीवर असाल तर.. असाल तसे वळा * चारचाकीत असाल तर गाडीतल्या पाठच्या पुढच्या सर्व लोकाना खिडकीबाहेर हात काढुन अगम्य खुणा करण्यास सांगावे * शक्यतो सर्वात डावीकडच्या लेन मधे गाडी ठेवुन वळायचा सिग्नल जवळ येईल तशी जोरदार वळण्यास सुरुवात करावी. प्रश्न ११.'जड वाहनास प्रवेश बंद' अशी पाटी पाहील्यास * आजूबाजूच्या गाडीवाल्याना दोन चार शिव्या देउन आधी मन हलके करावे * बायकोस खाली उतरण्यास सांगावे * सायकल चालवत असल्यास पाटी पाहताच एकदम काटकोनात वळावे व नियम पाळून कर्तव्य बजावावे. प्रश्न १२.पादचारी मार्ग ही पाटी पाहिल्यास काय कराल * त्या मार्गाच्या आसपास बेफाम गाडी चालवावी काय करायचे ते पादचारीच करतील * चारी पादानी चालणारे ते पादचारी अशी समजुत करुन घ्या व त्याना गुराढोरांसारखे वागवा * 'पाद' ह्याचा अर्थ 'चाक' असा घेउन चारी पादांनी त्या मार्गावर जावे ! * चालत असाल तर मात्र तो मार्ग सोडून बागेत फिरल्याप्रमाणे रस्त्यामधून चालावे प्रश्न १३.अतिशय बुद्धिमान व सुजाण नागरिक असल्याचे सर्वात उत्तम लक्षण कोणते ? * तुम्ही लहान मुलाची माता असाल तर तुमच्या मुलाला ट्रॅफिकच्या साईडला ठेवुन रस्त्याने चालावे व आपण दुसरीकडे वेंधळेपणे बघत चालणे * अतिशय भिकार 'लेटेस्ट ट्यून' हॉर्नवर वाजवणे * चार चाकीची आर्थिक ऐपत आली तरी जुने दिवस न विसरता ती दुचाकी सारखी चालवणे व कायम तिरकी घुसवण्यास बघणे * समोरचा आणि त्याच्या भावी पिढ्या आंधळ्या निपजतील इतका 'हाय बीम' उगाचच मारणे !!! समाप्त.
|
Mi_anu
| |
| Tuesday, July 11, 2006 - 6:45 am: |
| 
|
खूप हसले वाचून!! भन्नाट लेख.
|
Hemantp
| |
| Tuesday, July 11, 2006 - 7:16 am: |
| 
|
राहुल : मस्त लिहिले आहेस. खरेच परिस्थीती फार गंभीर आहे. त्यात रस्त्यांची दैनावस्था.
|
Roflphatak , उच्च!!! .. ..
|
Psg
| |
| Tuesday, July 11, 2006 - 7:37 am: |
| 
|
roflphatak !! नाव सार्थ आहे! काय निरिक्षण आहे! मस्त लेख!
|
अशक्य.... शब्दाशब्दात अशक्य! अफलातून! .... बायकोला खाली उतरवावे! राहूल सहसा माझ्या चेहर्यावरची माशीही हलणार नाही येवढा मी गम्भिर असतो, पण आज ऑफिसमधेच खुदु खुदु हसतो हे!
|
Athak
| |
| Tuesday, July 11, 2006 - 7:41 am: |
| 
|
भन्नाट लिव्हलस रे शिवराम गोविंद
|
Rajkumar
| |
| Tuesday, July 11, 2006 - 7:45 am: |
| 
|
जबरी रे.. .. .. ..
|
Maudee
| |
| Tuesday, July 11, 2006 - 7:45 am: |
| 
|
रहुल, मस्त लेख़ विषेशकरुन "सर्व धरणांचे सर्व दरवाजे उघडतील त्या दिवशी" ह्ह्प्व
|
Abhi_
| |
| Tuesday, July 11, 2006 - 7:46 am: |
| 
|
सही रे .. ..
|
त्याच्या गाडीवर ब्लेडने 'वाटेल तिथे थांबू नये' असे कोरावे>>>> त्या मार्गाच्या आसपास बेफाम गाडी चालवावी काय करायचे ते पादचारीच>>>>>अतिशय भिकार 'लेटेस्ट ट्यून' हॉर्नवर वाजवणे >>>चार चाकीची आर्थिक ऐपत आली तरी जुने दिवस न विसरता ती दुचाकी सारखी चालवणे व कायम तिरकी घुसवण्यास बघणे >>>>.दुचाकीवर असाल तर.. असाल तसे वळा >>>>>>>>>....... ekadam mast rahulpathak.. bhannat gaadi palavaliiye..!!!
|
Neelu_n
| |
| Tuesday, July 11, 2006 - 7:56 am: |
| 
|
राहुला तुला कोपरापासुन दंडवत. 
|
टू गुड रे राहूल..
|
राहूल!! जबर्या!! शेठ! शिवराम गोविंद... ऐकतोच आता 
|
Jyotip
| |
| Tuesday, July 11, 2006 - 8:00 am: |
| 
|
बाजुच्या स्कुटरवाल्याच्या हेल्मेटची काच वर करुन 'ते तुम्हाला बोलवताहेत' असे सांगावे >> राहुल सहि
|
Meggi
| |
| Tuesday, July 11, 2006 - 8:17 am: |
| 
|
राहुल, आयुष्यात तुझे लेख ऑफ़िस मध्ये वाचणार नाहि..
|
Ammi
| |
| Tuesday, July 11, 2006 - 8:39 am: |
| 
|
raahul sagle gore hapisat mazyakade pahat aahet ha aasa ka hastoy itka mhanun...lai bhari re..khallas... 
|
जबरदस्त झक्कास आणी नविन प्रभाकरच्य भषेत सान्गायचे तर Shoooolid 
|
राहूल, तुस्सी ग्रेट हो... 
|
Milindaa
| |
| Tuesday, July 11, 2006 - 11:48 am: |
| 
|
झकास .. .. ..
|