Bgovekar
| |
| Saturday, July 01, 2006 - 6:20 am: |
| 
|
नादमय शाश्वत सत्याची ओळख पटली तर नक्कीच इथे फरक हा उरणारच नाही कसला. छान लिहीलं आहेस. सुमती बर्याच दिवसांनी? खरीच नववधु गुलमोहरला भेट देतेय का?
|
बापरे.... खूप काही येवून गेलंय की! नादमय, अप्रतिम! अर्चना, खूप सुंदर! अस्मानी, मान गये!
|
स्व असावे भुरके आभाळ.. माथ्यावर आणि टिमटिमती चांदणी दारी.. होता साकाळ.. मन सामोरे जावे आभाळ.. त्याच्या पांढुरक्या पंखातुन.. मी झेप घ्यावी क्षितीजा पल्याड...!!! असावे नितळ.. निर माझ्या सख्याच्या नयनी.. ठाव लागावा त्याचा प्रत्येक अवघड क्षणी. टिपुन घेइन सारे दुख्: प्रतिबिंबेन तीथे फक्त सुख्: अंतरंगात मिसळुन मी जाइन सार्या स्पर्शा पल्याड..!!! असावे स्वप्न रंगांचे.. रंगवणारे क्षण देणारे.. सत्यात आणिन सारे रंग.. जरी पाषाणही आला पथात त्यातुन उमलुण येणारे.. मी जाईन दंग होउन.. त्यात " स्व " पल्याड..!!!
|
आठवणींची सावली सारी फुले अबोल झाली.. फ़िक्कटस हसुन.. थोडेसे रुसुन.. वाट पाहु लागली.. ओळखीची झुळुक.. गाली हसली नाही.. दारातली जाई.. सुध्दा बरसली नाही क्षणो क्षणी.. अंगणी पावलं वाजु लागली... मी कुणाची.. चाहुल घेउ लागली.. दिन उतरत निघाला.. सांजेच्या सखीने हात हाती घेतला.. पाहुन क्षणभर मज हेवा वाटला.. अवेळीच कसा हा हळवेपणा दाटला.. अजुन नाही म्हणत.... व्याकुळ.. वाट झाली उदास करुन गेली.. तुझ्या आठवणींची सावली....!!!
|
Princess
| |
| Tuesday, July 04, 2006 - 1:45 am: |
| 
|
वाह लोपा... नेहमीप्रमाणेच छान. "असावे नितळ नीर माझ्या सख्याच्या नयनी" वाह वाह. आठवणींची सावली सुद्धा नेहमीप्रमाणेच सुंदर. खुप दिवसात मायबोली वर चक्कर मारली नाही. मुंबईला गेले होते. आता मायबोलीवरच्या सगळ्या कविता वाचुन कढतेय. धमाल येतेय.
|
Lampan
| |
| Tuesday, July 04, 2006 - 3:03 am: |
| 
|
छान !! मस्त आहेत दोन्ही कविता
|
Zaad
| |
| Tuesday, July 04, 2006 - 4:38 am: |
| 
|
आठवणींची सावली मनावर पसरली.....
|
पाऊस पाऊस येतो, पाऊस येतो आणि.... कोसळत राहतो.... सारा आसमंत न्हाऊन निघतो, अवघी सृष्टी चैतन्यमय होऊन जाते.... ओल्या मातीचा घमघमाट... ओल्या पाखरांचा चिवचिवाट... पण,...पण अशा ह्या ओलेत्या क्षणीच माझ्या मनाचा एक दुखरा कोपरा हळहळत राहतो ! माझ्या मनाचा एक दुखरा कोपरा हळहळत राहतो आणि मीही आतल्या आत कुढत राहतो ! अशातच दबल्या पावलांनी चालत येते कातरवेळ मग मनात सुरू होतो माझ्या-तिच्या आठवणींचा बनेल खेळ विविध रूपे घेऊन ती सामोरी येत राहते आणि आधीच हळव्या झालेल्या मला छळत राहते कधी जागवते ती तिच्या ओलेत्या स्मृती तर कधी नाचत राहते फेर धरून अवती भवती रुसून बसते कधी उगाचच तर समजून घेते कधी माझ्या चूका माझीच सावली होऊन.... मातीच्या सुवासाने घमघमून निघते ती आणि मग मलाही खुणावत राहते पावसात तिची कळी खुदकन खुलते आणि माझ्याही जीवनात सुखाची कस्तुरी उधळत राहते चर्र र्र... कुठून तरी एक आवाज येतो असा स्वप्नांत दंगलेलो मी दचकून होतो वेडापिसा मग हळूच ठुसठुसतो मनाला लागलेला चटका माझ्या स्वप्नांच्या गावाला बसतो जहरी झटका.. मग जाणवते, अरे ह्या सार्या तर आता निव्वळ आठवणी आता अजिबात नाहीये माझं कुणी ! डोळ्यांत डोकावतात क्षणभर " दोनच " अशृ पण.... पण तेही वाहून जातात पावसाच्या झोतात आणि मागे ठेवून जातात दोन उदास डोळे घेऊन त्यांत भाव भोळे मी माझा मीच कावराबावरा होतो नि दचकून आजूबाजूला पाहतो.... .... पाऊस.... अजूनही सुरूच असतो, फक्त त्याचा जोर अंमळ वाढलेला असतो..... चौकटचा राजा
|
Aashu29
| |
| Tuesday, July 04, 2006 - 11:26 am: |
| 
|
अप्रतिम जमलिये पाउस कविता!!
|
Dineshvs
| |
| Tuesday, July 04, 2006 - 12:40 pm: |
| 
|
लोपा, या स्वः ला सामोरे जा, परत नव्याने भेट होईल.
|
चौकटचा राजा अप्रतिम पाउस कविता ...! truly ultimate
|
Meenu
| |
| Wednesday, July 05, 2006 - 1:41 am: |
| 
|
मागणं मी पत्र लिहीते तेव्हाच माहीत असतं मला तुझं उत्तर येणार नाहीये तरीही शब्द थांबत नाहीत मीही भावना बांधत नाही त्याच्याशीही मी असच बोलत असते काही बाही कधी कधी तो पण उत्तर देत नाही माझ्या अपेक्षांच ओझही वाटुन घेत नाही तरीही मी बोलते , मागते वाट्टेल ते अगदी दुसर्या कुणाला दुखवुनही माझ्या मनासारख व्हावं असही मागते मिळालं नाही की रडत रात्र रात्र जागते नव्या उगवणार्या दिवशी ईतकच म्हणते त्याचं खुप खुप प्रेम आहे माझ्यावर ..... आणि तुझही कदाचीत ....
|
माझा एक प्रयत्न रोज रोज तुझी वाट पहात रहाणं कंटाळवाण असत अस उदासवाणं रहाण एकदा तुला याबद्द्ल शिकवायचाय मला धडा लवकरच पोहोचलीय सांगुन उशीर करायचाय थोडा आडोश्याला लपुन बघायचीय जरा गंम्मत त्रास देउन तुला मला करायचीय जंम्मत तेव्हा कळेल तुला माझ्या मनाची अस्वस्थता घडेल तुला अद्दल समजेल मनाची अवस्था रुप...
|
लोपा दोन्हि कविता खुपच छान >>>डोळ्यांत डोकावतात क्षणभर " दोनच " अशृ पण.... पण तेही वाहून जातात पावसाच्या झोतात आणि मागे ठेवून जातात दोन उदास डोळे घेऊन त्यांत भाव भोळे मी माझा मीच कावराबावरा होतो नि दचकून आजूबाजूला पाहतो.... <<<< चौकटचा राजा मस्तच कविता मीनु सुरेख
|
Sarang23
| |
| Wednesday, July 05, 2006 - 6:34 am: |
| 
|
मी बेअक्कल... माणुसघाणी झाली अक्कल... टाळाटाळीसाठी शक्कल! भूषण त्यांना वाटे याचे - "गळ्यात माझ्या आहे बक्कल!" पहा विचारी माणुस आला... पुरावा धरा त्याचे टक्कल!!! जाळु नका मज, मेलो नाही... ही मुडद्याची होती नक्कल! मलाच का हे प्रश्न ग्रासती? खरेच मी आहे बेअक्कल! सारंग
|
Meenu
| |
| Wednesday, July 05, 2006 - 12:16 pm: |
| 
|
सारंग छान लिहीलं आहेस रे ... अतृप्त सुखात असताना सुख टोचतं दु:खात असेल तर तेही बोचतं काहीच नसेल तर सुनं सुनं वाटतं ... घरात असेल तर लांब जाव वाटतं लांब असेल तर घरी यावं वाटतं गर्दीत उगीच एकटं रहाव वाटतं .... पावसाळ्यात वाटते थंडी बरी थंडीत आठवते उन्हाळ्याची उब उन्हाळ्यात खुणावती पावसाच्या सरी ...... माणसाची अशी गंम्मत भारी बायकोही वाटते दुसर्याचीच बरी स्वप्नात तीसरीच स्वर्गीय परी कितीही शिकलं तरी याची पाटी कोरी ..........
|
Asmaani
| |
| Wednesday, July 05, 2006 - 12:49 pm: |
| 
|
सारंग, चौकटचा राजा, रुपाली, सुरेख कविता!
|
Chinnu
| |
| Wednesday, July 05, 2006 - 9:03 pm: |
| 
|
भरुन आले नभ विचारांची दाटी झाली आठवांचे शब्द लेवुन भरजरी मनाच्या कपाटी अवतरली तु दिलेल्या खुणा पैंजण सावरीत होते गुणगुणले मीही जराशी हातात तुझे गीत होते! अंधारुन आलेही मग नर्तनात रत पाऊस होता छत्रीखालच्या ओंजळीत चिमुकला थेंब स्तब्ध निजला होता! ती वेडी धडधड हृदयाची अन स्पर्श तुझा ओला थेंबाथेंबात ओवुन घेत माझा पाऊस श्रीमंत झाला!!
|
छत्रीखालच्या ओंजळीत चिमुकला थेंब स्तब्ध निजला होता>>>>>..kaay sundar lihilay...chinu!!! sarang...,rupali... mast aahet kavitaa..!!!
|
namaskar. mi ethe navin ahe.mala asha ahe ki tumhi mala tumachya groupmadhe samil karun ghyal.dhanyawaad.
|