|
आभाळ मन्दीरात वीज झन्कारली मातीत मिसळण्या आसावला पाऊस, आतुरल्या नेत्रास पापण्याची कवाड. दारात कधिचाच ओथम्बला पाऊस, लाल मातीस हिरवे कोवळे धुमारे नितळ निळाईत रन्गला पाऊस घनगर्भ मौनास शब्द सुचलेले रिमझिमत असा बरसला पाऊस, तुज कवेत घ्याया हात उन्चावले प्रेमास बघ किती नादावला पाऊस.
|
मन मन वेढले वेढले जशी सागरात लाट मन एकले एकले कुठे हरवले वाट, मन मिठाचा खडा मन साखरेचा दाणा मन गुन्तता मनात मन शोधते बहाणा मन गुढ उदास जसा अथान्ग डोह मन मऊ निरागस त्यास आवरेना मोह सोड सोड रे सारे घाल स्वताला आवर सागर सभोवार नि तुझी रितीच घागर -नेत्रा
|
Arch
| |
| Sunday, July 09, 2006 - 8:41 am: |
| 
|
नेत्रसखी, सुरेख आहेत कविता. बहिणाबाईंची आठवण झाली.
|
Dineshvs
| |
| Sunday, July 09, 2006 - 1:50 pm: |
| 
|
नेत्रसखी, पहिल्यांदा मी कबुल करतो कि मी या क्षेत्रातला जाणकार नाही, पण एक दुरुस्ती. दुसर्या ओळीत लाट ऐवजी, नाव किंवा बोट हवे ना, किंवा सागराची लाट हवे. लाट येताना एका रेषेत येते आणि फुटली कि वेढते. तसेच चौथ्या ओळीत हरवले च्या जागी, हरवली हवे आहे ना ? ऊद्या जाणकार मंडळी आली कि यथोचित प्रतिक्रिया मिळतील. अनुस्वारासाठी athaa.ng असे लिहिता येते आणि स्वतःला हे svataHlaa असे लिहिता येते.
|
Moodi
| |
| Monday, July 10, 2006 - 4:55 am: |
| 
|
मृदगंधा अन नेत्रसखी अप्रतीम लिहीलत तुम्ही. पाऊस, मन अन हुंदक्यांचा प्रयास, सुरेख!!
|
नेत्रा, तुझी कविता छानच आहे. पण काही बदल सुचवावेसे वाटतात. बघ आवडले तर... १) मन मिठाचाच खडा २) मन गूढसे उदास ३) सोड सोड आता सारे ४) जरी सभोती सागर असे केलेस तर कवितेची अष्टाक्षरी पूर्ण होईल.
|
Meenu
| |
| Monday, July 10, 2006 - 10:07 am: |
| 
|
पावसा, पावसा तुझा थोडासा गारवा दे मला संधीकाली आठवांचा मारवा दे मला तुझ्यासारखं पानोपानी आज मला झरु दे मातीच्या कणा कणातुन आज मला मुरु दे कोणा छोट्याची होडी माझ्या हाती तरु दे कोणा असावल्या जीवा मन भरुन भेटु दे सप्तरंगी ईंद्रधनुचा, पिसारा दे मला तृषा शमविणारा स्पर्ष तुझा, दे मला वाट पाहणार्या त्या चातकाला भेटु दे तृप्त तृप्त भाव त्याचा मज एकदा लुटु दे पावसा तुझा थोडासा गारवा दे मला संधीकाली आठवांचा मारवा दे मला
|
Meenu
| |
| Monday, July 10, 2006 - 10:24 am: |
| 
|
भेटणार असशील तर... भेटणार असशील तर आषाढातला बेधुंद पाऊस तु होऊन ये तप्त माझा कणकण गारवा तु होऊन ये भेटणार असशील तर नदीच्या पाण्याची ओढ तु घेऊन ये रिता रिता मी सागर जल तु होऊन ये भेटणार असशील तर मोगर्याचा मंद धुंद सुगंध तु होऊन ये उदास मी आज ईथे आशेचा किरण तु होऊन ये भेटणार असशील तरच...........
|
Ninavi
| |
| Monday, July 10, 2006 - 1:16 pm: |
| 
|
रहाटगाडे.. येथे कोणाचे तैसे कोणाविण काही अडते? हो, घुटमळते क्षण काही, पण पुढेच पाउल पडते झालाच सराव मलाही तू नसताना जगण्याचा मन कणाकणाने मरते, पण त्याने कुठे बिघडते? आतातर आठवणीही भासतात परक्या सार्या आल्याच कधी सामोर्या, तर पाहुन मी गडबडते दिस उजाडती मावळती, जणु रहाटगाडे फिरते चालते ह्रदय, सवयीने श्वासांची लड उलगडते डोळ्यांत कोरड्या माझ्या डोकावुन रात्र परतता चुरगळते चादर थोडी, अन उशी जराशी रडते..
|
मीनू भेटणार असशील तर ...... अतिशय सुंदर निनावी रहाटगाड्यातील आर्तता खुप तरलतेने रेखाटली आहेस अतिशय सुरेख आणि उच्च कविता....!
|
Ashwini
| |
| Monday, July 10, 2006 - 10:02 pm: |
| 
|
निनावी, मस्तच ग. चुरगळते चादर थोडी, अन उशी जराशी रडते.. सुरेख!
|
Meenu
| |
| Tuesday, July 11, 2006 - 12:18 am: |
| 
|
निनावी खुपच सुंदर ग प्रत्येक शब्द अगदी चपखल बसलाय .. मस्तच
|
Jyotip
| |
| Tuesday, July 11, 2006 - 12:42 am: |
| 
|
मीनु पावसा सहि.. निनावी रहाटगाडगे एकदम मस्त 
|
Jo_s
| |
| Tuesday, July 11, 2006 - 1:48 am: |
| 
|
मिनू, छानच आहेत कविता. काव्यरसात चिंब भिजलो. मजा आली.
|
मीनू शब्दांनी भीजवलेस. सुंदर. निनावी सुंदरच.
|
Sadda
| |
| Tuesday, July 11, 2006 - 2:10 am: |
| 
|
तुम्ही सगळ्यांनीच खुप छान लिहिल आहे
|
Princess
| |
| Tuesday, July 11, 2006 - 2:43 am: |
| 
|
निनावी अत्युच्च... किती छान लिहिलय...
|
नको व्यर्थ चिंता| नको आत्मक्षोभ| गुरूंचे चिंतन| करू जाणे|| आषाढी पौर्णिमा| पुण्यवान दिन| होई कृपादृष्टी| भक्तांवर|| गुरु नाम जप| सर्वांग सुंदर| भक्तांचा कैवार| तोची एक|| दत्तप्रभु करी| यतिवेशे वास| वटवृक्ष स्वामी| होउनिया|| माउलीची कृपा| कैवल्य समान| देवा म्हणे आता| तोची सर्व||
|
Me_anand
| |
| Tuesday, July 11, 2006 - 2:54 am: |
| 
|
Ninavi रहाटगाडे.. kavita uttam aahe.. Best one
|
मीनु, पावसा आणि भेटणार असशील तर दोन्ही फ़ार सुंदर आहेत. हृदयाला भिडल्या. निनावी, तुझ्या प्रतिभेची स्तुती करायलाही माझ्याकडे शब्द नाहीत.. अतिशय भावस्पर्शी.. अप्रतिम आहे तुझी गजल.. लोपामुद्रा, तुझ्याही कविता फ़ारच सुंदर आहेत..तुझ्या नावसारख़्याच दिव्य उच्च.. तुझं नाव जेव्हा मी प्रथम पाहिले तेव्हाच ''लोपामुद्रा या दिव्य ॠषीपत्नीची आठवण झाली.. आणि तुझ्या कविता वाचल्यावर तुझ्या उच्चतेचीही प्रचीती आली परंतु, तुझ्या काही कविता वाचायला मिळाल्या नाहीत.. फ़क्त चौकोन दिसले. नेत्रसखी, तुझ्या कवितेनेही तुझं नाव सार्थ केले..ते नेत्रसखी एवजी नेत्रसुखी असे असते तरि योग्यच ठरले असते. तुम्हा सगळ्यांच्या प्रतिभेच्या सुर्यासमोर मी एक काजवासुद्धा नाही.. असंच लिहीत रहा.
|
|
|