|
Meenu
| |
| Thursday, July 06, 2006 - 3:36 am: |
| 
|
मृदगंधा स्वागत आहे ईथे तुझं
|
Chinnu श्रीमंन्त पाऊस आवडली! -बापू.
|
dhanyawaad meenu.tuzi ''mi patr lihite'' kavita khupach hridaysparshi ani taral ahe.keep it up. rupali,chaukatraja tumachya kavitahi khupach chhaan ahet.
|
Lopa , ekdam sundar!! -madhav marathe
|
माझा पाऊस श्रीमंत झाला!! >> वाह चिन्नु!! 
|
ही माझी इथे पब्लिश होणारी पहिली कविता.. कधी अचानक आत्म्यावरचं शारिर आवरण गळून जातं जणू वैशाख वणव्यात झाडावरचं पान अकाली जळून जातं किती भरभरुन प्रेम घेऊन अलगद उतरतं पानांवर दहिवराचं माझं मन मग मुकाट ओघळून जातं चुकून वाट चुकलेल्या निरागस वासरासारखे व्यवहाराच्या काटेरी दुनियेत अगदी गोंधळून जातं वादळात पावलोपावली एक वात जपून नेताना विझता विझता ही स्वत्:ला हळूच सावरुन जातं
|
Chinnu
| |
| Thursday, July 06, 2006 - 9:39 am: |
| 
|
धन्यवाद लोपा, बापु आणि कांदु!( कुठे होतास रे इतके दिवस?) लोपा स्व खुप छान आहे. पण तुझ्या आठवणींच्या सावलीतील शब्द फार सुंदर आहेत. सांजसखी हात हातात घेते, ही कल्पनाच खुप आवडली! चौकटच्या राजा, मस्त! सारंग, मीनु, मृ छान. मृ, तुझ्या कवितेतील " दहीवराच माझ मन " काही कळले नाही ग. कविता छान आहे पण. princess कशी झाली मुंबापुरीची ट्रीप? मी देखील फिरुन आले. त्यामुळे बरेच पोस्ट वाचत आहे अजुन.
|
चिन्नु, कविता आवडली हे एकुन खुप बरे वाटले. दहिवर म्हणजे दवबिंदू....म्हणजे माझं मन दवबिंदूसारखं पानांवर मोठ्या अपेक्षेने उतरतं पण.त्याला काही क्षणांचाच सहवास लाभतो आणि त्याचं अस्तित्व संपते... पुन्हा भेटू.
|
Princess
| |
| Friday, July 07, 2006 - 1:24 am: |
| 
|
चिनु, छानच झाली ग माझी मुंबई ट्रिप. पण पावसाने अगदी थैमान घातलय तिथे. तिथल्या पावसावर कविता करा की कुणीतरी. तु कुठे फिरुन आलीस? मृ दहिवर शब्द अर्थ कळल्या नंतर खुप आवडला
|
P RINCESS, आपली मराठी अशा खुप सुंदर शब्दांनी समृद्ध आहे. अजून एक शब्द सांगते.. रातवा-म्हणजे रात्रीचा पाऊस..जो सध्या खुप पडतो आहे. so enjoy the rain n take care
|
Chinnu
| |
| Friday, July 07, 2006 - 9:20 am: |
| 
|
मृ, फार सुंदर शब्द आहेत तुझ्या कवितेत. फार घनाआशय आहे. princess , मी इकडे 4 July च्या निमित्ताने भटकुन आले ग. मृ, लिहित रहा ग.
|
मृदगंधा...कवितेतील दुसरी ओळ नवी उपमा घेउन येते... छान आहे कविता आवडली खुप..!!! अजुन येउ दे..!!!
|
आशु, रुपाली-राहुल, अस्मानि, मृद्गंधा, चिन्नु, ... तुम्हा सर्वांचे आभार ! कळावे. आपला लोभ असाच वाढू द्या... चौकटचा राजा
|
मृद्गंधा, कविता फार छान आहे. विशेष म्हणजे मला तू वापरलेले शब्द खूप आवडले. तू म्हणतेस ते अगदि खरं आहे. आपली मराठी भाषा आहेच खरी श्रीमंत ! तुझ्या पुढच्या कवितांची वाट पाहतोय... चौकटचा राजा
|
चिनु,लोपा,चौकटचा राजा, खुप खुप आभारी आहे.मला प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद. मी सुद्धा तुमच्या कवितांची वाट पहात आहे.
|
लोपामुद्रा,चिनु, princess ,चौकटचा राजा हि माझी आणखी एक गजल राम भोगतो आहे इथं वनवास रावण हुंगतो आहे अत्तरांचा सुवास एव्हढ्या सोसल्या आहेत ऊन्हांच्या झळा आठवतही नाही गत आयुष्याचा मधुमास रोज नवे अश्रु पिऊन हसायचंच आहे कधी संपणार असा हा वेदनेचा प्रवास ओरडूनही न ऐकणारे जणू बहिरेच ते करु नकाच हुंदक्यांनो बोलण्याचा प्रयास -मॄद् गन्धा [सुप्रिया]
|
Asmaani
| |
| Saturday, July 08, 2006 - 2:05 pm: |
| 
|
म्रुद्गंधा, उत्तमच आहे तुझी गझल.
|
अस्मानी धन्यवाद.तुझ्याही कविता वाचल्या मी खुप आवडल्या..सगळ्यांच्याच कविता खुप खुप छान आहेत..मी तर खुप लहान वाटले मला तुम्हा सर्वांपुढे...मला खुप काही शिकायला मिळेल इथं take care
|
Athak
| |
| Sunday, July 09, 2006 - 1:11 am: |
| 
|
ओह हा खजिना लुटायला वाचायला बरेच दिवसांनी फिरकलो , मनापासुन लुटला ग्रेट ग्रेट असेच छान छान लिहीत रहा
|
करु नकाच हुंदक्यांनो बोलण्याचा प्रयास\.....\>>>>> mast..!!!
|
|
|