Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
मामा

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » आषाढ » ललित » मामा « Previous Next »

Moodi
Thursday, July 06, 2006 - 4:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मामा..

मागच्या आठवड्यात घरी फोन केला अन नको ती बातमी कळली. मामा गेला गं.. आईच्या या बोलण्यावरच मला शक्तीपात झाल्यासारखे वाटले, घरच्यांपासुन एकतर अशा वेळी लांब मग ही अस्वस्थता जास्त वाटली.
आठवणी दाटुन आल्या.

कसे असते ना एवढे सगळे नातेवाईक असतांना आपला मामाच लाडका असतो. अगदी लहानपणापासुन " मामाच्या गावाला जाऊ या " हेच गाणे आईकडुन ऐकलेले असते. मामा लाड करणारच हे गृहीत धरलेले असते. माझी मावशी तर मला पहायलाच मिळाली नाही, ती आजारपणामुळे आधीच गेली. सगळ्या भावंडात आई धाकटी.

आई जेव्हा 14-15 वर्षाची होती तेव्हाच पितृछत्र हरपले अन मग सगळी भावंडे सोलापूर सोडुन पुण्यात आली. मग दुसरा धक्का होता पानशेतच्या पुराचा. कष्टाने गोळा केलेले, कमावलेले पुराने गिळुन टाकले. पण माझ्या मामांनी अन आईने जिद्द नाही सोडली. याच वेळी कणखरपणा आवश्यक होता. त्यामुळे सर्व भावंडे एकमेकाला धरुन राहिली.

मामाने आहे त्या परिस्थितीत कधी कमी नाही केले. मला अन माझ्या मामेबहिणीला सुट्टीत सारखे पिक्चर पहायची सवय, मग काय अलका टॉकीज पासुन राहूल पर्यंत सगळीकडे मामाच येणार. सारसबाग तर नेहेमीचा कार्यक्रम. मोठे झाल्यावर मात्र मी अन माझी मामेबहिण दोघीच फिरायचो.

मामाने मुलीला व्यवहारी ज्ञान मात्र भरपूर दिले. ती कॉमर्सच्या पहिल्या वर्षाला होती तेव्हापासुनच नोकरी करायला लागली. जीवनाच्या धडपडीतुन माणसाला पुढचे खरच खूप शिकावे लागते, पाण्यात पडलो आहोत ना, मग हात पाय मारावे लागतीलच, गळुन जाऊन कसे चालेल? मामाने हाच दूर दृष्टीकोन ठेवल्याने बर्‍याच अडचणी कमी झाल्या.

मामाच्या हातात जबरदस्त कला होती, अतिशय सुंदर चित्रे काढत होता. रंगसंगतीची अचुक जाण होती. तसेच संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते. श्लोकांचा अर्थ नेहेमी अगदी सोप्या भाषेत समजाऊन सांगायचा.
माझ्या वडिलांना प्रतिकूल परिस्थितीतुन त्याने बाहेर काढले.काकांपेक्षाही माझा मामाच त्यांना जवळचा होता. सोशल पण तेवढाच होता. आजुबाजुच्या लोकांना पण तो जवळचा वाटायचा.

मागच्या दिवाळीत त्याची भेट झाली. परदेशातुन भेटायला घरी जायचे म्हणजे वर्षाचे अंतर. फोनवर बोलणे हेच समाधान. आता जाईन तेव्हा मामा नसेल, एक माहेरपणाचा दुसरा आधार नसेल हीच एक बोच. जाणार्‍यांना जायचे असतेच पण ते हळव्या आठवणी ठेऊन जातात. मामाच्या स्मृतीला हीच माझी श्रद्धांजली. देव त्याला शांती देवो...


Mukman2004
Thursday, July 06, 2006 - 5:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडी, तुझ्या मेल ला उत्तर देणारच होते. वाईट वाटल तुझ्या मामां बद्दल वाचुन.
माणस जातात पण त्याण्च्या आठवणी आपल्या सोबतच असतात. तोच काय तो आपल्याला आधार
Take Care


Rupali_rahul
Thursday, July 06, 2006 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडीताई वाचुन फ़ार वाईट वाटल. धीराने घे, सांभाळ स्वताला...

Savani
Thursday, July 06, 2006 - 9:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, वाईट वाटलं तुझ्या मामांचं ऐकून.
पण त्यान्च्या इतक्या छान आठवणी तर आहेत ना तुझ्या जवळ.


Chinnu
Thursday, July 06, 2006 - 10:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडी, खरच मामालोक लहान्पणापासुन हट्ट पुरवतच असतात. धीराने घे ग.

Arch
Thursday, July 06, 2006 - 11:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, जवळच माणूस गेल की काळच त्यावर औषध असत. सगळ्यांपासून दूर रहाण्याच्यातला आणखी हा केवढा मोठा तोटा न?
तुझ्या मामाच्या आत्म्याला शांती लाभो



Zee
Thursday, July 06, 2006 - 11:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, तुझा वरचा लेख किती बरोबर आहे.. आपण लहानपणा पासुन अगदी ग्रुहीत धरतो की मामा म्हणजे हक्काचा..धिराने घे..वाईट वाचले वाचुन.

Nalini
Thursday, July 06, 2006 - 11:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडी, काय बोलु गं?
अगं दुर असलं कि वाटतं तिथे असतो तर? आणि तिथे असताना तर प्रिय व्यक्ती शेवटचा श्वास आपल्या समोर घेते आहे हे पहाणं खुप अवघड जातं... तेच आणि तेच आठवत रहातं.
आपण काहिच करु शकलो नाही हेच शल्य बोचत रहातं.
आता आयुष्यभर फक्त आठवणींना ऊजाळा द्यायचा.
तुझ्या मामांच्या आत्म्यास शांती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.



Dineshvs
Thursday, July 06, 2006 - 12:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडि, मामाचे एक मानसचित्र नाहि का काढता येणार ? प्रयत्न केल्यास नक्कि जमेल.
मामाकडुन वारसा मिळाला असेलच कि.


Megha16
Thursday, July 06, 2006 - 3:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडी,
काय प्रतिक्रिया देऊ तेच सुचत नाही.
नलीनी म्हणते ते बरोबर आहे एकदम. " दुर असल की वाटत जवळ असते तर किती बर झाल असत, जवळ असतो तेव्हा जवळ असुन काही करु शकत नाही, याच वाईट वाटत.
दिनेश दा ची कल्पना छान आहे.


Limbutimbu
Thursday, July 06, 2006 - 11:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अस नेहेमीच दुःखदायक असत! नो वे! काळ हाच ते दुःख विसरण्यावरचा उपाय!

Raina
Friday, July 07, 2006 - 3:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडी,
मामा आणि मामाच्या गावाच्या आणि रोज रोज शिकरण करणा-या सुगरण मामीच्या सान्निध्यात तर आपल्या कित्येकांच्या किती सुट्ट्या गेल्या आहेत नाही
आता फक्त उरल्या सगळ्या त्या आठवणी..
Take Care.


Moodi
Friday, July 07, 2006 - 8:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थॅंक्स सगळ्यांना सांत्वनाबद्दल. आठवणींरुपे माणूस रहात हे पण पुष्कळ नाही का!

दिनेश मला एवढे जमत नाही हो, पण पुढे पुण्यात गेल्यावर मामाने काढलेली चित्रे इथे टाकेन.


Jayavi
Saturday, July 08, 2006 - 2:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, आपलं माणूस गेल्यावर फ़क्त त्याच्या छान छान आठवणीची साथ सोबत असतेच गं. तीच आपली शिदोरी समजायची. सांभाळ हो!!

Kandapohe
Saturday, July 08, 2006 - 3:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडे ईश्वर मामाच्या आत्म्यास शांती देवो!!

खरच मामा हा सगळ्या नातेवाईकात सर्वात जवळचा वाटतो.


Gajanandesai
Saturday, July 08, 2006 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी वाईट वाटले. आणि खरंच सगळ्या नात्यांत हे नातं खास असतं.

Sampada_oke
Thursday, July 13, 2006 - 11:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, आजोळ आणि त्यात सुद्धा मामा म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा विषय. मामांबद्दल छान लिहिलंयंस. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना.

Aj_onnet
Tuesday, July 25, 2006 - 9:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, वाईट वाटले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. आज खूप उशीरा हा लेख वाचला. मामा म्हणजे खरेच खूप जवळचे अन हक्काचे नाते असते!




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators