|
Mi_anu
| |
| Friday, July 07, 2006 - 7:22 am: |
| 
|
परवाच बोलता बोलता बोलून गेले , 'अगं लिंबू फ्रिजमधे त्या भाज्यांच्या डिरेक्टरीमधे असतील. शोध जरा.' संगणक आणि एकंदर गतीची इतकी सवय व्हावी? दुचाकी तर जणू बुडाला चिकटलीच आहे. कोपर्यावर जायचं तरी दुचाकी लागते. नशिब, की अजून घरात दुचाक्या आणि सायकलने एका खोलीतून दुसर्या खोलीत जायची पद्धत नाही आली! कधी पायी चालायची वेळ आली तरी वेग पिच्छा सोडत नाही, आणि पुढे चालणार्यांना ओलांडून पुढे जाताना हात नकळत 'इंडीकेटर' चं बटण चाचपायला लागतात. छानसं आवडीचं पुस्तक वाचताना 'कंट्रोल एफ' दाबून काहीतरी शोधावंसं वाटतं. हातनं लिहायची कधी वेळ आलीच तर 'इनसर्ट', 'डिलीट' आणी 'कॉपी' 'पेस्ट' कळा दाबाव्याश्या वाटतात. कुकरातला भात शिजला नाही तर परत भात रिकंपाईल करावासा वाटतो. हल्ली स्पेलिंग आपसूक आठवत नाहीत. पटकन 'वर्ड' उघडून स्पेलचेक वर टंकीत करुन बघावंसं वाटतं..सामान पिशवीत मावलं नाही तर 'झिप' करुन परत पेस्ट करावंसं वाटतं. बापरे, काय झालंय मला? माझा डोक्याचं हे व्हर्जन रिसायकल बिन मधे टाकून नविन व्हर्जन इन्स्टॉल करायची वेळ आलेली दिसतेय!
|
Maudee
| |
| Friday, July 07, 2006 - 9:05 am: |
| 
|
माझंही असं होतं. रस्त्याने चालत जात असताना जर fast जायच असेल तर मागून कोणी वाहन तर येत नाहीये ना हे बघायला आरशात बघायचा प्रयत्न करते.
|
>>>> 'अगं लिंबू फ्रिजमधे त्या भाज्यांच्या डिरेक्टरीमधे असतील. शोध जरा हे वाक्य वाचल अन मला हुडहुडी भरली! पण लिम्बू आणि भाज्यान्ची (रेसिपीची) डिरेक्टरी... बात कुछ जची नही... इकडचे लिम्बू मोस्टली व्ही & सीच्या डिरेक्टरीत सापडते.... किन्वा कुठल्याही बीबीवर वादाच्या भोवर्यात.... तर ते जावुदे....! छान लिहिल हेस! अशा असेन सवई अन्गवळणी पडलेल्या असतात, आणि परिस्थितीत जरा बदल झाला की फसगत करतात! त्या विषयीचे अनुभव इथे लिहायला हरकत नाही! माऊडी, अगदी सेम हिअर! अन हे जेव्हा झाल तेव्हा मला वाटल की मला थोड थोड वेड लागत हे की काय! क्षणभर दचकलो होतो!
|
Meenu
| |
| Saturday, July 08, 2006 - 2:10 am: |
| 
|
खरं ग अनु पुस्तक वाचताना ctrl F मला पण करुस वाट्ट .. आणी चालत जातानाही one way बघणे, हात दाखवणे असे मजेशीर प्रकार होतात
|
आमच्या घरी एक मोठे कारपेट आहे. अंथरूण घालताना सगळ्यात खाली आम्ही ते अंथरतो. एकदा आमच्या घरातले मी आणि भाऊ सोडून सगळे गावी गेले होते. त्यामुळे एवढे मोठे अंथरूण करायची गरज नव्हती पण सवयीने माझ्या भावाने ते मोठे कारपेट अंथरले. मी म्हटले अरे आज याची काय गरज? Undo कर.. Undo कर! तर तो म्हणाला की मग मला काय सांगतोस दाब की कंट्रोल झेड! दुसरे म्हणजे, एकदा सकाळी सकाळी ऑफिसला येऊन PC चालू केला तर लक्षात आले की माझा माऊस चालत नाहीय. मला डेट select करायची होती पण माऊस response देत नव्हता. असा वैताग आला! मी हार्डवेअरला फोन करून ताबडतोब नवा माऊस घेऊन यायला सांगितले. आणि माझ्या लक्षात आले की मी माऊस फिरवतोय, क्लिक करतोय, सगळं खरंय पण मी ज्या कॅलेंडरमध्ये बघत होतो ते कॅलेंडर माझ्या मॉनिटरच्या शेजारी डेस्कवर ठेवलेले होते!
|
अब्बे जीडी, पण त्या हार्डवेअर वाल्याला पुन्हा फोन केला की नाही की येवु नको म्हणुन? की बॅकस्पेस मारून त्याला हकलवलास?
|
Ayogita
| |
| Saturday, July 08, 2006 - 6:16 am: |
| 
|
इथे आल्या पसुन काहि न करता फ़क्त नळा खाली हात धरला की पाणी येण्याची इतकी सवय झालिए. एकदा मी handwash च्या बाटली तुन साबण येतो त्याच्या खाली हात धरला होता आपोआप साबण येण्याची वाट बघत.......
|
Meggi
| |
| Saturday, July 08, 2006 - 1:43 pm: |
| 
|
मी पण एकदा बराच वेळ दारासमोर उभे रहिले होते, दार आपोआप उघडायची वाट बघत घरात एखादि गोष्ट सापडलि नाही कि Ctrl + F चि नक्कि आठवण होते
|
Swara
| |
| Saturday, July 08, 2006 - 8:45 pm: |
| 
|
अगदी असंच होत माझ पण. एक अजुन non technological गंमत म्हणजे... मी उन्हातून drive करत येते अणि garage मध्ये चाचपडत विचार करते की प्रकाश इतका मन्द का. मग मझी tube पेटते की आपण अजून sunglasses काढलेले नहीत. Long drive मध्ये कित्येकदा दुपरी लावलेले sunglasses दिवेलागण झाल्यानंतर पर्यन्त ठेवण्याच्या सवयीमुळे मला lady in black चिडवतात
|
|
|